The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा जापानी सैनिक दुसरं महायु*द्ध संपल्यानंतरसुद्धा २९ वर्षे लढत होता

by द पोस्टमन टीम
18 May 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात अनेक अशा घटना घडल्या ज्याने पूर्ण जगाला विस्मित करून सोडले. हे यु*द्ध अनेक कारणांनी इतिहासात नोंदवले गेले आहे. क्रौ*र्य आणि हुकुमशाहीवर मात  करून शेवटी यु*द्ध हा पर्याय नाही असे म्हणत या यु*द्धाचा अंत कसा झाला आणि त्यानंतर जागतिकीकरणाची गणिते कशी बदलली हे देखील या यु*द्धातून शिकण्यासारखे आहे.

या यु*द्धात शत्रू राष्ट्रे आणि मित्र राष्ट्रे यांच्या सेना, त्यांचे सैनिक, ज्यांनी या यु*द्धात असीम शौर्य गाजवले असे लोक आणि यांच्या सुरस कहाण्या प्रसिद्ध आहेत.

दुसऱ्या महायु*द्धात जपान आपलं सर्वस्व पणाला लावून उतरला होता. जपानी सैनिक जीवावर उदार होऊन यु*द्ध लढत असत, जर एखादी लढाई अथवा उठाव ते हरले तर त्याक्षणी स्वत:ला गोळ्या घालून घेण्याचे त्यांना आदेश दिलेले होते आणि या आदेशाचे पालन त्यांचे बहुतांशी सैनिक करत असत. त्यातलीच एक कहाणी आपण आता बघणार आहोत ती म्हणजे हिरू ओनोडा नावाच्या जपानी सैनिकाची.

हिरू ओनोडा वयाच्या विसाव्या वर्षीच जपानच्या सैन्यात भारती झालेला होता. अत्यंत शूर आणि कुठलीही कामगिरी फत्ते करून येणारा सैनिक असा त्याचा नावलौकिक होता.



डिसेम्बर १९४४ मध्ये ओनोडो आणि त्याच्याबरोबर एका लहानशा सैनिकांच्या तुकडीला फिलिपाइन्स देशातील लुबंग नावाच्या बेटावर पाठवण्यात आले. तिथे असलेले अमेरिकन एअरस्ट्रीप आणि जहाज तळ उ*ध्वस्त करण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

जर समजा सोपवलेले काम पार पडले नाही तर कोणाही सैनिकाला आत्मह*त्या करण्यावर बंदी घालण्यात आली होती, याचे कारण  म्हणजे त्या काळात जपानची सर्व आघाड्यावर पीछेहाट चालू होती, यु*द्ध हरण्याचे संकेत मिळत होते त्यामुळे जपानी सैनिक जिथे कुठे यु*द्ध हरतील तिथे आत्मह*त्या करत होते.

ओनोडो आणि त्याच्या तुकडीला सांगण्यात आले जर तुम्ही या लुबंग बेटावर अडकलात तर तिथे तुमची सुटका करण्यासाठी कोणी येईपर्यंत तुम्हाला तेथील भयानक जंगलात तग धरून राहावे लागेल.

या बेटावर गेल्यानंतर जपानला पराभव पत्करावा लागला. १९४५ साली अमेरिका आणि फिलिपाइन्सने या बेटावर कब्जा मिळवला. ओनोडाबरोबरचे अनेक सैनिक मारले गेले आणि बाकीचे यु*द्धकैदी म्हणून सापडले. मात्र ओनोडा त्याच्या ३ साथीदारसह जंगलामध्ये निसटला.

यु*द्ध करताना घेतलेल्या शपथेला स्मरून त्यांनी ठरवले की ते शेवटपर्यंत लढत राहतील. लुबंग बेट फक्त २५ किलोमीटरचा व्यास असलेले आहे मात्र या बेटाचा भाग अत्यंत घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या सैनिकांना तेथील जंगलात लपणे सोपे गेले.

या चार उरलेल्या जपानी सैनिकांनी त्या बेटावर अक्षरश: गुरील्ला पद्धतीचे यु*द्ध आरंभले. अचानक कुणाला खबर लागू न देता अंधारात ते ह*ल्ले करायचे आणि कुणाच्या लक्षात येण्यापूर्वी लगोलग जंगलात पसार व्हायचे ही पद्धत त्यांनी अवलंबिली. त्यांनी जवळजवळ ३० फिलिपिन्स नागरिक मारले, अनेक वेळा पोलिसांबरोबर हातापाई केली. तरीही त्यांना पकडण्यात तेथील लोकांना यश आले नाही.

१९४५ साली एके दिवशी या ओनोडो आणि त्याच्या ३ सहकाऱ्यांना एक बोर्ड त्यांच्या नावे लिहून ठेवलेला आढळला. त्यावर लिहिले होते की आता यु*द्ध संपले आहे, तुम्ही जंगलातून बाहेर या. ओनोडोचा आणि त्याच्या साथीदारांचा याच्यावर विश्वास बसला नाही. आपल्याला फसवण्यासाठी ही काहीतरी शत्रूची चाल आहे असं त्यांना वाटलं आणि १९४५ नंतर सुद्धा त्यांनी यु*द्ध चालू ठेवले.

