The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

हा माणूस इस्लामिक स्टेटच्या तावडीतून ५० हजारापेक्षा जास्त हस्तलिखितांचं रक्षण करतोय

by द पोस्टमन टीम
11 August 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब 


इस्लामिक स्टेटनं मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील मशिदी, मंदिरं, चर्च, ग्रंथालयं आणि ऐतिहासिक स्मारकांची तोडफोड करून ती पाडली. मात्र, असे काही ‘नायक’ होते जे त्यांच्याविरोधात उभे राहिले. त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सांस्कृतीक आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचा प्रयत्न केला. ग्रंथपाल अब्देल कादर हैदरा, या नायकांपैकी एक आहेत. मालीवर जिहाद्यांनी कब्जा केल्यानंतर टिंबकटूचा सांस्कृतिक खजिना वाचवण्यासाठी हैदरा यांनी जीवाचं रान केलं.

अब्देल कादर हैदरा ‘सवामा-डीसीआय’ (Sauvegarde des Manuscrits et la Defence de la culture Islamique) नावाची एक स्वयंसेवी संस्था चालवतात. अब्देल कादर हैदारा यांचे वडील, मोहम्मद हैदारा, फ्रेंच राजवटीच्या सुरुवातीच्या काळात १८९७ साली नायजरच्या बांबा शहरात जन्माला आले होते. ते अतिशय विद्वान होते. त्यांनी मोठ्या प्रमाणात दुर्मिळ हस्तलिखितं गोळा केली होती. मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर तो वारसा अब्देल कादर हैदरा यांच्याकडे आला. तेव्हा ते १७ वर्षांचे होते. त्यातूनचं पुढे त्यांना साहित्याची आवड निर्माण झाली.

प्राचीन दस्तऐवजांना कीड लागण्यापासून आणि काळाच्या नाशापासून वाचवण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

२०१२ पर्यंत हैदरा यांनी लाखो हस्तलिखितांचे कॅटलॉग तयार केले होते. २०१२ पासून मात्र, हस्तलिखितांचा धोका वाढला होता. पश्चिम आफ्रिकेतील ‘एकता’ आणि ‘जिहाद’ या चळवळीतील इस्लामी बंडखोरांनी (मुजाओ) टिंबकटूवर कब्जा केला. त्यांनी संपूर्ण शहरात द*हश*त पसरवली होती. बंडखोरांनी शहरातील इमारती नष्ट करण्यास सुरुवात करताच, हस्तलिखितांना मोठा धोका असल्याचं हैदरा यांच्या लक्षात आलं.

टिंबकटूमध्ये प्रत्येक घरामध्ये हस्तलिखिते सापडतात. त्या घरातील व्यक्ती त्यांचं जतन करण्याचं काम करतात. हैदरा यांनी हस्तलिखितांचा ताबा असलेल्या कुटुंबांशी तत्काळ संपर्क साधला. आंतरराष्ट्रीय मित्रांच्या मदतीनं हस्तलिखितं सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यास सुरुवात केली. मालीतील जर्मन दूतावासानं टिंबकटूमधील हस्तलिखितं बामाकोमध्ये सुरक्षित ठिकाणी हस्तांतरित करण्याची व्यवस्था केली. हा अतिशय धोकादायक उपक्रम होता. कारण जर बंडखोरांना याची माहिती मिळाली असती तर त्यांनी नक्कीच हैदरा यांचा जीव घेतला असता.



‘आपल्या पूर्वजांच्या या साहित्याचं संरक्षण करण आपली जबाबदारी असल्याचं हैदर यांचं म्हणणं आहे. हजारो किलोमीटरवर या हस्तलिखितांची वाहतूक करावी लागली. आम्ही रात्रीच्या वेळी हस्तलिखितं जमा केली. त्यांना साध्या लोखंडी पेट्यांमध्ये लपवलं आणि त्यावर पारंपारिक व्यावसायिक वस्तू ठेवल्या. त्यानंतर त्यापेट्या उंटांवर टाकून त्यांना सुरक्षितस्थळी पोहचवण्याची व्यवस्था केली’, अशी माहिती सवामा-डीसीआयचे सह-संस्थापक सान चिरफी अल्फा यांनी दिली.

