The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..आणि डॉक्टर आघारकरांमुळे होमी भाभांचं शिक्षण पूर्ण झालं!

by द पोस्टमन टीम
31 August 2024
in विज्ञान तंत्रज्ञान, इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


प्राध्यापक शंकर पुरुषोत्तम आघारकर हे नाव फार कमी लोकांना माहिती असेल, पण आज भारताचा जो आ*ण्विक कार्यक्रम आपण बघतो आहोत, जो भारताला एक बलशाली राष्ट्र म्हणून जगात एक स्थान प्रदान करतोय, त्याची निर्मिती या माणसांमुळे शक्य झाली आहे.

होमी भाभा यांनी जरी त्या आ*ण्विक कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली होती, तरी यातील आघारकरांचे योगदान  खूप मोठे होते.

आघारकरांच्याच प्रयत्नामुळे होमी भाभा नावाच्या एका तरुण संशोधकाला ब्रिटिश राजघराण्याकडून १८५१ मध्ये रिसर्च फेलोशिप प्रदान करण्यात आली होती.

भारताच्या अनेक उद्योगपतींच्या पैशावर सुरू करण्यात आलेली ही शिष्यवृत्ती त्याकाळी फक्त निवडक लोकांना दिली जात होती, त्यात महत्वपूर्ण बाब म्हणजे एकाही भारतीय विद्यार्थ्याला ही शिष्यवृत्ती मिळाली नव्हती.



आघारकरांनी प्रयत्न करून भारतीय मुलांना ही शिष्यवृत्ती मिळावी यासाठी एक विधेयक पारित करून घेतले. या विधेयकाचा परिणाम म्हणून होमी भाभा नावाच्या तरुणाला ब्रिटनच्या सुप्रसिद्ध केंम्ब्रिज विद्यापीठात शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता.

केंम्ब्रिजमध्ये वॉल्टर हैटलर नावाच्या मुलाशी भाभा यांची मैत्री झाली आणि त्या विद्यार्थ्यांसोबत काम करून ‘भाभा हैटलर कास्केड’ थेअरी जन्माला आली.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

ऊर्जेसंदर्भात खासकरून आण्विक उर्जेसंदर्भात त्यांनी विज्ञान नियतकालिकेत मोठे संशोधनपर निबंध लिहले. आण्विक ऊर्जा क्षेत्रातील अनेक गूढ रहस्यांचा उलगडा करण्यात भाभा यांना यश आले. यात आघारकरांचे महत्वपूर्ण योगदान होते.

फक्त भारतातील गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी मदत करणे इथपर्यंतच ते थांबले नाहीत. त्यांनी भारतातील काही प्रमुख विज्ञान संस्था जसे नॅशनल सायन्स अकॅडमी, नॅशनल सायन्स काँग्रेस आणि महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टीव्हेशन सायन्स यांची स्थापना पुणे शहरात केली. आज या संस्था एकत्रितपणे ‘आघारकर इन्स्टिट्यूट’ म्हणून ओळखल्या जातात.

१८८४ साली कोकणातील मालवणमध्ये आघारकरांचा जन्म झाला. त्यांचे वडील ब्रिटिश सरकारमध्ये नोकरीला होते. त्यांच्या सतत बदल्या होत, त्यामुळे आघारकरांचे बालपण वेगवेगळ्या ठिकाणी व्यतित झाले. त्यांनी अनेक भाषांत शिक्षण घेतले. मेहनत आणि जिद्दीने ज्या शाळेत शिक्षक नसायचे अशा ठिकाणी जाऊन विज्ञानाचे धडे गिरवले. कधी कधी शिक्षक नसतील तर आघारकर स्वतः विद्यार्थ्यांना शिकवायचे!

आपलं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या एलिफिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याठिकाणी ते वनस्पतीशास्त्र आणि प्राणीशास्त्राचा सामायिक अभ्यास करू लागले. १९०९ साली त्यांनी आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पुढे त्याच संस्थेत जीवशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून आघारकर रुजू झाले. याच काळात त्यांच्यातील संशोधकवृत्ती वाढू लागली.

आपल्या शैक्षणिक कामाकाजासाठी ते बऱ्याचदा पश्चिम घाटाच्या सफरीवर जात, त्या ठिकाणी असलेल्या विविध वनस्पतींचे आणि जीवांचे निरीक्षण करत. अशाच एका कामावर गेले असतांना त्यांना गोड्या पाण्यातील जेली फिश प्रजाती निदर्शनास आली. ही प्रजाती फक्त आफ्रिकेत आढळते असा सर्वांचा त्या अगोदर समज होता. त्यांनी या प्रजातीचा आभ्यास करून एक लेख ‘नेचर’ नावाच्या विज्ञान नियतकालिकेत लिहिला. पुढे आपल्या संशोधनाने प्रेरित होऊन डॉ. अण्णाडले नावाच्या सहकार्याला सोबत घेऊन ते विविध प्रजातींचा अभ्यास व संशोधन करू लागले.

त्यांनी अनेक प्रजातींचा शोध लावला, अनेक फुलांच्या आणि प्राण्यांच्या प्रजातीला त्यांचे नाव देण्यात आले.

भारतातील दोन पुष्प वृक्ष आणि एक सहस्त्रपादाची प्रजाती, यांना आघारकरांचे नाव देण्यात आले आहे. एका वेलीच्या प्रजातीला देखील आघारकरांचे नाव देण्यात आले होते.

