The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अमेरिकेला खुन्नस म्हणून रशियाने महाकाय हेलिकॉप्टर बनवलं होतं जे अजूनही धूळ खात पडलंय

by द पोस्टमन टीम
5 September 2021
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


लहानपणापासूनच आपल्याला विमान, हेलिकॉप्टर अशा गोष्टींचं मोठं आकर्षण असतं. विमानाचा किंवा हेलिकॉप्टरचा आवाज ऐकला रे ऐकला की घरातून बाहेर पळत येऊन आकाशात पाहणार नाही, असं होतच नव्हतं. विमानाच्या तुलनेत तसं तर हेलिकॉप्टर अगदीच लहान असतं. एका हेलिकॉप्टरमध्ये जास्तीत जास्त पाच-सहा व्यक्ती प्रवास करू शकतात, हे आपल्याला आता चित्रपटामध्ये किंवा अन्य ठिकाणी हेलिकॉप्टर पाहून माहिती झालंच आहे.

मात्र, असंही एक हेलिकॉप्टर आहे, ज्यात पाच-दहा नव्हे, तर तब्बल १९६ लोक आरामात प्रवास करू शकत होते. अर्थातच हे जगातलं सर्वात मोठं हेलिकॉप्टर आहे. ‘मिल व्ही 12’ असं नाव असलेल्या या हेलिकॉप्टरच्या नावावर तब्बल आठ जागतिक विक्रम आहेत. यांपैकी चार विक्रम आजही अबाधित आहेत. एवढं सगळं असूनही, हे हेलिकॉप्टर मात्र आज चक्क धूळ खात पडून आहे.

फक्त ‘जगातील सर्वात मोठं’ असं म्हटल्यामुळे याच्या आकाराचा अंदाज कदाचित तुम्हाला येणार नाही. त्यामुळे तुलना करायची झाली, तर ६०च्या दशकामधील बोईंग 737 या विमानापेक्षाही मोठं असं हे हेलिकॉप्टर आहे. याची लांबी ही तब्बल ३७ मीटर आहे. वजनाच्या बाबतीत बोलायचं झालं, तर कार्गो आणि इतर साहित्यासह याचं वजन जवळपास ७० हजार किलो एवढं आहे. तेच कार्गो आणि इतर साहित्य भरलं, तर याचं वजन ९७ हजार किलो होतं.

हे जेव्हा वापरलं जात होतं, तेव्हा याच्या संचालनासाठी ६ क्रू मेंबर आणि डबल हाईट कॉकपिटची आवश्यकता भासत होती. पायलट, को-पायलट, फ्लाइट इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर खालच्या कॉकपिटमध्ये होते. तर, नेव्हिगेटर आणि रेडिओ ऑपरेटर वरच्या कॉकपिटमध्ये होते.

यात दुहेरी रोटर कॉन्फिगरेशन कार्यरत होते. विशेष म्हणजे, अशाप्रकारे दोन रोटर्स वापरणारे हे पहिले हवाई उपकरण असल्याचे सांगितलं जातं. याचा ताशी वेग २६० किलोमीटर तर रेंज ही ५०० किलोमीटर इतकी होती. या हेलिकॉप्टरची मुख्य केबिन ही चक्क 28.15 मीटर लांब आणि 4.4 वर्गमीटर होती. हे हेलिकॉप्टर 2,255 मीटर म्हणजे 7 हजार 398 फूट उंचावर उड्डाण करू शकत होते.



तसेच, यात जवळपास ४० हजार किलो वजन वाहून नेण्याची क्षमता होती. मात्र, त्या काळात बोईंग सारखी मोठी विमानं उपलब्ध असतानाही, असं हेलिकॉप्टर तयार करण्याची काय गरज पडली? याचं उत्तर दडलंय, अमेरिका आणि सोव्हिएतच्या तेव्हाच्या विशेष वॉरमध्ये!

६० च्या दशकामध्ये अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये मशीन वॉर सुरू होतं. एकमेकांपेक्षा अधिकाधिक चांगले तंत्रज्ञान समोर आणण्याची ही चढाओढच मिल व्ही १२च्या निर्मितीचं कारण ठरली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

सोव्हियतने वर्षानुवर्षे वाळवंटात कुणालाही थांगपत्ता लागणार नाही अशा ठिकाणी प्रक्षेपण तळ बांधून आण्विक क्षेपणास्त्रे लपवून ठेवली होती. अमेरिकन गुप्तचर विभागाच्या विमानांनी सोव्हियत युनियनची ही आंतरखंडीय क्षेपणास्त्र प्रक्षेपण तळं शोधून ती उघडकीस आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे या क्षेपणास्त्रांना वेळीच तिथून हलवणे गरजेचे झाले होते. 

मात्र इतकी अवजड क्षेपणास्त्रे लवकरात लवकर आणि कुणालाही न समजता एकीकडून दुसरीकडे हलवणार कशी? हा मोठा प्रश्न सोव्हिएत समोर होता. या क्षेपणास्त्र तळांची गोपनियता हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न होता, आणि त्यावर उपाय काढणे गरजेचे होते. ही क्षेपणास्त्रे एवढी जड होती, की त्यांना रेल्वे मार्गाने किंवा रस्त्यावरुन नेणे शक्य नव्हते.

