The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या देशातील महिलांनी केस विकून तिथली अर्थव्यवस्था वाचवली होती

by द पोस्टमन टीम
10 April 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


कुठल्याही यु*द्धाने मानवाच्या जीवनातील स्थिरतेच नाश होतो आणि अर्थव्यवस्था डळमळीत होते. यु*द्ध कोणीही जिंकलं तरी हार मानवतेची होत असते.

अशीच कोरियन यु*द्धाच्या वेळीही तिथली अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. तुम्हाला ऐकायला विचित्र वाटेल पण कोरियन यु*द्धाच्या वेळी ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आणि आपले पोट भरण्यासाठी कोरियन महिला त्यांचे केस कापून विकू लागल्या होत्या. हे केस विग बनवण्यासाठी वापरले जात होते. यु*द्धात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी केसांचा वापर करण्यात आला होता.

तीन वर्षे चाललेल्या कोरियन यु*द्धाने दक्षिण कोरियाच्या जनतेला केस विकून पोट भरण्याची वेळ आणली होती. हे लोक केस विकून आपले दोन वेळेचं अन्न मिळवायचे.

आज ज्याप्रमाणे भाजी विकणारे भारताच्या गल्लीबोळात फिरतात, त्याचप्रमाणे १९५० साली दक्षिण कोरियाच्या गल्ली बोळात केस गोळा करणारे फिरायचे. 

हे लोक हे केस जमवून ते जिल्हा गोरूच्या इंडस्ट्रीमध्ये जाऊन विकायचे. गोरु हे दक्षिण कोरियामधील या विग इंडस्ट्रीचे एक महत्त्वाचे केंद्र होते. यु*द्धाच्या प्रभावाने त्याकाळी अनेक उद्योग बंद होण्याचा टप्प्याला येऊन पोहचले होते. यामुळे सर्वत्र बेरोजगारी वाढत चालली होती, बाजारात मंदी वाढतच चालली होती. ज्या काळात दक्षिण कोरियाचे लोक जीवनावश्यक गोष्टी देखील विकत घेऊ शकत नव्हते, त्यावेळी विग तयार करण्याच्या उद्योगाने दक्षिण कोरियाला सावरले होते. १९६४ साली गरीब आणि वंचित महिलांचे केस वापरून विग तयार करण्याचा व्यवसाय मोठी प्रगती करत होता.



दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी विगशी संबंधित व्यापाराने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. १९६० साली दक्षिण कोरियाच्या अर्थव्यवस्थेचा नफ्याचा दहावा भाग हा विग्जच्या निर्यातीतून तयार होत होता. १९७० मध्ये विग्ज, ही टेक्स्टाईल आणि प्लायवूड उद्योगानंतर सर्वात मोठी इंडस्ट्री होती. विग्ज इंडस्ट्रीवर सरकारचा ताबा होता. या इंडस्ट्रीची ओळख म्हणून यावर दक्षिण कोरियाचा हुकूमशहा पार्क चुंगचा फोटो छापला जात होता.

इतर देशातील लोकांनी चिनी विग्ज ऐवजी कोरियन विग्ज वापरण्यास सुरुवात केली होती, यामुळे कोरियन अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

१९६० साली विग इंडस्ट्रीमुळेच तेथील हुकूमशहाला घालवण्यात आले आणि लोकशाही व्यवस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. पार्क चुंग या हुकूमशहाला तिथल्या विग इंडस्ट्रीच्या वाय एच ट्रेड या कंपनीने मदत केली होती. १० लोकांना घेऊन तयार करण्यात आलेल्या या कंपनीने चार वर्षात ४००० लोक कामावर ठेवले होते. पण १९७९ साली कर्जाचा बोजा वाढल्यामुळे कंपनीने अनेक कामगारांना कामावरून काढून टाकले. यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले. कंपनीला यामुळे मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले.

परिणामी, कामगारांनी मोठे आंदोलन उभारले. त्यांनी आपल्या हक्काच्या नुकसान भरपाईची मागणी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आंदोलकांवर ह*ल्ला केला आणि आंदोलन बंद पाडण्याचा प्रयत्न केला पण यात एका २१ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. यामुळे आंदोलन अजून पेटले.

त्यावेळी नेते किम यंग सेम यांनी आंदोलकांची बाजू घेतली. त्यांनी आपल्या पक्षाचे कार्यालय आंदोलकांना दिले. याचा त्यांना भविष्यात फायदा झाला. १९९३ साली निवडणुकीत किम यंग सेम यांना दक्षिण कोरियाचा पहिला लोकशाही नेता म्हणून निवडले.

विग उद्योग मोठ्या प्रमाणात वाढत होता, त्यासाठी मजूर रात्रंदिवस मेहनत घ्यायचे. ज्या मजुराची आंदोलना दरम्यान ह*त्या करण्यात आली होती, तो त्या लोकांपैकी एक होता, जे शहरात आपली रोजी रोटी कमवायला आले होते. अत्यंत कठीण परिस्थितीत लोक कारखान्यात काम करायचे, अनेक लोकांनी तिथे काम करताना आपला जीव गमावला होता. अनेक लहान मुलांना तर प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्या झाल्याच या ठिकाणी कामाला जुंपण्यात आले होते. ज्यावेळी कारखाने बंद झाले त्यावेळी हे सर्व लोक रस्त्यावर आले होते.

एकेकाळी खायला पैसे नसलेल्या दक्षिण कोरियाच्या जनतेचे दिवस आता पालटले आहेत. आज दक्षिण कोरिया जगातील प्रमुख आर्थिक सत्तांपैकी एक आहे. इटालियन लोकांपेक्षा दक्षिण कोरियन लोकांचे उत्पन्न जास्त आहे. आज कोरियन लोक इतर देशातून विग आयात करतात.

कोरियामध्ये केसांना फार महत्त्व आहे. केस नसलेल्या लोकांना तर तिथे विग लावल्या शिवाय काम देखील मिळत नाही, त्यामुळे तिथे विगला मोठी मागणी असते. इतकेच नाही, तिथे विग हे फॅशनचा महत्वपूर्ण अंग मानले जाते. कोरियातील विग उद्योग आजदेखील तितकाच शक्तिशाली आहे, जेवढा तो आधी होता. ‘ही मो’ नावाचा एक कोरियन विग ब्रँड जगात सर्वोत्तम मानला जातो.

यु*द्धाने पार नेस्तनाबूत झालेला दक्षिण कोरिया केसांच्या बळावर एक जागतिक अर्थव्यवस्था बनली होती!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इस्राइलने नजरचुकीने अमेरिकेच्या जहाजावर हल्ला करून ते बुडवलं होतं

Next Post

विश्वास बसणार नाही पण हा माणूस अठरा वर्षे विमानतळावर अडकून पडला होता

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

विश्वास बसणार नाही पण हा माणूस अठरा वर्षे विमानतळावर अडकून पडला होता

इंग्रजांनी या यु*द्धात विजय मिळवून आपल्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.