The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा २१ वर्षीय युवक देतोय मुंबई पोलिसांना सायबर गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रशिक्षण

by द पोस्टमन टीम
12 March 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, घरी संगणक किंवा लॅपटॉप आहे. आपली सगळी कामं एक बटन दाबून सहज पुर्ण होतात. ऑनलाईन शॉपिंग असो, बिल भरणं असो, ऑनलाईन बँकिंग असो किंवा घरी बसून दूर राहणाऱ्या नातेवाईकांशी समोरासामोर संवाद असो. हे सगळं शक्य झाल ते सतत विकसित होत राहणाऱ्या तंत्रज्ञानामुळे आणि उपकरणांमुळे!

तंत्रज्ञानाने जग खूप जवळ आणलं. सोशल मिडीयाची अनेक माध्यमं आज विविध विषयांवर जागृती निर्माण करणं, समाजमनावर प्रभाव पाडण्यासाठी उपयोगी आहेत.

पैशांचे मोठमोठे व्यवहार बँकेत रांगेत न लागता सहज पुर्ण होऊ शकतात. थोडक्यात या सगळ्या तंत्रज्ञानाने मानवाच्या राहणीमानाचा स्तर उंचावला आहे व आयुष्य सुखकर केलं आहे.

पण याचे देखील दोन पैलु आहेत. आज आंतरजालवर कुठल्याही विषयावर अफाट माहिती उपलब्ध आहे. आपण सगळे या माहितीचा उपयोग चांगल्या कामांसाठी किंवा कुणाच्या मदतीसाठी करतो. पण काही प्रवृत्ती अशा आहेत जे या माहितीचा चुकीचा उपयोग करून लोकांना फसवतात, इजा पोहचवतात. गुन्हेगारीच्या दुनियेत ‘सायबर क्राईम’ हा एक भयंकर प्रकार समाविष्ट झाला आहे. गेल्या काही वर्षांत धक्कादायक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात आतंकवादापासून ते खू*न करण्याच्या प्रकरणांची नोंद आहे.

तंत्रज्ञानाचा वापर करून किंवा उपलब्ध असलेल्या माहितीचा गैरवापर करून शारीरिक किंवा मानसिक कुठल्याही प्रकारचा छळ करणं यालाच सायबर क्राईम असं म्हणतात.



घरात कुणाला तरी अनोळखी क्रमांकावरून कॉल येतो, आम्ही बँकेकडून बोलतोय असं सांगून बँकेची सगळी माहिती मिळवतात आणि आपलं खातं रिकामं करतात, असे अनेक प्रसंग आपण जवळून पाहिले असतील, अनुभवले असतील. तरूण मुलामुलींचे सोशल मीडियावरील विविध माध्यमांचे अकाऊंट हॅक करणं, त्यांना धमकी देणं, पैसे लुबाडणे, मुलींचे अश्लील व्हिडियो बनवून वायरल करणं या सगळ्या प्रकारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय.

अनेक तरूण मुलं या मुळे आपला जीव गमावून बसतात . सामान्य माणसालाच इतकी माहिती आहे म्हणल्यावर आतंकवादी  कारवाई करणारे कसे मागे राहतील. उलट आतंकवाद तंत्रज्ञानाने युक्त आहे आहे म्हणालो तर अतिशयोक्ती होणार नाही.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

बॉंब बनवण्याचे हजारो प्रयोग आंतरजालावर उपलब्ध आहे. मोबाईल ट्रॅकिंग, टँपिंग, या सगळ्या माहितीद्वारे ते आपल्याला हतबल करतात.

वादग्रस्त लेखन, भडकावू भाषणं सोडले जातात व आपण त्यांना बळी पडतो. एकेकाळी  ‘ब्लु व्हेल‘ नावाच्या एका व्हिडियो गेमने थैमान घातलं होतं. अनेक तरूण मुलं-मुली आत्मह*त्या करत होते.