या चौघांना अजून काही महिन्यांनी हवेतून विमानाने खाली सोडलेले आणखी एक पोस्टर दिसले त्यावर लिहिले होते मी सध्याच्या स्थितीमधील जपानी लष्कराचा सैन्य प्रमुख टोमोयुकी यामाशिता तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही या दाट जंगलातून बाहेर येऊन माझ्यासमोर सरेंडर करा.

आता हे पोस्टर खरोखर जपानच्या अधिकाऱ्यानेच फिलिपिन्स सरकारच्या विनन्तीवरून टाकले होते पण आपल्या देशाबरोबर शेवटपर्यंत एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतलेल्या ओनोडो आणि त्याच्या ३ साथीदाराने या पोस्टरलासुद्धा भीक घातली नाही आणि त्यांचे यु*ध्द चालूच ठेवले. या चौघांपैकी एकाचा पुढे जंगलात विषारी वनस्पती खाण्यात आल्याने मृत्यू झाला आणि पाठीमागे उरले ते ओनोडो आणि त्याचे दोन सैनिक.

the postman

१९४७ साली, दोन वर्षानंतर एक दिवस विमानातून या लुबंग बेटावर घनदाट जंगलात या ४ जणांच्या कुटुंबाचे असंख्य फोटो, यु*द्ध जिंकल्याचे फोटो, जपानने सरेंडर केल्याचे फोटो सोडण्यात आले. परंतु ही देखील अमेरिकन सैन्याची आपल्याला बाहेर काढण्याची एक ट्रिक आहे असेच ओनोडो आणि त्याच्या सहकाऱ्यांना वाटले त्यांनी आपले छुपे यु*द्ध चालू ठेवले.

त्यांच्याकडील अन्नधान्याचा पुरवठासुद्धा संपत आलेला होता. अनेक दिवस ते बेटावरील नारळ आणि केळी खाऊन जगले. अनेकदा जंगली प्राणी मारून त्यांनी स्वत:चा उदरनिर्वाह केला.

परिस्थिती भयानक होती, प्रचंड उष्ण वातावरण, प्रचंड पाउस आणि थंडीचा सामना जंगलात राहताना करावा लागत होता. या तिघांनी स्वत:साठी जंगलात फांद्यांच्या सहाय्याने राहण्यासाठी कॉटेज बांधलेले होते. या ओनोडोचा एक साथीदार १९५४ साली एका चकमकीत मारला गेला, दुसरा त्याचा साथीदार कोझुका १९७२ साली पोलिसांनी केलेल्या encounter मध्ये ठार झाला. उरला फक्त ओनोडो जो १९४४ चं दुसर महायु*द्ध अजूनही लढत होता जे १९४५ साली संपलं होत.

१९७४ साली ओनोडो जेव्हा फिलिपिन्स नागरिकांविरुद्ध लढत होता तेव्हा त्याची भेट नोरीया सुजुकी नावाच्या विद्यार्थ्याबरोबर झाली जो ते बेट पाहण्यासाठी आलेला होता. सुजुकीने त्याला यु*द्ध अनेक वर्षापूर्वी संपल्याचे सांगितले पण त्यावर ओनोडोने विश्वास ठेवला नाही.

सुझुकी ओनोडोबरोबरचे फोटो घेऊन जपानला परत आला आणि त्याबाबत त्याने लोकल तेथील वर्तमानपत्रात लिहिले. जपान सरकारला त्याच्याबाबत माहिती कळवण्यात आली. हे पाहून जपान सरकारने या ओनोडोचा जुना कमांडर, जनरल तानिगुची, जो आता रिटायर झाला होता त्याला शोधून फिलिपिन्सला ओनोडोला परत आणण्यासाठी पाठवले.

त्याप्रमाणे तानिगुची फिलिपिन्सला पोचला तिथल्या जंगलात त्याची फायनली ओनोडो बरोबर भेट झाली आणि त्याने जपान १९४५ साली यु*द्धात हरला असून आता ओनोडोने हे यु*द्ध बंद करावे आणि देशात परत यावे अशी आज्ञा त्याला दिली.

हे सगळ ऐकून ओनोडो हादरून गेला. जेव्हा तो जपानमध्ये आला तेव्हा संपूर्ण देशाने त्याचा जंगी सत्कार केला पण त्यानंतर आयुष्यभर ओनोडो आपला देश १९४५ साली हरला या दु:खातून बाहेर येऊ शकला नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

युरोपातून आलेला पाव आज आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनलाय

Next Post

भारताची ओळख असलेल्या लंगोटने सुपरमॅनलासुद्धा भुरळ घातलीये

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

भारताची ओळख असलेल्या लंगोटने सुपरमॅनलासुद्धा भुरळ घातलीये

यांच्या नेतृत्वाखाली अनवाणी खेळून भारताने हॉकीत 'गोल्ड' मिळवलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.