The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चीनने १९६२ मध्ये कुठलीही पूर्वसूचना न देता आपल्यावर ह*ल्ला केला होता

by द पोस्टमन टीम
20 October 2025
in इतिहास, विश्लेषण
Reading Time: 2 mins read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब


भारत-चीनमधील सीमावाद ही काही नवीन गोष्ट नाही. गेल्या कित्येक दशकांपासून हा वाद सुरू आहे. २०२० साली झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी आपले प्राण गमावल्यापासून या भागात मोठ्या प्रमाणात सैन्य तैनाती बरोबरच शस्त्रास्त्रं तैनातीसुद्धा झाली आहे. याच प्रसंगामुळे १९६२ साली झालेल्या यु*द्धाच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या. किंबहुना भारताने १९६२ चा धडा विसरू नये अशाप्रकारचे वक्तव्य चीनकडून करण्यात येत आहेत.

१९६२ साली असं काय घडलं होतं? कशाप्रकारे चीनने आपल्या पाठीत खंजीर खुपसला होता हेच आज जाणून घेऊयात.

तर झालं असं की, १९६२ साली भारत आणि चीनमध्ये यु*द्धजन्य परिस्थिती निर्माण होईपर्यंत भारतीय नेत्यांचे आणि सरकारचे धोरण चीनबद्दल अतिशय मवाळ होते. खुद्द नेहरू साम्यवादाकडे झुकले असल्याने त्यांची आणि चीनची जवळीक होती. ५०-६० चं दशक हे हिंदी-चिनी भाई भाई चं होतं.

याच आभासी मैत्रीत चीननं १९५१ साली तिबेट बळकावलं. तिबेट एक स्वतंत्र देश होता. बौद्ध धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू दलाई लामा यांचं हे वास्तव्याचं ठिकाण. अहिंसा आणि शांततेच्या चुकीच्या समजुतींमुळे त्यांनी सुरक्षेसाठी सैन्यही ठेवलं नव्हतं, तिबेटच्या सुरक्षेची जबादारी पूर्वी ब्रिटिश राज अर्थात भारतातील ब्रिटिश साम्राज्य आणि स्वातंत्र्यानंतर भारत सरकारकडे होती. पण नेहरूंच्या या धोरणामुळे त्यांनी तिबेटचा प्रदेश चीनला गिळंकृत करू दिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

असो. एकीकडे चीन भाई भाई म्हणत असतानाच १९५९ पासून चीनने आपल्या सीमेतील घुसखोरी मात्र सुरूच ठेवली होती. याच कारणामुळे दोन्ही सैन्य दलात वेळोवेळी खटके उडत.



१९६२ च्या मध्यावर भारताच्या पूर्व आणि पश्चिम सेक्टरमध्ये तणाव निर्माण व्हायला सुरुवात झाली. यु*द्धासाठी भारतीय सैन्य तयार नव्हते. पण चिनी सैन्य गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आपली ताकद वाढवण्याचे काम करत होते. तिबेट चीनच्या घशात गेल्यामुळे दलाई लामा यांनी देखील भारतात शरणागती पत्करली होती. तेव्हापासून भारत आणि चीनमध्ये खटके कायमच उडत होते.

सुरक्षेच्या कारणास्तव जेव्हा भारताने मॅकमोहन या सीमारेषेजवळ चौक्या उभारण्यास सुरुवात केल्यानंतर त्यावेळी जशी परिस्थिती निर्माण झाली होती अगदी तशीच परिस्थिती २०२० सालीही निर्माण झाली होती. पण यावेळी मात्र भारताने आपल्याच सीमा हद्दीत रणगाडे वाहून नेता येतील अशी रस्तेबांधणी करायला सुरुवात केली आहे.

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

१९१३ साली ब्रिटिश भारत आणि तिबेटमध्ये एक करार झाला होता. या करारानुसार एक मॅकमोहन सीमारेषा आखण्यात आली होती. ही रेषा आजवर निश्चित नाही. परंतु जेव्हा चीनने तिबेटवर ताबा मिळवला तेव्हा त्यांनी मॅकमोहन रेषा मानायला नकार देत, भारताचा एक मोठा भूभाग आपला आहे, असे आपल्या नकाशात दाखवले.

इतकंच नाही तर त्यांनी अक्साई चीनचा एक मोठा भूखंड, जो भारताच्या मालकीचा होता, तो गिळंकृत केला. याला प्रत्युत्तर म्हणून नेहरूंनी मॅकमोहन रेषेवर आपल्या चौक्या उभारण्याचे आदेश दिले. यानुसार लडाख क्षेत्रात पश्चिम सेक्टरमध्ये २४ आणि पूर्व सेक्टरमध्ये ६४ चौक्या तयार करण्यात आल्या.

चीनने ५० च्या दशकापासूनच हळूहळू लडाखचा भूभाग आपला असल्याचे दाखवायला सुरवात केली होती. अक्साई चीनचा भाग भारताचा असल्याचे भारताने आपल्या नकाशात दाखवले होते, हे चीन मानायला तयार नव्हता. परंतु भारत सरकारने त्यावेळी नरमाईचे धोरण स्वीकारले, याचाच फायदा उचलत चीनने आपल्या नकाशाचा आणि आपला त्या भूभागावरील दाव्याचा विरोध केला.

