The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या माणसामुळे घरोघरी असलेल्या “इडियट बॉक्स”चा शोध लागलाय

by द पोस्टमन टीम
5 January 2026
in विज्ञान तंत्रज्ञान, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


घर बसल्या जगाची माहिती देणारा, मनोरंजन करणारा, टीव्ही आला आणि संपूर्ण जगाचा चेहरा मोहराच बदलून गेला. टीव्हीने मनोरंजनाच्या जगतात एक अशी क्रांती घडवून आणली ज्यामुळे संपूर्ण जगाचा इतिहासच बदलून गेला. आजच्या काळात टीव्हीचे कितीतरी प्रगत रूप आपण पाहत आहोत. परंतु टीव्हीवरून चित्र प्रसारीत करण्याची ही कल्पना सर्वात आधी कुणाला सुचली आणि ती कुणी यशस्वी करून दाखवली तुम्हाला माहित आहे का?

लंडनमध्ये जॉन बेअर्डने पहिला टीव्ही सर्वांसमोर आणला. बेअर्डने अशा एका यंत्राचा शोध लावला होता ज्यावरून सर्वांना एकाच वेळी प्रसारित केलेली चित्रे पाहता येतील.

जॉन बेअर्डने ज्या दिवशी पहिल्यांदा हा टीव्ही सर्वांसमोर आणला ती तारीख होती २७ जानेवारी १९२८.

जगातील या पहिल्या टीव्हीमध्ये एक फिरती डिस्क लावण्यात आली होती. जी बदलत्या चित्रांना स्कॅन करून त्यांना इलेक्ट्रॉनिक लहरीत परावर्तीत करू शकत होती. मग तारांच्या सहाय्याने ही माहिती स्क्रीनवर पोहोचत असे. या पहिल्या टीव्हीवरील चित्रे प्रकाश आणि सावली यांच्या एका विशिष्ट प्रणालीच्या रुपात दिसत असे. याचे रिजोल्युशन कमी असल्याने चित्र काहीसे अस्पष्ट दिसत असे.

परंतु बेअर्ड पहिला व्यक्ती होता ज्याला टीव्हीवरून चित्रांचे प्रसारण करण्यात यश मिळाले होते. १९२८ मध्येच बेअर्डने पहिले विदेशी प्रसारण देखील यशस्वी करून दाखवले. फोनलाइनच्या माध्यमातून लंडनवरून न्यूयॉर्कला सिग्नल पोहोचवले गेले. याच वर्षी त्याने पहिला रंगीत टीव्हीदेखील आणला.



जे. एल. बेअर्ड याचा जन्म १३ ऑगस्ट १८८८ रोजी ग्लासगो जवळील हॅलेन्सबर्ग येथे झाला. त्याचे कुटुंब अतिशय गरीब होते. त्याचे वडील एक पाद्री होते. ते धर्मप्रसाराचे काम करत. त्याची आई श्रीमंत घरातील होती. ती मात्र नेहमी कुठल्या न कुठल्या कामात दंग असे. जॉनने आपल्या आईचा हाच गुण उचलला होता. तोही सतत नवे प्रयोग करणे, नवीन काही शिकणे अशा सृजनशील गोष्टीत व्यस्त असे.

जॉनला लहानपणापासूनच अभ्यासाचा छंद होता. तो ज्या शाळेत शिकत होता तिथे मात्र फक्त भाषा विषयांवर भर दिला जाई. विज्ञानासारख्या विषयाचे तिथे फारच वावडे होते. मात्र त्याने फोटोग्राफीचे विशेष कौशल्य आत्मसात केले. त्याने फोटोग्राफीमध्ये अशी काही मास्टरी मिळवली की, त्याला फोटोग्राफी सोसायटीचे अध्यक्ष बनवण्यात आले.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

बेअर्ड लहानपणापासूनच सृजनशील कामात गुंतलेला असे.

आपल्या शाळेतील मित्रांच्या मदतीने बाराव्या वर्षीच त्याने टीव्हीच्या लाइनची निर्मिती केली होती.

शाळा पूर्ण झाल्यानंतर त्याने ग्लासगो येथील रॉयल टेक्निकल कॉलेजमध्ये विज्ञानाचा अभ्यास केला. त्यानंतर एका इलेक्ट्रिकल कंपनीत इंजिनियरची नोकरी केली. इथेही आपली कल्पनाशक्ती वापरून त्याने काही छोट्याछोट्या वस्तूंची निर्मिती केली. या वस्तू विकण्यासाठी तो पाठीवर सॅक अडकवून दारोदारी फिरत असे.

