The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

संगीताच्या माध्यमातून सामजिक संदेश देणारा तेलंगणाचा ‘पोलीस अण्णा’

by द पोस्टमन टीम
9 June 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

पोलिस ‘ या व्यक्तिमत्वाची एक खास प्रतिमा आपल्या मनांत तयार आहे. सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटते .

चित्रपटातला खुप प्रसिद्ध संवाद आहे, ‘पोलिसांशी न मैत्री चांगली न वैर’ पण खरंतर पोलिस जनतेचे चांगले मित्र असायला हवे. बरेचदा त्यांच्या धाकामुळे आणि त्यांच्या कामामुळे सामान्य लोक त्यांच्यापर्यंत पोहचतच नाहीत. ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला आहे तेलंगणा येथील अंजापल्ली नागापल्लू यांनी.

 



अंजापल्ली पोलिस इन्स्पेक्टर तर आहेतच शिवाय तेलांगणा राज्यातील एक प्रख्यात व्यक्तिमत्व देखिल आहेत. त्यांना सगळे पोलिस अन्ना म्हणुन सुद्धा ओळखतात. त्यांच्या कामामुळे, गाण्यामुळे आणि स्वभावामुळे त्यांना ही ख्याती प्राप्त झाली आहे.

त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला.सुरुवातीला सूर्यपेट जिल्हयतील कुंटा या गावांत टे काही वर्ष होते. त्यांचे आई वडील मोल मजुरी करून उदरनिर्वाह करायचे. जवळपास सात – आठ वर्ष त्यांनी दुष्काळाशी सामना केला.

त्यामुळे त्यांचं कुटुंब मजुरीच्या शोधात अनेक गाव हिंडायचे. जिथे काम मिळेल तिथे मुक्काम असायचा. या परिस्थिती देखिल त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाशी तडजोड नाही केली. त्यांना एक बहिण व दोन भाऊ आहे. त्यांना व त्यांच्या भावाला शिक्षण अर्धवट सोडून कारखान्यात काम करावं लागलं . पण तरीही अनेक अडचणींचा सामना करून त्यांनी शिक्षण पुर्ण केलं .त्यांच्या भावंडांनी देखिल शिक्षण पुर्ण केलं.

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

तरूण वयातच त्यांनी पोलिस इन्स्पेक्टर बनून जनतेची प्रत्यक्ष सेवा करावी असा निश्चय केला . कॉलेजच्या दिवसांपासून त्यांना गाणी लिहण्याची आणि म्हणण्याची खुप हौस होती.

पोलिस मधे भरती होण्याच्या आधी त्यांनी तेलगू भाषेत विविध सामाजिक प्रश्नावर गाण्यांची रचना केली होती. महिला सशक्तीकरण, शिक्षण व्यवस्था, देशभक्तीपर अनेक गाणी यू ट्यूबवर प्रसिद्ध झाली.

रेडिओ व समाज माध्यमांवर त्यांची शहिदांवरील गीत लोकांच्या प्रचंड पसंतीस पडलं. त्यांना कार्यक्रमामधे सादरीकरणासाठी बोलवलं जायचं. पोलिस मधे भरती झाल्यावर त्यांची ही कला सर्वांच्या नजरेस पडली.

त्याच वेळी एका ५५ वर्षीय महिलेला, काळी जादू करण्याच्या संशयत गावकऱ्यांनी मिळून जाळल्याची घटना घडली. अशा घटनांवर आळा बसावा म्हणुन पोलिस अधीक्षक ‘ महेश भागवत ‘ यांनी जन जागृती करण्यासाठी मोहिम हाती घेतली.

त्यासाठी गावोगावी जावून गाणी, पथनाट्य, सामजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या विषयी जनजागृती केली. त्यावेळी अंजापल्लींना कलेची ताकद उमजली.

शब्दांपेक्षा कविता किंवा गाणी सामन्य लोकांच्या मनांत रुजतात असं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा पासून त्यांनी आपल्या कलेचा उपयोग याच भूमिकेत राहून समाजाच्या भल्यासाठी करायचा असं ठरवलं.

आत्तापर्यंत जवळपास त्यांनी १५ गाणी रेकॉर्ड केली आहेत आणि विविध सामजिक विषय जसे वाहातूकीचे नियम, सायबर क्राईम , खोट्या बातम्या या वर विडियो बनवले आहेत. रय्यू रय्यू त्यांचं सर्वात गाजलेल गाणं !

