The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दहा वर्षांच्या पोटच्या मुलाला सोबत घेऊन सावित्रीमाई प्लेगग्रस्त रुग्णांचा आधार बनली होती.

by द पोस्टमन टीम
10 March 2025
in इतिहास, आरोग्य
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


सावित्रीबाई फुले म्हटलं की आपल्या समोर स्त्री-शिक्षणासाठी आपलं आयुष्य वेचणाऱ्या ज्योतिरावांची पत्नी आणि भारतातील पहिली महिला शिक्षिका, इतकीच प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहते. पण सावित्रीबाई आणि ज्योतिराव या जोडीने केवळ स्त्री शिक्षणच नाही तर असंख्य सामाजिक सुधारणा घडवून आणण्यात प्रत्यक्ष आणि मोलाचे योगदान दिले आहे. ज्योतिराव गेल्यानंतर त्यांनी अगदी समर्थपणे मुलींची शाळा चालवली.

इतकंच नाहीतर सावित्रीबाई आणि त्यांच्या मुलाने पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीत लोकांची सेवा शुश्रूषा करताना आपल्या प्राणांची आहुती दिली होती.

आज आपण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता, आपल्या घरात विलगीकरण करून घेतले आहे. अनेक डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस कर्मचारी आज आपले प्राण संकटात घालून अहोरात्र आपली सेवा करत आहेत. परंतु कोरोना ही काही आपल्या देशात आलेली पहिली महामारी नाही. या आधीदेखील प्लेग आणि स्पॅनिश फ्लूच्या साथीमध्ये असंख्य लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

ब्लॅक डेथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्लेगने देखील एकेकाळी असाच धुमाकूळ घातला होता जसा आज कोरोना व्हायरस घालतो आहे. प्लेग असाच जगभरात पसरला होता आणि अनेक लोकांचा त्यामुळे बळी गेला होता.

१८९६ – ९७ दरम्यान भारतावर प्लेगचे संकट कोसळले. दर आठवड्याला या आजारामुळे तब्बल १९०० लोकांचा जीव प्लेगमुळे जात होता. त्या तुलनेने आजची परिस्थिती निश्चितच चिंताजनक नाही. त्याकाळी प्लेगबद्दल शास्त्रज्ञांमध्ये अनभिज्ञता होती, आता ती नाही. आज शास्त्रज्ञ कोरोनावर संशोधन करून वेगवेगळे उपाय शोधत आहेत.

भारतात एका आठवड्यात १९०० लोक प्लेगमुळे दगावत होते, त्यावेळी देखील जीवाची पर्वा न करता सावित्रीबाई फुले आणि त्यांचा मुलगा यशवंतराव फुले हे प्लेगने ग्रस्त असलेल्या रुग्णांची सेवा करत होते.



 

plague-patients-postman
प्लेगग्रस्त रुग्ण (द बेटर इंडिया)

एका दस्तावेजानुसार सावित्रीबाईंनी मुंढव्यातील एका दलितांच्या वस्तीतील दहा वर्षांच्या लहान मुलाला आपल्या खांद्यावर उचलून मुलगा यशवंतरावांच्या क्लिनिकमध्ये आणले होते. तो लहान मुलगा तर वाचला पण त्यानंतर सावित्रीबाईंना प्लेगची लागण झाली.

हे देखील वाचा

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

१० मार्च १८९७ रोजी त्यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले.

सावित्रीबाई यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे काम नेटाने पाहिले. ज्योतीराव आणि सावित्रीबाई यांना मुलबाळ नव्हते त्यामुळे त्यांनी एक मुलगा दत्तक घेतला होता.

यशवंतराव हा काशीबाई नावाच्या महिलेचा मुलगा होता. पुण्यातील सनातनी ब्राम्हणांनी तिला पतीच्या मृत्यूनंतर संपवण्याचा प्रयत्न केला होता. ज्योतिरावांनी काशीबाईंना त्या नराधमांपासून वाचवले आणि आसरा दिला होता. ती बाई गर्भवती होती. तिला झालेल्या मुलाला ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी दत्तक घेऊन त्याचा सांभाळ केला.

जेव्हा प्लेगची साथ पसरली त्यावेळी सावित्रीबाईंनी यशवंतरावाना दवाखाना चालू करण्याची विनंती केली. ज्यात कुठल्याही जाती पातीचा भेद न करता उपचार करणे शक्य होईल. त्याकाळी जातिव्यवस्था मजबूत होती.

ब्रिटिशांनी त्यावेळी कायदा केला होता की कुठल्याही रुग्णावर त्याची जात-धर्म न बघता उपचार करण्यात येतील. परंतु सनातनी लोकांचा याला प्रचंड विरोध होता. दलित आणि मुसलमान लोकांना त्यांच्यासोबत एकाच चिकित्सालयात ठेवणे त्यांना मान्य नव्हते. हे त्यांना धर्मविरोधी पातक वाटू लागलं होतं.

त्यावेळी दलित समाजातील लोकांच्या मदतीसाठी सावित्रीबाईंनी हे यशवंतरावांकरवी एक दवाखाना पुण्याच्या बाहेरील भागात चालू केला. सनातनी ब्राम्हण ह*ल्ला करतील अशी भीती त्यांना नेहमी वाटायची. त्यामुळे त्यांनी अशा ठिकाणी दवाखाना उघडून गरीब दलितांवर उपचार सुरू केले. त्यांची सेवा करता करता सावित्रीबाईंनी आपले प्राण गमावले. त्यांचा मुलगा यशवंतराव मात्र त्या साथीतून यशस्वीपणे सुटला.

यशवंतराव पुढे सैन्य दलात भरती झाले. १९०५ पर्यंत त्यांनी सेवा बजावली पण त्यावर्षी त्यांना परत यावे लागले कारण पुन्हा प्लेगचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता.

यशवंतरावांना देखील प्लेगने बाधले आणि १३ ऑक्टोबर १९०५ साली त्यांचे निधन झाले.

ज्योतीराव, सावित्रीबाई आणि यशवंतराव यांनी समाजातील दीन-दुबळ्या लोकांचा उद्धार करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं, सुखाचा त्याग केला, कष्ट सहन केले. असंख्य समस्यांना तोंड दिले. परंतु आजच्या कोरोना संकटकाळात अनेक खाजगी डॉक्टर रुग्णसेवा करण्याचा धर्म न निभावता, घरात बसून आहे. अशा लोकांसाठी ज्योतिरावांच्या कुटुंबाने केलेला त्याग समजून घेणे अत्यावश्यक आहे.

आज सर्व आधुनिक संरक्षक मास्क, पीपीई किट असताना डॉक्टर घाबरत आहेत, त्यावेळी सावित्रीबाई आणि यशवंतराव कुठलेही साधन नसताना लोकांची सेवा करत होते. त्यांनी आपले प्राण अर्पून अनेकांना जीवनदान दिले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

Tags: savitribai phule
ShareTweet
Previous Post

चहाचा इतिहाससुद्धा चहा इतकीच तरतरी आणणारा आहे

Next Post

‘वास्को द गामा’ने आधीच अस्तित्वात असलेल्या भारताचा शोध कसा लावला?

Related Posts

आरोग्य

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026
इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
Next Post

'वास्को द गामा'ने आधीच अस्तित्वात असलेल्या भारताचा शोध कसा लावला?

गरज नसतानाही हँडसेट अपग्रेड करण्यामुळे पर्यावरणावर भयानक परिणाम होतायत

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.