The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या पठ्ठयाने केवळ ४१५ रुपयांमध्ये गुगलचं डोमेन विकत घेतलं होतं..!

by Heramb
3 September 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजच्या जगात गुगल ही अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कंपनी आहे.  गुगलचे अँप्लिकेशन्स नसतील असं कोणतंही डिवाइस आज जगात नाही. गुगलचे फीचर्स कोणालाही सांगावे लागणार नाहीत, इतकं ते आपल्या परिचयाचं बनलंय. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने तर गुगल एक वरदान आहे, मग अभ्यास असो किंवा परीक्षा, गुगलची साथ विश्वासार्ह असतेच.

एखादा विद्यार्थी घरबसल्या जगात सगळ्यात अवघड समजली जाणारी संघ लोक सेवा आयोगाची किंवा राज्य लोक सेवा आयोगाची परीक्षा गुगलवरील कन्टेन्ट वापरून पास होऊ शकतो इतकी क्षमता या गुगल आणि त्याच्या ॲप्सवर उपलब्ध असणाऱ्या माहितीची आहे. जगातील जवळ जवळ सर्वच देशांमध्ये गुगलचं जाळं पसरलं आहे. अगदी राजापासून ते रंकापर्यंत सगळेच या गुगलचा उपयोग आपापल्या गरजेनुसार करतात.

जगातील अनेक व्यावसायिक कंपन्यांमध्ये गुगलचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी होतो. जगातील जवळ जवळ सर्व वेबसाईट्स गुगल क्रोम या ब्राऊजरवर अगदी न अडखळता अगदी व्यवस्थित कार्य करतात. याच ब्राऊजरद्वारे अनेक कामे केली जातात, ब्राऊजर, जी-मेल, गुगल डॉक्स, गुगल शीट्स, गुगल ड्राइव्ह, गुगल कॉन्टॅक्टस, गुगल फोटोज सारख्या गुगलच्या ॲप्लिकेशन्सवर जगातील लाखो कंपन्या अवलंबून आहेत. तर काही सरकारचा डेटासुद्धा गुगल ॲप्लिकेशन्सवर स्टोअर केलेला आहे.

प्रत्येक देशात गुगलचं वेगवेगळं डोमेन असतं. उदाहरणार्थ, भारतात गुगलचे गुगल इंडिया (google.co.in) डोमेन आहे, तसे जगातल्या प्रत्येक देशात गुगलचे वेगळे डोमेन आहे. गुगलचे स्वतःचे डोमेन (google.com) असतेच, शिवाय प्रत्येक देशात वेगवेगळे डोमेन देखील असते. google.com आपल्याला ग्लोबल सर्व्हरवरून सर्च रिजल्ट्स दाखवते, तर त्या त्या देशातील गुगल सर्च इंजिन त्या देशातील सर्च रिजल्ट्स जास्त दाखवते.



अर्जेन्टिनामध्येही गुगलचे वेगळे डोमेन अस्तित्वात असून काही वर्षांपूर्वी त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. अर्जेंटिनामधील गुगलची वेबसाईट एका रात्री दोन तास संपूर्ण देशात बंद होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गुगलचे डोमेन देखील त्या वेळी खरेदी करण्यात आले होते.

गुगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे आणि त्याचे प्रत्येक देशावर आधारित डोमेन जवळजवळ सर्व देशांमध्ये आहेत. ‘गुगल अर्जेंटिना’ यापेक्षा काही वेगळं नाही आणि त्याचं वेब डोमेन अन्य गुगलसारखंच सर्व हेतूंसाठी उपलब्ध असेल असं कदाचित तुम्हाला वाटेल. पण काही मिनिटांसाठी का होईना तसे नव्हते! याचे कारण म्हणजे एप्रिल २०२१ मध्ये एका व्यक्तीने गुगल अर्जेंटिनाचे डोमेन नेम विकत घेतले होते. 

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

ही अद्भुत खरेदी निकोलस कुरोना नावाच्या ३० वर्षीय वेब डिझायनरने केली होती. कुरोनाने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर डोमेन खरेदी केल्याची एक पोस्ट शेअर केली, यामुळे ट्विटर यूजर्सच्या अनेक रिॲक्शन्स त्याच्या ट्विटला मिळाल्या. गुगल डोमेनवर दावा करणे ही काही साधी गोष्ट नव्हती. राजरोस अशी संधी कोणालाही येत नाही. एवढेच काय, कुरोना यांनी नमूद केले की त्यांनी सामान्य, कायदेशीर प्रक्रियेद्वारे google.com.ar हे डोमेन खरेदी केले.

