The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

पाण्यावर चालणाऱ्या वाहनाचे संशोधन आणि संशोधक कसे गायब झाले हे अजूनही रहस्य आहे

by द पोस्टमन टीम
8 September 2023
in इतिहास, विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
A A
0

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगभरातील वाहनांची वाढती संख्या पाहता, गाडीत चुकीचे इंधन भरले जाण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. पेट्रोल ऐवजी डिझेल, डिझेल ऐवजी पेट्रोल. इथपर्यंत ठीक आहे, मात्र जर इंजिनमध्ये इंधनाऐवजी पाणी भरलं तर? या फास्ट फॉरवर्ड जगात वेळेची आणि इंधनाची वाढती किंमत पाहता त्यात हा इंजिनचा खर्च खिशाला कात्रीच की! मात्र जर खरंच नगण्य किमतीत मिळणाऱ्या पाण्यावरच वाहनं चालली असती, तर..?

१९७३ साली ऑइल क्रायसिसमुळे सौदी अरेबियाने अमेरिकेचा इंधन पुरवठा बंद केला. यामुळे महासत्ता असलेल्या अमेरिकेला प्रचंड अग्निदिव्यास सामोरे जावे लागले. इंधनाच्या किमती चढ्या दराने वाढत होत्या. ऑटोमोबाईल उद्योग तर बंद होण्याच्या मार्गावर होते. वाहनांची मागणी अगदी नगण्य होती आणि अर्थातच सर्व संस्थाही दिवाळखोर झाल्या होता.

त्याच काळात एका अवलियाने जीवाश्म इंधनाला पर्याय शोधण्याच्या प्रयत्नात चक्क ‘वॉटर पावर्ड कार’चा शोध लावला. तेव्हाही आणि आताही अगदी स्वप्नवत वाटणारा शोध.  ‘वॉटर फ्युएल सेल’ हे त्याचे वैज्ञानिक नाव. हा अवलिया म्हणजे ‘स्टॅन्ली ऍलन मेयर’.

२४ ऑगस्ट, १९४० रोजी कोलंबसच्या पूर्वीय भागात स्टॅन्ली मेयेरचा जन्म झाला. स्टॅन्ली जुळ्या मुलांपैकी एक होता. स्टीफन मेयर हा त्याचा भाऊ. स्टीफनच्या म्हणण्यानुसार दोन्ही भावंडांना सतत काहीतरी नवीन बनवण्याची आवड होती, अगदी त्यांची खेळणी देखील ते स्वतः बनवत.

स्टॅन्ली लहानपणापासूनच बुद्धीने तल्लख आणि सर्जनशील होता. स्टॅन्लीचे शोध हे काळाच्या पुढचे होते. त्यामुळे बऱ्याचदा लोकांना तो विक्षिप्त वाटायचा. समुद्रशास्त्र, इलेक्ट्रॉनिक बँकिंग, हार्ट मॉनिटर अशा जवळपास २ लाख पेटंट्ससाठी त्याने अर्ज केले होते. १९८९ पर्यंत स्टॅन्लीला इतकी पेटंट्स मिळाली होती की, ऑफिस रिसोर्स वाचवण्यासाठी यू. एस. पेटंट ऑफिसने त्याला फास्ट-ट्रॅक प्रोग्रामवर ठेवण्याचा निर्णय घेतला.

मात्र या सर्व कल्पना आणि विलक्षण बुद्धीचातुर्याशिवाय स्टॅन्लीच्या जीवनावर परिणाम करणारे संशोधन ठरले ते म्हणजे ‘वॉटर पावर्ड सेल’. 

‘वॉटर फ्युएल सेल’ पाण्याचे दोन घटक – हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांना कथितपणे विभाजित करण्याचे कार्य करते. ऊर्जा निर्माण करण्यासाठी हायड्रोजनचे ज्वलन केल्यास एक्झॉस्ट पाइपमधून ऑक्सिजन बाहेर पडतो आणि दुसऱ्या युनिटमध्ये पाण्याच्या रेणूंची पुनर्रचना होते. मेयरच्या मते, या इलेक्ट्रोलिसिससाठी वैज्ञानिक प्रक्रियेत सांगितलेल्यापेक्षा कमी ऊर्जा लागत असे. जर ही यंत्रणा काम करत असेल, तर थर्मोडायनॅमिक्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या नियमांचे उल्लंघन करते.

हे देखील वाचा

हा आहे स्टार्ट-अप्सच्या जगातील आजवरचा सगळ्यांत मोठा स्कॅम..!

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

धूम्र*पान विरोधी चळवळ राबवणारा हिट*लर कोणे एकेकाळी चेन स्मो*कर होता!

