The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय हवाई दलाची शान असलेल्या ‘सुखोई’ लढाऊ विमानाबद्दल जाणून घ्या..!

by द पोस्टमन टीम
11 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


लहानपणी ‘बॉर्डर’ चित्रपटात जॅकी श्रॉफला विमान उडवताना पाहिल्यानंतर पहिल्यांदा ‘एअर फोर्स’ या शब्दाशी ओळख झाली होती. पुढे अधून-मधून वर्तमानपत्रात एअर फोर्सच्या बातम्या वाचायला मिळायच्या. प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीतील कार्यक्रमामध्ये एअर फोर्सच्या विविध विमानांच्या चित्तथरारक कसरती पाहताना अक्षरश: अंगावर रोमांच उभे राहतात. त्यामुळे मी एअर फोर्सविषयी असलेल्या कुतुहलापोटी जमेल ती माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असे. असंच एक दिवस माझ्या हाती ‘सुखोई एसयू -30 एमकेआय’ या लढाऊ विमानाची माहिती पडली.

या विमानात नेमकं असं काय आहे ज्यामुळे त्याला भारतीय हवाई दलाचा कणा समजला जातं? आज आपण तेच जाणून घेऊयात.

तसं तर, प्रत्येक देशाची सेना ही त्या देशाची शान समजली जाते. जितकं प्रभावी सैन्यदल तितका जागतिक राजकारणात तुमचा दबदबा असतो. आपल्या देशाच्या सैन्यदलानं देखील जगभरात नाव कमावलेलं आहे विशेषत: वायुसेनेनं. ८ ऑक्टोबर १९३२ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय वायुसेनेची (आयएफए) स्थापना झाली. तेव्हापासून आजपर्यंत आयएफएची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे.

आयएफएचा जगातील पहिल्या चार हवाई दलांमध्ये त्याचा समावेश होतो. सुखोई एसयू – ३० एमकेआय, राफेल, मिराज २०००, मिग – २०, तेजस, मिग – २१ यांसारखी विमानं आणि अपाचे एएच-६४ई, सीएच-४७ चिनूक, ध्रुव, चेतक, चिताह, एमआय – ८, एमआय – १७, रुद्रा, एमआय – २६, एमआय – २५/३५ या हेलिकॉप्टर्ससह कितीतरी क्षेपणास्त्रांनी आपली वायुसेना सुसज्ज आहे.



‘सुखोई एसयू -30 एमकेआय’ हे भारतीय हवाई दलाचं एक बहुआयामी लढाऊ विमान आहे. रशियातील सुखोई डिझाईन ब्युरो आणि हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांनी संयुक्तपणे ते विकसित केलं आहे. थर्स्ट वेक्टरिंग कंट्रोल आणि इतर अत्याधुनिक तंत्रज्ञानानं हे विमान सुसज्ज आहे.

१९९५ साली खास भारतीय वायुसेनेसाठी या विमानाची बांधणी सुरू करण्यात आली होती. एकदम सुरुवातीच्या काळात सुखोई आणि इर्कुटस्क एअरक्राफ्ट प्रोडक्शन असोसिएशन (इर्कुट कॉर्पोरेशन) विमान उत्पादनासाठी जबाबदार होते. 

सुखोईनं १९९५ ते ९८ दरम्यान ‘एसयू – ३० एमकेआय’चे दोन प्रोटोटाइप तयार केले. पहिला प्रोटोटाइप, एसयू-३०आय-१ याने जुलै १९९७ मध्ये पहिलं उड्डाण केलं होतं. २००० मध्ये इर्कुटस्क प्लांटमध्ये या प्रोटोटाइपचं उत्पादन सुरू झालं. पहिल्या प्री-प्रोडक्शन विमानानं नोव्हेंबर २००० मध्ये पहिलं यशस्वी उड्डाण केलं. त्यापूर्वीच ऑक्टोबर २००० मध्ये भारतानं रशियासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या करारानुसार हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या प्लांटमध्ये ‘एसयू – ३० एमकेआय’चं उत्पादन करण्यास परवाना मिळाला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

एचएएलनं रशियाच्या मदतीनं तयार केलेलं पहिलं सुखोई एसयु-३०एमकेआय नोव्हेंबर २००४ मध्ये भारताच्या आयएएफ तंजोवर एअरबेसवर २२२ स्क्वाड्रन (टायगरशार्क) उभं राहिलं. या नवीन स्क्वाड्रनमधील लढाऊ विमानं ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रे वाहून नेऊ शकत होते. त्यारुपात भारतानं सुखोई -३०एमकेआय लढाऊ विमान तयार करण्याची सिद्ध केली. २००७ साली आयएफएनं एचएएलला ४० विमानांची ऑर्डर दिली. ऑक्टोबर २०१८ मध्ये आयएफएला पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या ‘एसयू – ३०एमकेआय’ विमानांचा ताफा मिळाला.

टायटॅनियम आणि उच्च क्षमतेच्या ॲल्युमिनियम अशा मिश्रधातूंपासून बनलेली एरोडायनॅमिक एअरफ्रेम सुखोई एसयू-३०एमकेआय विमानात आहे. दोन स्टॅबिलायझर्स आणि आडवे कन्सोल विमानाच्या शेपटीच्या भागातील बीममध्ये जोडलेले आहेत. कॉकपिट, रडार आणि एव्हियोनिक्स बे इत्यादींनी विमानाचा सेमी-मोनोकोक फ्यूजलेज हेड विमानाला एकदम सुंदर लूक देतो.

