The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाषण चालू असताना छातीवर गोळी लागली, तरीही प्रेसिडेंट रुझवेल्टनी पुढे ९० मिनिटं भाषण दिलं

by Heramb
23 August 2025
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


लोकशाही म्हटलं की निवडणुका आल्या, त्या बरोबर चुरशीच्या लढती, आरोप-प्रत्यारोप आणि प्रत्येक गोष्टीवर होत असलेलं राजकारणंही आलंच. प्रत्येक ५ अथवा ६ वर्षांत होणाऱ्या निवडणूका आपल्याकडे “लोकशाहीचा उत्सव” म्हणून पार पाडल्या जातात. अमेरिकेसारख्या आर्थिक आणि लष्करी महासत्ता असलेल्या देशामध्येसुद्धा दर ४ वर्षांनी राष्ट्रीय निवडणूका होतात. अमेरिका महासत्ता असल्याने आपल्यासारखेच निवडणुकीतील गैरप्रकार तिथेही होत असतील काय असा प्रश्न आपल्याही मनात उद्भवला तर काही नवल नाही.

कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल, अमेरिकेसारख्या प्रगल्भ, सुशिक्षित देशातही निवडणुकांचं वातावरण काही समाजोपयोगी किंवा शांततेचं नसतं, याचं उदाहरण आपल्यासमोर आहेच, जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्याच कॅपिटल हिलवर निवडणूक निकालांच्या पार्शवभूमीवर उसळलेली दं*गल. या वेळी मोठ्या प्रमाणात हिं*साचार उसळला होता आणि अनेकांना आश्चर्यचकित करणारी दृश्य पाहावयास मिळत होती.

तर या वर्षी देखील ट्रम्पवर २०२४च्या निवडणुकांच्या वेळी प्राणघातक ह*ल्ला झाला होता.

राजकारणाच्या पार्शवभूमीवर झालेला हा हिं*साचार अमेरिकेला काही नवा नाही, आजपर्यंत अमेरिकेच्या तब्बल ६ राष्ट्राध्यक्षांची ह*त्या करण्यात आली. त्याचप्रमाणे १५ राष्ट्राध्यक्षांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. अनेक लोकशाही देशांमध्ये अशा प्रकारचे ह*त्येचे प्रयत्न होतात, या वरून तिथल्या जनतेने खरंच मनापासून लोकशाही स्वीकारली आहे का? की काही जणांवर ही राज्यव्यवस्था थोपली गेलीये? हे आणि असे बरेच प्रश्न उद्दभवतात.

ज्या पंधरा राष्ट्राध्यक्षांचे ह*त्येचे प्रयत्न झाले, त्यांपैकी एक म्हणजे अमेरिकेचा २६वा राष्ट्राध्यक्ष टेडी रुझवेल्ट, एक असामान्य नेता, सैनिक, लेखक, इतिहासकार, संवर्धनवादी, निसर्गवादी आणि मुत्सद्दी राजकारणी. या आधी मार्च १९०१ ते सप्टेंबर १९०१ दरम्यान तो अमेरिकेचा २५वा उपराष्ट्राध्यक्ष तर १८९९ ते १९०० दरम्यान न्यू यॉर्क राज्याचा राज्यपाल म्हणून कार्यरत होता. १९०४ साली रशिया-जपानमध्ये झालेल्या यु*द्धात मध्यस्थी करून ते यु*द्ध थांबवल्याबद्दल सन १९०६ मध्ये त्याला शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. या शिवाय सन १९०४-१९१४ दरम्यान पनामा कालव्याचे बांधकाम सुरू करण्यात त्याचा मोठा वाटा होता.



स्वतःच्या कार्यकाळात त्याने राष्ट्राध्यक्षाकडे असलेल्या अधिकारांमध्ये वाढ केली, तसेच “अंकल सॅम”च्या (अमेरिकेचे फेडरल सरकार) अधिकारांमध्येसुद्धा टेडी रुझवेल्ट ने मोठ्या प्रमाणात वाढ केली.

