The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ट्राफिक जॅम करण्यासाठी त्याने नव्व्याण्णव स्मार्टफोन्सचा वापर करून गुगल मॅपच हॅक केलं

by द पोस्टमन टीम
15 February 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


आजकाल आपण पाहतोय तंत्रज्ञान किती पुढे गेले आहे, परंतु आपण हे विसरता कामा नये की तंत्रज्ञान हेदेखील मानवनिर्मित आहे आणि तंत्रज्ञानामध्ये देखील काही त्रुटी देखील असू शकतात. याचे एक उदाहरण म्हणजेच जर्मनीमधील एका कलाकाराने केलेले ‘व्हर्च्युअल ट्राफिक जॅम’.

गुगल मॅप गुगलद्वारा विकसित केलेली वेब मॅपिंग सेवा आहे. हे उपग्रह प्रतिमा, एरियल फोटोग्राफी, रस्त्यांचे नकाशे, रियल टाईम ट्राफिक तसेच तुम्ही प्रवासासाठी वापरत असलेल्या पर्यायांवरून उदाहरणार्थ चालत, चारचाकी, सायकल, सार्वजनिक वाहतूक या यावरून रस्त्यांचे नकाशे गुगल मॅपवर आपल्याला पाहता येतात.

२०२० मध्ये दर महिन्याला साधारण एक अब्जपेक्षाही जास्त लोक गुगल मॅपचा वापर करताना दिसत आहेत.

गुगल मॅपचा वापर आपण स्वतः एखाद्या ठिकाणी चालत जाण्यासाठी, बस, ट्रेन यासारख्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करून जाण्यासाठी किंवा टॅक्सी बुक करून जाण्यासाठी करु शकतो. एवढेच नाही तर, एखाद्या दूरच्या ठिकाणी विमानाने प्रवास करण्यासाठी सर्वात जवळचा आणि सोपा मार्ग कोणता आहे हे आपल्याला या मॅपचा वापर करून समजते.

गुगल मॅप वापरत असताना आपल्याकडे दोन महत्त्वाच्या गोष्टी असणे आवश्यक आहे, एक म्हणजे इंटरनेट कनेक्शन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मोबाईलचे जीपीएस लोकेशन चालू असणे.



गुगल मॅप मोबाइलमध्ये उघडल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर ती आपण आता ज्या लोकेशनला आहोत ती लोकेशन निळ्या रंगाच्या मार्कने तेथे दाखवले जाते. तिथेच स्क्रीनवरती एक सर्च बार दिला आहे त्यामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं असेल त्या ठिकाणाचा पत्ता टाईप केला जातो. नंतर त्या ठिकाणाचा पत्ता आपल्याला मॅपवरती दिसतो. तसेच त्या ठिकाणाचे काही फोटोज, त्या ठिकाणाची काही माहिती जसं की त्याचं रेटिंग असेल, त्या ठिकाणाच्या उघडण्याच्या बंद होण्याच्या वेळा अशी माहिती आपल्याला गुगल मॅपवरती मिळते.

आता ही माहिती आपल्याला कशी समजते? खरंतर ही माहिती आधीच गुगलला पुरवलेली असते त्यामुळे आपण ती माहिती गुगल मॅपवरती पाहू शकतो. एखाद्या ठिकाणाची जेवढी माहिती गुगलला पुरवलेली असते तेवढीच माहिती आपण गुगल मॅपवर पाहू शकतो.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

ज्या ठिकाणावर आपल्याला जायचे आहे त्या ठिकाणावर ती पोहचण्यासाठी जेवढे मार्ग उपलब्ध आहेत तेवढे सर्व मार्ग गुगल मॅप आपल्याला दाखवते.

मॅपवर आपल्याला जो निळ्या रंगाचा रस्ता दिसतो तो बेस्ट रूट मानला जातो, म्हणजे आपल्याला एखाद्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ज्या मार्गाने कमीत कमी वेळ लागेल, जेथे ट्रॅफिक कमी असेल असा रस्ता मॅपवरती हिरव्या रंगाने दाखवला जातो.अशाप्रकारे आपण गुगल मॅपचा वापर करून प्रवास करु शकतो.

बर्लिनमधील सायमन व्हेकर्ट या जर्मन कलाकाराने गुगल नकाशा असलेले स्मार्टफोन्स एका वॅगन कार्टमध्ये ठेवले आणि बर्लिनमधील रस्त्यांसभोवती ती कार्ट फिरवली त्यामध्ये गुगल ऑफिसच्या सभोवतालच्या रस्त्यांचाही समावेश होता. अशाप्रकारे व्हर्च्युअल ट्राफिक जाम करून गुगल मॅपला फसवण्याचा प्रयत्न त्या कलाकाराने केला.

