The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

इस्राईलने कमी जागेत जास्त उत्पन्नासाठी एक शक्कल शोधून काढलीये

by द पोस्टमन टीम
7 December 2024
in शेती, विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


शेती क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग सुरु असतात. विशेषत: इस्राईलसारख्या देशात, जिथे शेतजमिनीची कमतरता असते, तिथे शेतीसाठी विविध पर्याय अवलंबले जातात. आजच्या काळात संपूर्ण लोकसंख्येला मुबलक अन्नधान्य पुरवठा करणे ही नेहमीच एक आव्हानात्मक समस्या राहिली आहे.

शेतीसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा काळात या नव्या तंत्रज्ञानाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष बाब म्हणजे या शेतीसाठी तुमच्याकडे जमीन असलीच पाहिजे अशी अट नाही. सध्या सगळीकडेच शेतजमिनींची कमतरता जाणवत आहे.

या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने घराच्या भिंतीवरही शेती केली जाऊ शकते. इस्राईलमध्ये हे तंत्रज्ञान सध्या जास्त लोकप्रिय झालेले आढळते. इस्राइलमधील अधिकाधिक लोक याप्रकारच्या शेतीचा अवलंब करत आहेत.

इस्राईलमध्ये शेतीयोग्य जमिनीची कमतरता असल्याने तिथे व्हर्टीकल फार्मिंगची पद्धत मोठ्या प्रमाणात अवलंबली जाते.

शहरातील वाढती लोकसंख्या आणि शेतजमिनीची कमतरता, यावर ही शेतीची पद्धत जास्त प्रभावशाली ठरू शकते. दाट लोकसंख्येच्या शहरात, जिथे शेत जमीन खूप दूर असते किंवा कमी असते अशा ठिकाणी या पद्धतीने शेती केल्यास फायदा होऊ शकतो.



या पद्धतीच्या शेतीतून होणारे इतरही अनेक फायदे आहेत. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही घराच्या भिंतीवरच छोटीशी शेती करू शकता. या पद्धतीतून तुम्ही तुमच्या कुटुंबापुरते तरी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, गहू, तांदूळ अशा पिकांचे उत्पादन घेऊ शकता.

काही लोकांना या व्हर्टिकल फार्मिंगमधून घराच्या भिंतीची सजावट करण्याची हौस भागवता येते. शिवाय, भिंतीवर केल्या जाणाऱ्या या शेतीमुळे घरातील तापमानही मेंटेन राहते. हानिकारक केमिकल फवारून घेतलेली पिके आरोग्यासाठी किती हानिकारक ठरत आहेत हे तर आजच्या काळात आपण सर्वच जण अनुभवत आहोत. अशावेळी खतांचा अधिक वापर न करता घेतलेल्या या पिकांमुळे रासायनिक द्रव्यांच्या घातक परिणामांपासूनही मुक्ती मिळते.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पडीक जमिनीतून उगवणार सोनं; महाराष्ट्र शासनाची फळझाड/वृक्ष लागवड योजना

या तंत्रज्ञानात सर्वप्रथम छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये रोपे लावली जातात. नंतर या कुंड्या भिंतीवर अशा प्रकारे चिकटवल्या जातात जेणेकरून त्या खाली पडणार नाहीत. या कुंड्यांना वेळोवेळी पाणी घालण्यासाठी विशिष्ट पद्धतीची ड्रॉप इरिगेशन सिस्टीम लावली जाते.

ड्रॉप इरिगेशन सिस्टीम रोपांना विशिष्ट काळाने पाणी देते. यामुळे पाण्याचीही भरपूर बचत होते. ही सिंचन व्यवस्था आपण आपल्या कंप्युटरवरूनही नियंत्रित करू शकतो. कुंड्यांमध्ये रोपांची पेरणी केल्यानंतर, रोपांची थोडी वाढ झाल्यानंतरच या कुंड्या भिंतीवर चिकटवल्या जातात.

ग्रामीण भागात शेतीयोग्य जमीन भरपूर असते. पण, शहरात तशा शेतजमिनीची कमतरता असल्याने अशा पद्धतीची शेती शहरी लोकांसाठी फायद्याची ठरू शकते. ज्या लोकांना कमी जागेमुळे गार्डनिंगची हौस भागवता येत नाही ते, अशा प्रकारे  आपली हौस पूर्ण करू शकतात. यामुळे शहरातील हरवत चाललेली हिरवळ परत येऊ शकते.

