The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केरळमधील या एकट्या माणसाने तब्बल १००० सुरंग विहिरी खोदल्या आहेत

by द पोस्टमन टीम
30 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब 


जागतिकीकरणाने रोजच्या कामांना वेग मिळाला असला तरी अनेक गोष्टींमध्ये मात्र अजूनही पारंपारिक पद्धतीच आपल्या उपयोगी येतात. आधुनिकतेने दिलेल्या संख्यात्मक विकासापेक्षा पारंपरिकतेने होणाऱ्या गुणात्मक विकासाचा वापर आजही आपल्याला खूप फायदेशीर ठरू शकतो.

ही पारंपारिकता दुर्दैवाने आज लोप पावत चालली आहे. असे असले तरीही खेड्यात मात्र आजही याची मुळं खोलवर रुतलेली दिसतात. खेड्यातील वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनेक रूढींच्या मागे काहीतरी वैज्ञानिक कारणे आहेत. त्याची उपयुक्तता जास्त तर आहेच परंतु त्या गोष्टींचा पर्यावरणावर कसलाही वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाते.

असाच एक प्रकार म्हणजे ‘सुरंग’ नावाच्या विहिरीचा प्रकार. उत्तर केरळ आणि कर्नाटकमधील हा पारंपरिक जलसिंचनाचा स्त्रोत आता लोप पावतो आहे. या विहिरीला खोदण्यासाठी लागणारी विशेष पध्दतीची माहिती आज खूप कमी लोकांना आहे.

त्यातीलच एक म्हणजे केरळमधील कासारगोड जिल्ह्यात असणाऱ्या कुंदमजुझी या गावातील ६७ वर्ष वय असलेले कुंजम्बू. त्यांनी एकट्यानी या गावात मागच्या ५० वर्षात पाणी पुरवठा करण्यासाठी अनेक सुरंग विहिरी खोदल्या आहेत.



१४ वर्षाचे असताना त्यांनी खोदकाम सुरु केले. आता या खोदकामाचे ज्ञान असलेले खुप कमी लोक असले तरी कुंजम्बू यांनी आतापर्यंत १००० पेक्षा जास्त विहिरी खोदल्या आहेत असे ते सांगतात.

कन्नडी भाषेत ‘सुरंग’ म्हणजे बोगदा किंवा मल्याळम भाषेतील ‘थुरंगम’ म्हणजे अरुंद गुहांसारखी एक रचना, ज्याची निर्मिती डोंगराच्या पायथ्याशी केले जाते. या प्रकारच्या विहिरीची रुंदी २.५ फुट आणि लांबी ३०० मीटर पर्यंत किंवा जोपर्यंत पाण्याचा स्त्रोत सापडत नाही तिथपर्यंत असू शकते.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आजही या भागातील एक परिणामकारक जलसिंचनाचा स्त्रोत म्हणून या विहिरींकडे बघितले जाते. सुरंग म्हणजे थोडक्यात आडवी खोदली गेलेली विहिर असेही म्हणता येईल.

विहिरीच्या बोगद्यातुन बाहेर येणाऱ्या पाण्याला एका तलावात गोळा केले जाते, जे विहिरीच्या जवळच असते. एकदा झऱ्यातुन पाणी येणे सुरु झाले की तो प्रवाह वर्षानुवर्षे कायम चालू राहतो. कसल्याही उपकरणांच्या मदतीशिवाय हे पाणी त्या तलावात वाहत राहते.

कासारगोड जिल्ह्यातील गावांत पावसाळा अतिशय जास्त प्रमाणात असतो. नद्यांना पावसाळ्यात जास्त पाणी असते. उन्हाळ्यात तापमान जास्त वाढते म्हणून शेतीच्या पाण्यासाठी लोकांना भुजलावर अवलंबून रहावे लागते.

सुरंगाची तुलना ‘कनात्स’शी केली जाऊ शकते. इ.स.पुर्व ७००मध्ये ग्रीसमधील मेसोपोटेमिया आणि बॅबिलॉनमध्ये ही पध्दत वापरली जात असे. नंतर इराणमध्ये वापरल्या गेलेल्या या पध्दतीचा वापर आता कमी होत चालला आहे. कुपनलिकांचा (बोरवेल) वाढत चाललेला वापर यास कारणीभूत आहे.

“सुरंग खोदण्यासाठी जास्त शक्ती आणि जिद्द लागते. मी जाताना नेहमी एक कुदळ आणि मेणबत्ती घेऊन जातो. एकाच दमात काम पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो.” असे कुंजम्बू सांगतात.

“जेव्हा तुम्ही ३०० फूट लांब बोगदा खोदत असता तेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासण्याची शक्यता असते. यासाठी खबरदारी म्हणून मी एक आगपेटी आणि मेणबत्ती घेऊन जातो. मेणबत्ती पेटवण्यासाठी जर आगपेटी आग पकडत नसेल तर तिथे ऑक्सिजनची कमी आहे हे मला कळते आणि तिथे काम थांबवून मी परत जातो”, अनुभवाची ही शिदोरी सांगताना कुंजम्बू हे रहस्य सांगतात.

