The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हिंदू मुस्लीम ऐक्यासाठी सुफी पंथाचं मोठं योगदान आहे

by द पोस्टमन टीम
12 July 2024
in इतिहास
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब 


माणुसकी या धर्माचा रथ स्वार्थ नावाच्या चाकावर चालत नाही. त्यासाठी परमार्थ नावाचा सारथी असणे गरजेचे आहे. परमार्थ म्हणजे “स्व:”च्या जागेवर आपण असा विचार. भारतात माणुसकी जिवंत राहण्यास कारणीभूत आहे ते म्हणजे ‘हम’. दोन धर्मांमध्ये असणारी एकता अजुनही भारतात टिकून आहे ती या ‘हम’मुळे.

हिंदु मधील ‘ह’ आणि मुस्लिम मधील ‘म’ मिळून हा हम तयार होतो. हाच ‘हम’ भारतातील माणुसकीची मुळे अजून खोलवर रुतवत आहे हे नक्की.

एकतेची चर्चा होत असताना इथे एका पंथाचा उल्लेख गरजेचा आहे. तो म्हणजे सुफी पंथ. तोच सुफी पंथ, ज्याच्या अनुयायांना आपण दुरचित्रवाहिनीवर एक हात आकाशाकडे आणि एक हात जमिनीकडे करुन बेधुंद नाचताना बघतो. मागे कुराणची आयात, मीराचे भजन, कबिरांचे दोहे तर कधी गालिबची शायरी असते. यावरुन हा पंथ हिंदु आणि मुस्लिम यांच्यामधील एकता दर्शवता हे सिध्द होते.

तसे बघितले तर इस्लाममध्ये सुफी पंथास रहस्यमयी नजरेने बघितले जाते. या पंथाच्या उदयाचा उल्लेख कुराणमध्येही नाही आणि गीतेतही नाही. परंतु तरीही हा धर्म दोन्ही धर्मांच्या मधील दुवा बनुन आजही उभा आहे. आज आपण याच सुफी पंथाबद्दल जाणून घेणार आहोत.



फार पूर्वीपासून हा पंथ अस्तित्वात आहे असे मानले जाते. इतिहासात अनेक सुफी संतांचे साहित्य आपल्याला वाचायला मिळते. त्या साहित्यानुसार ‘सूफ’ या शब्दापासुन सुफी शब्दाचा उदय झाला. ‘सूफ’ म्हणजे पवित्र. काहींच्या मते ग्रीक भाषेतील ‘सोफिया’ या शब्दाचा हा अपभ्रंश आहे ज्याचा अर्थ बुध्दिमत्ता असा होतो.

एकूणच काय तर प्रत्येक धर्माने सुफीला आपल्या नजरेने बघितले आणि त्याचप्रमाणे त्याची व्याख्या बनवली. एक समान बाब म्हणजे सगळ्यांच्या मते सुफी हा इस्लामचा एक रहस्यमयी अवतार आहे. सुफी पंथात नमुद केलेले देवाकडे जाण्याचे रस्ते इस्लाम धर्माबरोबरच हिंदु, ख्रिश्चन आणि जैन धर्माशी साम्य दर्शवतात. 

इस्लाम किंवा कुराणात मात्र सुफी पंथाचा, विचारधारेचा कोणत्याही उल्लेख नाही. हजरत मोहम्मद यांच्या काळात या पंथाचा उल्लेख देखील आढळत नाही. तरीही कुराणात एका जागी घटनेचा उल्लेख आढळतो.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

सहीह मुस्लिम, पुस्तक १. क्र. १ मध्ये लिहिल्याप्रमाणे हजरत मोहम्मद यांच्या एका जोडीदाराचे नाव इब्न- अल- खत्ताब असे होते. ते म्हणतात की एकदा हजरतांबरोबर बसलेलो असताना एक पांढऱ्या रंगाचा लांबट कपडा घालून लांब काळ्या केसांचा एक व्यक्ती आमच्याकडे आला. पैगंबरांच्या पायी पडून त्याने इस्लाम शिकण्याची स्वत:ची इच्छा व्यक्त केली.

