The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोरबाकी – अस्तित्वात नसलेल्या या शास्त्रज्ञाने गणितात प्रचंड मोठं योगदान दिलंय..!

by द पोस्टमन टीम
17 June 2025
in विज्ञान तंत्रज्ञान, ब्लॉग
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


निकोलस बोरबाकी हा विसाव्या शतकातील महान गणितज्ज्ञ होता. गणितातल्या अनेक शाखांत त्यानं महत्त्वाचं योगदान दिलं आहे. पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक असं कार्य करणारा हा गणितज्ज्ञ या क्षेत्रातील सर्वच बाबींवर प्रभुत्व असणारा कदाचित अखेरचा गणितज्ज्ञ आहे. हे सगळं असलं तरीही निकोलसच्या बाबतीत एकच समस्या आहे आणि ती म्हणजे अशा नावाची व्यक्तीच अस्तित्वात नाही.

निकोलस बोरबाकी या प्रसिध्द गणितज्ज्ञानं या क्षेत्रात अक्षरश: क्रांती घडविली. विसाव्या शतकात गणिती क्षेत्रात भरीव कामगिरी करत गणितातली अनेक भेद सिध्द करणारा निकोलस स्वत: मात्र एक न सुटलेलं रहस्य आहे. १९३५ साली फ़्रान्सचे अग्रगण्य गणितज्ज्ञ एलि कार्टन यांना निकोलस बोरबाकी याचं परिचय पत्र मिळालं, सोबत कॉर्पोरेटस रेण्डस डे एल अकादमी डेस सायन्सेस (प्रोसिडींग ऑफ़ फ़्रेंच अकाडमी ऑफ़ सायन्सेस) या जर्नलमध्ये बोरबाकीच्या वतीनं सादर केला गेलेला एक शोधनिबंधही होता. अर्थातच निकोलस बोरबाकीला ओळखपत्र मिळाले.

त्याचा सहकारी असणारा गणितज्ज्ञ आंन्द्रे विल यानं लिहिलेल्या पत्रात बोरबाकी हा विजनवासात राहून काम करतो असं सांगितलं होतं. विलच्या शिफ़ारसीवर विश्र्वास ठेवून कार्टननं एक असं व्यक्तिमत्त्व अस्तित्वात आणलं जे पुढे जाऊन गणिताच्या क्षेत्रात उलथापालथ करणार होतं.

कुख्यात अशी थिअरी अस्तित्वात यायला कारण ठरलेली अशी ही घटना होती. वास्तवात विल त्याच्या दृष्टीनं एक निरुपद्रवी खोडी काढत होता. आजच्या भाषेत आपण ज्याला प्रॅन्क म्हणतो त्याचाच हा प्रकार होता. मात्र हा प्रॅन्क गणितज्ज्ञांत पुढे दशकभर विनोद बनून प्रचार करत होता. गणित जरी खरे असले तरिही बोरबाकी मात्र खोटा होता, किंबहुना तो कधी अस्तित्वातच नव्हता.

विसाव्या शतकातीलस गणितातील अत्यंत उल्लेखनिय आणि प्रख्यात योगदानांपैकी बोरबाकीचे oeuvre हे वास्तवात या क्षेत्रातील विद्वानांच्या समुहाने लिहिले होते.



आता प्रश्न असा पडतो की बोरबाकी जर अस्तित्वातच नव्हता तर मग तो होता तरी कोण?

१९३४ साली पॅरिसमधे जेव्हा अराजक माजलं होतं त्या काळात निकोलस बोरबाकी हे नाव पहिल्यांदा कानावर आलं. पहिल्या महायु*ध्दात फ़्रेंच विचारवंतांची एक अख्खी पिढी पुसली गेली होती. परिणामी प्रमाणित विद्यापीठस्तरीय कॅल्क्युलस, जे अडीच दशकांपूर्वी लिहिलं गेलं होतं ते कालबाह्य झालं होतं. नव्या पिढीचे गणितज्ज्ञ आंद्रे विल आणि हेन्री कार्टन यांनी स्टेक्सचं प्रमेय शिकविण्याची, मांडण्याची पध्दत अधिक टोकदार झाली पाहिजे असं मत व्यक्त केलं.

