The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या देशाचा राजपरिवार उदरनिर्वाहासाठी मासे विकतो आणि हॉटेल चालवतो

by Heramb
29 September 2025
in भटकंती
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगातील महासत्ता, महाशक्ती आणि श्रीमंत असलेल्या देशांची चर्चा सहसा अगदी गावांच्या चावडीपासून ते संसदेपर्यंत सगळीकडे होते. कोणत्या देशाकडे आपण किती लक्ष द्यावं, कोणत्या देशाबरोबर व्यापारी संबंध चांगले ठेवावेत, कोणत्या देशाबरोबर तसे चांगले संबंध ठेऊ नयेत, याची चर्चा आठवीच्या विद्यार्थ्यांपासून ते कार्यालयातील विविध प्रकारचे कर्मचारीसुद्धा करतात.

पण एखाद्या लहान किंवा गरीब देशांची, ज्यांना युरोपीय आणि पाश्चिमात्त्य भाषेत ‘थर्ड वर्ल्ड कंट्री’ म्हटलं जातं अशा देशांची चर्चा मात्र कोणीही करीत नाही. जर झालीच चर्चा, तर ती चीनसारख्या विस्तारवादी देशामध्ये त्या देशावर कशाप्रकारे वर्चस्व स्थापन करता येईल यावर होते. यापलीकडे फारतर मालदीवज्-सारखे पर्यटनासाठी प्रसिद्ध देश असतील तर भटक्यांमध्येही त्याबद्दल चर्चा होतात. पण काही देशांची नावेसुद्धा आपण ऐकलेली नसतात. उदाहरणार्थ मोनॅको नावाचा देश. असे अनेक देश जगात आहेत आणि त्या देशांचं स्वतंत्र असं वैशिष्ट्य असतंच. अशाच एका वैशिष्ट्यपूर्ण देशाबद्दल जाणून घेण्यासाठी हा विशेष प्रयत्न.

सफोक किंवा सीलँड नावाचा देश हा जगातील सर्वांत लहान मायक्रोनेशन आहे. या देशाची लोकसंख्या एकेकाळी भारतातील एका एकत्र राहत असलेल्या कुटुंबाइतकीच  होती. २००२च्या जनगणनेनुसार या देशात फक्त २७ लोक होते. लोकसंख्या आणि क्षेत्रीय विस्ताराच्या दृष्टीने त्याला सूक्ष्म राष्ट्र किंवा मायक्रोनेशन असेही म्हणतात.

कदाचित हे काहीसं विचित्र वाटेल पण दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात ब्रिटनने सागरी युद्धात मदत करण्यासाठी हा देश तयार केला होता. सीलँडवर वेगवेगळ्या लोकांचा कब्जा होता. ज्या टॉवर्सवर सीलँडची जमीन आहे त्यांना रफ टॉवर्स म्हणतात. जॅक मूर आणि त्यांची मुलगी जेन यांनी फेब्रुवारी आणि ऑगस्ट १९६५ साली रफ टॉवर ताब्यात घेतला. त्यानंतर सप्टेंबर १९६७ साली माजी ब्रिटिश मेजर पॅडी रॉय बेट्सने हा किल्ला ताब्यात घेतला.

पॅडी रॉय बेट्स हा ब्रिटिश पायरेट होता तसेच तो रेडियोवर चॅनेल्ससुद्धा प्रक्षेपित करत असत. दुसरे महायु*द्ध सुरू असताना तो ब्रिटिश सैन्यात मेजर या पदावर कार्यरत होता. त्याने आपल्या शौर्याने पायरेट्सचा एक विरोधी गट हुसकावून लावला होता. पायरेट्सचे एक स्वतंत्र रेडियो स्टेशन तयार करावे हा बेट्सचा हेतू होता. त्याने तसा प्रयत्नही केला आणि त्या रेडियो स्टेशनला ‘रेडिओ एसेक्स’ हे नाव दिले. पण काही अज्ञात कारणांमुळे, आवश्यक उपकरणे आणि रेडिओ बद्दल पुरेशी माहिती असूनही प्रसारण कधीही सुरू होऊ शकले नाही.



बेट्स याने किल्ला ताब्यात घेतल्यानंतर रफ टॉवरचे स्वातंत्र्य घोषित केले आणि त्याला सीलँडची प्रिन्सिपॅलिटी म्हणून ओळख दिली. सन १९७५ साली बेट्सने सीलँडसाठी राज्यघटना सादर केली, या राज्यघटनेत त्याने राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, चलन आणि पासपोर्टबद्दल माहिती दिली. डेली पोस्टच्या बातमीनुसार, ९ ऑक्टोबर २०१२ रोजी रॉय बेट्सने स्वतःला या सीलँडचा राजा घोषित केले. रॉय बेट्सच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा मायकेलने वडिलांची जागा घेतली.