रूझवेल्ट हा राजघराण्याचा सदस्य होता असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. त्यांचं घराणं डच आणि इंग्रजी वंशाचं आणि  सामाजिकरीत्या अतिशय प्रगत होतं. थिओडोर रुझवेल्टचे वडील थोरले थिओडोर रुझवेल्ट एक यशस्वी उद्योगपती आणि अतिशय परोपकारी माणूस म्हणून ओळखले जात. तर थिओडोरची आई, जॉर्जियाची मार्था बलोच ही अत्यंत्य श्रीमंत घराण्यातून होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

चार अपत्यांपैकी दुसरं अपत्य असलेल्या टेडी रुझवेल्टला सतत काहीतरी आजारपण असल्याने त्याच्यासाठी खाजगी शिक्षकाची सोय केली होती. लहानपणापासूनच थिओडोर अतिशय जिज्ञासू वृत्तीचा होता. त्याने हार्वर्ड महाविद्यालयातून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि कोलंबिया विधी अभ्यास केंद्रातून शिक्षण घेताना तो राजकारण आणि लेखन या विषयांकडे वळला, याच ठिकाणी तो “फी बीटा कप्पा” या संस्थेसाठी सन १८८० मध्ये निवडून आला.

भविष्यात राजकारण करायचं या दृष्टीने थिओडोर ‘न्यू यॉर्क’मधील मॉर्टन हॉल येथील बैठकांना उपस्थित राहू लागला. या दरम्यान सन १८८० मध्येच थिओडोरने ऍलिस हॅथवे ली बरोबर विवाह केला.

वर सांगितल्याप्रमाणे थिओडोरला सतत काहीतरी आजारपण असायचं, दमा आणि कमी दिसण्याच्या आजाराने आयुष्यभर त्याची पाठ सोडली नाही, आरोग्य विषयक  इतक्या अडचणी असूनसुद्धा त्याने आपली शरीरयष्टी संतुलित स्थितीत ठेवली होती. सन १९०१ मध्ये लिहिल्या आपल्या पुस्कात “खडतर जीवनशैलीचा” स्वीकार केल्याचं त्याने नमूद केलय.

वयाच्या केवळ २३व्या वर्षी रिपब्लिकन म्हणून तो न्यू यॉर्क स्टेट असेम्ब्लीमध्ये निवडून आला, लवकरच भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांचा शत्रू म्हणून तो ओळखला जाऊ लागला.

सन १८८४ मध्ये आई आणि पत्नी एकाच दिवशी गेल्याच्या दुःखावर मात करण्यासाठी राजकारण सोडून तो डकोटा प्रदेशातील ओसाड प्रदेशात गेला. याच ठिकाणी तो पाश्चिमात्य जंगलांच्या आणि पर्यावरण ऱ्हासाबद्दल चिंतातुर झाला, आणि त्याने या बद्दल अभ्यासाची सुरुवात केली . सार्वजनिक आयुष्यातून माघार घेतली असूनही त्याने १८८४ साली रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनचा प्रतिनिधी म्हणून गेला होता.

सन १८८४ मध्ये सार्वजनिक आयुष्यात येण्याचा त्याचा प्रयत्न फोल ठरला. त्याने न्यू योर्कची महापौर पदाची निवडणूक लढवली, पण तो हारला. यु. एस. सिव्हिल सर्विस कमिशनचं सदस्यत्व घेऊन आणि न्यू यॉर्क सिटी बोर्ड ऑफ पोलीस कमिशनर्स या संस्थेचा अध्यक्ष होऊन त्याने आपली भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरु ठेवली . या नंतर नौदल अध्यक्ष विलियम मॅकेनली यांनी त्याची नियुक्ती नौदलाचा सहाय्य्क सरचिटणीस म्हणून केली.

टेडी रुझवेल्टने याच काळात आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या नौदलाला आव्हान दिलं आणि यामुळेच त्याच्यावर स्पेनबरोबर यु*द्ध पेटवण्याचा आरोप लावला जातो. या यु*द्धाच्या काळात त्याने फस्ट वोल्युनटीअर कॅवलरीची म्हणजेच पहिल्या स्वयंसेवी घोडदळाची स्थापना केली, ज्याला रफ रायडर या नावानेही वळले जाते, या तुकडीला क्युबामध्ये पाठवण्यात आले.

रुझवेल्ट हा पराक्रमी आणि प्रसिद्ध असा लष्करी नेता होताच, पण रफ रायडर्सच्या दिल्या गेलेल्या जबाबदारीमुळे स्पॅनिश-अमेरिकन यु*द्धासमयीच्या सँटियागोच्या लढाईत तो एक राष्ट्रीय नायक म्हणून उदयास आला. अखेरीस १८९८ मध्ये तो निवडून आला, यानंतर १९०३ पर्यंत त्याची विजयी कारकीर्द सुरूच होती, या काळात त्याने अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकलं. १८९९ रुझवेल्ट न्यू यॉर्कचा गव्हर्नर बनला.

