The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली लाखोंचा स्कॅम झालाय..!

by Heramb
27 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आजवर जगात लाखो स्कॅम्स झाले आहेत. स्टार्टअप्सच्या नावाखाली पैसा उकळणे, एखाद्या ठिकाणी भरपूर फायदा आहे त्या ठिकाणी न्यायचं म्हणून पैसा उकळणे, इन्वेस्ट्मेन्ट्सच्या नावाखाली केलेले स्कॅम्स, गुंतवणूकदारांची केलेली फसवणूक असे अनेक स्कॅम्स आपण आजवर ऐकले किंवा वाचले असतील. आपण सावध असलो तर कोणताही माणूस आपली फसवणूक करूच शकत नाही. पण आपण आपली माहिती, सरकारी कागदपत्रे आणि धन बेसावधपणे वापरलं तर आपणही अशाच एखाद्या स्कॅममध्ये “व्हिक्टीम” बानू शकतो.

असे स्कॅम्स आपल्यापर्यंत पोहोचवायचा एकमेव हेतू म्हणजे आपल्याला सावध करणे. नुकत्याच घडलेल्या अशाच एका स्कॅमबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. हैद्राबादमध्ये “लिव्हिंग इंटेरियर डिझाईन” या नावाने एक कंपनी स्थापन करण्यात आली. ही कंपनी एक फ्रॉड कंपनी आहे याची पुसटशी कल्पनाही कोणालाच आली नसावी. पण या कंपनीच्या आडून नामवंत आयसीआयसीआय बँक आणि हैद्राबादच्या आजूबाजूच्या काही गावांमधील लोकांची फसवणूक करण्यात आली होती.

हैद्राबादमधील ५ तरुणांनी एकत्र येत “लिव्हिंग इंटेरियर डिझाईन” ही केवळ कागदोपत्री असलेली कंपनी तयार केली. एके दिवशी शहराच्या आसपास असलेल्या लहान-मोठ्या गावांमध्ये या कंपनीच्या नावे हे तरुण गेले आणि बँकमध्ये खाते उघडल्यास त्यांना काही काळाने बँकेकडून कमी व्याजदरात लोन मिळेल असे सांगू लागले. या गावांमधील तब्बल ५३ लोकांनी आयसीआयसीआय बँकमध्ये आपापले खाते उघडण्यास मान्यता दिली आणि त्यांचे अकाउंट्स ओपन झाले.

विशेष म्हणजे हे अकाउंट्स ओपन झाल्यानंतर या तरुणांनी त्या ५३ जणांचे अकाउंट ॲक्सेस आपल्याकडे घेतले आणि त्या सर्व जणांना आपल्या “लिव्हिंग इंटेरिअर डिझाईन” कंपनीचे कर्मचारी म्हणून रजिस्टर केले. पण वास्तविकतः त्या लोकांपैकी कोणीही लिव्हिंग इंटेरियरचे कर्मचारी नव्हतेच. अकाउंटचा क्रेडिट स्कोर आणि सिबिल स्कोर वाढवण्यासाठी या सर्व जणांच्या खात्यावर दर महिन्याला कंपनीच्या खात्यामधून ५० हजार ते १ लाखापर्यंत पगार जमा केला जात असे. पण अकाउंटचा ऍक्सेस त्यांच्यापैकी कोणाकडेच नसल्याने कोणालाही या सर्व व्यवहाराची खबर लागू शकली नाही.

काही महिन्यांनंतर या सर्व ५३ जणांच्या खात्यावरून क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला गेला, जो या तरुणांनीच केला होता. क्रेडिट कार्ड इश्यू करताना बँक सहसा सिबिल स्कोरसह अनेक गोष्टींची खातरजमा करते. त्यामुळेच या ५३ जणांपैकी ३४ जणांचे क्रेडिट कार्ड्स ॲप्रूव्ह झाले आणि लवकरच त्या तरुणांनी या क्रेडिट कार्ड्सचा वापर करून आपले उद्दिष्ट साध्य करून दाखवले.

क्रेडिट कार्ड इश्यू होताच या तरुणांनी सर्व क्रेडिट कार्ड्सची लिमिट एका दिवसांत संपवली आणि ती रक्कम घेऊन ते फरार झाले. या क्रेडिट कार्ड्सद्वारे मिळवलेली रक्कम थोडी-थोडकी नाही तर १ करोड ३३ लाख एवढी प्रचंड होती. या क्रेडिट कार्ड्सचा एकही हफ्ता (ईएमआय) न मिळाल्याने बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या त्या पत्त्यावर जाऊन भेटी दिल्या. ज्याठिकाणी त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या ती ठिकाणे ग्रामीण होती आणि ज्या लोकांच्या नावे एवढे ईएमआय पेंडिंग होते ते अतिशय गरीब होते.



या प्रत्यक्ष भेटीनंतर हा स्कॅम असल्याचे उघड झाले. कोणतीही व्यक्ती तुमच्या संमतीशिवाय तुमची सरकारी कागदपत्रे वापरू शकत नाही. कोणीही कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवत असेल तर त्यांना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, ऍड्रेस प्रूफसारखे महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं हस्तांतरित करू नका, असे केल्यास अशाच प्रकारचा घोटाळा होण्याची शक्यता असते. संपूर्ण सावधगिरी बाळगूनच अशा कागदपत्रांचा वापर व्हायला हवा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

ShareTweet
Previous Post

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

Next Post

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

क्रिकेटच्या वेडापायी त्याने जगातील आजवरचा सर्वांत मोठा क्रिकेट अर्काइव्ह बनवला आहे..!

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.