The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या ४ भारतीयांना युनोने द*हश*तवादी म्हणून घोषित करावं यासाठी पाकिस्तानने जंग जंग पछाडलं

by द पोस्टमन टीम
23 December 2025
in विश्लेषण, राजकीय
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


जेव्हापासून नेहरूंनी १९५० साली कश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला त्यानंतर पाकिस्तानने प्रत्येक वेळी भारताच्या कुरापती काढलेल्या आहेत आणि संयुक्त राष्ट्रांमध्ये जाऊन मात्र उलट भारताच्या विरोधात नगारा पिटला आहे.

जम्मू-कश्मीर संदर्भात पाकिस्तानने युनोमध्ये नेहमीच भडकाऊ भाषणे केली आणि खोटी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानचा हा प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी देखील होत होता.

परंतु अमेरिकेतील ०९/११च्या ह*ल्ल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली. त्याअगोदर फक्त भारताला पाकिस्तानच्या द*हश*तवादी कारवायांचा त्रास व्हायचा. मात्र युरोपियन देश आणि अमेरिका यांना जेव्हा द*हश*तवादाचा फटका बसू लागला, तेव्हा मात्र सगळे खडबडून जागे झाले.

इतके दिवस अमेरिकेने पाकिस्तानमध्ये असणाऱ्या द*हश*तवादी संघटनांकडे दुर्लक्ष करत होते. एवढेच नाही तर त्यांना पैसेही पुरवले. दुसरीकडे अमेरिकेबरोबर लांगूलचालन करून पाकिस्तान चीनची दाढी देखील कुरवाळत होता. जेणेकरून भारताला कोंडीत पकडता येईल.



मात्र आता परिस्थिती विपरीत आहे २०१४ साली केंद्रात सरकार बदलले. त्यानंतर भारताचे परराष्ट्र धोरण पूर्णच बदलले. भारताच्या पंतप्रधानांनी देशोदेशी जाऊन तिथल्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या, त्यांचे भारताबद्दलचे मत बदलण्यास भाग पाडले. याचाच परिणाम म्हणजे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा अधिक मजबूत झालेली आहे.

युनोमध्ये आता पाकिस्तानने कितीही कांगावा केला तरी बाकीचे देश त्याला काडीचीही किंमत देत नाहीत.

नुकतीच संयुक्त राष्ट्र संघ स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त युनोच्या मुख्यालयामध्ये मोठा कार्यक्रम साजरा करण्यात आला होता. त्यासाठी देशोदेशीचे राजदूत उपस्थित होते. या बैठकीमध्ये पाकिस्तानने कश्मीर मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद छेडला होता. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

पाकिस्तान हे द*हश*तवादाचे केंद्र बनले आहे. अनेक द*हशत*वादी संघटनांच्या लोकांनी पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेला आहे. शिवाय पाकिस्तानमध्ये गेली कित्येक वर्षे अल्पसंख्यांकांवर प्रचंड अन्याय होत आहे. बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे, अशा अनेक मुद्द्यांवर भारताने पाकिस्तानच्या मुद्द्यांचे खंडन केले होते. ज्याला अनेक देशांनी अनुमोदन दिले.

सध्या जगभरात भारताचा वाढलेला प्रभाव पाहून पाकिस्तानची प्रचंड जळजळ होते आहे. कुठल्या मुद्द्यावरून भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडीत पकडता येईल याकडे पाकिस्तानचे लक्ष असते.

युनोने अल-कायदा प्रतिबंधक सूची नावाची लिस्ट बनवलेली आहे. ज्यामध्ये जगभरात जे अल कायदाचे हस्तक छुप्या रीतीने काम करतात त्यांना ओळखण्याचे आणि त्यासंदर्भात प्रत्येक देशाच्या सरकारला अलर्ट ठेवण्याचे काम केले जाते.

या सूचीमध्ये पाकिस्तानमधील जवळपास २०० हून जास्त नागरिकांचा उल्लेख आहे ही विशेष बाब. तरीही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या चार भारतीयांचे नाव या प्रतिबंधक सूचीमध्ये घालावे म्हणून युनोमध्ये जोरदार निदर्शने केलेली होती.

अंगारा अप्पाजी, गोविंद पटनायक, अजय मिस्त्री, वेणुमाधव डोंगरा. या चार भारतीयांची नावे युनोच्या अल-कायदा प्रतिबंधक सूचीमध्ये सामील व्हावी म्हणून पाकिस्तानचे प्रयत्न चालू होते.