मग त्यादिवशी नेमके काय घडले होते हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. गुगलचे अर्जेंटिना डोमेन त्यादिवशी देशात सुमारे दोन तास बंद होते. डोमेन डाऊन होण्याच्या रात्री कुरोना ब्यूनस आयर्सच्या बाहेरील भागात, एका क्लायंटसाठी वेबसाइट डिझाईन करत होता. त्याच वेळी त्याला व्हाट्सॲपवर गुगलची वेबसाईट बंद झाल्याची बातमी मिळाली.

त्याने स्वतः तपासण्याचे ठरवले आणि आपल्या ब्राऊजरमध्ये www.google.com.ar टाकले, पण अपेक्षेप्रमाणे गुगलची वेबसाईट बंदच होती. बी.बी.सी.ला मुलाखत देताना त्याने सांगितले, “मला काहीतरी विचित्र घडत असल्याचे वाटत आहे!” पण त्याने एक मोठं पाऊल उचललं त्याने नेटवर्क इन्फर्मेशन सेंटर अर्जेंटिनावर वेबसाइटचे डोमेन शोधले. अर्जेंटिनासाठी .ar सह नाव असलेले संपूर्ण देशाचे डोमेन नेम्स चालवण्याचे दायित्व नेटवर्क इन्फर्मेशन सेंटर (एन.आय.सी.) अर्जेंटिनाकडे आहे.

‘नेटवर्क इन्फर्मेशन सेंटर अर्जेंटिना’वर वेबसाइटचे डोमेन शोधल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण गुगलचे अर्जेंटिना डोमेन नेम चक्क विक्रीसाठी उपलब्ध होते. निकोलसने केवळ ४१५ रुपयांमध्ये गुगल अर्जेंटिनाचे डोमेन नेम विकत घेतले.

बी.बी.सी.ला मुलाखत देताना कुरोनाने वक्तव्य केले, “मी आश्चर्यचकित होतो, मी कधीही हा व्यवहार पूर्ण होण्याची कल्पनाही केली नव्हती, तरी याची सत्यासत्यता पडताळण्यासाठी सर्च बार मध्ये www.google.com.ar टाकले आणि एंटर प्रेस केले तेव्हा मला माझा वैयक्तिक डेटा दिसला!”

काही काळ डोमेनचं नियंत्रण कोण्या दुसऱ्या व्यक्तीकडे असल्याचं गुगल अर्जेंटिनाने बी.बी.सी.ला सांगितलं आणि यावर शिक्कामोर्तब केलं, किंबहुना त्या डोमेनवर पुनर्नियंत्रण लगेचच मिळवल्याचेही गुगल अर्जेंटिनाने नमूद केले. कुरोनानेही डोमेन नेम त्याच्याकडून ‘नेटवर्क इन्फर्मेशन सेंटर अर्जेंटिना’ने लवकरच काढून घेतल्याचे निश्चित केले. परंतु त्याचे २७० पेसो किंवा ४१५ रुपये एनआयसी किंवा गुगलने परत केले नाहीत.

हे कशामुळे घडले हे अद्याप एक गूढ आहे. एक अनुमान असाही लावला जातो की गुगलच्या डोमेन नेमची व्हॅलिडिटी एक्सपायर झाली होती. पण गुगलने याला सर्वस्वी नकार दिला आहे. त्याचप्रमाणे इतर सोर्सेस तपासल्यास खरंच तसे नसल्याचेही दिसून येते. कारण काहीही असो पण या घटनेने ट्विटरवर रात्रभर खळबळ उडाली होती. कुरोना कोणत्याही कायदेशीर अडचणीत सापडला नाही, याबद्दल तो स्वतःही समाधान व्यक्त करतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दिल्लीच्या वाढत्या प्रदूषणामुळे ‘ताज महालाचा’ रंग पिवळा पडतोय..!

Next Post

इंधन वाचवण्यासाठी ‘गो एअर’ फक्त महिला फ्लाईट अटेण्डण्ट्स भरती करत असे!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

इंधन वाचवण्यासाठी 'गो एअर' फक्त महिला फ्लाईट अटेण्डण्ट्स भरती करत असे!

दुसरं महायु*द्ध होऊ नये यासाठी महात्मा गांधीजींनी हि*टल*रला पत्र लिहिलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.