The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेत लोक आपल्या पोरांना पोस्टाने मामाच्या गावाला पाठवायचे..!

by द पोस्टमन टीम
22 December 2023
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजच्या काळात पोस्ट ऑफिसचे महत्व खूपच कमी झाले आहे. पुस्तक, कपडे किंवा अशीच काही किरकोळ वस्तू पाठवायची असेल तरच आज पोस्टाची आठवण येते. पोस्टाद्वारे आपण कुठली वस्तू पाठवू शकतो आणि कुठली वस्तू पाठवली जाणार नाही याचे काही नियम आहेत. अमेरिकेत जेव्हा सुरुवातीला पोस्टल सर्विस सुरू झाली तेव्हा अमेरिकेच्या पोस्टल सर्विसकडून पोस्टाद्वारे पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंविषयी कुठलीही बंधने घालण्यात आली नव्हती. पोस्टाच्या नेमक्या याच ढिलेपणाचा लोकांनी कसा फायदा घेतला हे वाचल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

१९१३ साली ओहिओतील एका जोडप्याने पोस्टाच्या पार्सल सर्विसचा फायदा घेत चक्क आपल्या छोट्या मुलाला ७३ मैलावर राहणाऱ्या त्याच्या आजीच्या घरी पाठवले होते. या पार्सलसाठी त्यांना फक्त १५ सेंट्स इतकाच खर्च आला होता. त्याच्या शर्टच्या खिशावर पोस्टाचे तिकीट लावून त्यांनी त्या बाळाला पोस्टमनच्या हवाली सोपवले.

खरे तर, कोणते पार्सल स्वीकारायचे आणि कोणते नाही याचा कुठलाच नियम नसल्याने पोस्ट अधिकारीही बुचकळ्यात पडले. शिवाय, तो पोस्टमनही त्या जोडप्याच्या ओळखीतला होता. त्यामुळे त्यानेही जास्त आढेवेढे घेतले नाहीत.

१ जानेवारी १९१३ पासून पोस्टाने ४ पौंड वजनापेक्षा जास्त पार्सल स्वीकारण्याची तयारी दाखवली होती, पण त्यामुळे वाढवलेल्या वजनाच्या मर्यादेचा लोकं असाही फायदा घेतील याची त्यांनी कल्पनाही केली नसेल.



वजनाची मर्यादा वाढवल्यानंतर लोकांनी काय काय म्हणून पार्सल केले विचारू नका. अंडी, विटा, साप आणि अशाच कितीतरी आश्चर्यकारक गोष्टींच्या पार्सल्सचा ढीग लागला होता. म्हणून काय लोकांनी आपल्या मुलांनाही पार्सल करायचं का?

तांत्रिकदृष्ट्या तरी त्यात काही त्रुटी काढणे शक्य नव्हते. म्हणून पोस्टाचाही नाईलाज झाला.

पोस्टल सर्विसच्या सुरुवातीच्या वर्षात असे अनेक किस्से घडले ज्यामुळे बराच गोंधळ उडाला. नंतर मात्र पोस्टाने आपल्या पार्सल सेवेबाबत काही नियमावली आखली, पण तोपर्यंत घडणारे असे धमाल किस्से काही त्यांना रोखता आले नाहीत.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

पोस्टाच्या सेवेबद्दल वेगवेगळ्या गावात वेगवेगळे समज होते. अर्थात पोस्टमास्तर लोकांना पोस्टाचे नियम कशापद्धतीने समजावून सांगतात त्यावर हे सगळं अवलंबून होते.

१९१३ ते १९१५ दरम्यान सात पालकांनी आपल्या मुलांना अशाच पद्धतीने पार्सल केले होते. अर्थात, तुम्ही म्हणाल, ‘किती ते निष्काळजी पालक? असं कुणी अनोळखी व्यक्तीच्या हातात आपले मुल सोपवतं का?’ पण खरे तर गावातील कुठल्याच लोकांना पोस्टमन अनोळखी नसतात. आपल्या लोकांचा निरोप घेऊन येणारा पोस्टमन हा प्रत्येक घरातील एक हक्काचा सदस्यच असतो म्हणा ना. तुमच्या बालपणीही तुम्ही इतर कुठल्या नातेवाईकांइतकीच पोस्टमन काकांची वाट बघितल्याचे तुम्हालाही आठवत असेलच. असाच काहीसा माहोल तिकडेही होता.

अर्थात, म्हणून काय सगळेच लोक अशाप्रकारे आपली मुले पार्सल करून पोस्टाने पाठवायचे असे नाही. पण, रेल्वेपेक्षा पोस्टाच्या पार्सलचे चार्जेस कमी होते त्यामुळे काही लोकांना पोस्टाचीच पार्सल सेवा परवडत असे.