स्टेक्स कॅल्क्युलसमधला महत्त्वाचा भाग असल्यानं इतरांना जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनीही आंद्रे आणि कार्टन यांच्या मताला अनुमोदन दिलं, इतर गणितज्ज्ञांचं मत आणि चिंताही आपल्यासारखीच आहे हे लक्षात आल्यावर आंद्रे विल यांनी एक बैठक आयोजित केली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

१० डिसेंबर १९३४ चा तो ऐतिहासिक दिवस. या दिवशी पॅरिसमधील कॅपोलादे या कॅफ़ेत ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत उपस्थित नऊ गणितज्ज्ञांनी एकमतानं एक निर्णय घेतला आणि हा निर्णय होता,

विश्लेषणाचा एक ग्रंथ एकत्रितपणे लिहून विभेदक आणि अविभाज्य कॅल्क्युलस या प्रमाणपत्रासाठीचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम निश्चित करणे. हे पुस्तक सहा महिन्यांत लिहून पूर्ण होईल अशी त्यांची अपेक्षा होती.

नऊ जणांचं एकत्रित काम असलं तरिही ते एकमुखी व्हावं या हेतूनं त्यांनी या गटासाठी नाव निवडण्याचं ठरविलं खरंतर त्यांनी सहज चर्चेत आणि गंमतीत हे नाव धारण केलं. पर्शियन यु*ध्दात साफ़ फ़सलेल्या जुन्या फ़्रेंच जनरलच्या नावावरून हे नाव ठेवलं गेलं.

हा प्रकल्प पुढे सरकत असताना, आकाराला येत असताना स्टोक्सच्या प्रमेयाचे स्पष्टीकरण देण्याचे त्यांचे जे मूळ ध्येय होते ते विस्तारत गेले. सर्व गणिताचा पाया घालण्यापर्यंत हा प्रकल्प आता विस्तारला होता. अखेरीस या कामाचा आवाका इतका वाढला की या ग्रंथातील नव्या अध्यायांसाठी चर्चा करण्यासाठी त्यांनी वर्षातून तीनदा नियमीतपणे “बोरबाकी परिषद” घेण्यास सुरवात केली.

आता या गटा व्यतिरिक्तही काहीजण नवीन कल्पना आणि सिध्दांत घेऊन येऊ लागले. याची यांनी कल्पनाही केली नव्हती. या समूहाच्या कार्यशैलीनं प्रभावित झालेले आणि योगदान देण्यास उत्सुक असलेलेल अव्वल गणितज्ज्ञ या समूहाला समृध्द करण्यासाठी सामिल झाले. कालांतराने बोरबाकी हे नाव डियुडोन्ने, श्वॉर्टज्, बोरेल, ग्रोथेंडीक आणि इतर बर्‍याच गणितज्ज्ञांचे एकत्रित असे टोपणनाव किंवा उपनाम बनले.

अनेक गणितज्ज्ञांनी बोरबाकीच्या नावाखाली या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. या गटातील जुने निवृत्त होत गेले आणि त्या जागी नवीन गणितज्ज्ञ येत गेले. मात्र या समूहात स्त्रियांना येण्यास नेहमीच मज्जाव राहिला. या समुहाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, या समुहाच्या विचारसणीत आणि लेखनात कट्टरपंथीपणा तर होताच शिवाय गुप्ततेचा करारही होता. स्वत:ची ओळख पुढे येऊ न देता बौरबाकी या नावाखालीच सर्व संशोधन केलं जात होतं. ही एक निस्वार्थ सेवाच म्हणली पाहिजे. अशा रितीने बोरबाकीचं भरीव योगदान अखंडित चालूच राहिलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गुजरातमध्ये एक बहादूर शाह होऊन गेला जो हुमायूनला नडला होता..!

Next Post

दुसऱ्या महायु*द्धात अटलांटिक महासागरातही एक यु*द्ध लढलं गेलं होतं ‘बॅ*टल ऑफ अटलांटिक’

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

दुसऱ्या महायु*द्धात अटलांटिक महासागरातही एक यु*द्ध लढलं गेलं होतं 'बॅ*टल ऑफ अटलांटिक'

सुट्या पैशांऐवजी दिल्या जाणाऱ्या पल्स कॅण्डीचा टर्नओव्हर ऐकून तोंडात बोट घालाल..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.