सन १८९९ मध्ये अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष गॅरेट हॉबर्ट हृदयविकाराने मरण पावला. हेनरी कॅबोट आणि अन्य सदस्यांच्या विनवण्यानंतरही रुझवेल्ट उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी नामांकन देण्यास अनैच्छिक होता, याउपर राष्ट्राध्यक्ष मॅक-किन्ले आणि निवडणूक मोहिमेची व्यवस्थापक मार्क हाना यांच्या म्हणण्यानुसार स्पॅनिश-अमेरिकन यु*द्धासाठी कारणीभूत असलेला रुझवेल्ट उपराष्ट्राध्यक्षपदासाठी पात्र ठरत नसल्याचं सांगितलं.

भ्रष्टाचारविरोधी रुझवेल्टपासून सुटका करून घेण्यासाठी प्लाटने रूझवेल्टच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या नामांकनासाठी वर्तमानपत्रांतून मोहीम चालवली. रूझवेल्टने १९०० रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शनला राजकीय प्रतिनिधी म्हणून हजेरी लावली, आणि प्लाटबरोबर केलेल्या एका करारात तो अडकला, प्लाटचा उपराष्ट्राध्यक्षपदाच्या नामांकनाचा प्रस्ताव त्याने मान्यही केला असता, पण पुढच्या टर्ममध्येसुद्धा रूझवेल्टने गव्हर्नर पदावर कार्यरत राहायचे ठरवले.

प्लाटने शेवटी पेनसिल्वानियामधील आपल्या मॅथु क्वे नावाच्या पक्षाच्या अध्यक्षाला रूझवेल्टची राष्ट्राध्यक्षपदाची मोहीम हाती घ्यायला सांगितली, क्वे ने आपली शक्ती वापरून मार्क हानाला निवडणूक मोहिमेतून बाहेर काढलं आणि अतिशय विचित्ररीतीने रुझवेल्ट नामांकनाबरोबरच निवडणुकही जिंकला.

०६ सप्टेंबर १९०१ रोजी राष्ट्राध्यक्ष मॅक-किन्ले बफेलो येथे पॅनअमेरिकन प्रदर्शनाला हजेरी लावण्यासाठी चाललेला असताना लिओन सोलगॉझ नावाच्या माणसाने त्याला गोळ्या घातल्या, रुझवेल्ट या वेळी वेरमॉण्ट या ठिकाणी सुट्टीवर होता, राष्ट्राध्यक्षावरील ह*ल्ल्याची बातमी कळल्यानंतर त्याने लगोलग बफेलोकडे कूच केले आणि तो मॅक-किन्लेला भेटला, मॅक-किन्लेची प्रकृती सुधारते असं दिसल्यावर रुझवेल्ट पुन्हा आपल्या सुट्ट्या सुरु ठेवण्यासाठी ऍड़िरोंडकसला गेला, पण मॅक-किन्लेची प्रकृती बिघडते म्हटल्यावर रुझवेल्ट पुन्हा बफेलोला आला.

१४ सप्टेंबर १९०१ रोजी मॅक-किन्लेचा मृत्यू झाला आणि थिओडोर रुझवेल्टने अमेरिकेच्या २६व्या राष्ट्राध्यक्षाच्या रूपात अन्स्ले विल्कोक्स हाऊस येथे शपथ घेतली.

स्क्वेअर डील हा थिओडोर रूझवेल्टचा स्वदेशी कार्यक्रम होता, या कार्यक्रमातून त्याने तीन मागण्या समोर ठेवल्या, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण (कंजर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस), कॉर्पोरेट कायदा आणि ग्राहक संरक्षण (कन्ज्युमर प्रोटेक्शन). या तीन मागण्यांना बऱ्याचदा रूझवेल्टच्या स्क्वेअर डीलचे “तीन सीज्” असे संबोधले जाते.

सन १९०२ मध्ये अमेरिकेतील कोळसा खाण कामगारांनी बंद पुकारला, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर कोळसा टंचाईचा संभाव्य धोका उद्भवला, पण रूझवेल्टने आपली नीती वापरून, न्यायालयीन मार्गाने तोडगा काढत तो संप बंद पाडला.

असेच अनेक प्रश्न त्याने आपल्या कारकिर्दीत सोडवले, रेल्वे मार्ग, अमेरिकी-भारतीय विभागात झालेल्या गैरवर्तनाविरोधात खटला चालवला, शुद्ध अन्न आणि अंमली पदार्थ यांच्याबद्दल कठोर कायदे करण्याचं कामही याच राष्ट्राध्यक्षाच्या कार्यकाळात पार पडलं.