तो पहिल्या महायु*द्धाचा काळ होता. सैनिकांजवळ थंडीपासून बचाव करण्यासाठी फारशी साधने नव्हती. तेव्हा सैनिक पायांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी टॉयलेट पेपर गुंडाळायचे. तेव्हा बेअर्डने पायमोजे बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. फक्त पायमोजेच नाही तर त्या परिसरात जी मुबलक पिकणारी फळे असतील त्यापासून जॅम आणि चटणी बनवण्याचाही व्यवसाय केला. नंतर त्याला याचा कंटाळा येऊ लागला.

विज्ञानाच्या सानिध्यात रमणारा जॉन व्यवसायात कसा रमेल? १९२२ साली अचानक त्याच्या मनात आले की, लहानपणी आपण जी टीव्ही बनवण्याची कल्पना अर्ध्यावर सोडली होती, ती पूर्ण केली पाहिजे. त्याने लागलीच कामाला सुरुवात केली. टीव्ही संच कसा असेल त्याचा कच्चा आराखडा तयार केला.

कोणतेही चित्र हे ठिपक्यांचे बनलेले असते. हे चित्र जर आपण विजेच्या वाहकावरून दुसऱ्या जागी पाठवले तर त्याठिकाणच्या ठिपक्यातून एक चित्र तयार होईल. त्याने यावरच काम करायला सुरुवात केली.

हे प्रयोग करताना अनेकदा त्याला अडचणी आल्या.

एकदा तर त्याच्या खोलीत प्रयोगासाठी आणलेल्या बॅटऱ्यांचा स्फो*ट झाला होता. तेंव्हा त्याच्या घरमालकाने त्याला नसते धंदे बंद करण्याचा सल्ला दिला होता. नसेल तर त्याने घर खाली करण्यास हरकत नाही असेही सुनावले.

परंतु जेव्हा टीव्हीचा शोध यशस्वी झाला तेव्हा याच ठिकाणी त्या शहरातील महापालिकेने ‘टेलीव्हिजनचा निर्माता जोन लोगी बेअर्डची प्रयोगशाळा,’ अशी पाटी लावली आणि घरमालकाची छाती अभिमानाने भरून आली.

कित्येक महिन्यांच्या प्रयत्नानंतर तो यशस्वी झाला. टीव्ही ट्रान्समिशन आणि त्याला रिसीव्ह करणारी यंत्रणा बनवण्यात त्याला यश आले. त्यानंतरही यावर अनेक प्रकारे प्रयोग सुरु होतेच. १९२४ मध्ये त्याला पहिल्यांदा ट्रान्समिशन तीन फुटाच्या अंतरापर्यंत पाठवण्यात यश मिळाले.

त्यानंतर १९२५ मध्ये त्याला प्रकाशाचे विद्युत किरणात रुपांतर करण्याची युक्ती सापडली. जेव्हा त्याने हे यंत्र सुरु केले तेव्हा स्वतःच चकित झाला. त्या उपकरणात चित्रातील पूर्ण चेहरा दिसत होता. खरेतर हे एक मोठे यश होते. अशाच पद्धतीने आणखी काही दिवस सातत्याने प्रयोग करत बेअर्डला संपूर्ण मानवाकृतीचे ब्रॉडकास्ट करण्यात यश मिळाले.

१९२६ मध्ये त्यांनी आपला हा प्रयोग सार्वजनिक रुपात सादर केला. टीव्हीचे पहिले प्रसारण यशस्वी झाल्यावर बेअर्डचे नाव सर्वदूर पोहोचले. टीव्हीवरून पहिले प्रसारण यशस्वी झाले तेंव्हा जॉन आनंदाने नाचला होता. तरीही त्याने आपले प्रयोग थांबवले नाही. दूरदर्शन संचाच्या रुपात बदल करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करू लागला.

काळाच्या ओघात टीव्हीचे रूप कितीतरी पालटत गेले. आज या दूरदर्शनने आपले संपूर्ण आयुष्य व्यापले आहे. काळाच्या ओघात अजूनही याच्या रुपात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

मेजर ध्यानचंदचा खेळ बघून त्यांच्यावर एक झेकोस्लोव्हेकियन युवती फिदा झाली होती

Next Post

आज गल्लीबोळात स्टँड-अप कॉमेडीअन आहेत पण याची सुरुवात ‘उल्टा-पुल्टा’ने केलीये

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
Next Post

आज गल्लीबोळात स्टँड-अप कॉमेडीअन आहेत पण याची सुरुवात 'उल्टा-पुल्टा'ने केलीये

जगातील सगळ्यात मोठ्या प्रयोगशाळेत नटराजाची मूर्ती का ठेवण्यात आली आहे..?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.