पैगंबरांनी त्याला इस्लाम समजावून सांगताना म्हटले की इस्लाम म्हणजे अल्लाहच्या अस्तित्वाला सिध्द करणारे एक माध्यम आहे. सगळ्या प्रार्थना त्याच्यासाठीच आहेत, हजरत मोहम्मद अल्लाहचे दुत असून पृथ्वीवर लोकांना इस्लाम शिकवण्यासाठी ते आले आहेत. नमाज, जकात, रोजा आणि हज या सगळ्या गोष्टी अल्लाहकडे पोहचण्याचे मार्ग आहेत असे त्यांनी सांगितले. नंतर त्या इसमाने ईमानदारी वगैरेबद्दल विचारले. तर पैगंबरांनी त्याला अल्लाहवर श्रद्धा ठेवण्यास सांगितली. अशी श्रद्धा जिच्यामुळे तो अल्लाहला बघू शकेल, अल्लाह त्याच्या समोर उभे आहेत असे त्याला वाटेल.

तुम्ही अल्लाहला बघू शकत नसलात तरी त्याची नजर तुमच्यावर नेहमीच असते. कुराणावर आपली श्रद्धा असू द्या. मृत्यूच्या वेळी तुम्हाला तुमच्या याच जाणिवेचा आणि इमानाचा उपयोग होईल.

त्यानंतर तो व्यक्ती एका मागे एक असे अनेक इस्लामबद्दल प्रश्न विचारत गेला आणि पैगंबरांनी त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावर उमर-अल-खत्ताबने पैगंबरांना विचारले की तुम्ही या व्यक्तीला ओळखता का? त्यावर त्यांनी तो फक्त अल्लाहचा बंदा होता एवढंच उत्तर दिलं.

या सगळ्या घटनेत त्या व्यक्तीची जी वेषभुषा सांगण्यात आली आहे त्यानुसार तो व्यक्ती सुफी पंथाचा अनुयायी होता असे वाटते. पण याशिवाय दुसरीकडे कुठेही सुफी पंथाचा उल्लेख सापडत नाही.

भारतात सुफी पंथाचे आगमन अरबी लोकांच्यामार्फत झाले. अबुल-हसन-हुज याला सुफी पंथाचा प्रणेता समजले जाते. त्यांनी भारताच्या विविध भागात इस्लाम धर्माचा प्रचार केला. त्यांच्या प्रचाराची पध्दत सुफी होती. खरा इस्लाम फक्त पुस्तक वाचून नाही तर अल्लाहच्या श्रध्देत हरवून जाण्यात आहे. 

भारतात बाराव्या शतकात मोइनुद्दीन चिश्तीने उत्तर भारतात सुफी पंथाचा प्रचार केला. बाबा फखरुद्दीन यांनी दक्षिण भारतात तेराव्या शतकात सुफी विचारांचा प्रसार केला. अकबरच्या दरबारातही सुफी संतांना आणि गायकांना मानाची वागणूक दिली गेल्याचा इतिहास आहे.

चौदाव्या शतकात अरब इतिहासकार इब्न-ए-खलदुन याने सुफीवादाची व्याख्या सांगताना म्हटले की संपत्ती, प्रसिद्धी, अशा अनेक वैश्विक आकर्षणांपासून दूर राहुन आपल्या देवाशी श्रध्दा ठेवणे आणि एकनिष्ठ राहणे यालाच सुफीवाद म्हणतात. याच व्याख्येनुसार पुढे सुफी पंथ ओळखला जाऊ लागला.

सुफी पंथाच्या प्रार्थनेची पध्दत काहीशी वेगळी आहे. जरी ते पाच वेळा नमाज पढतात, मशिदीत जातात, रोजे ठेवतात आणि त्यांच्या या सगळ्या पध्दती इस्लाम धर्माशी साधर्म्य बाळगत असल्या तरी काही प्रमाणात त्यांच्या काही पद्धतींमध्ये इतर धर्मांशी साम्य असलेल्या गोष्टी देखील आहेत. 