रूझवेल्टने आपल्या कारकिर्दीत वन संवर्धनाचे मोठे काम हाती घेतले होते. आधी सांगितल्याप्रमाणे तो निसर्गवादी आणि संवर्धनवादी होता. या झंझावाती आणि पूर्ण तत्परतेने काम करणाऱ्या राष्ट्राध्यक्षाला सन १९०४ मध्ये जनतेने पुन्हा बहुमत देऊन निवडून आणले.

पण अशा या कार्यक्षम राष्ट्राध्यक्षाची कारकीर्द अतिशय खळबळजनक रितीने आणि गोंधळाच्या परिस्थितीत संपली.

अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेत एक राष्ट्राध्यक्ष फक्त दोन वेळा निवडून येऊ शकतो, तिसऱ्यांदा तो राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवू शकत नाही.

थिओडोर रूझवेल्ट यांनी अमेरिकन लोकांना तिसरी टर्म न घेण्याच्या प्रतिज्ञेची पूर्तता करण्यासाठी १९०८ मध्ये पुन्हा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. रुझवेल्टने यु*द्धसचिव विल्यम हॉवर्ड टाफ्टला त्याचा उत्तराधिकारी बनवले होते आणि १९०८ च्या सार्वत्रिक निवडणुकीत टाफ्टने विल्यम जेनिंग्ज ब्रायनचा पराभव केला होता.

पुढे वैयक्तिक स्तरावर तो रिपब्लिकन पक्षासाठी काम करत राहिला, १४ ऑक्टोबर १९१२ रोजी जॉन स्क्रँक नावाच्या व्यक्तीने रूझवेल्टला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, माजी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट या वेळी मिल्वाउकी या शहरात निवडणुकीची मोहीम चालवत होता, स्क्रँकने मारलेली गोळी त्याच्या स्टीलने तयार केलेल्या फ्रेम वर वर लागून, ५० पानी कागदी ठोकळ्यातून जाऊन त्याच्या छातीवर लागली.

स्क्रॅंकच्या हातातून तात्काळ बंदूक काढून घेण्यात आली, त्याला बहुधा आलेल्या गर्दीने चोपही दिला असावा, पण हे होत असताना रूझवेल्टने त्याला हानी होईल याची खात्रीच केली असावी, या नंतर स्क्रॅंकला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

बंदुकीची गोळी फुफ्फुसापर्यंत गेली नाही हे रक्ताचा खोकला येत नसल्याने रुझवेल्टने हे अचूकरीत्या ओळखलं होतं, त्या मुळे त्याने लगेचच रुग्णालयात जायचं टाळलं, आणि आपलं सुमारे ९०मिनिटांचं भाषण पूर्ण केलं. भाषणाच्या सुरुवातीलाच त्याचे शब्द होते: “लेडीज अँड जेंटलमन, मला गोळी लागलीये हे तुम्हाला समजलं कि नाही हे मला माहित नाही, पण बुल मुझला मारण्यासाठी या पेक्षा कमी वेळ लागतो!”

बंदुकीची गोळी रूझवेल्टच्या छातीच्या स्नायूंना छेदून गेली पण फुफ्फुसापर्यंत पोहोचली नाही हे एक्स-रे मधून समोर आलं. ती गोळी बाहेर काढण्याचा प्रयत्न करणं हे धोकादायक ठरेल असं डॉक्टरांचं मत होतं, ज्यामुळे पुढे पूर्ण आयुष्यभर त्याला ही गोळी घेऊनच जगायचं होतं.

सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे रूझवेल्टला सतत काहीतरी आजारपण असायचं, पण या सगळ्यावर मत करून, छातीत गोळी लागलेली असतानाही तो आपल्या कर्तव्य सोडून पळाला नाही, पहिल्यापासूनच इतक्या शारीरिक समस्या असतानाही आपलं कर्तव्य त्याने चोखपणे पार पाडलं, देशाची आणि आपल्या जनतेची सेवा हीच त्याच्यामागची प्रेरणा असावी बहुधा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

MIT-स्टॅनफर्डच्या विद्यार्थ्यांनी केलेली गां*ज्याची खरेदी विक्री हा इंटरनेटवरचा पहिला व्यवहार

Next Post

या कंपनीने जगभरातील करोडो लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाय शोधलाय

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

या कंपनीने जगभरातील करोडो लोकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाय शोधलाय

या छोट्या हॉटेलसमोर अमेरिकन फूड जायंट ‘मॅकडोनाल्ड’लाही हार मानवी लागली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.