The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अलेक्झांडर फ्लेमिंग नव्हे तर या शास्त्रज्ञाने पहिल्या अँटिबायोटिकचा शोध लावला होता…

by द पोस्टमन टीम
21 April 2025
in विज्ञान तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


पेनिसिलीन या प्रतिजैविकाचा शोध कसा लागला याची कथा आपण ऐकली आहे, १९२८ साली अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचा संशोधक आपल्या प्रयोगशाळेत प्रयोग करत असताना, त्याने एका पेट्री डिशमध्ये एका बॅक्टेेरीयाला ठेवलं होतं, थोड्या वेळाने त्याने बघितले असता त्याला लक्षात आले की बॅक्टेरीयाच्या जागी एक फंगस स्वरूपाचा पदार्थ तयार झाला होता. फ्लेमिंगने त्या पदार्थाचं योग्य निरीक्षण केलं असता त्याला आढळून आलं की या फंगसमध्ये प्रतिजैविक गुण आहेत. मग त्यांनी या फंगसचं नामकरण पेनिसिलीन असं केलं. हेच पेनिसिलीन त्याकाळी जगातलं सर्वाधिक आजारांवर उपचारासाठी वापरलं गेलेलं प्रतिजैविक बनलं आणि त्याने असंख्य रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत केली.

पण वरील या कथेचा पहिला भाग खरा असला तरी फ्लेमिंग यांनी जिवंत प्राण्यांवर पेनिसिलीनचा उपयोग करून औषधाची निर्मिती केलीच नव्हती. या फंगसच्या संशोधनानंतर तब्बल १० वर्षांनंतर त्याचे रूपांतर मूळ औषधात करण्यात आलं. हे करण्यामागे चार संशोधकांची मेहनत होती, पण हे चार संशोधक कधी जगासमोर येऊ शकले नाही.

फ्लेमिंगने आपल्या बॅक्टेरीयल कॉलोनीजमध्ये पेनिसिलियम बुरशीचा पेनिसिलियम नॉनेटम या अत्यंत कापसासारख्या फंगसला बघितले होते. फ्लेमिंग आणि ते ज्या सेंट मेरी इस्पितळात कार्यरत होते, तेथील कर्मचारी यांनी मिळून त्या फंगसला मूळ बॅक्टेरीयापासून वेगळं करण्याचा प्रयत्न अनेक आठवडे करून बघितला परंतु त्यांना अपयश आलं, शेवटी त्यांच्या हाती एक प्रदूषित आणि कच्च्या स्वरूपाचं प्रॉडक्ट आलं.

News18.com

तरी ते १९२९ साली त्याचा संशोधनाचे प्रकाशन केले, त्याला त्याने “On the Antibacterial Action of Cultures of a Penicillium, with Special Reference to Their Use in the Isolation of B. influenzae.” असे लांबलचक नाव दिले. या नावाप्रमाणे पेनिसिलिनच्या प्रतिजैविक क्रियेचं इन्फ्लुएंझा या जिवाणूच्या संपर्काने होणारे स्थित्यांतर असे सूचित होते. हे कुठल्याही प्रकारे हे एक प्रकारचे औषध आहे, हे अधोरेखित करू शकत नाही. फ्लेमिंगचे बहुतांश संशोधन हे पेनिसिलीनला बॅक्टेरियापासून वेगळं करण्याचा कार्यपद्धतीवर अवलंबून होतं.



त्याची जरी जगप्रसिद्ध जैविकतज्ञ ओळख असली तरी तो जास्त काळ संशोधन करू शकला नव्हता, हे देखील तितकेच सत्य आहे. १९३८ साली डॉ. हॉवर्ड फ्लोरे यांनी फ्लेमिंगच्या संशोधनाचा पेपर वाचला आणि त्यांना बॅक्टेरीया बुरशी यांच्या संबंधांविषयी कुतूहल निर्माण झालं. फ्लेमिंगच्या प्रयोगाच्या आधारावर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लॅबमध्ये या बॅक्टेरीया आणि बुरशीच्या एकमेकांवर होणाऱ्या परिणामांवर अभ्यास करायला सुरुवात केली.

pinterest.com

फ्लोरे आणि त्यांच्या टीमने यावर काम करायला सुरुवात केली. त्यांच्या या टीममध्ये असलेल्या बायोकेमिस्ट अर्नेस्ट चेन यांचा समावेश होता, त्यांनी फ्लेमिंगची चूक सुधारत त्यांनी वेगळं केलेल्या क्रूड सॅम्पलपासून एक संपूर्ण सुधारितपणे त्या फंगसला वेगळं करण्यात यश मिळवलं, इतकंच नाही त्यांनी त्याचा प्रयोग स्ट्रेप्टोकोकस या बॅक्टरीयावर केला.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

त्यांनी पेनसिलीनयुक्त इंजेक्शन आणि त्या विरहित असलेलं इंजेक्शन उंदरांना देऊन बघितलं, ज्यात पेनिसिलीन होतं, तो  उंदीर जगला.