जेव्हा बीजिंगच्या एका सरकारी प्रकाशनाने उत्तर पूर्व लडाखच्या मोठ्या भूभागाला आपला भूभाग म्हणून दाखवले तेव्हा नेहरू हादरले. अशा प्रसंगी नेहरूंना फॉरवर्ड पॉलिसीचा स्वीकार करत चीनवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला परंतु चीनने त्याला प्रत्युत्तर म्हणून ह*ल्ला केला.

चीनने कधी ह*ल्ला करणार नाही असं वचन दिलं होतं. परंतु ज्या प्रकारे चीनने आपली भूमिका बदलली त्यामुळे सर्वांना धक्का बसला. तत्कालीन पंतप्रधान नेहरू आणि संरक्षणमंत्री कृष्णा मेनन या भ्रमात होते की चीन आक्र*मण करणार नाही. मेनन नेहमी चीन आक्र*मण करणार नाही हे सांगण्यासाठी त्यांना जिनिव्हामध्ये चेन यी या चिनी साथीदाराने दिलेलं वचन प्रस्तुत करायचे, ज्यानुसार चीनबरोबर असलेली सीमा समस्या सोडवण्यासाठी कधीच बलप्रयोग करणार नाही. 

लढाईच्या काही महिन्याअगोदर चीनचा प्रधानमंत्री चाउ इन लई भारतात आला तेव्हा भारतात सीमावाद मोठ्या प्रमाणावर सुरू होता. तेव्हा वाटत होत की चर्चेतून हा विवाद सोडवला जाईल. परंतू चीनने मात्र अरुणाचल प्रदेशात घुसखोरी केली. लडाखमध्ये त्याने भूप्रदेश कसा जिंकला हे आपण बघितलेच. जेव्हा चीनने भारतावर आक्र*मण केले तेव्हा त्यांना परत हाकलण्यासाठी भारताकडे न ह*त्यारे होती, ना रसद. अरुणाचलमधील सैन्याला रस्त्यांच्या अभावी पुरेशी रसद पोहचत नव्हती.

१९६२ साली जेव्हा चीन भारताच्या आतल्या भागात शिरला तेव्हा भारतीय सैन्याने त्यांना हाकलण्यासाठी लढा देण्याची तयारी केली. परंतु हे घडण्याअगोदरच चीनने संपूर्ण ताकदीनिशी ह*ल्ला केला.

११ ऑक्टोबरला पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात भारतीय सीमा क्षेत्रात घुसलेल्या चिनी सैन्याला परत हाकलणे कठीण असल्याचा निर्वाळा देण्यात आला, कारण सैन्याकडे ना श*स्त्र होते न रसद. या बैठकीत ठरवण्यात आले की पुढच्या उन्हाळ्यापर्यंत कुठलंही ऑपरेशन हाती न घेणेच योग्य राहील, तसेच आदेश भारतीय सेनेला देण्यात आले.

१३ ऑक्टोबर १९६२ ला नेहरुना श्रीलंकेला जायचे होते. तेव्हा रस्त्यात त्यांनी चेन्नईला मीडिया समोर भूमिका मांडली की सैन्याला चिनी लोकांना हाकलण्याचे सैन्याला आदेश दिल्याचे म्हटले होते. पण यावर चीनकडून प्रतिक्रिया आली नाही. परंतु यानंतर केवळ आठच दिवसांत चीनने भारतावर आक्र*मण केले. या आक्र*मणाची तयारी त्यानी बरीच आधी केली होती.

चीनचे फार पूर्वीपासून हेच धोरण राहिले आहे. सैन्य शक्तीत वृद्धी करत करत छोटे छोटे प्रदेश ताब्यात घेत स्वतःचा विस्तार करणे आणि शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवू अशा बतावण्या करत ह*ल्ले करणे. मग ते १९६२ असो नाही तर २०२०. चीन हा कुठल्याच दृष्टीने विश्वासपात्र नाही हेच यावरून स्पष्ट होते.

१९६२ ची सर्वांत दुर्दैवी बाब म्हणजे भारतीय सैन्याची उडालेली तारांबळ: 

या संपूर्ण प्रकरणात एक प्रश्न असाही पडतो तो म्हणजे १८९५ साली स्थापन झालेलं सैन्य. ज्याकडे सुमारे ६७ वर्षांचा दांडगा अनुभव, त्यातही दोन जागतिक महायु*द्धांचा आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कितीही थंड अथवा कितीही उष्ण हवामानात जाऊन लढण्याची आणि जिंकण्याची क्षमता आहे असं सैन्य कोलमडण्यामागे नेमकं कारण काय? त्यावेळी सैन्यामध्ये “फिल्ड मार्शल” सॅम मनेक्शॉंसारखे शूर, अनुभवी जनरल्स होते, मग भारत कमी कुठे पडला?

