The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रक्ताचा एक थेंबही न सांडता हे युद्ध ३३५ वर्षे चाललं होतं

by द पोस्टमन टीम
21 March 2021
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


मानवी इतिहासात आजवर अनेक युद्धं झालेली आहेत आणि यातील बऱ्याच युद्धाबाबत आपण बरच काही वाचलेलं आहे. घनघोर युद्ध, अमानवी युद्धं, रक्तरंजित युद्ध, अशी कितीतरी युद्धाबद्दल आपण काही ना काही माहिती वाचलेली आहे.

आज आपण इथे सर्वाधिक काळ म्हणजे तब्बल ३३५ वर्षे चाललेल्या युद्धाबद्दल आपण माहिती घेणार आहोत.

हो! इतिहासातील हे सर्वाधिक काळ चाललेले युद्ध आहे. नेदरलँड्स आणि ग्रेट ब्रिटनमधील आईल्स ऑफ सिली दरम्यान झाले होते. या युद्धाची सुरुवात १६५१ला झाली आणि सांगता १९८६ ला.

पण, ३३५ वर्षे चाललेल्या या युद्धात रक्ताचा एक थेंबही सांडला गेला नव्हता. हे युद्ध जराही भयावह किंवा रक्तलांछित झाले नव्हते. रक्ताचा एकही थेंब न सांडता झालेले हे युद्ध खरे तर फक्त कागदी युद्ध होते.

कुणी एक गोळी झाडली नाही की कुणी कुणाच्या जीवावर उठले नाही आणि तरीही ३३५ वर्षे हे युद्ध सुरु होते कसे काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. या लेखातून तुम्हाला त्याचे उत्तर नक्कीच मिळेल.



या युद्धाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी इंग्लिश गृह युद्धाच्या इतिहासापर्यंत जावे लागेल. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या निधनानंतर राज्याची सूत्रे तिच्या चुलत भावाच्या म्हणजेच जेम्स स्टुअर्टच्या हातात गेली आणि पहिल्यांदा इंग्लंड, आयर्लंड आणि स्कॉटलंड ही सगळी राज्ये एका छत्राखाली आली. यामुळे अंतर्गत विवाद उफाळून आले आणि आयरिश विरुद्ध इंग्लिश आणि स्कॉटिश बंडखोर एकमेकांविरोधातच उभे ठाकले. सरदार घराण्यांनी राजाला पाठींबा दिला तर संसद सदस्यांना मात्र हा राजा अमान्य होता.

यात नेदरलँडने संसद सदस्यांना पाठींबा द्यायचे ठरवले आणि त्यांचा या इंग्लंडच्या गृह युद्धाशी काहीही संबंध नसताना त्यात ओढले गेले. नेदरलँडच्या पाठींब्यामुळे सरदार घराण्यांनीही आपापल्या तलवारी परजल्या.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

या सरदारांनी इंग्लिश खाडीतून जाणाऱ्या प्रत्येक डच जहाजाची अडवणूक केली आणि त्यांची लुटालूट सुरु केली. आता या सरदारांकडेही भरभरून येणाऱ्या जहाजांशी दोन हात करण्यासाठी खूप मोठे सैन्य बळ नव्हते. म्हणून ते मागे सरकत सरकत आइल्स ऑफ सिलीपर्यंत पोहोचले.

डचांचे देखील बरेच नुकसान झाले होते त्यामुळे त्यांनी फक्त आपली पकडलेली जहाजे आणि माल परत देण्याची मागणी केली. पण, सरदारांनी काही या मागणीला भिक घातली नाही. त्यामुळे डचांचा संताप पुन्हा वाढला.

म्हणून १६५१ मध्ये डचांनी आईल्स ऑफ सिलीवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला. परंतु इंग्लंडचे सरदार आणि संसद सदस्यांमध्येच तह झाल्याने आता डच नेमके कुणाविरुद्ध युद्ध लढणार म्हणून तेही मागे हटले. परंतु त्यांनी रीतसर युद्ध संपल्याचे जाहीर केले नाही.

नंतरच्या काळात या युद्धाची कुणालाच काही माहिती नसल्यामुळे हे युद्धच विस्मृतीत गेले. परंतु अधिकृतरित्या या युद्धाला पूर्णविराम मिळालाच नव्हता. एका इतिहास तज्ज्ञाला लंडनमधील डच दुतावासात या युद्धाची माहिती मिळाली. तिथे असे युद्ध सुरु झाल्याची पुष्टी करणारी काही कागदपत्रेही सापडली. थोडी अधिक माहिती त्याने शोधून काढल्यानंतर त्याच्या असे लक्षात आले की हे युद्ध सुरु झाल्याचे पुरावे सापडतात पण या युद्धाला पूर्णविराम मिळाल्याचा पुरावा कुठेच सापडत नाही.

त्याने ही बाब दोन्ही सरकारांच्या लक्षात आणून दिल्यावर १७ एप्रिल १९८६ रोजी या युद्धाला पूर्णविराम दिल्याचा करार संमत करण्यात आला आणि इतिहासातील हे दीर्घकालीन युद्ध संपुष्टात आले. एकही जीवितहानी अथवा वित्तहानी न होताही हे युद्ध दीर्घकाळ सुरु कसे राहिले या प्रश्नाचे उत्तर आता तुम्हाला मिळाले असेल.

आईल्स ऑफ सिली समितीचे अध्यक्ष आणि इतिहास तज्ज्ञ रॉय डंकन यांनी या युद्धाची पाळेमुळे शोधून काढली आणि त्यांनी लंडनमधील डच दूतावासालाही याबद्दल माहिती दिली. डच राजदूत जॉंखीर रेन हायडेकॉपर आणि रॉय डंकन या दोघांनी मिळून या ऐतिहासिक दस्तावेजावर सह्या केल्या आणि एक दिर्घकालीन युद्धाला पूर्णविराम मिळाला.

तसे तर हे युद्ध मुळात सुरूच झाले नाही त्यामुळे ते संपण्याचा विषयच नव्हता पण, फक्त काही तांत्रिक बाबींमुळे कसा गोंधळ होतो आणि आपल्या इतिहासात कशी गंमतीशीर भर पडत जाते हेच यावरून समजते. अशा घटना इतिहासाला आणखी रंजक बनवतात. म्हणूनच भविष्य घडवायचे असेल तर तुम्हाला तुमचा इतिहास माहिती पाहिजे असे का म्हटले जाते ते आता समजले असेलच. इतिहासातील या छोट्या छोट्या चुका, खरं तर याला चूक नाही हलगर्जीपणा नक्कीच म्हणता येईल, आपल्याला खूप काही शिकवून जातात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या मराठी माणसाने संघर्ष करून आपल्याला आपली प्रिय रविवारची सुट्टी मिळवून दिली आहे

Next Post

ही आहे भारताला लुटून खाणाऱ्या ११ आक्र*मकांची संपूर्ण यादी

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

ही आहे भारताला लुटून खाणाऱ्या ११ आक्र*मकांची संपूर्ण यादी

आज स्टाईल स्टेटमेंट बनलेल्या सनग्लासेसचा इतिहास माहित आहे का..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.