The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राईट बंधूंनी तब्बल १४ वर्षं विमान निर्मितीसाठी झोकून दिलं होतं

by द पोस्टमन टीम
16 December 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आपला संकल्प दृढ असेल आणि माघार न घेण्याची जिद्द असेल तर या जगात आपल्यासाठी अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. काहीतरी नवे शोधण्यासाठी किंवा नवनिर्मिती करण्यासाठी तुमच्याकडे मोठमोठ्या डिग्र्या असल्याच पाहिजेत असे अजिबात नाही. फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती आणि स्वप्न पाहण्याची जिद्द या दोनच गोष्टींच्या आधाराने मोठ्यात मोठे यश प्राप्त केल्याची कित्येक उदाहरणे आपण पाहिली आहेत, त्याबद्दल ऐकले, वाचले आहे.

विमानाचा शोध लावणाऱ्या राइट बंधूंची कथाही यापेक्षा काही वेगळी नाही. दोघांनाही फक्त काही तरी अद्भुत काम करण्याच्या ध्यासाने झपाटले होते. त्यांना आपल्या कामाशिवाय इतर कशातच रस नव्हता. या कामात जितक्या म्हणून अडचणी आणि अडथळे आले त्याला त्यांनी कवडीमोल किंमत न देता आपले काम सुरुच ठेवले. म्हणूनच त्याच्या स्वप्नांना पंख मिळाले. आज त्यांनी दिलेल्या या पंखांमुळेच अनेकांना उंच झेप घेता येते.

संपूर्ण उत्साहाने आणि सद्सदविवेकबुद्धीने काम केले तर या जगात काहीच अशक्य नाही. दृढ इच्छाशक्तीच्या जोरावर माणूस डोंगरालाही भगदाड पाडू शकतो. त्यात जर एकाला दुसऱ्याची साथ असेल तर मग काय विचारूच नका. आपण कठीणात कठीण प्रसंगही एकमेकांच्या सहाय्याने पार करू शकतो. राइट बंधूंच्या कामाकडे पाहिल्यास आपल्याला नक्कीच याची प्रचीती येते. या दोन्ही भावांनी एकमेकांच्या साथीने अगदी चमत्कारच करून दाखवला होता. अर्थात आजच्या घडीला याकडे कुणी चमत्कार म्हणून पाहणार नाही पण, ज्यावेळी त्यांच्या कल्पनेला त्यांनी मूर्त स्वरूप दिले त्यावेळी नक्कीच ही गोष्ट एखाद्या चमत्कारापेक्षा कमी वाटली नसेल. आपल्या संशोधनाने त्यांनी जगाचा इतिहासच बदलून टाकला.

त्यांच्या या संशोधनामुळे हजारो-लाखो किलोमीटरचे अंतर अगदी काही तासांत पार करणे शक्य झाले. राइट बंधूनी विमानाचा शोध लावला आणि संपूर्ण जग पादाक्रांत करण्याच्या मानवी महत्त्वाकांक्षेला नवीन धुमारे फुटले. परंतु, राइट बंधूंनी हा शोध लावला कसा? त्यांना याची प्रेरणा कुठून मिळाली? त्यांना कुणी यासाठी प्रोत्साहन दिले का? दोघांनीही एकमेकांच्या साथीने विमानाचा शोध कसा लावला? जाणून घेऊया या लेखातून.



विमानाचा शोध कुणी लावला, असा प्रश्न विचारल्यावर कुणीही उत्तर देईल ‘राइट बंधू.’ या प्रश्नाच्या उत्तरासाठी कोणा एकाचे नाव कधीच घेतले जात नाही. राइट बंधूंनी विमानाचा शोध लावला असेच म्हटले जाते.

खरे तर या दोन्ही भावंडाच्या वयात पाच वर्षांचे अंतर होते, तरीही दोघे भाऊ अगदी नेहमी सावलीसारखे एकमेकांसोबत राहिले. या दोन्ही भावंडापैकी मोठ्याचे नाव होते विल्बर राइट तर छोट्याचे नाव होते ऑरविल राइट. विल्बर यांचा जन्म १६ एप्रिल १८६७ रोजी तर ऑरविल यांचा जन्म त्यांच्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच १९ ऑगस्ट १८७१ रोजी झाला. दोघेही अमेरिकन नागरिक. त्यांचे वडील अमेरिकेतील ब्रेदेन चर्चमध्ये बिशप होते.