एक देश म्हणून या सीलँडला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही. परंतु उर्वरित जगाप्रमाणे, सीलँडचे स्वतःचे चलन आणि टपाल तिकीट आहे. सीलँड जागेच्या दृष्टीने खूपच लहान आहे, जमिनीच्या या भागावर रोजगाराचे कोणतेही साधन नाही, उलट येथील कुटुंबं बाहेर जाऊन आपली उपजीविका करतात. मुळात ते मासे आणि सागरी वस्तू विकतात. या देशांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकृतपणे राष्ट्र म्हणून मान्यता नसली तरी अनेक लोक याचं वर्णन ‘मायक्रो-नेशन्स’ असेही करतात.

हे देखील वाचा

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

दुसरा याच प्रकारचा देश म्हणजे इटलीमधील तावोलारा. येथे फक्त ११ लोक राहतात. हे तवलीच्या सार्डिनियन प्रांताजवळ बांधलेले एक छोटे बेट आहे. यालाच तावोलाराचे राज्य म्हणतात. एक राजा अँटोनियो बर्टोलोनी देखील आहे, जो बेटावर एकमेव रेस्टॉरंट चालवतो. या बेटाची कथा १८०७ मध्ये सुरू होते.

वर्तमान राजा अँटोनियोचे आजोबा ज्युसेप्पे बर्टोलोनी हे इटलीतून पळून जाताना या बेटावर आले. खरं तर, त्याने दोन बहिणींबरोबर लग्न केलं होतं आणि त्याला द्विलिंगीपणाचा आरोप टाळायचा होता. म्हणूनच या भागात, तो या निर्जन बेटावर पोहोचला.

हे बेट निर्जन होते, पण कथेनुसार तिथले वैशिष्ट्य असे की तेथे सोनेरी दात असलेल्या शेळ्या सापडल्या. लवकरच या अनोख्या सोनेरी दात असलेल्या शेळ्यांची चर्चा पसरली आणि लोक शिकारीसाठी बेटावर येऊ लागले. मग शिकार करण्यास मदत करताना, गुसेपचा मुलगा पाओलो स्वतःला बेटाचा राजा घोषित करतो.

हळूहळू तावोलारा हे एक वेगळे राज्य मानले जाऊ लागले. त्या काळात बेटावर एकूण ३३ लोक राहत होते आणि अशा प्रकारे पाओलो त्या ३३ लोकांचा राजा बनला. स्वतःला राजा मानून, पाओलोने ‘त्याच्या थडग्यावर मुकुट ठेवावा’ असे मृत्युपत्रात लिहिले. या राजाने जिवंत असताना कधीही मुकुट घातला नाही, परंतु मृत्यूनंतर त्याच्या थडग्यावर मुकुट ठेवण्यात आला.

सध्या, बेटाच्या एकमेव रेस्टॉरंटची कथा देखील मनोरंजक आहे. हे रेस्टॉरंट बेटाचा सध्याचा राजा अर्थात अँटोनियो आणि त्याचे राजघराणे चालवते. हे लोक इटलीहून जवळजवळ दररोज या बेटावर पोहचतात आणि रेस्टॉरंटमध्ये आवश्यक वस्तू घेऊन जातात जेणेकरून पर्यटकांना त्यांच्या आवडीनुसार जेवण करता येईल. तांत्रिकदृष्ट्या, या बेटावर राहणारे संपूर्ण राजघराणे इटलीचे नागरिक आहे. इटलीने देखील या बेटाला आपला भाग मानले नाही. म्हणूनच टोनिओ तावोलाराला स्वतःचे साम्राज्य मानतात.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

या कंपनीमुळे भारतीयांना नोकरी आणि छोकरी दोन्ही शोधणं सोपं झालंय

Next Post

हि*टल*रने आर्य वंशाचं मूळ शोधण्यासाठी तिबेटला संशोधकांची एक टीम पाठवली होती

Related Posts

भटकंती

भटकंती – ॲमेझॉनच्या जंगलातील एकही गाडी नसलेलं पर्यावरणपूरक शहर

6 June 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
भटकंती

खोल समुद्रातही डोळे उघडे ठेवून शिकार करणाऱ्या लोकांचं अस्तित्व आज धोक्यात आलंय..!

8 September 2025
इतिहास

तुर्कस्तानातील हजारो वर्षांपूर्वीची ही भूमिगत शहरे अविश्वसनीय आहेत..!

8 September 2025
भटकंती

१० हजार वर्षांपूर्वीच्या या अंडरवॉटर पिरॅमिड्सचं रहस्य अजूनही उलगडलेलं नाही..!

16 October 2025
भटकंती

जगाचे मध्य ब्रिटनमध्येच का आहे?

5 September 2025
Next Post

हि*टल*रने आर्य वंशाचं मूळ शोधण्यासाठी तिबेटला संशोधकांची एक टीम पाठवली होती

'टायटॅनिक'सह विसाव्या शतकातील तीन मोठ्या सागरी अपघातांतून वाचलेली 'व्हायलेट'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.