त्यांनी नेपाळ आणि पश्चिम घाटातील फुलांवर मोठे संशोधन केले. पुढील संशोधनासाठी ते जर्मनीला गेले आणि अचानक पहिले महायुद्ध सुरू झाले. महायुद्ध काळात त्यांना जर्मनीत तीन वर्षांचा कारावास भोगावा लागला.

१९१९ साली बर्लिन विद्यापीठातून त्यांना पीएचडीने सन्मानित करण्यात आले.

त्यांनी शिक्षण घेत असताना अनेक ब्रिटिश आणि युरोपियन उद्यानांंना भेट दिली. अनेक पर्वत शिखरांवर गिर्यारोहण केले, अनेक दुर्मिळ प्रजातींचे संकलन करून त्यांचे संकलन १९२० साली कलकत्ता विद्यापीठासमोर प्रस्तुत केले. त्यांच्या अद्वितीय संशोधनासाठी त्यांना कलकत्ता विद्यापीठात प्रोफेसर सी. व्ही. रमण यांच्या  शिफारशीवरून प्राध्यापकाची नोकरी मिळाली.

आघारकरांच्या काळात कलकत्ता विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचा मोठा विकास झाला. तिथे होणाऱ्या वनस्पतींवरील संशोधनाने जागतिक मापदंड प्रस्थापित केला.

भारतातील संशोधकांच्या चळवळीत त्यांचा मोठा सहभाग होता. भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक दशकं काम केलं. त्यांच्या प्रयत्नामुळे ब्रिटिश राजघराण्याच्या प्रसिद्ध १८५१ संशोधन शिष्यवृत्तीसाठी भारतीय विद्यार्थ्यांची निवड ग्राह्य धरली जाऊ लागली.

१९३१ सालापर्यंत ही शिष्यवृत्ती फक्त ब्रिटिश विद्यार्थ्यांना प्रदान केली जात होती. आघारकरांनी प्रयत्न करून भारतीय विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती मिळण्याचा मार्ग सुकर केला.

भारतीय आण्विक कार्यक्रमाचे जनक होमी भाभा हे त्याच शिष्यवृत्तीला प्राप्त करणारे पहिले भारतीय होते.

आघारकरांनी इंग्रज सरकारला कोलकाता येथील शिबिपुर येथील राष्ट्रीय वनस्पती संकलन केंद्रातील वनस्पतींच्या प्रजातींना इंग्लंडच्या रॉयल बोटॅनिकल गार्डनमध्ये घेऊन जाण्यापासून रोखले होते.

आज त्यांनी त्या प्रजाती भारतात ठेवल्या म्हणून बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया यासारख्या संस्थेकडे भारतीय वनस्पती प्रजातींचे संकलन करणे शक्य झाले आहे.

१९४६ साली आघारकरांनी कलकत्ता विद्यापीठातील पदाचा राजीनामा दिला. त्यांनी मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्यास सुरुवात केली. त्याच वेळी पुण्याच्या इंडियन लॉ सोसायटीने आघारकरांची भेट घेऊन पुण्यात एका वनस्पती संशोधन संस्थेची स्थापना करण्याची मागणी केली.

आज हीच संस्था आघारकर इन्स्टिट्यूट म्हणून प्रसिद्ध आहे. १९६६ सालापर्यंत पुण्याचा प्रसिद्ध विधी महाविद्यालयाच्या तळघरात आघारकरांनी महाराष्ट्र असोसिएशन फॉर कल्टीव्हेशनचे काम केले. पुढे पाच एकर जमीन आघारकरांना आपल्या संस्थेच्या उभारणीसाठी मिळाली. त्या जमिनीचा सदुपयोग केला गेला आणि आज आघारकर इन्स्टिट्यूट त्याच भूमीवर उभं आहे.

आधी आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आणि प्राध्यापकांंना पगार देण्यासाठी आपले वैयक्तिक खर्च आघारकरांनी बाजूला ठेवले, फंडिंगचा कुठलाही स्रोत नसल्यामुळे स्वतःच्या खिशातून पैसे दिले आणि आघारकर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधन चालू ठेवले.

१९५६ साली त्यांना कॅन्सरचे निदान झाले, त्यांची प्रकृती खालावली. पुढे चार वर्षांनी २ सप्टेंबर १९६० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल ३२ वर्षांनी त्यांच्या संस्थेचे नामकरण आघारकर इन्स्टिट्यूट म्हणून करण्यात आले. हे नामकरण सीएनआर राव या प्रसिध्द संशोधकाने केले.

आज आघारकर इन्स्टिट्यूटमध्ये ६० संशोधन प्रकल्प सुरू असून अनेक प्रकल्पांंना परदेशी संस्थांनी अर्थसहाय्य प्रदान केलं आहे, ते अनेकांत परदेशी संस्था भागीदार झाल्या आहेत. जैविकशास्त्र, जैव-तंत्रज्ञान, नॅनो टेक्नॉलॉजी हे विषय या संस्थेत प्रामुख्याने अभ्यासले जात असून या सर्व यशाचे श्रेय शंकर पुरुषोत्तम आघारकर या ध्येयवेड्या संशोधकाचे आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

अमेरिकेत लोकांनी मास्क विरोधी चळवळ उभी केली होती

Next Post

कशी आहे सगळीकडे चर्चेत असलेली ‘पाताल लोक’ वेबसिरीज..?

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

कशी आहे सगळीकडे चर्चेत असलेली 'पाताल लोक' वेबसिरीज..?

जपानने अमेरिकेवर कागदाचे फुगे सोडून त्यांची झोप उडवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.