The Postman
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result

गोरे विद्यार्थी माझ्याकडे जनावर असल्यासारखं पहायचे – पहिल्या अश्वेत विद्यार्थ्याची कहाणी

by द पोस्टमन टीम
7 June 2021
in इतिहास
Reading Time: 1 min read
A A
1

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


इतिहासात घडणाऱ्या पहिल्या गोष्टी येणाऱ्या अनेक सकारात्मक बदलांची नांदी असतात. भारतीय इतिहासाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य असणाऱ्या अशा कित्येक घटना आहेत. अशीच एक घटना जिने अमेरिकन कृष्णवर्णीय लोकांसाठी प्रेरणेचे काम केले ती म्हणजे ‘ओक्लाहोमा’ विद्यापीठातुन पहिला कृष्णवर्णीय विद्यार्थी बनलेला जॉर्ज मॅक्लॉरिन याची.

उच्च शिक्षण घेण्याची तीव्र इच्छाशक्ती असणारा जॉर्ज हा ओक्लाहोमा विद्यापीठात प्रवेश मिळवणारा पहिला आफ्रिकन-अमेरिकन कृष्णवर्णीय ठरला. सुरुवातीला त्याला विद्यापीठात प्रवेश नाकारला गेला. कृष्णवर्णीय लोकांना त्यावेळी दिल्या जात असलेल्या वागणुकीमुळे त्यावेळी प्रवेश देता येणार नाही असे त्याला सांगितले गेले.

१९४८ मध्ये रंगलेल्या सुप्रीम कोर्टातील जॉर्ज विरुध्द ओक्लाहोमा विद्यापीठ या खटल्यातील निकालानंतर त्याला प्रवेश देण्यात आला.

या खटल्यामुळे बाकी आफ्रिकन-अमेरिकन विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणासाठी प्रवेश दिला जाऊ लागला. हा प्रवेश देताना श्वेतवर्णीय विद्यार्थी आणि कृष्णवर्णीय विद्यार्थी यांना वेगवेगळी वागणुक दिली जाईल या अटीवरच दिला जात असे. म्हणजेच श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांना असणाऱ्या सगळ्या सुविधा कृष्णवर्णीय विद्यार्थी वापरु शकत नव्हते.

जॉर्जचे वर्ग ज्या खोलीत भरवले जात त्या खोलीत जॉर्जला बाकी विद्यार्थ्यांपासून दुर बसावे लागत असे. तसेच जेवणाची सोयही वेगळी होती. शौचालये तसेच खेळाची मैदाने यामध्ये सुध्दा जॉर्जसाठी वेगवेगळ्या सुविधा होत्या. श्वेतवर्णीय विद्यार्थ्यांनी बघु नये म्हणून त्याला वाचनालयात वर्तमानपत्र विभागाच्या पलीकडे ठेवण्यात आलेल्या खुर्चीवर बसवले जात असे. ओक्लाहोमा शहरातील न्यायालयाने या भेदभावाचा खटला फेटाळून लावला.

या भेदभावाच्या वागणुकी विरोधात जॉर्जने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. अमेरिकन सुप्रीम कोर्टाने एप्रिल, जून १९५० मध्ये ओक्लाहोमा न्यायालयाचा निर्णय फेटाळून लावला आणि हा भेदभावाविरोधाचा खटला उचलून धरला. मुख्य न्यायाधीश फ्रेड विंसन यांनी न्यायालयाचा निर्णय सांगताना म्हटले,

“जॉर्जला दिली गेलेली वेगळी वागणुक ही अमेरिकन संविधानातील १४व्या घटनादुरुस्तीचा भंग तर करतेच, परंतु या निर्बंधांमुळे त्याचा अभ्यास, विचारविनिमय करण्याची त्याची प्रवृत्ती या बाबींवरही निर्बंध लादले जातात.”

हे देखील वाचा

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

ADVERTISEMENT

या खटल्याचा निर्णय देताना अशी वेगळी वागणुक यापुढे खपवली जाणार नाही अशी सक्त ताकीद सर्वोच्च न्यायालयाने दिली.

या खटल्याच्या वेळी जॉर्जला थरगुड मार्शल, अमोस टी. हौल, रॉस्को डनजी आणि इतर ५ मित्रांची मदत झाली. बाकी कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांनाही वेगळे वर्ग, वाचनालये, जेवणाची सोय आणि शौचालये अशी भेदभावाची वागणुक सहन करावी लागलीच होती.

या खटल्यानंतरही जॉर्जचे नाव ओक्लाहोमा विद्यापीठातील ३ सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांमध्ये समाविष्ट आहे.

जॉर्ज आपला अनुभव सांगताना म्हणतात की, “काही विद्यार्थी माझ्याकडे प्राणी असल्यासारखं बघत असत. कोणी एक शब्दही माझ्याशी बोलत नसत. शिक्षक तर माझ्यासाठी असुनही नसल्यासारखेच होते. माझ्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली नाहीत. मी घेतलेल्या कष्टानंतर मात्र ते मला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे विचारण्यासाठी शोधत असत.”

१६ सप्टेंबर, १८९४ ला जन्म झालेल्या जॉर्जने पदवीत्तर शिक्षण कँसास विद्यापीठातुन मिळवले आणि प्राध्यापक म्हणुन सेवानिवृत्त झाल्यावर ओक्लाहोमा शहरात स्थायिक झाले. मुख्यतः कृष्णवर्णीय विद्यार्थी असलेल्या लँगस्टन विद्यापीठातही त्यांनी काही काळ शिकवण्याचे काम केले. ४ सप्टेंबर, १९६८ ला त्यांचा मृत्यू झाला. ‘जॉर्ज मॅक्लॉरीन मेल लीडरशिप’ या समितीचे नाव त्यांच्याच नावावरुन ठेवण्यात आले.

शिक्षण नावाचे दूध पिल्यावर कोणत्याही जातीचा, धर्माचा आणि रंगाचा माणुस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. जॉर्जच्या या लढ्याचे फलित म्हणूनच अमेरिकेने त्यांचा पहिला कृष्णवर्णीय राष्ट्रपतीसुध्दा निवडून दिला. सुरुवात छोटी असली तरी त्याची परिणीती खुप मोठ्या बदलात होते याचंच हे एक उदाहरण.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweetShare
Previous Post

आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कुठल्या मेड इन चायना गोष्टी वापरतो?

Next Post

कसा आहे अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा ‘गुलाबो सिताबो’..?

द पोस्टमन टीम

द पोस्टमन टीम

Related Posts

इतिहास

या दोन देशांमधील युद्ध तब्बल सहाशे वर्षांहून अधिक काळ चालू होतं!

4 June 2022
इतिहास

या नकाशाने अब्राहम लिंकन यांना गुलामगिरी संपवण्यास भाग पाडले!

2 June 2022
ब्लॉग

नेहरू नाही तर या राजकुमारीमुळे भारतात एम्सची स्थापना होऊ शकली!

20 April 2022
इतिहास

ही आहे जगातील पहिली संघटित दहशतवादी चळवळ!

20 April 2022
इतिहास

त्याच्या संशोधनाने कोट्यवधी लोकांना अन्न दिले आणि लाखोंना वेदनादायक मृत्यूही!

18 April 2022
इतिहास

एका लहानशा दगडामुळं ग्रीक संस्कृतीच्या इतिहासाच्या अस्तित्त्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय!

15 April 2022
Next Post

कसा आहे अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा 'गुलाबो सिताबो'..?

अझरबैजान या मुस्लीम राष्ट्रातील एका मंदिरात संस्कृत शिलालेख कसे काय आहेत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2022 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)