घराचे तापमान नियंत्रित राहिल्याने एसी, कुलर यांसारख्या यंत्रांचा वापरही कमी होईल. त्यामुळे वीज बचतही होऊ शकते. घराच्या आजूबाजूच्या वातावरणातील आर्द्रता देखील टिकून राहते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या शेतीमुळे पर्यावरणाच्या समस्यांचे प्रमाणही कमी होईल. या तंत्रज्ञानात पाण्याचा वापर, उर्जा बचत, जमिनीचे रसायनीकरण अशा कितीतरी समस्यांपासून सुटका होऊ शकते.

रासायनिक खतांचा मारा कमी झाल्यामुळे त्याचे दुष्परिणामही आटोक्यात येतील. जास्तीत जास्त लोकांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास अन्नधान्याचे मुबलक उत्पादन मिळू शकते.

आज उपलब्ध शेतीतून संपूर्ण लोकसंख्येच्या अन्नाची गरज भागवणे शक्य नाही. त्यामुळे असे जमिनीशिवाय शेती करण्याचे तंत्र फायद्याचे ठरू शकते.

अन्नाची गरज भागवली जाऊन, भूकबळी, कुपोषण यांसारख्या समस्यांवरही आपण निश्चितच मात करू शकू. जगातील मोठमोठ्या शहरात, जिथे लोकसंख्या अधिक आहे, तिथे या तंत्राने केल्या जाणाऱ्या शेतीतून शहरवासियांना मुबलक प्रमाणात भाजीपाला मिळू शकेल.

आपल्या देशातही काही मेट्रो सिटीज् आहेत, जिथे शेतीची गंभीर समस्या आहे. अशा शहरांच्या मोठमोठ्या इमारतींच्या भिंतीवर या तंत्राचा वापर करून केली गेलेली शेती निश्चितच उपयोगी ठरेल.

व्हर्टिकल फार्मिंगच्या तीन आधुनिक पद्धती आहेत. हायड्रोपोनिक्स, ॲक्वापोनिक्स, आणि एअरोपोनिक्स. आपल्या सोयीनुसार यातील एका पद्धतीचा अवलंब केला जाऊ शकतो. हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये मातीचा वापर केला जात नाही. या तंत्रात मातीशिवायच रोपांची लागवड केली जाते. एका रासायनिक द्रावणात रोपं उगवली जातात.

एअरोपोनिक्स तंत्रात तर हवेतच रोपांची लागवड करून पिक घेतले जाते. इस्राइलमध्ये मात्र, हायड्रोपोनिक्स किंवा ॲक्वापोनिक्स याच तंत्राचा जास्त वापर होताना दिसत आहे. एअरोपोनिक्सबाबत अजूनही लोकांमध्ये बरीच संदिग्धता आहे.

भारतातील मोठमोठ्या शहरात या प्रकारच्या शेतीचा विचार केला जात आहे. इस्राइलसारख्या देशात तर या तंत्रज्ञानाचा भरपूर फायदा दिसून येत आहे. इस्राइलव्यतिरिक्त सध्या अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, चीन, कोरिया, जपानमध्येही या तंत्राचा वापर करून शेती केली जात आहे.

या तंत्राची एकमेव नकारात्मक बाजू म्हणजे सुरुवातीला या तंत्रात वापरली जाणारी ड्रॉप ईरीगेशन सिस्टम बसवण्यासाठी येणारा खर्च जास्त आहे. परंतु, तरीही या तंत्राचा वापर करून शेती करण्याची पद्धत अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

सत्यकथेवर आधारित “गुंजन सक्सेना – द कारगिल गर्ल” बघितला का…?

Next Post

“जागतिक सायकल डे”च्या दिवशीच ॲटलासला आपलं उत्पादन बंद करावं लागलं

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
शेती

पडीक जमिनीतून उगवणार सोनं; महाराष्ट्र शासनाची फळझाड/वृक्ष लागवड योजना

13 October 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

19 August 2024
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

"जागतिक सायकल डे"च्या दिवशीच ॲटलासला आपलं उत्पादन बंद करावं लागलं

भारताच्या मदतीने मुजीबुर रेहमान यांनी पाकिस्तानच्या तावडीतून बांग्लादेश स्वतंत्र केला

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.