The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जग फिरायचं म्हणून विमानाच्या चाकाला लटकला, विमान उडताच खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला

by द पोस्टमन टीम
11 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


आपल्या मराठीत ‘हौसेला मोल नसतं’ अशी एक म्हण आहे. आपली हौस पुरवण्यासाठी कोण कुठल्या थराला जाईल हे सांगणं अशक्य आहे. अशीच एक वेडी हौस म्हणजे भटकंती. भटकायचा ध्यास असलेला माणूस कोणत्याही परिस्थितीत आपला मार्ग शोधायला कायमच तयार असतो. अशांना फकीर समजून त्यांना या हौसेपायी वेड्यातही काढलं जातं. पण ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे’ अशी धारणा असलेल्या या भटक्यांना लोकांच्या बोलण्याने काही फरक पडत नाही. ते आपल्याच मस्तीत रममाण होऊन आपली हौस पूर्ण करत असतात.

दुर्गम आणि अवघड वाटांवरून आपलं ध्येय गाठण्याचा आत्मविश्वास फक्त या अशा हौशी लोकांमध्येच आढळून येतो पण कधी कधी ही हौस जीवावरही बेतू शकते, याचंच प्रमाण १९७० च्या फेब्रुवारीमध्ये घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेवरून मिळतं.

२२ फेब्रुवारी १९७० ही तारीख जगभरातल्या विमानतळांच्या सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरली. ऑस्ट्रेलियावरून जपानला निघालेल्या विमानातून एक आगंतुक प्रवासी खाली पडला आणि त्याचा दुर्दैवी अंत झाला. तो प्रवासी अवघ्या १४ वर्षांचा मुलगा होता. विनातिकीट प्रवास करण्याचा मोह त्याला आवरता नाही आणि त्याबदल्यात त्याला आपल्या प्राणांची किंमत चुकवावी लागली. या अभागी प्रवाशाचं नाव होतं किथ सॅपस्फोर्ड.

सिडनीच्या रँडविकमध्ये वाढलेल्या किथचे वडील हे तिथल्या युनिव्हर्सिटीत लेक्चरर म्हणून काम करत होते. किथचा धडपड्या, भटका आणि व्रात्य स्वभाव त्यांना चांगलाच ठाऊक होता, पण त्याचं वय लहान असल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. कालांतराने त्याचा हट्ट पुरवण्यासाठी ते त्याला घेऊन एक ओव्हरसीज ट्रीपही करून आले. त्यांना वाटलं की आता तरी तो काही काळ शांत राहील पण प्रत्यक्षात मात्र किथला या सगळ्याची चटकच लागली होती. जग फिरायची त्याची भूक त्याला अस्वस्थ करत होती आणि त्यामुळे त्याच्या स्वभावातही चिडखोरपणा वाढला होता. त्याच्या अशा वागण्यामुळे घरातही सतत वाद होऊ लागले.

त्याच्या या बेलगाम वृत्तीला नियंत्रणात आणता यावं आणि त्याला शिस्त लागावी यासाठी त्याची रवानगी ‘बॉयज’ टाऊन’ या रोमन कॅथलिक संस्थेत करण्यात आली. कोवळ्या वयातील मुलांना या शिस्तबद्ध जगण्याची शिकवण देणाऱ्या रोमन कॅथलिक संस्था म्हणजे छळछावण्याच वाटत असत. हे एकप्रकारचं बोर्डिंग स्कूलच होतं. नाईलाजास्तव किथने सुरुवातीला सहकार्याचं धोरण स्वीकारलं खरं पण त्याच्या मनातील भटकंतीची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.



दोनच महिन्यांत त्याने संधीचा फायदा उठवून त्या ‘छळछावणीतून’ पळ काढला आणि थेट सिडनी एअरपोर्टकडे धूम ठोकली. त्याकाळी विमानतळावरील सुरक्षाव्यवस्था फारशी कडक नसल्याने किथला धावपट्टीवर असलेल्या विमानांपाशी जाणं सहजशक्य झालं. तिथं डग्लस डीसी-८ हे सिडनीहून टोकियोला जाणारं विमान बोर्डिंगच्या तयारीत होतं. किथला तिथे लपण्यायोग्य एक जागा दिसली आणि सुरक्षारक्षकांची नजर चुकवून तो त्या जागेत जाऊन बसला.