इंजिनजवळच्या नसॅलस विभागात विविध उपकरणं, इंधन साठवण आणि ब्रेक पॅराशूट यंत्रणा आहे. या विमानाची लांबी २१.९ मीटर असून उंची ६.२ मीटर आहे. तर, पंखांची लांबी १४.७ मीटर इतकी आहे. ३८ हजार ८०० किलो ही एसयु-३०एमकेआयची सर्वोच्च टेक-ऑफ क्षमता आहे. 

विमानाच्या टँडेम ग्लास कॉकपिटमध्ये दोन वैमानिक बसू शकतात. फॉरवर्ड कॉकपिट, इंटिग्रेटेड एव्हियोनिक्स सूटसह सुसज्ज आहे. सूटमध्ये एल्बिट एसयू ९६७ हेड-अप डिस्प्ले (एचयूडी), सात ऍक्टिव-मॅट्रिक्स लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले (एएमएलसीडी) आणि प्रायमरी कॉकपिट इन्स्ट्रुमेंटेशनचा समावेश आहे. एचएएलनं भारतात तयार केलेली विमानं ‘सॅमटेल डिस्प्ले सिस्टम्स’नं पुरवलेल्या मल्टीफंक्शन डिस्प्लेने (एमएफडी) सुसज्ज आहेत.

विमानात फ्लाय-बाय-वायर (FBW) फ्लाइट कंट्रोल सिस्टीम इन्स्टॉल आहे. मागील कॉकपिटमध्ये बसवलेली एक मोठी मोनोक्रोमॅटिक डिस्प्ले स्क्रीन, क्षेपणास्त्र सोडण्यासाठी आकाशापासून जमिनीपर्यंतची दृश्य दाखवू शकते. एसयु-३० एमकेआय विमानात एन ०११ एम पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन एअरी रडार, ओएलएस-३० लेसर-ऑप्टिकल लोकेटर सिस्टीम आणि एअर टू सरफेस मिसाईल व लेसरला मार्गदर्शन करण्यासाठी सुसज्ज पॉड्सह आहेत. 

सध्या निर्माणाधिन असलेल्या विमानांमध्ये एन ०११एम रडारऐवजी नवीन झुक एईएसए रडार बसवले जाणार आहे. एसयु-३०एमकेआयमध्ये दोन ए१-३१एफपी टर्बोजेट इंजिन बसवलेले आहेत. प्रत्येक इंजिन १२ हजार ५०० केजीएफ आफ्टरबर्न थ्रस्ट निर्माण करतं. थ्रर्स्ट वेक्टर कंट्रोलसह सुसज्ज असलेला पॉवर प्लांट, प्रति सेंकदात ३०० मीटरची उंची गाठू शकतो.

एसयु-३० एमकेआय वायुसेनेच्या ताफ्यातील सर्वोत्तम लढाऊ विमान आहे. अनेक अत्याधुनिक क्षेपणास्त्रे वाहून नेण्याची विमानात क्षमता आहे. एसयू -30 एमकेआय विमानात १५० राउंड दारूगोळा असलेली ३० मिमी जीएसएच -३०-१ तोफ आहे. विमानात १२ हार्ड पॉईंट्स आहेत.

हवेतून जमिनीवर मारा करणारी विविध क्षेपणास्त्र लागोपाठ सोडण्याची क्षमता या विमानात आहेत. या क्षेपणास्त्रांमध्ये केएच-२९एल/टी/टीवायइ, केएच-३१ ए/पी, केएच-५९एम आणि निर्भय यांचा समावेश आहे. 

एसयु-३०एमकेआयच्या एका ताफ्यात ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांचं एअर लॉन्चड् व्हर्जन बसवून नोव्हेंबर २०१७ मध्ये त्याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. ब्रह्मोस ४५०-५०० किमीच्या परिघात असलेल्या लक्ष्यांवर ह*ल्ला करू शकतं. विमान, हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, रॉकेट पॉड्स आणि केएबी-५०० व केएबी-१५००सारखे लेझर बॉ*म्बही वाहून नेऊन शकते.

एसयु-३०एमकेआयमध्ये ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’नं (DRDO) विकसित केलेलं ‘तरंग रडार वॉर्निंग रिसीव्हर’ देखील बसवलेले आहे. याशिवाय फ्लेअर डिस्पेन्सर्स आणि ऍक्टिव जॅमर्स देखील यात आहेत.

२००० पासून जुलै २०१८ पर्यंत, सात एसयु-३०एमकेआय विमानांचे अपघात झाले आहेत. या विमानाचे वारंवार होणारे अपघात ही भारतीय वायुसेनेसाठी मोठी चिंतेची गोष्ट आहे. मात्र, असे असले तरीही या विमानाच्या रुपात वायुसेनेकडे कुठल्याही हवाई संकटाचा सामना करणारा यो*द्धा उपलब्ध आहे, हे नक्की.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

१९७३ सालापासून म्हणजे तब्बल ५१ वर्षे साधू अमर भारती यांनी एक हात वर केला आहे

Next Post

जग फिरायचं म्हणून विमानाच्या चाकाला लटकला, विमान उडताच खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

जग फिरायचं म्हणून विमानाच्या चाकाला लटकला, विमान उडताच खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला

हा कुत्रा बालवाडीतील लहान मुलांना रोज रस्ता ओलांडायला मदत करतोय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.