कधीकधी एका सुरंगाच्या आत छोटेछोटे सुरंग बनवले जातात. हवा खेळती राहुन नैसर्गिक दबाव रहावा म्हणून आत हवेच्या नलिका बसवल्या जातात. या हवेच्या नलिकेचा आकार २ मी. बाय २ मी. इतका असतो.

“खोदकाम करणारा व्यक्ती निसर्गाशी एकरुप झालेला असावा. खोदकामासाठी लागणारी योग्य जागा, तिथली माती या सगळ्या गोष्टी त्याला कळायला हव्यात. जसे की, जर आपल्याला खोदकामासाठी योग्य अशी जागा शोधायची असेल तर मी आसपासच्या झाडांकडे बघतो. ही झाडे बहरत असतील आणि मातीत एक विशिष्ट ओलावा असेल तर आपल्याला योग्य जागा मिळाली आहे असे मी ठरवतो. हे ज्ञान फक्त वर्षानुवर्षे केलेल्या कामाच्या अनुभवातुनच येऊ शकते. निसर्गावर एक प्रकारची श्रध्दा असणेही गरजेचे आहे”, असे ते म्हणतात.

“जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा सुरंग म्हणजे आमच्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक होता. शेतीसाठी जलसिंचनाचा तो एक मुख्य उपाय होता. परंतु कुपनलिकांच्या शोधाने हा उपाय पर्यायामध्ये बदलला आणि हळूहळू आम्हाला काम मिळेनासे झाले.”

सुरंग खोदण्यासाठी मानवी ताकद लागते, कुपनलिकेच्या तुलनेत खर्चही जास्त येतो. सुरंग खोदण्याला अंदाजे ०.७२ मीटरसाठी १००-१५० रुपये लागतात. या एका कारणामुळेही लोक आता सुरुंग खोदत नाहीत, असे कुंजम्बू सांगतात.

“कुपनलिकेची पध्दत आपल्या निसर्गासाठी एकदम हानिकारक आहे. त्यासाठी खोदत असताना आपण थेट पृथ्वीच्या हृदयात घाव घालतो. त्यामुळे नैसर्गिक यंत्रणेच्या विरोधात आपण जातो आणि म्हणूनच यातून भूकंप होण्याचीसुध्दा शक्यता आहे.” असे कुंजम्बू म्हणतात.

कासारगोड जिल्ह्यातील प्रसिध्द लेखक, शेतकरी पत्रकारितेतील एक मोठे नाव असलेले श्री पाद्रे यांच्या नुसार, “सुरंग पध्दती शेतकऱ्यांसाठी एक अतिशय परिणामकारक उपाय म्हणून काम करत आली आहे. वर्षभर पाण्याचा पुरवठा करणारी ही पध्दत एकमेव आहे. कासारगोडसारख्या भागात जिथे जमीन खचण्याची शक्यता जास्त आहे अशा ठिकाणी तर कुपनलिका कधीही योग्य पर्याय ठरणार नाहीत.”

आज कासारगोड जिल्ह्यात ५०००पेक्षाही जास्त सुरंग विहिरी आहेत. त्यातील बऱ्याचशा आता कालबाह्य झाल्यात. परंतु, कुंजम्बूसारखे लोक मात्र अजुनही ही पारंपारीक पध्दत जपण्याचा प्रयत्न करत आहेत.

कुंजम्बू शेवटी सांगतात, “सुरंग पध्दती कमी होत असली तरीही पृथ्वीच्या अंतर्गत भागात सुरु केलेला माझा हा प्रवास मी असाच सुरु ठेवणार आहे, या पध्दतीचा पुनर्जन्म होईल एवढी एकच आशा मला आहे.”

या विशिष्ट आणि पर्यावरणाशी एकरुप असलेल्या पध्दतीचे रक्षण करणे आज खूप गरजेचे आहे. यामुळे निसर्गाची हानी तर वाचेलच परंतु कुंजम्बूसारख्या मोजक्या असलेल्या व्यक्तींना त्यांच्या रोजगाराचे साधनसुध्दा परत मिळेल. तसेच ऐतिहासिक वारसा असलेली ही जलसिंचनाची पध्दत गमवायची नसेल तर लवकरात लवकर या सुरंग पध्दतीचे संवर्धन करणे गरजेचे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

बाबू मोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए लंबी नहीं

Next Post

“हजार द्या दोन हजार वापस देतो” असं ट्विट बिल गेट्स, एलोन मस्क, ओबामा यांनी केलं होतं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

"हजार द्या दोन हजार वापस देतो" असं ट्विट बिल गेट्स, एलोन मस्क, ओबामा यांनी केलं होतं

या माणसाने भारतात छापील पुस्तकांचा काळ आणला, गालिबच्या कविताही प्रकाशित केल्या

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.