हे चौघेही सध्या अफगाणिस्तान येथे काम करतात.

पाकिस्तान केवळ त्या सूचीमध्ये यांची नावे यावीत एवढ्यावरच थांबला नाही तर, या चौघांना एकटे गाठून त्यांच्यावर ह*ल्ला करून त्यांना ठार मारण्याचे षड्यंत्र देखील पाकिस्तानने रचले होते. जेव्हा पाकिस्तानने युनोमध्ये हा ठराव मांडला तेव्हा या ठरावाला कुठल्याही देशाने पाठिंबा दिला नाही. उलट जर्मनी, बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, इजिप्त, पोलांड, रशिया या देशांनी पाकिस्तानच्या या मुद्द्याचे खंडन केले.

याअगोदर जून आणि जुलैमध्ये देखील या भारतीय नागरिकांना द*हशत*वाद्यांचा दर्जा द्यावा अशी मागणी पाकिस्तानने युनोमध्ये केली होती. युनोच्या कामकाजाचे राजकारण करण्याचे हे पाकिस्तानचे हीन प्रयत्न आहेत अशा शब्दांत भारताने प्रतिक्रिया नोंदवली.

सप्टेंबर महिन्यात जेव्हा पाकिस्तानने पुन्हा एकदा या चार भारतीय नागरिकांच्या विरोधात युनोमध्ये तक्रार केली असता युनोच्या सुरक्षा समितीच्या सदस्य देशांनी भारताला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानची मागणी फेटाळून लावली.

आता प्रश्न असा आहे की अफगाणिस्तानमध्ये काम करणाऱ्या या चार भारतीयांबाबत पाकिस्तानने हे पाऊल का उचलले?

पूर्वी अफगाणिस्तानमध्ये जास्तीत जास्त पाकिस्तानी नागरिक काम करत असायचे. अफगाणिस्तानमध्ये जे प्रोजेक्ट चालत असत मग ते शैक्षणिक असतील, आर्थिक असतील, तंत्रज्ञानविषयक असतील त्यामध्ये मूलतः पाकिस्तानवरून मनुष्यबळ उपलब्ध व्हायचे.

परंतु आता अफगाणिस्तान भारताकडून वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळाची मदत घेतो. भारतातील अनेक इंजिनियर्स, डॉक्टर्स, सरकारी अधिकारी, अभियंते आणि इतर विविध क्षेत्रातील कारागीर अफगाणिस्तानला जाऊन काम करीत असतात. यामुळे पाकिस्तानच्या रोजगारनिर्मितीला मोठा फटका बसल्याचे सांगण्यात येते.

त्यामुळे भारतीय कामगार हे काम करण्याच्या लायकीचे नाहीत आणि त्यांचे द*हश*तवाद्यांबरोबर संबंध आहेत असा बादरायण शोध पाकिस्तान लावत आहे.

या चौघांपैकी वेणू माधव डोंगर हे अभियंता आहेत. अफगाणिस्तानमधल्या पावर प्रोजेक्टवर त्यांनी काम केलेले आहे ज्यामुळे अफगाणिस्तानमधील खेड्यांना वीज पुरवता येईल.

बाकीचे तीन लोक असेच वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये काम करतात. त्यांचे पद मोठे आहे आणि त्यांना अधिकार भरपूर आहेत हे लक्षात घेऊन पाकिस्तानने त्यांच्यावर निशाणा चालवलेला होता. ही गोष्ट अफगाणिस्तानमध्ये असणाऱ्या भारतीय परराष्ट्र मंडळाच्या कार्यालयाला समजल्यानंतर त्यांनी या चारही भारतीयांना अफगाणिस्तानमधून जुलै महिन्यात बाहेर काढले होते.

हे चौघही आज भारतात परतले आहेत. मात्र या लोकांना ब्लॅक लिस्ट करण्याची मागणी पाकिस्तानने लावून धरली होती. पाकिस्तानची ही मागणी युनोने स्पष्ट शब्दांमध्ये फेटाळून लावली. हा भारताचा एक मोठा राजनैतिक विजय झाला.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

कॉंग्रेसच्या रॅलीला जागा दिली नाही म्हणून या कलाकाराला रस्त्यावरच मारून टाकण्यात आलं होतं

Next Post

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला निझाम आता दोन खोल्यांत आयुष्य काढतोय

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेला निझाम आता दोन खोल्यांत आयुष्य काढतोय

ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून या मुसलमान मंत्र्याने राजीव गांधींच्या विरोधात जाऊन राजीनामा दिला होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.