The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी कोर्टात चक्क व्हाट्सऍपवरच्या फेक व्हायरल मेसेजचा दाखला दिलाय

by द पोस्टमन टीम
4 June 2020
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


२८ मे रोजी सुप्रीम कोर्टात एक प्रवासी मजुरांच्या प्रश्नावर एक खटला भरवण्यात आला होता, त्यावर सुनावणी चालू होती. देशभरात मजुरांच्या दुरावस्थेला सरकार जबाबदार आहे, असं याचिकाकर्त्याचे मत होते. यावर सरकारी पक्षाची बाजू मांडण्याचे काम सर्वोच्च सरकारी वकील तुषार मेहता करत होते.

सरकारी वकील तुषार मेहता सरकारची बाजू मांडताना म्हणाले की,

“सध्या देश कोव्हिड १९ च्या एका अत्यंत धोकादायक परिस्थितीतून जात असून अशा प्रसंगी राज्य सरकार आणि मंत्री अगदी अहोरात्र मेहनत घेऊन जनसेवेचे कार्य करत असताना काही लोक मात्र सरकारविषयक नकारात्मक बातम्या समाज माध्यमांवर आणि वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून पसरवत आहेत. हे लोक आपल्या घरातील आरामखुर्चीवर बसून मजुरांसाठी लढा देत असून त्यांना आज राष्ट्र कुठल्या परिस्थितीचा सामना करत आहे याची जाणीव उरलेली नाही.”

तुषार मेहता यांनी पुढे जाऊन एक उदाहरण देताना १९९३ साली सुदान देशात पत्रकारिता करणाऱ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त पत्रकार केविन कार्टर यांची एक कथा सांगितली.



तुषार मेहता म्हणाले की, “एक छायाचित्रकार १९८३ साली सुदान ह्या देशात गेला. त्याठिकाणी एक अत्यंत कुपोषित बालक होता आणि एक गिधाड त्या बालकाच्या जवळ येऊन त्याच्या मृत्यूची वाट बघत होते. केविन कार्टर असे पत्रकार-छायाचित्रकाराचे नाव होते. ते छायाचित्र न्यू यॉर्क टाईम्स ह्या वृत्तपत्रात छापून आले होते. ह्या छायाचित्रासाठी त्यांना पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुरस्कार मिळाल्यानंतर त्या पत्रकाराने आत्महत्या केली होती.

एका पत्रकाराने त्या छायाचित्रकाराला विचारले होते की त्या मुलासोबत नंतर काय झाले होते? त्यावर केविन त्याला म्हणाले होते की त्यांना याची कल्पना नाही. त्या पत्रकाराने किती गिधाडं होती असं विचारलं त्यावेळी तो छायाचित्रकार म्हणाला ‘एक होतं’, त्यावेळी तो पत्रकार त्या छायाचित्रकाराला म्हणाला ‘एक नाही दोन होते, त्यापैकी एकाच्या हातात कॅमेरा होता’.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

आता तुषार मेहता यांनी जी ही कथा कोर्टात सादर केली ती व्हॉट्सऍपवर फिरत असलेल्या एका फेक व्हॉट्सऍप मेसेजमधून उचलण्यात आली होती. या मेसेजच्या माध्यमातून त्या मजुरांच्या समस्या जगासमोर आणणाऱ्या लोकांची तुलना गिधाडाशी करून सरकारची धोरणे कशी योग्य आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला जात होता.

दुष्काळाचे वर्ष वगळता मेहता यांनी जसाच्या तसा तो व्हॉट्सऍप मेसेज कोर्टात वाचून दाखवला. हा मेसेज खरंतर खूप तथ्यहीन होता. त्यामुळे सर्वोच्च सरकारी वकिलाने एका महत्वपूर्ण खटल्यात असे खोटे मेसेज वाचणे अत्यंत आश्चर्यकारक होते.

अल्ट न्यूज ह्या एका तथ्य छाननी करणाऱ्या संकेतस्थळावर त्या दाव्याची तथ्य तपासणी करण्यात आली, त्यात अनेक तथ्य समोर आणण्यात आले. त्यानुसार लहान मुलाची आणि गिधाडाच्या छायाचित्राची कथा खरी होती आणि १९९३ साली सुदानमध्ये पडलेल्या दुष्काळात हे छायाचित्र केविन कार्टर यांनी काढले होते. २६ मार्च १९९३ साली ते न्यूयॉर्क टाइम्स ह्या वृत्तपत्रात ते छायाचित्र आणि त्या मागची कथा प्रसिद्ध झाली होती.

यानंतर केविन यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. अनेक लोक म्हणाले की केविन यांना त्या लहान मुलाला वाचवण्याची पूर्ण संधी होती. यावर अजून एक लेख छापून आला की केविन त्या लहान बाळाच्या जवळ गेले नाही कारण त्यांना तिथल्या सरकारने त्या भागात पसरलेल्या रोगराईमुळे तसे करण्यास मनाई केली होती.

अजून महत्वपूर्ण बाब म्हणजे फोटो काढल्यानंतर त्या गिधाडाला केविन त्यांनी पिटाळून लावले होते. त्यांना पुलित्झर पुरस्कार मिळाल्यावर त्यांच्यावर आफ्रिकेतील अनेक पत्रकारांनी टिका केली होती. पण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना गिधाड कोणीच म्हणाले नव्हते.

त्यांच्यावर वशिलेबाजी करून पुरस्कार मिळवला अशी टीका इतर पत्रकार करत होते. याउलट एका अमेरिकन दैनिकात त्या फोटोच्या आधारावर त्यांना देखील गिधाड हे संबोधन वापरले होते, ज्याचा कोणत्या पत्रकाराने घेतलेल्या मुलाखतीशी काहीच संबंध नव्हता.

त्या छायाचित्रात ज्या लहान बालकाचा फोटो होता, ती एक मुलगी होती. जी त्यानंतर तब्बल १४ वर्षे जगली आणि पुढे मलेरियाने मृत्युमुखी पडली होती.

केविन यांनी त्या फोटोमुळे आत्महत्या केली नव्हती. केविन यांनी आत्महत्या करण्याचे कारण देणारे एक पत्र सोडले होते त्यानुसार त्यांचा एक मित्र केन याची दक्षिण आफ्रिकेत हत्या करण्यात आली होती. याचा प्रचंड तणाव केविन यांच्यावर होता. त्यांना नैराश्याने घेरलं होतं, यामुळे त्यांनी आत्महत्या केली होती.

त्यांच्या आत्महत्येचा, त्या छायाचित्राचा, त्या पत्रकाराचा कथेचा कुठलाच संबंध नव्हता यामुळे जो मेसेज समाज माध्यमांवर फिरत होता, तो सर्वार्थाने चुकीचा होता.

हा अत्यंत तथ्यहीन चुकीचा खोटा मेसेज भारताचा सर्वोच्च सरकारी वकिलांनी एका महत्वपूर्ण विषयावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान वापरला आहे. या घटनेने न्यायव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहते!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चिनी लोक वन्यजीवांना का खातात..?

Next Post

या वृद्ध महिलेने आपल्या सहाशे रुपये कमाईतले पाचशे रुपये करोनालढ्यासाठी दिलेत

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

या वृद्ध महिलेने आपल्या सहाशे रुपये कमाईतले पाचशे रुपये करोनालढ्यासाठी दिलेत

वादळांना ही चित्रविचित्र नावं देतं तरी कोण..? जाणून घ्या..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.