The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ऑक्सिजनचा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाला त्याच्या शोधाचं श्रेय कधी मिळालंच नाही

by द पोस्टमन टीम
7 December 2024
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


कोरोना महामारीच्या या काळात कधी नव्हे ते सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. हवेत मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या ऑक्सिजनचे महत्त्व काय असते ते आपल्याला आज कळत आहे. पण हवेत मुबलक प्रमाणात ऑक्सिजन असतो तसे ऑक्सिजनशिवाय आणखीही काही घटक असतात. खरे तर हवा ही अनेक रासायनिक घटकांचे मिश्रण आहे. त्यातील फक्त ऑक्सिजन आपल्याला श्वसनासाठी आवश्यक असतो.

हवेत ऑक्सिजन असतो आणि आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजनच गरजेचा असतो याचा शोध कुणी लावला हे तुम्हाला माहिती आहे का?

हवेतील ऑक्सिजनचा शोध लावणाऱ्या महान शास्त्रज्ञाचे नाव होते, कार्ल विल्हेल्म शील. कार्ल शील हा एक स्वीडिश शास्त्रज्ञ होता ज्याचा जन्म ९ डिसेंबर १७४२ रोजी स्ट्रासलँड या गावी झाला. हे गाव जर्मनीतील असले तरी त्याकाळी ते स्वीडिश अधिपत्याखाली होते. कार्लचे वडील जॉकीम शील हे धान्याचे व्यापारी होते. जॉकीम शील यांचे एक मित्र औषध चिकित्सक होते. त्यांनी आपल्या मुलाला, कार्लला त्यांच्याकडे शिकायला पाठवले. जॉकीम यांच्या या मित्राने कार्लला औषधांची माहिती दिली, औषधे तयार करण्यासाठी लागणाऱ्या विविध रसायनांचीही माहिती दिली. औषध प्रणालीची नियमावली म्हणजे काय हेही शिकवले.

इथेच त्याला औषधशास्त्र आणि रसायनशास्त्राची आवड निर्माण झाली. पुढे ते एका औषधालयात काम करण्यासाठी गटेनबर्ग येथे गेले. तिथे फार्मासिस्ट म्हणून काम करत असताना त्याने आपले स्वतंत्र संशोधनही सुरू ठेवले.



त्याला रासायनिक पदार्थातील वेगवेगळ्या घटकांचा शोध घेण्याचा जणू छंदच जडला होता.

आपल्या अवतीभवती असलेली हवा ही दोन घटकांच्या मिश्रणातून बनलेली आहे हा शोध त्यानेच लावला. पोटॅशियम नायट्रेट, मँगनीज डायऑक्साइड, सिल्व्हर कार्बोनेट आदी घटकांचा अभ्यास केल्यानंतर त्याला ऑक्सिजनचा शोध लागला होता.

१७७२ साली त्याने हवेतील ऑक्सिजनचे अस्तित्व सिद्ध करणारा प्रबंध लिहिला. त्याने तो प्रबंध स्वीडनच्या रॉयल सोसायटीकडे प्रकाशित करण्यासाठी पाठवला. पण सोसायटीच्या दिरंगाईमुळे तो प्रबंध १७७४ साली प्रकाशित झाला. त्या आधीच जोसेफ प्रिस्टलेनेही ऑक्सिजन शोधल्याचा दावा केला होता. त्यामुळे ऑक्सिजनच्या शोधाचे श्रेय कार्लला मिळू शकले नाही.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

याशिवाय कार्लने मूलद्रव्य सारणीतील अनेक मूलद्रव्यांचा शोध लावला. क्लोरीन, हायड्रोजन, बेरियम, टंगस्टन, मॉलीब्डनम आणि मँगनीज या महत्त्वाच्या मूलद्रव्याचा शोधही त्यानेच लावला. १७७५ साली त्याला ‘रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स’चे सदस्यत्व मिळाले. या अकॅडमीकडून त्याला वर्षिक मानधन मिळत होते. हे सगळे मानधन तो आपल्या रासायनिक प्रयोगावरच खर्च करत असे.

रसायन शास्त्रातील अनेक ऑरगॅनिक ॲसिड्सचा शोधही त्याने लावला, जसे की टार्टारिक ॲसिड, ऑक्झॅलिक ॲसिड, युरीक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड आणि सायट्रिक ॲसिड. याशिवाय हायड्रोफ्लोरिक, हायड्रोसायनिक आणि अर्सेनिक ॲसिडच्या शोधाचे श्रेयही त्यालाच द्यावे लागते.

क्लोरीनमध्ये ब्लिचिंगचा गुणधर्म असतो याचाही शोध कार्लनेच लावला. त्याच्या या शोधामुळेच मोठ्या प्रमाणात क्लोरीनचा व्यावसायिक वापर होऊ लागला.