पोस्टमनसुद्धा या मुलांना अगदी सांभाळून नेत असत. त्यांच्यासोबत सामानाची किती मोठी जंत्री असे, तरीही पोस्टकार्डांचा तो गठ्ठा आणि सोबतचे ते मुल दोघांनाही ते व्यवस्थितरित्या त्यांच्या पत्त्यावर पोहोचवत असत.

पण जुन्या काळातील लोकांचा एकमेकांवर किती अफाट विश्वास होता, हे पाहून आश्चर्य वाटते. आज शेजारच्या घरी जरी मुल दहा-पंधरा मिनिटासाठी गेले तरी लागेल त्याची शोधाशोध सुरू होते.

१९१४ मधे एका पालकांनी आपल्या सहा वर्षाच्या मुलीला अशाच प्रकारे पार्सल केले होते. त्यांच्या मुलीला घेऊन जाणारा तो पोस्टमन त्यांचा नातेवाईकच होता. या पार्सलसाठी त्या कुटुंबाने ५३ सेंटचा स्टँप त्या मुलीच्या कपड्यांवर चिकटवला होता. हा किस्सा पोस्ट मास्तर जर्नल अल्बर्ट बर्लसन यांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनाही काय प्रतिक्रिया द्यावी हे पटकन सुचेना. त्यानंतर त्यांनी नियम काढला की कोणत्याही मनुष्य प्राण्याला पार्सल म्हणून स्वीकारले जाणार नाही.

नियम काढले म्हणून काय झाले? लगेच काही त्याची अंमलबजावणी होत नाही. हे तर लोकांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे त्यानंतरही लोक पोस्टात मुलांच्या पार्सलबाबत चौकशी करत राहिले. त्यानंतर एका वर्षाने एका बाईने आपल्या सहा वर्षाच्या मुलीला फ्लोरिडातून तिच्या वडिलांच्या घरी म्हणजे व्हर्जिनियाला पाठवले होते. तब्बल ७२० मैल अंतरावर. इतक्या दूरच्या अंतरावर मुलाला पार्सल केल्याचे हे पहिले आणि शेवटचेच उदाहरण. इतक्या दूरच्या अंतरासाठीही तिला १५ सेंट्स इतकाच खर्च आला होता.

त्यानंतर एका आजीने आपल्या नातीला तिच्या आई-वडिलांच्या घरी पाठवले होते. पण, अमेरिकन पोस्टल सर्विसच्या इतिहासातील मुल पार्सल केल्याची ही शेवटची घटना होती.

या घटनेवर मात्र पोस्टाचे सुप्रीटेंडंट जॉन क्लर्क चांगलेच भडकले होते. हे पार्सल स्वीकारणाऱ्या पोस्टमास्तर केनी केंटुकीला त्यांनी चांगलेच फैलावर घेतले होते. केनीनी काहीतरी कारणे सांगून स्वतःचा बचाव करून घेतला तो भाग वेगळा, पण यानंतर अशाप्रकारे मुलांना पार्सल करण्याची पद्धत बंद झाली. मॉड हा पार्सल करण्यात आलेला शेवटचा मुलगा ठरला. त्यानंतरही अनेक पालक आपल्या मुलाचे असे पार्सल करण्याबाबत पोस्टात चौकशी करत राहिले, पण आता पोस्टाचा नियम ठरला होता. काही झाले तरी मनुष्य प्राण्याला पार्सल म्हणून स्वीकारले जाणार नाही.

पोस्टमास्तर जॉन कुन्स यांनी मुलांच्या पार्सलसाठी विचारणा करणाऱ्या दोन अर्जांना खूप मजेशीर भाषेत उत्तर देऊन नकार दिला होता. त्यांनी मुलांचे पार्सल करण्यासाठी अर्ज करणाऱ्या पालकांना कळवले होते की, तुमचे मुल धोकादायक प्राणी या प्रकारात मोडत नसल्याचा कुठलाच पुरावा नसल्याने आम्ही त्याला पार्सल करू शकत नाही.

यानंतर मात्र ही पद्धत पूर्णतः बंद झाली. पण शेवटी मुलांना पार्सल न करण्याचा पोस्टाने घेतलेला हा निर्णय बरोबरच होता तुम्हाला काय वाटते?


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

क्रिकेटर व्हायचं स्वप्न बघितलेला पोरगा जगातला सर्वोत्तम धावपटू बनला होता

Next Post

मंगळावर अतिक्रमण केलं म्हणून तीन कार्यकर्त्यांनी ‘नासा’वरच केस ठोकली होती

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

मंगळावर अतिक्रमण केलं म्हणून तीन कार्यकर्त्यांनी 'नासा'वरच केस ठोकली होती

एकेकाळी 'बुलेट'ला टक्कर देणारी ही बाईक पुन्हा मार्केटमध्ये आली आहे !

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.