रस्त्यांवरती गाड्या नसल्या तरी काही वर्षांपूर्वी बर्लिनच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी दिसत असल्याचे लक्षात येताच सायमन व्हेकर्ट या कलाकाराने ‘गूगल मॅप हॅक’ हा प्रकल्प सुरू केला.

तेथे गाड्या नसून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन्स गुगल मॅपचा वापर करत असल्यामुळे तेथे ट्रॅफिक जॅम दिसत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

बर्लिनमधील त्या रस्त्यांवरती व्हर्च्युअल ट्राफिक जाम करण्यासाठी या कलाकाराने नव्व्याण्णव स्मार्टफोन्सचा वापर करून गुगल मॅप्स कसे हॅक केले याचा एक व्हिडीओ त्याने त्याच्या यूट्यूब चॅनलवर पोस्ट केला आहे.

सायमनने गुगल मॅप हे अप्लिकेशन स्मार्टफोनमध्ये चालू ठेवून हे नव्व्याण्णव स्मार्टफोन एका वेगन कार्टमध्ये ठेवले आणि नंतर ही कार्ट बर्लिनमधील गुगल कार्यालयाच्या बाहेरील रस्त्यांवर फिरवली त्यामुळे ऑनलाईन नेव्हिगेशन ॲपवरील रस्त्यावरती भरपूर रहदारी असल्याचे तसेच ही रहदारी खूप धीम्या गतीने पुढे सरकत असल्याचे दिसू लागले अशाप्रकारे स्मार्टफोन्सच्या साहाय्याने गुगल मॅपला उघडपणे मूर्ख बनवण्यात आले.

ऑनलाईन नेव्हिगेशन ॲपवरील रस्त्यांवरती व्हर्च्युअल ट्राफिक जाम दिसू लागल्याने ऑनलाईन नेव्हिगेशन टूलमध्ये हिरव्या रंगाचे रस्ते लाल रंगात बदलू लागले.

हे झालेले व्हर्च्युअल ट्राफिक जॅम इतर लोकांना दिसू लागले त्यामुळे लोकांनी या रस्त्यावरती येणे टाळले. खरं तर प्रत्यक्षात तिथे कोणत्याच प्रकारचे ट्राफिक जॅम नव्हते. या सगळ्यावरून आपल्या लक्षात येईल की व्हर्च्युअल जगाचा आपल्या खऱ्या आयुष्यावर कशाप्रकारे परिणाम होतो आहे.

सायमनने केलेल्या या प्रयोगामुळे सर्व जगभर वापरल्या जाणाऱ्या गुगल मॅपमधील सर्वात मोठी त्रुटी उघडकीस आली.

सायमनने हा प्रयोग व्हायरल झाल्यावर ती गुगलच्या प्रवक्त्यांनी सांगितले की गुगल मॅपमधील रहदारी असते रहदारीचा डेटा वेळोवेळी रिफ्रेश केला जातो, ज्यामध्ये वेगवेगळे माहितीचे स्रोत, लोकेशन सर्व्हिस आणि गुगल मॅप कम्युनिटीची मदत घेतली जाते.

तसेच आम्ही गाडी आणि मोटारसायकलमधील फरक ओळखण्याची क्षमता भारत, इंडोनेशिया आणि इजिप्त सारख्या बऱ्याच देशात प्रक्षेपित केली आहे तरीही अजून मोटारसायकल आणि गाड्यांप्रमाणे प्रवासासाठी वेगनसारख्या उपकरणांचा समावेश गुगल मॅपमध्ये केलेला नाही, परंतु यासारखे गुगल मॅपमध्ये क्रिएटिव्ह आणि नवनवीन वैशिष्ट्यांचा समावेश करायला आम्हालाही आवडेल कारण यामुळेच वेळोवेळी गुगल मॅपला अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत होईल.

हे ॲप अत्यंत उपयुक्त आहे लोकांचे आयुष्य या तंत्रज्ञानामुळे अत्यंत सुखकर व सोपे होत आहे परंतु जर हे तंत्रज्ञान चुकीच्या हातात गेले तर हे तंत्रज्ञान अतिशय शक्तिशाली आहे.

कदाचित आपल्याला हा प्रयोग मजेदार वाटू शकतो, जर एखादे ॲप इतक्या सहजतेने हाताळता येत असेल तर यामुळे खूप काही अडचणी निर्माण होऊ शकतात हे या प्रयोगातून सायमनने निदर्शनास आपल्या आणून दिले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

हैद्राबादच्या निजामाला होता लोकप्रिय व्यक्तींचे ‘तसले’ फोटो जमवण्याचा छंद

Next Post

भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्म देणाऱ्या डॉक्टरने आत्मह*त्या केली होती

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्म देणाऱ्या डॉक्टरने आत्मह*त्या केली होती

आशिया खंडातील पहिल्या महिला ट्रेन चालक सुरेखा यादव यांचा प्रेरणादायी प्रवास

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.