The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कम्प्युटरमधल्या एररला ‘बग’ म्हणतात त्यामागे हा किस्सा आहे..!

by द पोस्टमन टीम
21 October 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


तुम्ही अँजेलिना जोली आणि जॉनी ली मिलरचा ‘हॅकर्स’ हा चित्रपट पाहिलाय का? एक किशोरवयीन मुलगा इतिहासातील सर्वात मोठा स्टॉक एक्सचेंज क्रॅश घडवून आणतो. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात येते मात्र, सात वर्षांनंतर तो परत सक्रीय होतो. त्याला त्याच्यासारखेच काही साथीदार मिळतात. अपघातानं ते एका मोठ्या कारस्थानाचा भाग होतात.

आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी आणि कारस्थानातून बाहेर पडण्यासाठी ते आपल्या कौशल्याच्या बळावर प्रयत्न करतात. त्यात त्यांना यशही येतं. १९९५ साली आलेला हा चित्रपट पाहिल्यानंतर पहिल्यांदा मला कॉम्प्युटर बग, हॅकिंग या गोष्टी समजल्या होत्या. आता तर माहिती तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रचंड प्रगतीमुळं बग, हॅकिंग, व्हायरस, डेटा चोरी या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. पण, तुम्ही कधी विचार केलाय का, की ‘बग’ ही संकल्पना कुठून आणि कशी आली? त्याचा शोध कुणी लावला?

‘बग’ म्हणजे कीडा हे आपल्याला माहितीचं आहे. कॉम्प्युटरमध्ये सापडणारे बग हे काही कीडे नसतात. वास्तविक सॉफ्टवेअर ‘बग’ म्हणजे कम्प्युटर प्रोग्राम किंवा सिस्टीममधील त्रुटी असतात. जर सिस्टिममध्ये बग आला तर संगणक त्याला ठरवून दिलेलं काम अपेक्षेप्रमाणं करत नाही. बग शोधणं आणि त्याचं निराकरण करण्याच्या प्रक्रियेला ‘डीबगिंग’ असं म्हटलं जातं.

साधारणपणे कॉम्प्युटर प्रोग्रामच्या डिझाईनमध्ये किंवा त्याच्या सोर्स कोडमध्ये जर काही चुका झाल्या किंवा त्रुटी राहिल्या तर अडचणी निर्माण होतात. त्याला ‘बग’ आला असे म्हणतात. एका प्रोग्राममध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त बग निर्माण होऊ शकतात. बगमुळे एखादा विशिष्ट प्रोग्राम किंवा संपूर्ण कॉम्प्युटर क्रॅश होऊ शकतं.



काही बग सुरक्षेच्या कारणास्तव देखील प्रोग्राममध्ये सोडलेले असतात. जर अनधिकृतपणे एखाद्याने प्रोग्राममध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर, असे बग त्याला अटकाव करतात. मात्र, कॉम्प्युटरमध्ये सापडलेला पहिला ‘बग’ हा खराखुरा कीडाच होता, ही गोष्ट सांगितली तर नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही. पण, ही गोष्ट एकदम खरी आहे! ९ सप्टेंबर १९४५ रोजी यूएस नेव्ही ऑफिसर ग्रेस हॉपर यांना पहिला कॉम्प्युटर बग सापडला होता.

त्यांना हा बग कसा सापडला याची माहिती घेण्याअगोदर आपण ग्रेस हॉपर यांच्या बाबत जाणून घेऊया.

ग्रेस ब्रूस्टर मरे हॉपर या एक संगणक तज्ञ आणि अमेरिकन नौदल अधिकारी होत्या. येल विद्यापीठातून गणित विषयामध्ये त्यांनी पदवी आणि पीएच.डी. पूर्ण केली होती. जगातील पहिल्या तीन आधुनिक कॉम्प्युटर ‘प्रोग्रामर’मध्ये त्यांचा समावेश होतो. कॉम्प्युटर लँग्वेजमधील विकासासाठी त्यांचं योगदान लक्षणीय आहे. त्या बेधडक, फटकळ स्वभावाच्या आणि हुशार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, ग्रेस हॉपर यांनी यूएस नेव्ही आणि खासगी क्षेत्रात दीर्घकालीन करिअर केलं.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

या बाईमध्ये कमालीची बुद्धिमत्ता आणि जिद्द होती. दुसरं महायु*द्ध आणि नंतर शीतयु*द्धानं अमेरिकन सैन्य आणि सुरुवातीच्या संगणक उद्योगामधील घनिष्ठ संबंध जोपासले. ही गोष्ट हॉपरच्या कारकीर्दीला आकार देणारी ठरली. पर्ल हार्बरवरील ह*ल्ल्यानंतर अमेरिकेनं दुसऱ्या महायु*द्धात प्रवेश केला. तेव्हा हॉपरनं यु*द्धात सामील होण्याचा निर्णय घेतला. मात्र, वय आणि कृश शरीरयष्टीमुळं त्यांना सुरुवातीला नेव्हीमध्ये नाकारण्यात आलं.