लहानपणापासून त्यांच्यात जबरदस्त प्रेम होते. दोघेही तितकेच खोडकर आणि व्रात्य होते. येणाऱ्या काळात त्यांचे हे एकमेकांवरील प्रेम आणि एकमेकांना साथ देण्याच्या वृत्तीतूनच एक नवा इतिहास रचला जाणार होता हे कदाचित त्यांनाही ठाऊक नसेल.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

ज्या वयात इतर मुले मैदानावर जाऊन खेळ खेळत तेव्हा हे दोघे बंधू आपल्या घरातील अडगळीतील खोलीत जाऊन बसत. तिथल्या मोडक्या-तोडक्या वस्तू पुन्हा जोडता येतात का हे पाहत. काही वस्तू मोडत आणि त्या पुन्हा जोडत. दिवसभर त्यांचा हाच खेळ चाललेला असे. शाळेतून घरी आले की थेट ते या अडगळीच्या खोलीतच शिरत. तिथे बसून वस्तूंची तोडमोड आणि जोडाजोडी करण्यातच त्यांना भरपूर आनंद मिळत असे.

स्वतःला अडगळीच्या खोलीत कोंडून घेणारी ही मुले पाहून त्यांच्या आई-वडिलांना या मुलांची खूप काळजी वाटत असे. इतर मुलांप्रमाणे हे दोघे कधीच मैदानावर वगैरे जाऊन का खेळत नसतील?, इथे कोंडून घेऊन जुन्या तुटक्या अडगळीच्या वस्तूंमध्ये त्यांना काय मिळत असेल?, अशा अनेक चिंता त्यांना भेडसावत होत्या. या मुलांना अडगळीच्या खोली बाहेरचे जग कधी दिसणार आहे की, नाही हाच प्रश्न त्यांना सतत सतावत असे. पण, त्यांना काय माहिती की त्यांची हीच सवय पुढे जाऊन त्यांना इतिहास घडवण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. खरे तर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना कधीच बंधने घातली नाहीत. त्यांच्या कल्पना फुलण्याआधीच कुस्करल्या नाहीत. त्यामुळे त्यांचा बौद्धिक विकास चांगला झाला.

खुद्द विल्बर यांनीच ही कबुली दिली होती, की “आम्हाला मुक्त वातावरण मिळाल्यानेच आमची कल्पनाशक्ती आणि सृजनशील विचार अधिकाधिक मजबूत झाले.”

तरीही कुठल्याही सामान्य आई-वडिलांप्रमाणे त्यांची ही चिंता रास्तच होती म्हणा. यावर उपाय म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांनी खेळण्यातील विमान आणून दिले. हे विमान कागद आणि लाकडापासून बनवण्यात आले होते. या विमानामुळे ते त्या अडगळीच्या खोलीतून बाहेर आले आणि त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटली. या खेळण्यामुळे ते अडगळीच्या खोलीतून बाहेर आले असले तरी मोडतोड आणि जोडाजोड करण्याचा छंद काही सुटला नव्हता. त्यांच्या वडिलांनी त्यांना आणून दिलेले खेळण्यातील विमानही एकदा खेळता खेळता त त्यांच्या हातून तुटले. दोघांचीही चांगलीच घाबरगुंडी उडाली. नवीन आणलेले खेळणे आपण मोडले आहे हे कळले तर वडील आपल्याला खूप खूप ओरडतील म्हणून ते दोघेही घाबरले होते. परंतु जोडाजोडी हा तर त्यांच्या डाव्या हाताचा मळच ना! मग काय दोघांनीही ते मोडलेलं खेळणं अगदी शिताफीने जोडलं आणि पुन्हा त्याच्याशी खेळू लागले. या खेळण्यातील विमानानेच कदाचित दोघांच्याही स्वप्नात हवेत उडण्याचे रंग भरले असतील.

मोठे झाले तसे त्यांची समज वाढत होती. दोघांनीही शाळेत प्रवेश घेतला होता. पण, दोघांनीही हायस्कूलमध्येच शिक्षणाला रामराम ठोकला. त्यांचे मन अभ्यासात रमतच नव्हते. हायस्कूलमधून डिप्लोमा पूर्ण न करताच त्यांनी शिक्षण सोडून दिले. मग दोघांनी स्वतःचे वर्तमानपत्र सुरु केले. ऑलिव्हर या वर्तमान पत्राचा प्रकाशक होता तर विल्बर संपादक. परंतु चारच महिन्यात हे वर्तमानपत्र बंद करण्याची वेळ आली. यातून त्यांना फायदा काहीही नाही आणि नुकसान मात्र खूप होऊ लागले.