वास्तवात, ही जागा कुणी बसावं यासाठी नव्हती तर तो विमानाचा व्हील कम्पार्टमेंट होता. खास विमानाच्या चाकांसाठी बनवली गेलेली ही जागा ‘स्टोअवे’ अर्थात विनातिकीट प्रवास करण्यासाठी प्रथमदर्शनी सोयीची वाटत असली तरी प्रत्यक्षात मात्र असे प्रवास यशस्वी झाल्याच्या घटनांचं प्रमाण अत्यल्प होतं.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

थोड्याच वेळात विमानाने टेक-ऑफ केलं आणि जवळपास २०० फूट उंची गाठल्यानंतर बाहेर राहिलेली चाके आत घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. किथला याबाबत कल्पना नसल्याने तो निवांतपणे आत जाऊन बसला होता. पण व्हील कम्पार्टमेंटचा दरवाजा उघडला जाताच या प्रक्रियेपासून पूर्णतः अनभिज्ञ असलेला किथ त्या चालत्या विमानातून खाली पडला आणि त्यामुळे त्याला आपला प्राण गमवावा लागला.

अपघाताने, ही घटना त्यावेळी सिडनी विमानतळावर उपस्थित असलेल्या जॉन गिल्पीन या हौशी छायाचित्रकाराच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. आपण असा काही फोटो काढलाय याची गिल्पीनला पुसटशीही कल्पना नव्हती. तो फक्त आपल्या नव्या कॅमेऱ्याची लेन्स पारखून घेण्यासाठी तिथे फोटो काढत होता. आठवड्याभरानंतर जेव्हा त्याने आपल्या कॅमेऱ्यातील फिल्म डेव्हलप केली, तेव्हा त्याला किथ विमानातून पडताना घेतला गेलेला फोटो मिळाला.

अनावधानाने कॅमेऱ्यात क्लिक झालेली ही घटना विमानतळांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यासाठी कारणीभूत ठरली, असेही म्हणता येतील.

किथच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम केल्यानंतर किथचा मृत्यू हा त्याच्या श्वसनप्रक्रियेत अडथळा आल्यामुळे झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांच्या मते, एकवेळ एवढ्या उंचीवरून खाली पडूनही किथ जिवंत राहण्याची शक्यता अगदीच कमी होती पण तो जगला असता तरी त्याचे हात-पाय त्याला कायमचे गमवावे लागले असते. कम्पार्टमेंटमधील अतिशय थंड वातावरण आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे फक्त एक आखूड बाह्यांचा शर्ट अंगावर घालून इतक्या उंचीवर कुडकुडत बसलेला किथ वाचणे जवळजवळ अशक्यच होते आणि घडलेही तसेच. विनातिकीट जग फिरण्याचा किथचा हा निर्णय त्याच्यासाठी अतिशय घातक ठरला.

किथच्या वडिलांना ही दुर्दैवी घटना कळाल्यावर त्यांनी हताशपणे उसासा टाकत या सगळ्यासाठी किथच्या भटकंती करण्याच्या अनाठायी हौसेला जबाबदार धरलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विमानातून असा विनातिकीट प्रवास करणे हे किती धोकादायक आहे याबद्दल त्यांची किथशीही आधीच चर्चा झाली असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. पण विश्वभ्रमंतीचं खूळ अनावर झालेल्या किथने ही चर्चा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिली. भटकंतीची हौस आणि अनाठायी हट्ट पूर्ण करण्यासाठी किथने आततायीपणा करून घेतलेला निर्णय त्याच्या आयुष्यातील शेवटचा निर्णय ठरला!!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

भारतीय हवाई दलाची शान असलेल्या ‘सुखोई’ लढाऊ विमानाबद्दल जाणून घ्या..!

Next Post

हा कुत्रा बालवाडीतील लहान मुलांना रोज रस्ता ओलांडायला मदत करतोय..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

हा कुत्रा बालवाडीतील लहान मुलांना रोज रस्ता ओलांडायला मदत करतोय..!

हा माणूस इस्लामिक स्टेटच्या तावडीतून ५० हजारापेक्षा जास्त हस्तलिखितांचं रक्षण करतोय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.