The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगातील शेवटचा ना*झी आयुष्यभर लपून राहिला, पण सत्य समोर आलंच..!

by द पोस्टमन टीम
14 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


उच्च ‘आर्य’वंशीय म्हणून या जगावर केवळ राज्य करण्याचाच नव्हे तर या जगात राहण्याचा हक्क केवळ आमचाच आहे, असे मानणाऱ्या आणि ज्यूंचे शिर*काण करणाऱ्या ना*झी सैन्याचा दुसऱ्या महायु*द्धात पराभव झाल्यावर त्यांचे अनेक हस्तक जर्मनीतून पळून जाऊन आपापली ओळख लपवून जगातल्या वेगवेगळ्या देशात राहू लागले. कारण यु*द्धोत्तर काळात त्यांच्या स्वतःच्या देशातही त्यांना क्षमा नव्हती. ना*झी सैनिक आणि त्यांच्या समर्थकांना शोधून काढून त्यांच्यावर खटले भरले जात होते, त्यांना कठोर शिक्षा केली जात होती.

जगभरात पसरलेल्या ना*झी सैनिकांचा शोध घेण्याचं कामही जोरात केलं जात होतं. इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ त्यात आघाडीवर असणं स्वाभाविकच होतं. मात्र, इतर अनेक देशांच्या गुप्तचर यंत्रणाही ना*झी सैनिकांना शोधून काढत होत्या..

असाच एक ना*झी सैनिक वयाच्या तब्बल ९५व्या वर्षी अमेरिकन गुप्तचरांच्या हाती लागला. फ्रेडरिक कार्ल बर्गर असं त्याचं नाव. तो वयाच्या १९ व्या वर्षांपासून ना*झी छळछावण्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याला अमेरिकेने शोधून काढून जर्मनीत परत पाठवून दिलं. टेनेसीमध्ये राहणारा फ्रेडरिक हा कदाचित जगातला जिवंत असणारा शेवटचा ना*झी असावा.

फ्रेडरिक कार्ल बर्गर ना*झी जर्मनीमध्ये सन १९४५ साली न्युएन्गॅमे येथील छळछावणीत सशस्त्र सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला लागला. त्याने त्याच्या सेवा काळात कैद्यांचा अमानुष छळ करण्यात सक्रिय सहभाग घेतला. मानवतेला धोका पोहोचवणाऱ्या कोणालाही, कधीही पाठीशी न घालण्याचं अमेरिकेचं धोरण असल्याने त्याला जर्मनीत पाठवून देण्यात येत असल्याचं अमेरिकन न्यायालय आणि न्याय विभागानं स्पष्ट केलं. फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याला परत पाठवण्यात आलं.

फ्रेडरिकने काम केलेल्या छळछावणीत ‘गॅस चेंबर’ नव्हतं. त्या ठिकाणी प्रामुख्यानं यु*द्धकैद्यांना ठेवण्यात आलं होतं. या ४० हजार यु*द्धकैद्यांमध्ये रशियन, डच आणि पॉलिश सैनिकांचा समावेश होता. याशिवाय फ्रेंच, ब्रिटिश, इटालियन सैनिक, ज्यू नागरीक आणि ना*झी विरोधकही त्यामध्ये होते. या सर्वांना नंतर ठार करण्यात आलं.



आपण आपल्या कार्यकाळात कधीही शस्त्र हातात घेतलं नाही किंवा कैद्यांचा छळ केला नाही, असा दावा फ्रेडरिकने न्यायालयात केला. मात्र, कैद्यांच्या सन १९४५ मधल्या ‘मृत्यू मोर्चा’मध्ये तो होता आणि त्याने त्यातल्या ७० कैद्यांना यमसदनी पाठवलं, असा अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा दावा आहे. याची सत्यासत्यता पडताळणारी साक्ष या मोर्चातून वाचलेल्या काही जणांनी दिल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

ना*झी छळछावणी असलेल्या ज्या भूभागातून दोस्त राष्ट्रांच्या सैन्यांनी ना*झी सैन्याला हुसकावून लावलं, तिथून माघार घेताना कैद्यांचा ‘मृत्यू मोर्चा’ (डेथमार्च) काढला जात असे. त्यामध्ये कैद्यांचे हाल करून त्यांना ठार मारण्यात येई.