मग काय वर्तमानपत्र बंद केले आणि दोघांनी मिळून एक सायकल दुरुस्त करणारी कंपनी काढली. या कंपनीचे नाव होते ‘राइट ब्रदर्स सायकल कंपनी’. या कंपनीत त्यांना फायदा होत होता. बरीच वर्षे ही कंपनी अगदी सुरळीत चालली पण, नंतर त्यांना यातही तोटा होऊ लागला. शेवटी या कंपनीलाही त्यांनी टाळे लावले. त्यांच्या आवडीचे आणि ज्यात त्यांचे मन रमेल असे काहीतरी काम त्यांना हवे होते. पण, त्यांना असे काम मिळत नव्हते. तरीही त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत.

एक-दोनदा अपयश आले म्हणून ते खचून गेले नाहीत. त्यांनी अनेक कामे केली पण, कशातच त्यांना यश येत नव्हते. एक दिवस त्यांना विमान बनवण्याची कल्पना सुचली.

वर्तमानपत्र चालवत असताना त्यांच्याकडे कागदी विमानाच्या भरपूर जाहिराती येत असत. त्यामुळे या विमानांबद्दल त्यांना बरीच माहिती होती. सायकल रिपेअरिंग कंपनी सुरु केली तेव्हाही ते मोठमोठ्या प्रदर्शनांना भेटी देत होते. त्यावेळी ते एका प्रदर्शनात गेले होते जिथे विमानाच्या संशोधनावर चर्चा सुरु होती. परंतु त्यावेळी तर त्यांची सायकल कंपनी जोरात सुरु होती, त्यामुळे त्यांनी विमान संशोधनाच्या चर्चेत रस घेतला नाही.

पण, सायकल दुरुस्तीची कंपनीही बंद पडली तेव्हा त्यांना विमान निर्मितीची कल्पना सुचली. इथून पुढे त्यांचे अवघे जीवनच पालटून गेले.

दोघांनी मिळून १८९९ साली विमान निर्मितीचे काम सुरु केले. अमेरिकेतील अनेक वैज्ञानिक आधीपासूनच विमान निर्मिती करण्यासाठी धडपडत होते. परंतु हवेत गेल्यावर विमानाचा तोल सावरणे अवघड काम. म्हणूनच त्यावेळी लाकूड आणि कागदाचा वापर करून बनवलेले विमान काही काळ आकाशात उडाल्यानंतर तुटून खाली पडत असे.

राइट बंधूनी विमानाच्या निर्मितीचा ध्यास घेतला. त्यांनी यावर अभ्यास आणि संशोधन सुरु केले. विमानाच्या दोन्ही बाजूला पसरट पंख लावले तर, कदाचित हवेत गेल्यावर विमानाचा तोल ढासळणार नाही आणि विमान हवेत बराच काळ उडेल असा त्यांचा कयास होता. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. पण एवढ्यातच पूर्ण यश मिळाले नव्हते.

विमान निर्मितीच्या कामात त्यांनी स्वतःला असे काही झोकून दिले की इतर कुठल्याही गोष्टींचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. त्यांना वाटले होते इतके हे काम सोपे नव्हते. अडचणी तर होत्याच पण, त्यावर मात करण्याची जिद्द देखील होती. यासाठी वेळही खूप जात होता. त्यांनी अडचणींचा बाऊ न करता आपले काम सुरूच ठेवले. त्यांच्या कार्याला यश येण्यास बराच अवधी जावा लागला. यासाठी त्यांना आयुष्यातील कित्येक वर्षे खर्ची घालावी लागली.

कित्येकदा त्यांच्या कल्पना कुचकामी ठरत. %

ShareTweet
Previous Post

या रशियन स्नायपरने दुसऱ्या महायु*द्धात ना*झी सैन्याच्या नाकीनऊ आणले होते

Next Post

या शास्त्रज्ञाने अवघ्या २५व्या वर्षी नोबेल पारितोषिक पटकावलं होतं

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

या शास्त्रज्ञाने अवघ्या २५व्या वर्षी नोबेल पारितोषिक पटकावलं होतं

ऑपरेशन गुलमर्गने कश्मीर हडपण्याचा पाकिस्तानचा डाव त्याला चांगलाच महागात पडला

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.