आणि काही महिन्यात स्टॅन्लीला हे वॉटर फ्युएल सेल बनवण्यात यश मिळाले. ओहीयो टीव्ही चॅनलच्या एका बातमीत मेयरने भव्य चाके असलेल्या बीच बग्गीचे प्रात्यक्षिक दाखवले. त्याचा असा दावा होता की गाडीत त्याने बनवलेले वॉटर फ्युएल इंजिन आहे. केवळ ८३ लिटर पाण्यावर ही बीच बग्गी लॉस एंजलिसपासून न्यू यॉर्क शहरापर्यंत चालली असा मेयरने दावा केला होता. काही प्रत्यक्षदर्शी अगदी या कारची प्रशंसा करतात तर काहींना ही कार खरच पाण्याच्या इंजिनवर चालते कशी?, त्या इंजिनचे वास्तविक कार्य काय? असे प्रश्न देखील होते.

स्टॅन्ली मेयरचा हा शोध खऱ्या अर्थाने त्यावेळी चमत्कारापेक्षा कमी नव्हता. या संशोधनाच्या जोरावर स्टॅन्लीने सर्वांना आकर्षित करून घेतले. एखाद्या संशोधकासाठी इन्व्हेस्टर, प्रसिद्धी, आकर्षण मिळवणे सुदैवाचेच. मात्र स्टॅन्लीच्या बाबतीत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. कारण, इथून पुढे मेयरचा जगाशी जणू संघर्ष सुरू झाला.

बऱ्याच कंपन्या आणि उद्योजकांनी भरभक्कम पैसे ओतून त्याची यंत्रणा खरेदी करण्याचा प्रयत्न केला. काहींनी त्याच्या संशोधनाचे संपूर्ण पुरावेच नष्ट करावे यासाठी देखील मेयरकडे बोलणी केली. काही तेल कंपन्यांना मेयेरचा हा शोध त्यांच्या उद्योगावर सावट बनू पाहणारा वाटला. प्रत्यक्षात हा शोध स्टॅन्लीच्या आयुष्यातच वादळ घेऊन आला.

ज्या दोन गुंतवणूकदारांना मेयरने त्याच्या वॉटर फ्युएल सेलमध्ये व्यवसाय करण्याची मुभा दिली होती, त्याच दोन गुंतवणूकदारांनी १९९६ साली मेयेरचा शोध फसवा असल्याचे आरोप केले. या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आणि त्याच्या कारची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञ साक्षीदार म्हणून मायकेल ला्ँफ्टॉन यांची नेमणूक करण्यात आली. परंतु मेयरने मायकेलच्या अधिपत्याखाली तपासणीला विरोध केला. त्यामुळे तपासणीसाठी एका तज्ज्ञ समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने मेयेरच्या वॉटर पावर्ड सेलमध्ये काहीही क्रांतिकारी अथवा नावीन्य नाही, ही केवळ पारंपरिक इलेक्टरोलिसिस प्रक्रिया असल्याचे कोर्टासमोर सांगितले. त्यानुसार कोर्टाने मेयेरला आरोपी ठरवून ‘त्याने घोर आणि गंभीर फसवणूक केली आहे आणि गुंतवणूकदारांना २५ हजार डॉलरची नुकसान भरपाई द्यावी’ असा निकाल जाहीर केला. स्टॅन्लीच्या समस्या इथेच थांबल्या नाहीत. मेयर या अडचणींवर मात करत त्याचा प्रकल्प यशस्वीरीत्या जगासमोर मांडण्यासाठी प्रयत्नशील होता. कारण, मेयर आणि त्याचा भाऊ स्टीफन यांना हा तत्कालीन क्रांतिकारी शोध असल्याची यथार्थ खात्री होती.

याच प्रकल्पानिमित्त अमेरिकेच्या एका गुंतवणूकदाराला भेटण्यासाठी मेयर बंधू हॉटेलमध्ये मेजवानीवजा बिझनेस मिटींगला गेले. तेथे एक वेटर स्टॅन्लीसह चौघांना ज्यूस सर्व्ह करतो. ज्यूसचा घोट घेता क्षणी स्टॅन्ली उठतो, वेड्यासारखा करत घसा पकडून विव्हळत विव्हळत बाहेर पडतो. सैरावैरा पळत सुटतो, पार्किंगमध्ये जातो आणि वेदनेने खाली कोसळतो. त्याच्या सोबत असणाऱ्या आपल्या भावाला तो शेवटी सांगतो, की ‘ त्यांनी मला विष दिलं आहे’. स्टॅन्लीचं हे शेवटचं वाक्य त्याच्या मृत्यूबद्दल प्रश्न, शंका उपस्थित करत कायमस्वरूपी राहील.

स्टॅन्लीच्या दुर्दैवी आणि अकस्मात मृत्यूने त्याची हत्या झाली असल्याची चर्चा आणि बातम्या पुढे येऊ लागल्या. तपास चालू झाला. या तपासातील प्रमुख अधिकारी स्टिव्ह यांनी सर्व पैलूंचे बारकाईने निरीक्षण केले. प्रत्यक्षदर्शी लोकांचे जबाब घेतले. विषप्रयोग झाला की नाही याचे परीक्षण केले. मात्र त्या अहवालातही ‘अमेरिकेला ज्ञात असलेल्या कोणत्याही प्रकारचे विष दिल्याचे आढळले नाही’ असे नमूद केले.

