पुण्यातील या चिमुकल्याने भाज्यांचं निर्जंतुकीकरण करणारं मशीन बनवलंय!

Get real time updates directly on you device, subscribe now.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


विज्ञानात संशोधनाला वयाचे बंधन नसते, असे म्हटले जाते आणि ते खरे देखील आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान ही अशी क्षेत्रे आहेत जिथे फक्त नि फक्त बुद्धीच्या बळावर मनुष्य चमत्कार घडवून आणतो. मग त्याचे वय ५ वर्षे आहे की ६५ वर्षे याला किंमत याला किंमत नसते, किंमत असते त्याच्या संशोधनाला, त्याच्या बुद्धीला आणि त्या संशोधनातुन होणाऱ्या मानव कल्याणाला!

तंत्रज्ञानाची जननी मनुष्याची गरज आहे. तंत्रज्ञानाचा विकास हा नेहमी प्रतिकूल काळातच अधिक होत असतो आणि या विकासाला चालना देणारे हे गरजेची पूर्तता करणे याला अधिक महत्व देतात.

तंत्रज्ञानाच्या विकासात हातभार लावणारे त्या क्षेत्रातील तज्ञच असतील असं नाही, बऱ्याचदा सामान्य विद्यार्थी देखील अशक्य असं संशोधन करून तंत्रज्ञानाच्या प्रगतीत हातभार लावतात. आता कोरोनाचा या महामारीच्या काळात संशोधन क्षेत्रात अनेक क्रांतिकारी बदल घडले आहेत, नवीन तंत्रज्ञान जन्माला आलं आहे.

नुकतंच या तंत्रज्ञान क्षेत्रात अजून भर घातली आहे १४ वर्षीय आदित्य पाचपांडे या किशोरवयीन शाळकरी मुलाने!

टेस्ला व स्पेस एक्सचा संस्थापक एलोन मस्कला आदर्श मानणाऱ्या पुण्याच्या १४ वर्षीय आदित्य पाचपांडेने एक “सुरक्षा किट’ तयार केली आहे.

या सुरक्षा किटमध्ये अल्ट्रा व्हायोलेंट रेजचा वापर करून कोरोनापासून संरक्षण दिले जात आहे. या संशोधनासाठी आदित्यला पेटंट प्रदान करण्यात आलं आहे.

आदित्य हा नवव्या इयत्तेत शिक्षण घेत असून तो इंडस इंटरनॅशनल स्कुलचा विद्यार्थी आहे. आदित्यला कौन्सिल फॉर सैंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चच्या मेकेनिकल इंजिनिअरिंग विभागाकडून त्याचा UV सॅनिटायझेशन बॉक्ससाठी प्रशंसा पत्र मिळालं आहे.

त्याच्या या “सुरक्षा किट”च्या मदतीने भाजीपाला व फळांवरील विषाणूंचा शंभर टक्के नायनाट करणे शक्य होणार आहे, ज्यावर आपण सॅनिटायझरचा वापर करू शकत नाही. त्याच्या अल्कोहॉल विरहित सॅनिटायझरला अनेकांची पसंती मिळत आहे.

आदित्य या सॅनिटायझर बॉक्सचे दादरच्या भाजी मार्केटमध्ये मोफत वितरण करत आहे. उभा बॉक्समुळे घरगुती भाजीपाल्याचा स्वच्छतेची आणि निर्जंतुकिकरणाची सर्वात मोठी समस्या सुटणार आहे, असं मत आदित्यने व्यक्त केलं आहे.

आदित्य सांगतो की त्याच्या मनात कोरोनाच्या या काळात आली ज्यावेळी त्याला प्रश्न पडायचं की भाजीपाल्याचे कशा प्रकारे निर्जंतुकीकरण करणे शक्य होईल? त्याने पुढे यावर स्वतः संशोधन केले, यासाठी त्याने अल्युमिनियमला एका विशिष्ट वातावरणात पोटॅशियम परमॅग्नेटच्या मदतीने सूर्यप्रकाशात ठेवल्यावर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया लक्षात आली. यातूनच त्याचा हा सॅनिटायझर बॉक्स आकारास आला.

भविष्यात अशा १००० बॉक्सची निर्मिती करून त्यांचे वाटप करण्याची तयारी आदित्य करतो आहे. आदित्यच्या या संशोधनामुळे भाजीपाला संवर्धनाला मदत होईल व विषाणूचा प्रसाराला रोखणे शक्य होणार आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: एवढं आवडलंय तर शेअर करा, कॉपी कशाला करताय..!