The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एकदा हर्शेजचं चॉकलेट खाल्लं की त्यानंतर दुसऱ्या कुठल्याच चॉकलेटला चव लागत नाही

by द पोस्टमन टीम
25 September 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


चॉकलेट. लहानथोरांपासून सर्वांच्याच आवडीचा पदार्थ! सेलिब्रेशनच्या सर्व प्रसंगांना चॉकलेटमुळे एक वेगळीच गोडी येते. आपण जे आनंदाचे क्षण साजरे करतो त्या क्षणांचा आनंद चॉकलेटमुळे द्विगुणित होतो. एखाद्या सेलिब्रेशनमध्ये चॉकलेट किंवा चॉकलेट केक किंवा पेस्ट्री नसेल तर का कोण जाणे, पण अनेकांना ते सेलिब्रेशनच अर्धवट वाटू लागतं.

थोडक्यात चॉकलेटला प्रत्येकाच्या जीवनात एक खास हळवा कोपरा म्हणून स्थान आहे. आपल्या प्रिय व्यक्तीसाठी भेट म्हणून चॉकलेट दिले जाते. लहान मुलांना खाऊ म्हणून काही देताना चॉकलेट हाच पहिला चॉइस असतो. भारतात तर चॉकलेट हे प्रत्येक चांगल्या गोष्टीशी किंवा सेलिब्रेशनशी जोडले गेले आहे.

चॉकलेटचा इतिहास जवळपास चार हजार वर्षे जुना आहे. चार हजार वर्षांपूर्वी ज्या झाडाच्या बियांपासून चॉकलेट बनवले जाते त्या झाडाचा अमेरिकेत शोध लागला. सुरुवातीला या झाडाच्या फळांच्या बियांपासून चॉकलेट बनवण्याच्या दृष्टीने अमेरिकेत आणि मेक्सिकोमध्ये प्रयोग केले गेले.

इ.स. १५२८ साली स्पेनच्या राजाने मेक्सिकोवर ताबा मिळवल्यावर पहिल्यांदा कोकोची चव चाखली. त्याला कोको आवडल्याने त्याने कोकोच्या बिया मेक्सिकोमधून स्पेनमध्ये नेल्या. तेव्हापासून स्पेनमध्ये चॉकलेट प्रसिद्ध झाले. 

काही तज्ज्ञांच्या मते सुरुवातीला चॉकलेट विशिष्ट देशांमध्येच परिचित होते. इ. स. १५५० साली युरोपमध्ये त्याचा शोध लागला आणि नंतर ते जिथे जिथे पोहोचले तेथे लोकांचे आवडते बनले.



चॉकलेटचे बरेच प्रकार असले आणि त्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनत असले तरी चॉकलेटचा प्रवास तेवढ्यापुरताच मर्यादित नाही. मुळात चॉकलेट हा केवळ एक पदार्थ नव्हे; तो नाते जोडण्याचे एक साधन आहे. तसेच काही संस्कृतींमध्ये औषध म्हणून, तर काही ठिकाणी चलन म्हणून देखील चॉकलेटचा वापर केलेला आढळतो.

मुख्यतः चौदाव्या शतकात कोकोच्या बियांचा चलन म्हणून वापर होत असे. या कोकोच्या बियांची देवाण-घेवाण करून वस्तूंची खरेदी विक्री व्हायची. कोकोच्या दहा बियांची किंमत एखादा ससा किंवा एखाद्या गणिकेच्या खरेदीएवढे असे. शंभर बिया देऊन गुलामाला विकत घेता यायचे. एवढेच नाही तर माया सभ्यतेचे लोक धार्मिक विधींमध्ये चॉकलेटचा वापर करत.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

कित्येक ठिकाणी प्राण्यांप्रमाणे चॉकलेटचाही बळी दिला जात असे. माया संस्कृतीत कोको गॉड हा चॉकलेटचा देवही अस्तित्वात होता. चर्चनेही चॉकलेटला पवित्र मानत उपवासाच्या काळात चॉकलेट खायला परवानगी दिली होती. अशी या चॉकलेटची महती.

आज आपण चॉकलेट खातो ते तुलनेने बरेच अलीकडचे. सन १८५० पासून आधुनिक चॉकलेटच्या उत्पादनास सुरुवात झाली. जगभरात वेगवेगळ्या कंपन्या चॉकलेट आणि तत्सम उत्पादने तयार करतात, पण त्यात अग्रगण्य आहे ती अमेरिकेतील हर्शेज नावाची कंपनी.

या कंपनीचे संस्थापक मिल्टन हर्शे यांचा जन्म १३ सप्टेंबर १८५७ रोजी एका गरीब कुटुंबात झाला. आज ते हर्शेज चॉकलेटचे जनक आणि चॉकलेटचे स्थान जगात उंचावणारे एक यशस्वी उद्योजक म्हणून गणले जातात. मिल्टन हर्शे अठरा वर्षांचे असताना त्यांनी फिलाडेल्फिया येथे स्वतःचे कॅण्डी तयार करण्याचे दुकान उघडले. मात्र केवळ सहा वर्षातच हे दुकान बंद करावे लागले.