त्याचं उत्तर आहे धोरण. पॉलिसीज. होय, तत्कालीन सरकारची धोरणेच अशी होती की त्यांनी सैन्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. कहर तर तेव्हा झाला जेव्हा आदर्शवादाच्या चुकीच्या भूमिका घेऊन भारत सरकारमध्ये सैन्यावर कायमची बंदी आणण्याच्या आणि सीमांचे संरक्षण पोलिसांच्या हाती देण्याच्या चर्चा सुरू होत्या. पण आपल्या सुदैवाने त्यावर अंमलबजावणी झाली नाही. 

तिबेट तर भारताने चीनला गिळंकृत करू दिलाच. पण अक्साय चीनचा ३८ हजार स्क्वेअर किलोमीटरचा भाग जेव्हा चीनच्या ताब्यात गेला तेव्हा आपल्या पंतप्रधानांचे उद्गार होते, “नॉट अ ब्लेड ऑफ ग्रास ग्रोज देअर..!”

नथु-ला (१९६७):

या पराभवानंतर मात्र भारत सरकारला जग आली. सैन्याच्या बाळकटीकडे लक्ष देण्यात आले. १९६५ साली जेव्हा पाकिस्तानने पुन्हा कश्मीर बळकावण्यासाठी ह*ल्ला केला तेव्हा तत्कालीन पंतप्रधान शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने पश्चिम सीमेवर आघाडी उघडली आणि थेट लाहोरवर तिरंगा फडकावला. त्यानंतर झालेल्या ताश्कन्द करारात मात्र लाहोरसह कश्मीरमधील सर्वांत महत्त्वाचे ठिकाण पीर पंजालही आपल्याला गमवावे लागले. पण यानंतर सैन्याची ताकद वाढली हे निश्चित!

दोनच वर्षांमध्ये चीनने सिक्कीममधील सीमांवर पुन्हा घुसखोरी करण्यास सुरुवात केली. १४२०० फुटांवर असलेली ‘नथु-ला’ खिंड तिबेट-सिक्कीम सीमेवरील महत्त्वाचे ठिकाण आहे. इथूनच पूर्वीचा गंगटोक-यातून-ल्हासा हा व्यापारी मार्ग जात असे. इथून चिनी सैन्याने भारतीय सैन्याला मागे हटण्याचा अल्टिमेटम दिला होता. हे चिनी सैनिक ‘नथु-ला’च्या उत्तर टोकावर होते.

अल्टिमेटम दिला तरी १७ माउंटन डिव्हिजनचे मेजर जनरल सगत सिंग मागे हटण्यास तयार नव्हते. भारत-चीन सीमेवर एक गोष्ट म्हणजे सीमारेषा निश्चित नसणे. १७ माउंटन डिव्हिजन आणि चिनी सैन्य १ किलोमीटरपेक्षाही कमी अंतरावर तैनात होते. याठिकाणी रोज वादावादी होत असे, गंमत म्हणजे चिनी सैन्यातील केवळ एकालाच इंग्रजी येत असत. या वादावादीचे रूपांतर काहीच दिवसांत धक्का-बुक्कीमध्ये झाले. त्यानंतर भारतीय सैन्याने तारेचे कुंपण घालण्याचा निर्णय घेतला.

कुंपण घालताना पुन्हा चिनी सैनिक आडवे आले, काही वेळ वादावादी झाल्यानंतर ते आपल्या बंकरमध्ये परतले पण काही मिनिटांमध्ये चिनी सैन्याकडून मिडीयम मशीन ग*नने अंधाधुंद गोळी*बार सुरु झाला, यात एका कर्नलसह काही सैनिक जखमी झाले. पुढे दोन सैनिकांनी आपल्याकडील लहान ग*न्सने गोळी*बार केला आणि त्यात सुमारे ७० चिनी मारले गेले. भारतीय सैन्याचा तोफखानाही (आर्टिलरी) जवळच होता, त्यांना बोलावून चिनी सैन्याचे बंकर्स उ*ध्वस्त करण्यात आले. ११ सप्टेंबर रोजी सुरु झालेले हे शे*लिंग १४ सप्टेंबरला थांबले, ते ही चीनने एअर फोर्सच्या वापराचा इशारा दिल्यानंतर. एव्हाना चीनला चांगलाच धडा शिकवण्यात आला होता. 

यानंतर २० दिवसांनी पुन्हा चीनने कुरघोडी केली ती ‘चो-ला’ या खिंडीत. पण तेथे उपस्थित ७ आणि ११ गोरखा रायफल्स आणि १० जम्मू अँड कश्मीर रायफल्सने त्यांची दाणादाण उडवली, त्यानंतर चिनी सैन्याने ३ किलोमीटर मागे आपला डेरा टाकला, आणि आजही ते तिथेच आहेत. 


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

चीन मोठ्या प्रमाणावर गाढवांची आयात का करतोय..?

Next Post

गलवान खोऱ्याचं नामकरण ज्याच्यावरून झालं तो गुलाम रसूल गलवान कोण होता?

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

गलवान खोऱ्याचं नामकरण ज्याच्यावरून झालं तो गुलाम रसूल गलवान कोण होता?

आजवर चीनने जगाला सांगितलेल्या खोट्या गोष्टींची लांबलचक यादी

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.