The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चहाचा इतिहाससुद्धा चहा इतकीच तरतरी आणणारा आहे

by द पोस्टमन टीम
13 December 2025
in मनोरंजन, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


चहा माहीत नाही आणि चहा प्यायला आवडत नाही असा माणूस विरळाच. करोडो लोकांच्या घरात सकाळ उजाडते ती गरमागरम चहाने. सुगंध आणि तरतरी आणणारी चहापत्ती योग्य प्रमाणात उकळल्यावर त्यात दुध घालून, उकळी आणून शेवटी साखरेचा गोडवा त्यात घोळवून घेतल्यावर जे अप्रतिम घमघमाट आणणारं मिश्रण तयार होतं, ते सकाळची झोप उडवून तरतरी निर्माण करण्यासाठी पुरेसं असतं.

आपण साधारणपणे दुध आणि साखर मिसळून चहा पितो. चहामध्ये मिरी, जायफळ, इलायची अशा अनेक प्रकारचे मसाले घालूनसुद्धा तो बनवण्याची पद्धत आहे. चहाचा मसाला म्हणून अनेक घरामध्ये गृहिणी स्वतंत्र काळी मिरी, दालचिनी, लवंग, जायफळ, इलायची, सुंठ पावडर अशा मसाल्यांच्या वस्तू घेवून त्याची पावडर करून ठेवतात. चहापत्तीबरोबर अशा मसाल्यांचा सुगंध आणि चव घेऊन समोर येणारा चहा म्हणजे शब्दशः अमृततुल्य..!

thepostman

पहिल्यांदा चीनमध्ये चहा शोधला गेला आणि ज्या ज्या देशांत इंग्रज गेले त्या त्या देशांत त्यांनी चहा नेला असे म्हटले जाते, पण तरीही आज चहाच्या निर्यातीच्या बाबतीत चीननंतर अव्वल असणारा देश म्हणजे भारत.

आता हा चहा पहिल्यांदा कुठे शोधला गेला याबाबत बरेच संभ्रम आहेत. याचे चायनीज ओरिजिन तसे जगप्रसिद्ध आहेच. चहाबाबत सगळ्यात पुरातन गोष्ट सापडते ती अर्थात चीनमध्येच.



चीनच्या युनान प्रदेशात शांग नावाचे राजघराणे राज्य करत होते. त्या प्रदेशात औषधी वनस्पती म्हणून चहाचा वापर केला जात असे. आता हे घराणे होऊन गेले जवळपास ३ हजार वर्षांपूर्वी. म्हणजे चहा आपल्या इतिहासाच्या कालखंडात बऱ्याच जुन्या काळापासून वापरला जात होता हे यावरून लक्षात येईल. आता त्यांना हा शोध कसा लागला?

तर शांग राजघराण्यात राज्य करणाऱ्या एका राजाला पिण्यासाठी उकळलेले पाणी लागायचे. तसे पाणी त्याचा खानसामा बनवत असताना त्या पाण्यात बाजूच्या झाडावरची काही पाने पडली. त्यामुळे त्या पाण्याचा रंग बदलला. हे रंग बदललेले पाणी जेंव्हा राजा प्यायला तेंव्हा त्याला त्याची चव अतिशय आवडली आणि त्याने अशा झाडांचा शोध घेऊन त्याची लागवड करण्याचे आदेश दिले.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

याव्यतिरिक्त आणखी एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे चीनमध्ये चहाचा जन्म हा भारतातून चीनमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या बोधिधर्म नावाच्या बौद्ध भिक्षुमुळे झाला. बोधीधर्माने चीनमध्ये झेन तत्वज्ञानाची स्थापना केली.

या बोधीधर्माने ९ वर्षे न झोपण्याची शपथ घेतलेली होती पण ९ वर्षे संपता संपता त्याला झोप लागली आणि त्याचे व्रत मोडले याचा राग येवून त्याने आपल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस उपटून फेकून दिले त्यातून जन्माला आली ती ही चहाची पाने!

आता या कथा किंवा काल्पनिक लोककथेचा भाग जर सोडला तर चीनमध्ये चहाचा इतिहास त्यांच्या संस्कृतीबरोबर उगम पावला असे म्हणण्यास हरकत नाही.

सहाव्या शतकात चीनमध्ये तांग राजघराण्याचे राज्य होते. या काळात चहाची महती अगदी दूर दूरपर्यंत पसरली. या काळात लु युन नावाच्या एका चिनी लेखकाने “चा चिंग” हे चहाची माहिती देणारे पुस्तक लिहिले. या पुस्तकात चहाचे ओरिजिन, चहाचे प्रकार, चहा करण्याच्या पद्धती, चीनच्या वेगवेगळ्या प्रांतात बनणारे वेगवेगळे चहा इत्यादींचा उल्लेख आहे. चहाची संपूर्ण माहिती देणारा हा जगातील पहिला चहाकोश मानला जातो.

सुरुवातीला चीनमध्ये जो चहा पिला जात असे तो अर्थात अत्यंत कडवट लागायचा. आजही चीनमध्ये दूध आणि साखरेशिवाय चहा पिला जातो. आज जशी चहाच्या पानांवर प्रक्रिया करून त्याची चहापत्ती बनवली जाते ती पद्धत तेव्हा नव्हती, तरी या चहाचा वापर झपाट्याने चीनमध्ये वाढला, इतका की कालांतराने चिनी सम्राटांना चहावर कर लावावा लागला.

