The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एका डेंग्यूग्रस्त जिल्ह्याला देशातील सर्वांत स्वच्छ जिल्ह्यात परावर्तीत करणारी ‘देवसेना’

by द पोस्टमन टीम
18 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


‘बाहुबली’ चित्रपटातली देवसेना य काल्पनिक पात्राने सर्व रसिकांची मनं जिंकून घेतली. सर्वांना भावला तो तिचा बाणेदारपणा व धाडसी नेतृत्व. आणखी एका ‘देवसेने’ने खऱ्या आयुष्यात महत्त्वाकांक्षी पावलं उचलून एका गावाला स्वच्छ, सुंदर व समृद्ध बनवलं आहे. एका अर्थाने त्या गावाला आयुष्य जगण्याची नवी दिशा दिली आणि हा चमत्कार केवळ एका वर्षांत करून दाखवला.

ही गोष्ट आहे आएएस अधिकारी ‘देवसेना’ हिची. २०१८ साली त्यांची पेदापल्ली या जिल्ह्यात, जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली. पेदापल्ली हें तेलंगणा राज्यातील आठ लाख लोकसंख्या असलेला एक जिल्हा. जेव्हा देवसेना या गावात जिल्हाधिकारी म्हणून आल्या तेव्हा गावाची परिस्थिती खूप बिकट होती.

हे गाव पाण्यासाठी पुर्णपणे धरणावर अवलंबून होतं त्यामुळे उन्हाळ्यात, पाण्याची समस्या हा मोठा प्रश्न होता. वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत होती. भूजल पातळी देखील खालावत चालली होती.

योग्य नियोजनाच्या अभावामुळे ड्रेनेज सिस्टिम देखील खराब झाली होती. पावसाळ्यात नाले तुंबणे व त्यामुळे डेंग्यू सारख्या आजारांची साथ पसरणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. स्वच्छतेचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता.

पण अविश्वसनीय बाब अशी की २०१९च्या राष्ट्रीय स्वच्छता सर्वेक्षणात ‘सर्वांत स्वच्छ जिल्हा’ हा बहुमान मिळाला आणि याचं पुर्ण श्रेय देवसेना आणि त्यांच्या टीमच्या अथक प्रयत्नांना जातं .



नियुक्तीच्या काही महिन्यांच्या आतच पेदापल्ली हागणदारीमुक्त गाव म्हणून घोषित करण्यात आलं. त्यासाठी त्यांनी अनेक पाउलं उचलले. त्यांच्या टीमने जिल्ह्यातील सर्व २६३ गावांत सार्वजनिक शौचालय बांधल्या गेले आहेत की नाही याची निश्चिती केली.

गावकऱ्यांना सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी ही शौचालयं बांधण्यात आली, जेणेकरून ‘घरापासून लांब आहे’ असं कारण देणारे कमी झाले.

हे काम इथेच थांबवलं नाही तर स्वच्छतागृहे स्वच्छ राहायला हवी याची देखील काळजी घेतल्या गेली व ही जबाबदारी सरपंचांकडे सोपवली. शिवाय ५०-१००  कुटुंबासाठी एक स्वच्छताग्रही निवडण्यात आला. अशा रीतीने जवळपास १००० महिला स्वच्छताग्रही म्हणून प्रत्येक गावांत काम करु लागल्या. गावाच्या स्वच्छतेकडे तर त्या लक्ष द्यायच्या शिवाय घरोघरी जावून लोकांना स्वच्छतेचं महत्त्व, उघड्यावर शौच किंवा अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांबद्दल लोकांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलं. ज्यामुळे आज हा जिल्हा अनेक रोगराईपासून मुक्त आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

जेव्हा हे कार्य टप्प्याटप्प्यानी पुढे जात होतं त्याच वेळी आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी हाती घेतला, तो म्हणजे, कचरा वर्गीकरण व कचरा व्यवस्थापन. प्रत्येक घरात ‘सोक पिट्स’ बांधण्यात आले. जे मुख्य ड्रेनेज लाईनला जोडले गेले.

