The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

त्या दाम्पत्याने स्वबळावर जगातील सर्वांत मोठा हॉटेलिंग ब्रँड सुरु केला..!

by Heramb
1 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


क्रिकेटच्या मॅचेस असो, किंवा कोणत्याही बड्या कंपनीचा कर्मचारी दुसऱ्या शहरात काही कामानिमित्त गेलेला असो, अथवा परदेशातील डिप्लोमॅट्स G-20 सारख्या परिषदेस आलेले असो, या सर्वांच्या पाहुणचाराची आणि त्यांना सर्वोत्तम सर्व्हिस द्यायचं काम एखाद्या पंचतारांकित हॉटेलवर सोपवलं जातं. पंचतारांकित हॉटेल्समध्येही जगभरातील लिडिंग ब्रॅण्ड्सपैकी एक म्हणजे जे. डब्लू. मॅरीयट. याच ब्रॅण्डला बऱ्याच वर्षांपासून अनेकांची पसंती मिळालेली दिसते.

जे. डब्लू.मॅरीयटची सुरुवात करणं सोपं काम अजिबात नव्हतं. अनेक पायऱ्या चढत आणि अनेक अडचणींवर मात करत एका दाम्पत्याने सुरु केलेली ही हॉटेल चेन आज जगभरातील प्रमुख हॉटेल चेन्सपैकी एक आहे किंवा अग्रभागीच आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या लेखातून जे. डब्लू. मॅरीयटचा प्रवास उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.

वर्ष होतं १९२६. अमेरिकेतील युटाह विद्यापीठामधील मित्र मैत्रीण सॉल्ट लेक सिटी येथील एका रेस्टॉरंटमध्ये एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी गेले. त्या रेस्टॉरंटमध्ये एकाच गोष्टीसाठी प्रचंड गर्दी झाल्याचं त्यांनी पाहिलं, ती गोष्ट होती “ए अँड डब्लू रूट बिअर”. यावेळी ग्रॅज्युएट झाल्यावर तो तिच्याशी लग्न करण्यासाठी परत येईल असं सांगून त्यानं मैत्रिणीला प्रपोज केलं आणि तो आनंदात रूट बिअरच्या विक्रीची तयारी करण्यासाठी वॉशिंग्टन डी. सी.ला निघून गेला. कारण उन्हाळ्यात वॉशिंग्टन डी. सी.चं तापमान प्रचंड वाढतं याची कल्पना त्याला होती. प्रचंड उन्हाळ्यामुळे या थंड गर बियरचा वॉशिंग्टनमध्ये चांगला खप होणार होता.

नाईन-सीट रूट बियर स्टॅन्ड

ठरल्याप्रमाणे १९२७ साली दोघांनी लग्न केलं आणि त्यांनी आपलं पहिलं-वहिलं नाईन-सीट रूट बियर स्टॅन्ड सुरु केलं. मे पासून ते सप्टेंबरपर्यंत हे रेस्टॉरंट अतिशय दणक्यात चालू होतं, पण जसजसा ऑक्टोबर सुरु झाला तसा पाऊस आणि थंडीचं वातावरण सुरु झाल्याने कोणालाही थंडगार रूट बियर प्यावी वाटत नव्हती. याची कल्पना असल्याने दाम्पत्य आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याच्या तयारीत होतंच.



नवीन सुरुवात करत त्या दाम्पत्याने आपल्या रेस्टॉरंटमध्ये अमेरिकन डिश तमाले आणि चिली विकण्यास सुरुवात केली, याच रेस्टॉरंटला त्यांनी “हॉट शॉपी” असे नाव दिले. रूट बियर, कॉफी, तमाले आणि चिली कॉर्नबरोबरच त्यांनी आपल्या डिशेसच्या व्हरायटीज वाढवल्या. अमेरिकेच्या पूर्व भागातील सर्वात मोठ्या रेस्टॉरंट चेनची ही सुरुवात होती. त्यानंतर त्यांनी हळू हळू आपल्या रेस्टॉरंट्सची संख्या वाढवली.

हॉट शॉपी

ते फक्त रेस्टॉरंट्सवरच थांबले नाहीत तर त्यांनी आणखी एका आयडियावर प्रत्यक्षात काम केलं आणि जगातील पहिला एअरलाइन कॅटरिंग व्यवसाय सुरु झाला. या दोन्ही व्यवसायांमध्ये ३० वर्षे काम केल्यानंतर या जोडप्याने आपला मोर्चा लॉजिंग व्यवसायाकडे वळवला आणि अमेरिकेतील व्हर्जिनियामधील अर्लिंग्टन येथे पहिले मॉटेल उघडले.

पहिला एअरलाईन केटरिंग व्यवसाय
जे. डब्लू. मॅरियट यांचे पहिले मॉटेल

आज त्याच हॉटेल चेनकडे संस्थापक जॉन विलार्ड आणि ॲलिस शीट मॅरियट यांच्या नावावर जगभरात सुमारे ८ हजार मालमत्ता असून त्या जे. डब्लू मॅरियट नावाने प्रसिद्ध आहेत. 

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

व्यवसाय करताना रिस्क टेकिंगबरोबरच सुसंगतता (कन्सिस्टन्सी), नाविन्यता (इन्व्हेंशन),  उत्तमता (एक्ससेलन्स) आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर यशाची परमोच्च शिखरे नक्कीच गाठता येतात हेच जे. डब्लू. मॅरियटच्या कथेतून लक्षात येतं. कोणत्याही नवउद्योजकाला किंवा या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना नक्कीच ही कथा प्रेरणादायक आहे.

जॉन विलार्ड आणि ॲलिस शीट मॅरियट यांनी प्रेमाचा संबंध फक्त भावनेपुरताच मर्यादित न ठेवता एकमेकांना साहाय्य करीत उभारलेलं हे विश्व अनेक पिढ्यांना शिकवण देत राहील हे नक्की..!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

 

ShareTweet
Previous Post

भारताला FIFA वर्ल्ड कपमध्ये खेळता आलं नाही त्यामागे खरं कारण ‘हे’ आहे..!

Next Post

आयम सेमानी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी..!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

आयम सेमानी, सोन्याची अंडी देणारी कोंबडी..!

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.