त्यानंतर मिल्टन हे डेन्व्हर, कोलोरॅडो येथे स्थायिक झाले तेथे त्यांनी कॅरेमेल तयार करायला सुरुवात केली. सन १८८६ मध्ये ते पेनसिल्व्हानिया येथे आले आणि स्वतःची लँकेस्टर कॅरेमेल कंपनी सुरू केली.

१८९३ साली मिल्टन हर्शे शिकागो येथे भरलेल्या इंटरनॅशनल एक्सपोजेटमध्ये सहभागी झाले. तेथे त्यांनी जर्मन चॉकलेट तयार करण्याची यंत्रणा विकत घेतली आणि चॉकलेटचा लेप दिलेली कॅरेमेल तयार करायला सुरुवात केली. पुढच्याच वर्षी म्हणजे १८९४ साली त्यांनी हर्शेज या चॉकलेट कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. आता त्यांनी पूर्णवेळ चॉकलेट व तत्सम उत्पादने तयार करायला सुरुवात केली.

आज अमेरिकेत हर्शेज म्हणजे चॉकलेट हे समीकरण झाले आहे, किंबहुना तेथे चॉकलेटचे दुसरे नाव हर्शेज आहे. हर्शेज चॉकलेट कंपनीचा परिसर म्हणजे केवळ एक कारखाना नाही, तर हर्शे यांनी उभे केलेले एक अद्भुत चॉकलेटचे गावच आहे. या गावात कामगारांसाठी अनेकविध सोयीसुविधा आहेत.

हा परिसर स्वच्छ, सुंदर तर आहेच, पण त्याशिवाय तेथे क्रीडांगणे, वाचनालय, उद्यान, प्रदर्शन, मैदाने, ऑर्केस्ट्रा, थिएटर्स अशा विविध सुविधा आहेत. परिसरात फिरण्यासाठी येथे अंतर्गत बससेवाही उपलब्ध आहे. ‘हर्शेज चॉकलेट वर्ल्ड’ हे पर्यटकांसाठी एक आकर्षक ठिकाण आहे.

अमेरिकेतील काही टूर्समध्ये ते पर्यटनस्थळ म्हणून दाखवले जाते. ही फॅक्टरी पाहण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही. प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर एक छोटी गाडी पर्यटकांच्या स्वागतासाठी समोर येते. तिच्या छोट्या फिरत्या डब्यात पर्यटकांना बसण्यासाठी सोय असते. हा सगळा परिसर या गाडीतून सावकाशपणे पाहता येतो. अनेक दालनांमधून पुढे जात चॉकलेट बनवण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया पर्यटकांना दाखवल्या जातात. एक वेगळा अनुभव घेता येतो.

येथे सर्व कामे यंत्राच्या मदतीने होतात, त्यामुळे मानवी हस्तक्षेप नसतो. कोकोच्या बियांपासून चॉकलेट बनवताना आधी जगातील विविध ठिकाणांहून दर्जेदार कोकोच्या बिया मागवल्या जातात. नंतर त्या बिया साफ करून, फोडून, त्यांची पूड करून, गरम करून, सुकवून, त्यामध्ये साखर दूध आणि अन्य घटक योग्य प्रमाणात मिसळले जातात. ही पेस्ट सुकवण्यासाठी पसरून ठेवली जाते. नंतर त्याच्या वड्या पाडून त्याचे पॅकिंग करतात.

गाडीतून साधारण वीस मिनिटांची सफर झाल्यानंतर पर्यटकांना विनामूल्य चॉकलेटची चव चाखता येते आणि तीही हवी तितकी! त्याशिवाय त्यांनी येथे सर्व सुविधांनी युक्त असा अनाथाश्रम उभारला आहे. मात्र या सगळ्यामागची प्रेरणा आहे ती चॉकलेटसम्राट मिल्टन हर्शे यांच्या व्हिजनची.

प्रत्येकाला आयुष्यात चॉकलेटची चव चाखता यावी; ते केवळ श्रीमंतांपुरते मर्यादित असू नये या भावनेतून. अतिशय स्वस्त दरात घराघरात चॉकलेट कसे पोहोचवता येईल याचा अभ्यास करून या चॉकलेटसम्राटाने एक प्रचंड मोठे साम्राज्य उभे केले. आज येथे रोज ८ करोड चॉकलेट्सची निर्मिती केली जाते. मात्र कितीही मोठा व्यवसाय उभा केला तरीही व्यवसायिकतेपेक्षा भावनांना प्राधान्य देणाऱ्या व्यक्ती विरळाच! त्यामुळेच व्यवसायाच्या बरोबरीने समाजोपयोगी कार्य करणाऱ्या या अवलियाचा जीवनपट प्रेरणादायी ठरतो.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

ब्लॉग- हैद्राबाद मुक्तीलढ्यातील रणझुंजार नेते – पंडित नरेंद्र

Next Post

जॉन हावर्डच्या पुतळ्याच्या डाव्या पायावर बोट घासून आशिर्वाद घेतल्यानं ‘गुडलक’ मिळतं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

जॉन हावर्डच्या पुतळ्याच्या डाव्या पायावर बोट घासून आशिर्वाद घेतल्यानं 'गुडलक' मिळतं

काश्मीरच्या मीरपूरमध्ये पाकिस्तानने ३५ हजार हिंदू आणि शिखांची निर्दयपणे क*त्तल केली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.