जवळपास एक लाख ‘सोक पिट्स’ बांधण्यात आले व त्याचे परिणाम दिसू लागले. आज पेदापल्ली भारतात पहिला जिल्हा आहेत जिथे ‘ओपन ड्रेनेज सिस्टिम’ नाही. यासाठी देवसेना व सर्व गावकरी अभिनंदनास पात्र आहेत!!

कचरा व्यवस्थापनासाठी घरातील प्रत्येक स्त्रीला कचऱ्याच वर्गीकरण ओला कचरा, सुखा कचरा व प्लास्टिक असं करण्यास सांगितले, जेणेकरून जास्तीत जास्त कचरा रीसायकल करता आला.

कॉंपोस्ट करून अंगणात  किचन गार्डन बनवण्यास प्रोत्साहन दिले. भाज्या, फळांची रोपं सुद्धा त्यांना प्रशासनातर्फे पुरवण्यात आली. यामुळे दोन हेतु साधले गेले. स्वच्छता व्यवस्थापन योग्य प्रकारें होवू लागले व घरी पिकवलेल्य भाज्या व फळांमुळे एनीमिया व कुपोषणाच प्रमाण बऱ्यापैकी कमी झालं. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी पर्यायी साधन उपलब्ध करून देण्यात आली.

अनेक स्त्रिया एकत्र येवून कापडी पिशव्या व इतर ‘इको फ्रेंडली’ साधनं बनवायच्या. यामुळे महिलांना रोजगारसुद्धा निर्माण झाला.

याच प्रकल्पाची लाभार्थी सांगते, “आधी मी मोल मजुरी करून थोडं फार कमवायची पण आता माझी कमाई चांगली असल्यामुळे माझी मुलं इंग्रजी शाळेत शिकू शकतात.” मासिक पाळी व स्वच्छता हा प्रमुख कार्यक्रम राबवण्यात आला. पेदापल्ली ‘सॅनिट्री नँपकिन’ मोठ्या प्रमाणावर बनवणारा व अत्यंत कमी किमतीत विकणारा पहिला जिल्हा ठरला.

‘सबला’ नावाचं हें सॅनिट्री नँपकिन २.५० रुपयात विकण्यात येत. युरिनरि ट्राक इन्फेकशन व रेप्रेझेन्टेटिव्ह ट्रक इनफॅकशन पासून अनेक स्त्रिया वाचवल्या गेल्या .

जवळपास ४०० एकर जागेत एक लाख झाडं लावून वनीकरण करण्यात आलं. या मुळे जमीन सुपीक झाली व भूजल पातळीत देखिल लक्षणीय वाढ झाली. फळांची झाडे खास करून लावण्यात आली. त्यामुळे पक्षी व इतर शाकाहारी प्राण्यांमधे वाढ झाली. देवसेना यांच्या कार्याला पाहून राज्य व केंद्र सरकार कडून अनेक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आलं. या यशाच श्रेय त्या कायम गावकरी व त्यांच्या टीमला देतात.

त्या म्हणतात, “जेव्हा गावकऱ्यांना माझ्या कामावर विश्वाच बसायला लागला व आपल्या गावाला प्रगतीकडे जाताना ते पाहू लागले, तेव्हा स्वतःहून त्यांनी हातात झाडू घेवुन आपलं योगदान दिलं. गावकऱ्यांचा प्रतिसाद व सहकार्याशिवाय हे शक्यच नव्हतं.”

गावाची अशीच पुढे प्रगती होत राहो यासाठी देवसेना व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन व शुभेच्छा..!!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: IAS Officer
ShareTweet
Previous Post

आखाती देशातील या प्रश्नाने आजवर तब्बल ३० लाख लोकांना निर्वासित बनवलंय…!

Next Post

पॅसिफिक समुद्रात रंगांधळ्या लोकांचे बेट आहे

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

पॅसिफिक समुद्रात रंगांधळ्या लोकांचे बेट आहे

या महिलेने आयएएस होऊनही रुग्णसेवेचा ध्यास सोडला नाही

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.