कार्लने अपुऱ्या साधनात आणि अपुऱ्या सोयी असतानाही लावलेले हे शोध खूप महत्त्वाचे आहेत. खनिजांचे पृथक्करण करण्यासाठी पुरेशी उष्णता देता येईल असा ओव्हनही त्याच्याकडे नव्हता. त्याच्याकडे असलेली बरीचशी साधने त्याने आपण काम करत असलेल्या फार्मसीमधून मागून आणली होती. जुन्या साधनांची दुरुस्ती करून ती वापरण्यायोग्य बनवली होती. हवेचा आणि हवेतील घटकांचा अभ्यास करण्यासाठी तर त्याच्याकडे फक्त साधी नळी, बाष्पपात्र, आणि रबराची पिशवी अशी प्राथमिक साधनेच होती.

सातत्याने ॲसिडच्या संपर्कात आल्याने त्याच्या तब्येतीवर परिणाम होत होता. या रसायनांचा शोध लागला नसता तर औद्योगिक क्रांती झालीच नसती. १७७० साली त्याला टार्टारिक ॲसिडचा शोध लागला. यासंबधीचा शोधनिबंध त्याने रेट्झीसमधून प्रकाशित केला होता. १७७४ साली त्याने ब्लॅक मॅग्नेशिया संबंधीचा शोध लावला जो बर्गमनमधून प्रकाशित केला.

ब्लॅक मॅग्नेशियामध्ये आणखी एक खनिज असल्याचाही त्याला शोध लागला, ज्याला नंतर मॅग्नेशियम हे नाव देण्यात आले. दुधात आंबटपणा निर्माण होतो, यासाठी त्यातील लॅक्टिक ॲसिड कारणीभूत असल्याचेही त्याने दाखवून दिले.

कार्लने रसायनशास्त्राच्या सर्व उपशाखांचा अभ्यास केला. त्याने फॉस्फरस आणि त्यातील घटकांचाही अभ्यास केला. प्रकाशाचा सिल्व्हर सॉल्टवर काय परिणाम होतो याचाही त्याने अभ्यास केला.

फॉस्फरसचा शोध लावल्यानंतर याचा वापर करून आगकाड्या बनवल्या जाऊ लागल्या.

फॉस्फरसचा मोठ्या प्रमाणात उत्पादन कसे करता येईल या तंत्राचा शोधही कार्लने लावला. त्यामुळे स्वीडन त्या काळात आगपेट्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करू शकत होता.

कार्लने इतके महत्वाचे शोध लावले मात्र त्याच्या हयातीत त्याच्या या संशोधनासाठी त्याला कधीच प्रसिद्धी मिळाली नाही. त्याची एक वाईट सवय त्याच्या जीवावर उठली. ती म्हणजे तयार केलेल्या रसायने चाखून बघण्याची सवय! त्याने निर्माण केलेली कित्येक रसायने विषारी आणि घातक होती. तो ज्या प्रयोगशाळेत हे सगळे प्रयोग करत असे त्या प्रयोगशाळेत हवा खेळती राहत नव्हती, त्यामुळे प्रयोगातून निर्माण झालेले गॅस तिथेच कोंडून राहत असत.

कार्ल असाच एके दिवशी प्रयोग करता करताच खाली कोसळला आणि परत उठलाच नाही. सततच्या विषारी द्रव्यांच्या संपर्काने त्याचा बळी घेतला होता. रसायनशास्त्राच्या विकासासाठी जीवाची पर्वा न करता त्याने अनेक शोध लावले, कित्येक रसायनांचे गुणधर्म सांगितले. औद्योगिक क्रांती कदाचित त्याच्या या शोधाशिवाय अपूर्णच राहिली असती. मुलद्रव्यांची सारणीही (पिरिऑडिक टेबल) अर्धवट राहिली असती. यावरून कार्लच्या संशोधनाचे महत्त्व आपल्याला पटू शकते. रसायने आणि त्यांचा अभ्यास यांनीच कार्लचे आयुष्य व्यापले होते.

इतक्या मोठ्या संशोधकाला मात्र जिवंतपणी त्याच्या संशोधनाचे श्रेयही मिळाले नाही. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे हे सगळे शोध प्रकाशात आणले गेले. याला कार्लचा आणखी एक दुर्गुण कारणीभूत होता. तो म्हणजे त्याने सुरुवातीच्या काळातच आपल्या प्रयोगांची नोंद करून ठेवण्याचे महत्त्व ओळखले नाही. नंतरच्या काळात त्याच्या काही मित्रांनी त्याला याचे महत्व पटवून दिले आणि तो आपल्या प्रयोगाच्या नोंदी ठेवू लागला.

फक्त ३२व्या वर्षी जगाचा निरोप घेतलेल्या या शास्त्रज्ञाला खरी ओळख मिळाली ती त्याच्या मृत्यूनंतरच!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

ज्या राजाला मुघल व सुलतानी सैन्य हरवू शकले नाही त्याचा पोटच्या मुलानेच घात केला

Next Post

टीव्हीवर लागणाऱ्या ‘सास-बहू’छाप मालिकांना डेली सोप का म्हणतात..?

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

टीव्हीवर लागणाऱ्या 'सास-बहू'छाप मालिकांना डेली सोप का म्हणतात..?

पाकिस्तानच्या निर्मितीमागे जिन्नांपेक्षा मोठं योगदान या माणसाचं आहे..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.