तपासात काहीही उघड झाले नाही आणि अवघ्या तीनच महिन्यांत ‘नैसर्गिक कारणांनी मृत्यू’ असे सांगून केसच बंद करण्यात आली.
स्टॅन्लीच्या मृत्यू नंतरही त्याच्या रहस्यमयी मृत्यूबाबत असंख्य तर्कवितर्क केले गेले. तर प्रमुख आणि मोठ्या तेल कंपन्या, १९९८ साली प्रसिद्ध असणारे ऑटोमोबाईल उद्योजक, किंवा त्या दिवशीचा तो रहस्यमयी गुंतवणूकदार.. सगळ्यांवर संशयाची सुई फिरते.

स्टीफनने सांगितल्याप्रमाणे स्टॅन्लीची बीच बग्गी त्याच्या मृत्यूनंतर आठवडाभरात काही अज्ञातांनी, गुंतवणूकदारांच्या साहित्यासह चोरली. तिचे पेटंट करून घेतले. मात्र काही दिवसात ती एका बंद दार आणि खिडक्या नसणाऱ्या खोलीत ठेवण्यात आली. सुरक्षेसाठी म्हणून नाही, तर तिच्या निर्माणबद्दल आणि वॉटर फ्युएल सेल सिस्टमबद्दल गुप्तता राहावी यासाठी.

काही जण असा सिद्धांत मांडतात की अशा क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळे भू-राजकीय संतुलन उलथून गेले असते. अमेरिकेचे कच्च्या तेलावरचे अवलंबित्व संपुष्टात येणे म्हणजे रशियाचे तेल क्षेत्र आणि मध्यपूर्वेतील धोरणात्मक महत्व देखील संपुष्टात आले असते. तसे पाहता आज मेयरच्या वॉटर इंजिनची उपयोगिता आणि महानता अनुभवास येते.

आज हायड्रोजन ज्वलनातून आपल्याकडे गाड्या बनवल्या जातात. ज्या हायड्रोजनचा स्रोत पाणी असतो. स्टॅन्लीच्या मृत्यूनंतर देखील त्याचा वॉटर पावर्ड कारचा प्रोजेक्ट कित्येक वर्षे कायद्याच्या चौकटीत अडकलेला एक विलक्षण विज्ञान प्रयोग बनून राहिला होता. आता मेयरचा पेटंट कालावधी देखील संपुष्टात आला आहे आणि त्याचे संशोधन सार्वजनिक अभ्यासासाठी सर्वत्र खुले आहे.

आपण माणूस म्हणून करत असणाऱ्या प्रयत्नांना आपणच कधीतरी मर्यादा लावल्या आहेत, काही प्रयत्न केवळ कालानुरूप नाही म्हणून प्रगतीची दारंदेखील बंद केली आहेत, ही प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. बाकी मेयरच्या रहस्यमय मृत्यू आणि विलक्षण शोधाकडे त्याची आवडती म्हण ‘प्रेईस द गॉड अँड पास द अँमुनिशन’ म्हणत डोळेझाक होतेय, की येत्या काळात आणखी काही पदर उलगडतायत हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आपल्याला मिळणारा ऑक्सिजन खरंच झाडांपासून तयार होतो का..?

Next Post

काय आहेत स्कॉटलँडमध्ये असणारे हे “बॉग्स” ? ज्यांचे जतन करणे आपल्याला फायदेशीर आणि तितकेच नुकसानकारक आहे.

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

हा आहे स्टार्ट-अप्सच्या जगातील आजवरचा सगळ्यांत मोठा स्कॅम..!

26 September 2023
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

25 September 2023
इतिहास

धूम्र*पान विरोधी चळवळ राबवणारा हिट*लर कोणे एकेकाळी चेन स्मो*कर होता!

25 September 2023
विज्ञान तंत्रज्ञान

आजही अनेक वैज्ञानिक त्यांचे वायरलेस इलेकट्रीसिटीचे स्वप्न सत्यात उतरवायच्या प्रयत्नांत आहेत..!

18 September 2023
इतिहास

हे आहेत जगाच्या इतिहासातील सर्वांत जास्त वेळ चाललेले वेढे..!

16 September 2023
विज्ञान तंत्रज्ञान

जेंव्हा “बिल गेट्स” मैलापाण्यापासून रिसायकल केलेले पाणी पितात..

11 September 2023
Next Post

काय आहेत स्कॉटलँडमध्ये असणारे हे "बॉग्स" ? ज्यांचे जतन करणे आपल्याला फायदेशीर आणि तितकेच नुकसानकारक आहे.

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2023

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

27 September 2023

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)