ज्या गोष्टी हजरतांनी त्या व्यक्तीला सांगितल्या त्या पुढे जाऊन सुफी पंथाच्या पाया रचण्यासाठी महत्त्वाच्या ठरल्या. सुफी पंथ अल्लाहला फक्त नमाजपुरते मर्यादित ठेवत नाहीत, ते त्याला आता संगीतामध्ये, नृत्यामध्ये शोधतात.

अल्लाहच्या प्रेमात ते स्वत:ला हरवून घेतात आणि स्वत:ला त्याच्या आणखी जवळ अनुभवतात. एकेश्वरवादावर विश्वास असणाऱ्या सुफी पंथाचे अनुयायी फक्त अल्लाहची इबादत करतात असे नाही. एकेश्वरवादी असूनही सुफी संत सगळ्या धर्मांचा आदर करतात. डोळे मिटुन नाचत असताना ते कुराणची आयात आणि कबीरांचे दोहे अगदी एकाच वेळी गातात.

भारतात चिश्ती सांप्रदायाचे संस्थापक ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांनी या पंथाच्या प्रचारात मोठी भूमिका बजावली. त्यांचा जन्म इराणच्या सिस्तान प्रांतात झाला. लहानपणी ते ख्वाजा उस्मान हसन यांचे शिष्य होते. ११९० साली ते भारत दौऱ्यावर आले तेव्हा त्यांनी भारतात इस्लाम सुफी पंथाचा प्रसार केला. हिंदुंच्या बाबतीत त्यांचे विचार नेहमीच उदार होते. देवाच्या बाबतीत बोलताना ते बऱ्याच वेळी हिंदु धर्माबद्दल बोलत असत.

१२३६ साली बदायुनमध्ये जन्म झालेल्या निजामुद्दीन औलिया दुसरे सुफी संत होते, ज्यांनी चिश्ती संप्रदायाचा प्रचार केला आणि नंतर ते सुफी पंथाचे विचारवंत बनले. संसारिक बंधनांतून बाहेर पडून फक्त अल्लाहच्या इबादतीत मग्न राहण्याचा ते संदेश देत असत.

१२५३ साली एटा जिल्ह्यात पटियालीमध्ये अमीर खुसरोचा जन्म झाला. १२ वर्ष वय असतानाच त्यांनी कविता म्हणायला सुरुवात केली. माणसाला योग्य रस्ता दाखवण्यासाठी ते कविता लिहीत असत. ‘तुघलकनामा’मध्ये केलेल्या एकेश्वरवादामुळे ते मुस्लिम आणि हिंदु दोन्ही समाजात अतिशय प्रसिद्ध झाले.

आज भारतात चिश्ती संप्रदाय, सुहरावादी संप्रदाय, कादरिया संप्रदाय, नक्षबदी संप्रदाय, शत्तारी संप्रदाय सुफीवादाचा स्पष्टपणे स्वीकार करतात. सुफी संत ‘जायसी’ इस्लामचे अनुयायी असुनही म्हणतात,

“मातु के रक्त पिता कै बिंदू,
अपने दुनौ तुरूक और हिंदू ।”

आज भलेही सगळीकडे दोन धर्मांच्यामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी सुफी पंथ आजही दोन्ही धर्मांना एकत्र ठेवण्यात यशस्वी झाला आहे हाच या सुफी पंथाच्या शिकवणीचा खरा विजय आहे असं म्हणता येईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

इतिहासाने कायमच अन्याय केलेला क्रांतिकारक विचारवंत मानवेंद्रनाथ रॉय

Next Post

म्हणूनच पालनजी मिस्त्री यांना ‘फँटम ऑफ द बॉम्बे हाउस’ असं म्हटलं जातं

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

म्हणूनच पालनजी मिस्त्री यांना 'फँटम ऑफ द बॉम्बे हाउस' असं म्हटलं जातं

या शास्त्रज्ञाने ब्रिटनला दुसरं महायुद्ध जिंकून दिलं पण ब्रिटनने त्यांनाच शिक्षा ठोठावली

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.