पण या कामात त्यांना २००० लिटर बुरशीचा व्यय केल्यावर एका व्यक्तीवर उपचार करता येईल इतकं पेनिसिलीन तयार करता आलं, ते देखील पुरेसं नव्हतं. त्यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलवर याचा दुर्दैवी प्रयोग करून बघितला, तो कॉन्स्टेबल अत्यंत विखारी ज्वराने ग्रस्त होता.

त्याला सलग पाच दिवस पेनिलसिलीन देण्यात आलं पण त्यामुळे त्याच्या तब्येतीत आधी सुधारणा झाली पण पुढे पेनिसिलीनचा साठा संपला आणि त्या पोलिसाला प्राणाला मुकावं लागलं. त्या संशोधकांना जाणीव झाली की जोवर ते मोठ्या प्रमाणावर पेनिसिलीनचं उत्पादन करत नाही, तोपर्यंत त्यांचा संशोधनाचा व्यापक उपयोग अशक्य आहे.

जेव्हा हे संशोधन सुरु होतं तेव्हा जगभरात विश्वयु*द्धाची नांदी होती, ब्रिटन यु*द्धात उतरला होता, त्यामुळे फ्लोरे व त्यांचे सहयोगी असलेल्या हेटली यांनी अमेरिकेची मदत घेण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेने तोपर्यंत यु*द्धात उडी घेतली नव्हती. त्यांना अमेरिकेत संशोधनाची संधी मिळाली. पहिले काही दिवस प्रयत्न करून देखील त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. मग त्यांनी पेनिसिलिनचा नवीन स्ट्रेन शोधायला घेतला.

Cosmos Magazine

त्यांनी त्यासाठी जगभरातल्या मातीच्या नमुन्यांना गोळा करायला सुरुवात केली. त्यांनी त्या नमुन्यांचे परीक्षण करून अपेक्षित बुरशीचा स्ट्रेन शोधायला सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणावर रिसर्च केल्यावर त्यांना आढळून आलं की टेक्सासच्या मातीत मिळालेली बुरुशी जिचं नाव होतं पेनिसिलियम चायरोगासम, ही अत्यंत उत्पादक असून यामुळे दहापट जास्त प्रमाणात उत्पादन करणे शक्य आहे. पुढे फ्लोरे यांनी त्या प्रजातीला एक्स रे ट्रीटमेंट देऊन तिची उत्पादन क्षमता दुप्पट केली.

पुढे मोठ्या प्रमाणावर पेनिसिलीनचं उत्पादन करण्यात आलं, न्यूमोनियावर पेनिसिलीन रामबाण उपाय होता.

दुसऱ्या विश्वयु*द्धात पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत तब्बल १८ टक्के घेत न्यूमोनियात नोंदवण्यात आली ती पेनिसिलिनच्या या फ्लोरे करवीत संशोधनामुळेच!

या संशोधनासाठी फ्लेमिंग, फ्लोरे आणि हेटली यांना १९४५ साली नोबेलने सन्मानित करण्यात आलं. मग आता तुम्हाला प्रश्न पडू शकतो की जर योगदान सर्वांचं होतं तर फ्लेमिंगला सर्व श्रेय का देण्यात येतं ? तर ऑक्सफर्ड प्रेसनुसार फ्लेमिंग हे विस्टन चर्चिल यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांनी संशोधन आपलं असल्याची बतावणी करून सर्व प्रसिद्धी खेचून घेतली आणि फ्लोरे यांना ती मिळू शकली नाही. विशेष म्हणजे फ्लोरेंनी तशी अपेक्षा बाळगली नाही.

आज प्रतिजैविकांचा विज्ञानाचा पिता म्हणून जरी जग फ्लेमिंगला ओळखत असलं तरी या क्षेत्रात त्याचा वाटा फार कमी होता, ज्या लोकांनी यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले ते मात्र दुर्लक्षितच राहिले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: scientist
ShareTweet
Previous Post

या शास्त्रज्ञाच्या समुद्र सफारीमुळे सुटलं होतं ‘उत्क्रांती’चं कोडं

Next Post

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या भयानक व्हायरसबद्दल जाणून घ्या

Related Posts

विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
xr:d:DAEiXqP5IBY:4353,j:5814571545322122661,t:24041011
विज्ञान तंत्रज्ञान

एकेकाळी सायन्स फिक्शन वाटणारी फ्लायिंग कार आता प्रत्यक्षात उतरणार आहे, पण…

8 April 2025
विज्ञान तंत्रज्ञान

शेतकऱ्यांना स्थानिक भाषेत पिकाविषयी सर्व माहिती देणारं ॲग्रीशक्ती पहिलंच ॲप..!

5 April 2024
विज्ञान तंत्रज्ञान

नवीन आलेल्या सोडियम-आयन बॅटरीज् लिथियम-आयन बॅटरीजसाठी पर्याय ठरत आहेत..!

26 March 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: गगनयान: नेमकं काय आणि कशासाठी?

28 February 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर: सॅम अल्टमन आणि ओपनएआयमध्ये नेमकं चाललंय काय..?

27 November 2023
Next Post

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या भयानक व्हायरसबद्दल जाणून घ्या

स्वामी श्रध्दानंदांचा मारेकरी 'अब्दूल'ला माफ करण्यासाठी गांधीजींनी पत्र लिहिलं होतं

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.