या गाण्यात ते वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी आव्हान करत आहेत. त्यांनी आत्तापर्यंत तेलगू आणि हिंदी मधे गाणी रेकॉर्ड केली आहेत . या पूढे त्यांना १० भाषांमधे गाणी सादर करायची आहेत. जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा संदेश पोहचेल.

या शिवाय देखिल ते अनेक सामाजिक कार्य करताना दिसतात. ड्युटीवर असताना बाझारात एका अपघात स्थळी ते पोहचले. रक्ताने माखलेलें, जखमेने विव्हळताना त्यांनी बघितलं.

आजूबाजूला जमा झालेल्या लोकांनी फक्त बघण्याची भूमिका बजावली. कुणीही मदत करायला समोर येत नव्हतं . शेवटी त्यांनीच पीडितांना रुग्णालयात भरती केलं. तेव्हा पासून ते आपल्या सोबत एक फर्स्ट एड कीट कायमच सोबत ठेवतात.

वाटेत कुठेही त्यांना अपघात दिसला तर पीडिताला प्राथमिक उपचार देण्यासाठी ते कायम तत्पर असतात. ते नियमित रक्तदान करतात. जवळपास 25 वेळा त्यांनी रक्तदान केलं आहे व 80 अपघाती रुग्णांना वाचवलं आहे.

वाटेत कुठेही त्यांना अपघात दिसला तर पीडिताला प्राथमिक उपचार देण्यासाठी ते कायम तत्पर असतात. या शिवाय त्यांना लोकांशी संवाद साधायला आवडत. त्यांच्या खास शैलीत अगदि सहज पणे ते लोकांची मनं जिंकतात.

याच गुणामुळे अनेक गावांमधे जनजागृतीचे उपक्रम हाती घेतलें व पूर्णपणे यशस्वी करून दाखवले आहेत. समस्या समजून घेवून लोकांची मदत करायला आवडते. त्यांनी त्यांचा नंबर समाज माध्यमांवर मोठ्या अक्षरात नमूद केला आहे.

जेणेकरून कधीही, कुठल्याही परिस्थितीत लोकं त्यांच्या पर्यंत पोहचू शकतील. ते सांगतात, ” लोकं कधि कधि माझ्या कार्याच कौतुक करण्यासाठी फोन करतात. लोकांचे आशीर्वादाने मला फार समाधान वाटतं.

” स्वतःच घर, गाडी, पैसा यापैकी कशातच त्यांना रुची नाही. उलट एका वृद्ध महिलेला व अपंग व्यक्तीला घर बांधून देण्यासाठी कर्ज घेतलं आहे.’ त्यांना माझी गरज होती ‘ एवढच स्पष्टीकरण ते देतात.

कुठलाही स्वार्थी हेतु किंवा गर्व त्यांच्या शब्दांत जाणवत नाही, हे विशेष !

त्यांच्या या कार्यात त्यांचे कलीग देखिल त्यांना पुर्ण पाठिंबा देतात. अनेक वेळा मदत देखिल करतात. या मुळे हे काम पूढे नेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळतं.

आपल्या व्यस्त दिनचर्येतून हे सगळं काम सांभाळण खुप कठीण काम होतं, पण सगळ्यांच्या सहकार्याने अनेक समस्यांवर उपाय मिळाला.

रोज आपण अनेक घटना आसपास बघतो. थोडा विचार करून दुर्लक्ष करण्यापलीकडे आपण काहीही करत नाही. फक्त क्वचितच व्यक्ती समोर येवून मदतीचा हात पुढे करतात. या साठी सुद्धा धाडस हवं.

अंजापल्लीच कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्याला , व्यक्तिमत्वाला सलाम ….!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Police
ShareTweet
Previous Post

देशभरात एक लाख शौचालय बांधून या माणसाने खताचा प्रश्न सोडवलाय

Next Post

असामान्य कर्तृत्व असणारी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेची महिला गुप्तहेर

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

असामान्य कर्तृत्व असणारी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेची महिला गुप्तहेर

मांजरीला मारल्याच्या खोट्या आरोपाखाली या कुत्र्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.