 

bluewhale game postman
News18.com

या सगळ्या गतिविधींना व वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणेला एका वेगळ्या शाखेची गरज भासली. ज्याला सायबर क्राईम इन्वेस्टिगेशन सेल म्हणतात. २००० साली ‘आय टी ॲक्ट’सुद्धा लागु केला गेला. कायद्यात अशा प्रकारच्या गुन्ह्यांना कडक शिक्षा सांगितली आहे. २०११ ते २०१४ सालात सायबर गुन्हेगारी ३०० टक्क्यांनी वाढली. २०१५ साली ११,५९२ केसेसची नोंद झाली.

पण तरीसुद्धा गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंच चाललंय. उलट त्यात रोज नवनवीन बदल होऊन प्रत्येक वेळी वेगळ्याच तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जर अशा गुन्हेगारांना पकडायचं असेल तर पोलिसांनी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे राहायला हवं.

असं म्हणतात लोखंडच लोखंडाला कापू शकतं. अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्यांच्याच प्रमाणे विचार करणाऱा व तंत्रज्ञानाची माहिती असलेला व्यक्ती हवा.

मुंबई पोलिसांना शुभम सिंघ नावाचा तरूण एथिकल हॅकिंगच्या माध्यमातून अशा केसेस सोडवण्यासाठी मदत करतो.

मुंबई येथील रहिवासी, हा विशीतला तरूण एथीकल हॅकिंग करण्यात पारंगत आहे. कुटुंबात अशी कुठलीही पार्श्वभुमी नसताना त्याने आपल्या बुद्धिमत्ता व मेहनतीने यात यश प्राप्त केलं.

काही वर्षांपूर्वी त्याचं फेसबुक अकाउंट हॅक झालं होतं. त्यावेळी त्याने यूट्यूबवर अनेक व्हिडीओ बघितले व माहिती मिळवली. इथूनच त्याला या क्षेत्रात रुची निर्माण झाली व त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. याच विषयावर विक्रोळी येथील एका विद्यापीठात तो व्याख्यान देत होता. त्यावेळी तिथे उपस्थित एका गृहस्थाने पोलिसांशी त्याचा संपर्क करून दिला. तेव्हापासून तो पोलिसांना मदत करतोय.

या शिवाय विक्रोळी येथें ‘सायबर वर्ल्ड्स ॲकॅडमी’देखील सुरू आहे. त्याची मैत्रिण सौम्या मोण्डलच्या मदतीने तो ही अकॅडमी चालवतो. सायबर क्राईम इन्वेस्टिगेशनसाठी त्यांनी अभ्यासक्रम तयार केला आहे व या अकॅडमीमध्ये तो शिकवला जातो.

अनेक पोलिस अधिकारी त्याच्या या कामामुळे प्रभावित झाले. जवळपास १०० पोलिस या अकॅडमीमध्ये निःशुल्क हा कोर्स करत आहेत व एथिकल  हॅकिंग आणि तंत्रज्ञान शिकून घेत आहेत.

खरंतर, या सगळ्या माहितीचा व आपल्या बुद्धिमत्तेचा गैरवापर तो करु शकला असता. पण तो त्या मार्गाला वळला नाही. चांगल्या हेतू आणि उद्देशाने तो अविरत काम करत आहेत आणि मुंबई पोलिसांना मदत करतो आहे. या गुन्ह्यांना पुर्णपणे संपवणे शक्य नाही, पण कमी करणं आपल्या हातात आहे. आपल्यासोबत किंवा आजूबाजूला अशी कुठली घटना घडताना दिसली तर पोलिसांकडे तक्रार करा.

आजच्या जगात ‘अपडेटेड’ राहणं आवश्यक आहे. योग्य ती काळजी घेऊन, सतर्क राहून, आपण सायबर क्राईमवर आळा घालू शकतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज आणि वादग्रस्त पुस्तके

Next Post

ऑस्ट्रेलियन सरकारने इमू पक्षांविरोधात यु*द्ध पुकारलं होतं, ज्यात त्यांचा दारुण पराभव झाला

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

ऑस्ट्रेलियन सरकारने इमू पक्षांविरोधात यु*द्ध पुकारलं होतं, ज्यात त्यांचा दारुण पराभव झाला

मुलगी जन्मली की १११ झाडं लावणारं गाव

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.