आता जर चीनमध्ये हा चहा आढळत असेल तर मग हा चहा बाकीच्या देशात कसा गेला याचं उत्तर देता येईल. अर्थातच, व्यापाराच्या माध्यमातून. चीनचे व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने ज्या ज्या प्रांतात गेले तिथे तिथे त्यांनी आपल्या बरोबर हा चहा नेला.

thepostman

जेव्हा सागरी मार्गातील वाहतूक विकसित करून युरोपियन देश व्यापार आणि राज्यविस्ताराच्या निमित्ताने बाहेर पडले, व्यापार करण्यासाठी आलेल्या पोर्तुगीज लोकांना आशिया खंडातील लेबनन प्रांतात पहिल्यांदा या चहाची ओळख सोळाव्या शतकात झाली याचे पुरावे उपलब्ध आहेत. आपल्याबरोबर मायदेशी परत येताना ते हा चहा घेऊन आले.

खरं तर युरोपमध्ये अगदी पहिल्यापासून कॉफी प्रसिद्ध आहे पण हळूहळू हे पेय युरोपमधील महिला वर्गात लोकप्रिय व्हायला सुरुवात झाली. १६५७ साली लंडनमध्ये पहिले ऑफिशियल चहाचे दुकान उघडले गेले. या दुकानात देशोदेशी व्यापारानिमित्त जाणाऱ्या डच व्यापाऱ्याकडून चहा मागवण्यात यायचा. लंडनच्या दुकानात, हॉटेल्समध्ये, स्नॅकपार्लर्समध्ये हळूहळू चहा विकण्यास सुरुवात व्हायला लागली.

इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याने पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन ब्रेगेन्झाबरोबर लग्न केलं. ही राणी चहाप्रेमी होतीच, त्यामुळे इंग्लंडमध्ये चहा संस्कृती अगदी राजघराण्यामध्येसुद्धा रुजली. १७ व्या शतकात इंग्लिश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली या कंपनीच्या व्यापारात चहा हा एक प्रमुख घटक होता.

या इस्ट इंडिया कंपनीने आपली पाळेमुळे संपूर्ण जगभरात पसरवली होती. मकाऊमध्ये त्यांची चहाची फॅक्टरी होती. चीनच्या चहा मधील मक्तेदारीला इस्ट इंडिया कंपनीने मोठे आव्हान दिले आणि लवरकरच स्वत:ची मक्तेदारी या व्यवसायात निर्माण केली. चहाचे मळे, त्याबरोबर त्या जमिनीवर मालकी, वर्चस्ववाद, चहाच्या मळ्यात काम करायला स्थानिक मजुरांवर दादागिरी असे प्रकार देखील या कंपनीने सुरु केले.

thepostman

इंग्रजांच्या कॉलनी ज्या देशात असतील तेथे चहावर कर लावला जावा अशी मागणी या कंपनीने ग्रेट ब्रिटनच्या साम्राज्याकडे केली होती. याचा निषेध म्हणून अमेरिकेमधील संस्थाने एकत्र आली. त्यांनी चहाची खोकी बोस्टन बंदरात आल्यावर फेकून दिली होती. याच घटनेला इतिहासात बोस्टन टी पार्टी म्हणून ओळखले जाते. याच घटनेपासून युनायटेड स्टेट्सच्या स्थापनेची नांदी सुरु झाली.

जेव्हा ही इस्ट इंडिया कंपनी भारतात आली तेव्हा भारतात चहाच्या लागवडीसाठी उत्तम जमीन आणि हवामान आहे असे त्यांना आढळून आले. इंग्लंड युरोपचे अति थंड हवामान चहाच्या वाढीस पोषक नव्हते. तसे ते भारतात त्यांना आढळल्यावर त्यांनी भारतात दार्जीलिंगमध्ये चहाची लागवड सुरु केली. भारतात तेंव्हापासून हे चहाचे कल्चर जोमाने फोफावले.

आज भारताचा चहा उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. जवळपास १०० वर्षे आपण चहा निर्यातीमध्ये अव्वल होतो पण आता चहाच्या लागवडीसाठी जास्तीची जमीन उपलब्ध नसल्यामुळे आता पुन्हा चीन पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

thepostman

आता मात्र टेटली, टायफू सारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे चहाचे सगळ्यात जुने ब्रँड भारतीय कंपन्यांनी विकत घेतलेले आहेत. आपल्या देशामध्ये पर कॅपिटा चहा पिण्याचे प्रमाणसुद्धा प्रचंड आहे. २०१९ पर्यंत देशातील चहा व्यवसायाचा टर्नओव्हर ५० हजार करोडच्या पुढे होता. इथून पुढे ही देशात या चहा उद्योगाची भरभराट होत राहील अशी आशा आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: green teaorigin of teatea
ShareTweet
Previous Post

फ्री सोलो – अंगावर काटा आणणारी ऑस्कर विनिंग डॉक्युमेंटरी

Next Post

दहा वर्षांच्या पोटच्या मुलाला सोबत घेऊन सावित्रीमाई प्लेगग्रस्त रुग्णांचा आधार बनली होती.

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

दहा वर्षांच्या पोटच्या मुलाला सोबत घेऊन सावित्रीमाई प्लेगग्रस्त रुग्णांचा आधार बनली होती.

'वास्को द गामा'ने आधीच अस्तित्वात असलेल्या भारताचा शोध कसा लावला?

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.