परंतु, त्या आपल्या निश्चयावर कायम राहिल्या. शेवटी त्यांची बुद्धीमत्ता पाहून डिसेंबर १९४३ मध्ये हॉपरला यूएस नेव्हल रिझर्व फोर्समध्ये (महिला राखीव) सामील करून घेत आणि हार्वर्ड विद्यापीठातील ‘ब्यूरो ऑफ शिप कम्प्युटेशन प्रोजेक्ट’मध्ये नियुक्त करण्यात आलं. तिथे त्यांनी संगणकाचे प्रणेते हॉवर्ड आयकेन यांच्यासाठी काम केलं.

हार्वर्ड लॅबमध्ये हॉपर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यु*द्धासाठी आवश्यक असलेल्या रॉकेट ट्रॅजेक्टरीजची गणना, नवीन विमानविरोधी तोफांसाठी रेंज टेबल्स तयार करणं आणि खाण कामगारांना कॅलिब्रेट करणं यांसारखी कामं केली. नागासाकीवर जो अणुबॉ*म्ब टाकण्यात आला होता. त्याची गणितीय आकडेवारी करण्यात देखील हॉपर यांचा सहभाग होता.

त्याच दरम्यान आयकेन यांनी IBM स्वयंचलित सिक्वेन्स कन्ट्रोल्ड कॅल्क्युलेटर विकसित केलं होतं. या कॅल्क्युलेटरला मार्क I म्हणून ओळखलं जातं. मार्क सर्वात जुन्या इलेक्ट्रोमेकॅनिकल संगणकांपैकी एक आहे. मार्क I ची प्रोग्रामिंग करण्यासाठी हॉपर यांनी योगदान दिलं होतं. त्यांनी मार्क I साठी ५६१ पानांचं एक युजर मॅन्युअल देखील लिहिलं होतं.

हार्वर्ड विद्यापीठात असतानाचं हॉपर यांनी पहिला बग शोधून काढल्याची माहिती उपलब्ध आहे. ९ सप्टेंबर रोजी काम करत असताना हॉपरला हार्वर्ड मार्क II संगणकातील रिलेमध्ये एक पतंग (किटक) सापडला! तेव्हाचे कॉम्प्युटर आजच्यासारखे हातभर नव्हते. मोठ्या-मोठ्या खोल्यांमध्ये त्यांचं संपूर्ण सर्किट असे. या यंत्रांच्या उष्णतेमुळे पतंग त्यांच्याकडं आकर्षित झालं होतं. या पतंगांमुळे शॉर्ट सर्किट झालं आणि संगणकामध्ये बिघाड झाला होता.

असं म्हटलं जातं, थॉमस एडिसननं १८०० च्या दशकात त्याच्या डिझाईन्समध्ये ‘बग’ या शब्दाची नोंद केलेली होती. परंतु, ग्रेस हॉपरनं कॉम्प्युटरमध्ये ‘बग’ सापडल्याची पहिली वास्तविक घटना सांगितल्यानंतर हा शब्द सायबर वर्ल्डमध्ये लोकप्रिय झाला. पहिला कॉम्प्युटर बग हा ग्रेस हॉपरनं शोधला असल्याचं सर्व जगाला माहिती असली तरी प्रत्यक्षात तो पतंग विलियम बिल बर्क नावाच्या तिच्या एका सहकाऱ्याला दिसला होता. ही बाब स्वत: हॉपर यांनी सांगितलेली आहे.

हॉपर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोधलेल्या बगमुळं पुढे संगणक क्षेत्रातील अनेक समस्या उघडकीस येण्यात मदत झाली. ज्याप्रमाणं जर हार्डवेअरमध्ये किटक अडकू शकतो तसचं सॉफ्टवेअरमध्ये देखील एखादा बग (अडचण) निर्माण होऊ शकतो, ही कल्पना समोर आली.

संगणक विज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी २०१६ साली हॉपर यांना मरणोत्तर ‘प्रेसिडेन्शियल मेडल’ हा अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

काश्मीरच्या मीरपूरमध्ये पाकिस्तानने ३५ हजार हिंदू आणि शिखांची निर्दयपणे क*त्तल केली होती

Next Post

…म्हणून दुसऱ्या महायु*द्धात फ्रांसने स्वतःचीच जहाजं समुद्रात बुडवून टाकली..!

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

...म्हणून दुसऱ्या महायु*द्धात फ्रांसने स्वतःचीच जहाजं समुद्रात बुडवून टाकली..!

राष्ट्राध्यक्ष विल्सन होते परंतु सगळा कारभार त्यांची बायकोच पाहायची

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.