अशावेळी त्यांनी या हेलिकॉप्टरची युक्ती शोधून काढली. तसं सोव्हियतकडे त्यावेळे मिल मी-6 हे तेव्हाचे सर्वात मोठे हेलिकॉप्टर होतेच. मात्र, त्या काळातील या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टरमध्येही 25 टन वजनदार बँलिस्टीक क्षेपणास्र वाहून नेण्याची क्षमता नव्हती.

त्यामुळेच त्याहून दुप्पट क्षमता असणारे एखादे नवीन यंत्र तयार करणे, त्याच क्षमतेचे असे आधुनिक इंजिन आणि रोटर तयार करणे गरजेचे होते. असं करणं म्हणजे एक असामान्य आव्हानच होतं, आणि सोव्हिएतच्या तंत्रज्ञांनी ते आव्हान पेलूनही दाखवलं.

सोव्हियतची ही संकल्पना वाटते तितकी सोपी नव्हती मात्र, त्यांनी (यूएसएसआर) यावर काम करण्यास सुरूवात केली आणि एक नवीन सुपर हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर तयार केले. १९५९ साली सोव्हियत डिझायनर्सने म्हणजेच ‘मिल डिझाइन ब्युरो’ने या हेलिकॉप्टरच्या संकल्पनेवर संशोधन सुरू केले.

या हेलिकॉप्टरचा मुख्य उद्देश्य मिल सैनिक आणि उपकरणे पुरवठा करण्यासह मोठ-मोठाल्या बँलिस्टीक क्षेपणास्त्रांना हलवून सुरक्षित स्थळी पोहोचवणे हा होता. या प्रयोगाला १९६२ मध्ये हिरवा कंदील मिळाला. १९६३ मध्ये टेस्टींग रिग्स, मॉक-अपचे बांधकाम सुरू झाले. 

त्यानंतर १९६५ मध्ये पहिल्या म्हणजेच मिल व्ही-12 प्रोटोटाईपचे बांधकाम सुरू झाले. मिल व्ही-12 सोव्हियत युनियनमध्ये व्ही-12 म्हणून आणि नाटोच्या ‘होमर’ या कोडनेम अंतर्गत ओळखले जाणारे हेलिकॉप्टर होते. हे नवीन यंत्र अर्धे हेलिकॉप्टर आणि अर्धे विमानासारखे दिसत होते.

मिल व्ही–12 व्हीचे फक्त दोन प्रोटोटाइप तयार करण्यात आले. १९६७ मध्ये या हेलिकॉप्टरची पहिली उड्डाण चाचणी घेण्यात आली मात्र ती अपयशी ठरली. त्यानंतर त्यात काही सुधार करून १९६८ मध्ये पुन्हा एक चाचणी घेण्यात आली जी यशस्वी ठरली आणि त्याच वर्षी त्याने ७ जागतिक विक्रम प्रस्थापित केले.

आजही जगातील सर्वांत उंचीवर उड्डाण करणारे हेलिकॉप्टर म्हणून मिल व्ही-12चा उल्लेख केला जातो. १९७१ मध्ये पहिल्यांदा मिल व्ही-12 ला पँरिस एअरशोमध्ये ठेवण्यात आले तेव्हा त्याचा विशाल आकार आणि क्षमतेमुळे ते सर्वांना आश्चर्यात टाकणारे ठरले. मात्र, त्याचे आकारमान, समायोजन आणि असंख्य बदल केल्यानंतरही 70 च्या दशकात सुरू असलेल्या शीत युद्धात मिल व्ही-12 सोव्हिएतच्या अपेक्षेप्रमाणे काम करू शकलं नाही.

आजपर्यंत उड्डाण करणारे सर्वात मोठे हेलिकॉप्टर म्हणून आजही मिल व्ही १२चा जास्त फायद्याचे ठरेल. १९८३ मध्ये लष्कराने जड कामांसाठी लिफ्टर म्हणून मिल मी-26 चे सादरीकरण केले, आणि त्याचा वापर सुरू झाला. त्यामुळे मिल व्ही-१२ हे विस्मरणात गेले.

मिल व्ही-12 हा प्रकल्प रद्द होण्यापूर्वी या हेलिकॉप्टरचे दोन प्रोटोटाइप तयार करण्यात आले होते. यातील पहिले प्रोटोटाइप हे त्याच्या चाचणी दरम्यान अपयशी ठरले. तर, दुसरे प्रोटोटाइप हे आजही रशियातील मॉस्को शहरापासून 40 किमी अंतरावर असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लष्करी संग्रहालयापैकी एक अशा सेंट्रल एअर फोर्स संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

जगप्रसिद्ध ‘कार्ल्सबर्ग बिअर’च्या लोगोतच त्यांनी स्वस्तिक वापरलं होतं..!

Next Post

कितीही मोठी आपत्ती आली तरी जपान एवढ्या लवकर कसा सावरतो..?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

कितीही मोठी आपत्ती आली तरी जपान एवढ्या लवकर कसा सावरतो..?

वॅनिला आईस्क्रीम घेऊन या कारमध्ये बसलं की ही कार चालूच होत नव्हती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.