The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग १

by द पोस्टमन टीम
9 June 2020
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 

===

लेखक: आदित्य कोरडे 

===

चार्ली कोणाला माहित नसेल?तो कुणाला माहिती नाही असे होणे शक्यच नाही आणि आवडत नाही असे तर अजिबातच शक्य
नाही.



माझ्या ९ वर्षाच्या मुलीला अन तिच्या कंपूला देखील तो माहिती आहे, नव्हे तो त्यांचा आवडता आहे आणि त्याचे बरेच
चित्रपट तिने मला विकत घ्यायला लावलेत. शिवाय हल्ली सुरु झालेली कार्टून वरची सिरीयल आहेच – ती मात्र रटाळ आहे.

 

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

असो… नुकतीच एक बी बी सी ने बनवलेली चार्ली चॅप्लिन वरची चांगली दीड तासाची डॉक्युमेंटरी डाऊन लोड करून पहिली आणि थोडा धक्काच बसला. त्या डॉक्युमेंटरी प्रमाणे चार्ली हा हॉलीवूडचा पहिला आंतरराष्ट्रीय ख्याती पावलेला इसम.

त्याच्या काळात चार्ली चॅप्लिन हा जगातला सर्वात लोकप्रिय इसम होता. इतका की लेनिनने असं एकदा म्हटले होते म्हणे की हा (चॅप्लिन) असा एकच माणूस आहे की मला त्याला जाऊन भेटायची इच्छा आहे.

चॅप्लिनचा करिष्मा इतकी की चर्चिल आपल्या चार्त्वेल इथल्या राजघरात त्यांला राहायला बोलावत असे. बर्नार्ड शॉ, केन्स, एच जी वेल्स.. असे अनेक नामवंत लोक चार्लीचे चाहते होते.

याचा चॅप्लिन यालाही अभिमान होता. अगदी गर्व वाटावा इतका होता. त्याचमुळे तो एकदा म्हणाला होता जगात ज्या प्रदेशात लोकांना येशू ख्रिस्तही माहीत नाही, त्या प्रदेशातल्या लोकांना ही मी ठाऊक आहे.(आणि ही वस्तुस्थिती होती.)

 

तर ही डॉक्युमेंटरी पाहून मला जाणवले कि कलाकार, त्याची कला, कर्तृत्व, दानत, त्याची जनमानसातली प्रतिमा त्याचे सामाजिक व्यक्तिमत्व आणि त्यामागचा माणूस, इत्यादींच आणि त्याचं व्यक्तिगत आयुष्य ह्यांचा आपण जर अन्योन्य संबंध
शोधू गेलो तर दारुण अपेक्षाभंग होऊ शकतो.

चार्लीसारख्या कलाकाराच्या बाबतीत तर या अपेक्षाभंगाच्या वेदना अधिक तीव्र असू शकतात.

मोठ मोठ्या साहित्यिकांचे जसे मानसपुत्र असतात किंवा असत आणि ते इतके प्रसिद्ध असत कि त्या साहित्यिकांचे नाव घेतले
कि ते मानस्पुत्रच समोर येतात.

उदा. भा. रा. भागवत आणि फास्टर फेणे , ना. धो. ताम्हणकर आणि गोट्या किंवा आर्थर कॉनन डायल आणि शेरलॉक, तसाच चार्ली आणि त्याचा जगप्रसिद्ध लिटल ट्रॅम्प.

चार्ली म्हटले कि हा काहीसा भोळा वेंधळा, गरीब, धडपड्या पण प्रामाणिक आणि सत्प्रवृत्त लिटल ट्रॅम्प डोळ्यासमोर येतो. मुळातला चार्ली कितीही वेगळा असला. ( आणि होताच )

तरी त्याची ही प्रतिमा आपल्या डोळ्यासमोरून जात नाही इतकी त्या प्रतिमेची पकड आज जवळपास १०० वर्षांनंतरही आपल्यावर कायम आहे.

सिनेजगतात इतके प्रभावी आणि इतके दीर्घकाळ आपली मोहिनी टिकवून असणारे प्रतिमा सृजन ह्या आधी किंवा नंतर झालेले नाही. ह्या लिटल ट्रॅम्पची भुरळ भल्या भल्या चित्ररथीना, साहित्यिकांना, कलावंताना पडलेली आहे.

 

आपल्याकडे राज कपूर पासून, शम्मी कपूर, अमिताभ बच्चन, श्रीदेवी ते अगदी आपल्या पु ल देशपान्डेन्पर्यंत अनेकांनी
आपापल्या परीने हा लिटल ट्रॅम्प साकारलाय. (आणि यश ही मिळवलय)

पण चार्ली वैयक्तिक आयुष्यात इतका साधा भोळा गरीब ( स्वभावाने देखील) विनोदी वगैरे नव्हता. नव्हे त्याचे आयुष्य आणि व्यक्तिमत्व विरोधाभासांनी भरलेलं होतं.

तो क्वचितच हसायचा. त्याच्या चेहऱ्यावर सहजासहजी स्मित आलंय असं कधी व्हायचं नाही. तो संशयी होता. रागीट होता
एकलकोंडा होता, बाईलवेडा होता.पडद्यावर साधाभोळा सज्जन सहृदय वाटणारा चार्ली प्रत्यक्ष स्वत;च्या पोटच्या मुलांशी क्रूर
पणे वागायचा,तो धनाढ्य होता आणि विलासी आयुष्य जगत होता.

हा सगळा पैसा त्याने भांडवलशाही अमेरिकेत कमावला पण तो कम्युनिझमचा समर्थक आणि स्टालिनचा चाहता होता.त्याच्या ह्या कम्युनिस्ट प्रेमाने त्याने FBI च्या चौकशीचा ससेमिरा मागे लाऊन घेतला ज्याचे फलस्वरूप त्याला अमेरिका कायमची सोडावी लागली.

 

त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध आले आणि त्यातल्या बहुतेक त्याच्यापेक्षा वयाने खूप म्हणजे खूपच लहान होत्या.त्याची चौथी आणि शेवटची पत्नी उना ओ नील ( ख्यातनाम अमेरिकन नाटककार युजीन ओ नील ची मुलगी ) ही त्याच्या पेक्षा ३६ वर्षानी लहान होती.

त्या दोघांनी लग्न केले तेव्हा चार्ली ५४ वर्षांचा होता तर उना फक्त १८ वर्षांची. लग्नानंतर त्यांना एक नाही दोन नाहीतर चक्क ८ मुलं झाली.

शेवटचे मुल झाले तेव्हा चार्ली ७३ वर्षांचा होता. पण त्याच वेळी तो एक जीनियस कलाकार होता. त्याने त्याकाळी जी प्रसिद्धी प्रेम आणि यश मिळवलं टिकवल आणि वाढवलं तसं मिळवणं आजही कुणाला जमलेलं नाही.

क्रमश:

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: Charlie ChaplinComedianLife Story
ShareTweet
Previous Post

अनादी काळापासून फेक न्यूजमुळे निष्पाप नागरिकांचा बळी जातोय

Next Post

या दोन भावांच्या प्रयत्नातून पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
Next Post

या दोन भावांच्या प्रयत्नातून पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता

charlie chaplin 6 postman

जगाला हसवणारा चार्ली चॅप्लिन कोण होता ? : भाग २

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.