वास्तविक फ्रेडरिक हा ना*झी जर्मनीच्या नौदलात भरती झाला होता. मात्र, महायु*द्धाच्या उत्तरार्धात ना*झी सैन्याची ठिकठिकाणी पीछेहाट होत गेली. दोस्त राष्ट्रांनी ना*झी सैन्याला मागे रेटून त्यांची अनेक ठाणी ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे फ्रेडरिकसारख्या अनेकांना जमिनीवरची ना*झी ठाणी शाबूत ठेवण्यासाठी भूदलात रवाना करण्यात आलं होतं.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

सन १९४५ साली बर्लिनजवळ तो दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांच्या हाती लागला. त्याने शरणागती पत्करली. सन १९४६ साली तो पत्नी आणि मुलीला घेऊन कॅनडाला गेला. तिथून तो १९५९ साली अमेरिकेला स्थलांतरित झाला.

खोटी ओळख घेऊन केलेल्या अमेरिकेच्या वास्तव्यातही आपलं निवृत्तिवेतन जर्मन सैन्याकडून मिळत रहावं यासाठी फ्रेडरिकने आपलं जर्मन नागरिकत्व कायम ठेवलं होतं. विशेष म्हणजे, त्याच्या भूतकाळाबद्दलची ही सर्व माहिती ‘एसएस थीलबेक’ नावाच्या जर्मन यु*द्धनौकेत सापडली. ही युद्ध*नौका मे १९४५ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या बॉ*म्ब ह*ल्ल्यात बुडाली होती. सन १९४९ मध्ये ती शॊधून वर काढण्यात आली. डागडुजी करून ती पुन्हा वापरातही आणण्यात आली.

डागडुजी, दुरुस्ती करताना त्यामध्ये लष्करी नोंदी असलेल्या अनेक फाईल्स शाबूत असल्याचं आढळून आलं. त्यापैकी एका फाईलमध्ये फ्रेडरिकला नेमून दिलेल्या सर्व कामांची सविस्तर माहिती नमूद करण्यात आली होती. त्यामध्ये डेथ-मार्चचाही उल्लेख होता. सुरुवातीला या फाईल्सकडे कोणी फारसं लक्ष दिलं नव्हतं. मात्र, ही सगळी माहिती उघड झाल्यावर माध्यमातून त्याचा मोठा गाजावाजा झाला. सामान्य नागरिकांमधूनही त्याबद्दल प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यामुळे फ्रेडरिकची सगळी कुंडलीच तपासयंत्रणांच्या हाती लागली.

कोणीही कितीही सराईतपणे आपली ओळख लपवून वेगळ्या मुखवट्याच्या आधारे जगण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी सत्य उघडकीला आल्याशिवाय रहात नाही. फ्रेडरिक दशकानुदशकं कॅनडा आणि अमेरिकेत एक ‘रिटायर्ड पेन्शनर’ म्हणून ऐषारामी आयुष्य जगला. मात्र, वयाच्या ९५ व्या वर्षी त्याची खरी ओळख जगासमोर आली. या वयात फारसं आयुष्य शिल्लक नसताना त्याची रवानगी कारागृहात करणं निरर्थक आहे, अशा भूमिकेतून अमेरिकन न्यायालयानं त्याला शिक्षा करण्याऐवजी जर्मनीत पाठवून दिलं.

जर्मन न्यायालयानेही पुरेश्या पुराव्यांअभावी त्याची सुटका केली. मात्र, ना*झी म्हणून जी ओळख वर्षानुवर्षे लपवली, ती आयुष्याच्या अखेरच्या काळात जगासमोर आली. आपल्याच देशात उपेक्षाच नव्हे तर तिरसाकाराला सामोरं जाण्याची पाळी आली आणि कुटुंब अमेरिकेत ठेऊन वयाच्या अखेरच्या काही वर्षांत एकाकी जीवन जगण्याची वेळ त्याच्यावर आली, हीच त्याच्यासाठी मोठी शिक्षा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

या बयेनी नवऱ्याला तुरुंगातून पळवण्यासाठी चक्क पायलटचं लायसन्स मिळवलं होतं

Next Post

पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून इम्रान खानने पाकिस्तानची लाज काढलीये!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

पंतप्रधान असताना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव करून इम्रान खानने पाकिस्तानची लाज काढलीये!

रशिया दुसऱ्या महायु*द्धापासून जपानच्या या बेटांवर ठाण मांडून बसलाय!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.