आफ्रिका खंडातील राष्ट्रांना लिखित संस्कृतीचा वारसा आहे. ‘टिंबकटू हस्तलिखिते’ ही ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व असलेल्या हस्तलिखितांची एक मोठी मालिका आहे. शतकानुशतकं मालीच्या टिंबकटूमधील लोकांनी आपल्या घरांमध्ये त्यांचं जतन केलं आहे. हस्तलिखितांच्या संग्रहांमध्ये कला, औषधं, तत्त्वज्ञान आणि विज्ञान, तसेच कुराणाच्या प्रतींचा समावेश आहे.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या हस्तलिखितांची संख्या तब्बल सात लाख इतकी आहे. ही हस्तलिखितं सोनघाय आणि तमाशेक या स्थानिक भाषा आणि अरबीमध्ये लिहिलेली आहेत. साधारण १३व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंतच्या काळातील हे साहित्य आहे. हैदारा यांनी वाचवलेल्या हस्तलिखितांमध्ये अकराव्या शतकातील दस्तावेजांचा समावेश आहे. त्यावेळी टिंबकटू एक संपन्न व्यापारी ठिकाण होतं. त्यामुळं त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक देवाणघेवाण होत असे. हस्तलिखितांमध्ये अरब आणि मुस्लिम बुद्धिजीवींचं लिखाण आहे. त्यांच्या प्रवचनांच्या लिखित नोंदी आहेत.

ही जुनी हस्तलिखितं अगदी युरोपियन वसाहतवाल्यांपासून देखील लपवून ठेवण्यात आली होती. जेव्हा माली स्वतंत्र झाला तेव्हा ही ऐतिहासिक कागदपत्रं पुन्हा जगासमोर आणली गेली. १९८८ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. ‘जेव्हा ही हस्तलिखिते समोर आली तेव्हा अनेक लोक आश्चर्यचकित झाले. कारण, आफ्रिकन इतिहासाच्या नोंदी नसल्याचं त्यांना शाळेपासून सांगितलं गेलं होतं. मात्र, तसं नाही. आमच्याकडे अरबी आणि आफ्रिकन भाषांमधील हे लाखो दस्तऐवज उपलब्ध आहेत,’ असं हैदरा सांगतात.

इस्लामिक बंडखोरांपासून वाचवण्यात आलेली ही हस्तलिखितं सध्या मालीची राजधानी बामाकोमध्ये ठेवलेली आहेत. मात्र, जिथे देखील नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. मालियन राजधानी बामाकोमध्ये उच्च पातळीची आर्द्रता आहे. त्याचा या हस्तलिखितांवर परिणाम होत आहे.

आर्द्रतेमुळं मेटल बॉक्समध्ये ठेवलेली ही कागदपत्रे कालांतरानं खराब होण्याची दाट शक्यता आहे. कागदपत्रे व्यवस्थित जतन करण्यासाठी बामाकोमध्ये एका अद्ययावत ग्रंथालयाची आवश्यकता आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार त्यासाठी ८० लाख युरो खर्च होईल. त्यामुळं आता हैदरा आणि मालीला विदेशी मदतीची आवश्यकता आहे. 

मालीचे सांस्कृतीक मंत्री, एन डिया डीयालो यांनी दिलेल्या माहितीनुसार, याकामासाठी ६० लाख युरो कमी पडत आहेत. युनेस्को, युरोपीयन देश, दुबई आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प शक्य होणार नाही.

हैदरा यांनी १८ महिन्यांच्या कालावधीत इस्लामवाद्यांच्या अवकृपेपासून जवळपास ५० हजार हस्तलिखितांचं रक्षण केलं. त्यांच्या या कामासाठी ‘जर्मन आफ्रिका फाउंडेशन’नं त्यांना २०१४च्या ‘जर्मन आफ्रिका पुरस्कारा’नं सन्मानित केलं आहे. हा सन्मान मिळाल्यानंतर हैदरा यांनी अतिशय नम्र प्रतिक्रिया दिली. ‘हा एक मोठा सन्मान आहे. माझ्याबरोबर काम केलेल्या प्रत्येक व्यक्तीचा या सन्मानामध्ये वाटा आहे. यामुळं आमच्या देशाची मान अभिमानानं उंचावली आहे. त्यामुळं मला आनंद वाटतो,’ असं हैदरा म्हणतात.

प्राचीन काळापासून जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी आक्रमकांमुळं ऐतिहासिक साहित्याचा नाश झाला आहे. अब्देल कादर हैदरा यांनी आपला जीव धोक्यात घालून टिंबकटूमधील हस्तलिखितं वाचवली नसती तर त्यांचा देखील नाश झाला असता आणि मालीचा इतिहास ‘इतिहासजमा’ झाला असता. हैदरा यांच्यासारखी निष्ठा प्रत्येकानं दाखवली तर नक्कीच समृद्ध साहित्यसाठा तयार होईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हा कुत्रा बालवाडीतील लहान मुलांना रोज रस्ता ओलांडायला मदत करतोय..!

Next Post

धुळ्याच्या या डॉक्टरने पेशंटच्या किडनीतून १ लाख ७२ हजार १५५ खडे काढून वर्ल्ड रेकॉर्ड बनवलंय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

धुळ्याच्या या डॉक्टरने पेशंटच्या किडनीतून १ लाख ७२ हजार १५५ खडे काढून वर्ल्ड रेकॉर्ड बनवलंय

वसिम अक्रमने विव रिचर्ड्सचे पाय धरून माफी मागितली आणि सांगितलं इथून पुढे असं होणार नाही.

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.