The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्वतःच्या वेगळ्या स्वतंत्र देशासाठी ‘इस्लामिक स्टेट’शी लढणारे कुर्दिश लोक कोण आहेत..?

by Nachiket Shirude
10 October 2025
in राजकीय
Reading Time: 1 min read
1
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


जगभरात असे अनेक समुदाय आहेत ज्यांना स्वत:चं घर नाही. त्यांची संख्या मोठी आहे, तरी त्यांना एक राष्ट्र म्हणून मान्यता मिळालेली नाही. हे समुदाय इतर राष्ट्रांचा आसरा त्यासाठी घेत असतात. ह्या समुदायांपैकी ज्यू वगळता इतर कुठल्याच समुदायाला आपले राज्य पुन्हा मिळवता आलेले नाही.

अशाच काही दुर्दैवी समुदायांपैकी एक समुदाय आहे कुर्दिश लोकांचा समुदाय, ज्यांच्या आयुष्याला आज यु*द्धाचे ग्रहण लागले आहे.

सतत अशांततेच्या वातावरणात आपला जीव मुठीत धरून हे कुर्दीश लोक आपले जीवन कंठीत आहेत.

आज २ ते ३ कोटी कुर्द लोक इराक, सिरीया, तुर्कस्तान आणि आर्मेनियाच्या डोंगराळ भागात वास्तव्यास आहेत. त्यांचा समुदाय  मध्यपूर्वेतील चौथा सर्वांत जास्त लोकसंख्या असणारा वांशिक गट आहे. परंतु त्यांना अजूनही स्वतःचं एक राष्ट्र नाही. ते अजूनही विस्कळीत अवस्थेत जीवन जगत आहेत.

कुर्दिश लोक हे बहुसंख्येने सुन्नी मुस्लीम आहेत. मिसेपोटेमिया साम्राज्याच्या काळापासून हे लोक या प्रदेशात वास्तव्यास आहेत. यांच्यात धार्मिक भेद देखील आहेत पण ते सांस्कृतिकदृष्ट्या एक आहेत.



विसाव्या शतकात कुर्दांचा राष्ट्रवाद जागृत झाला. त्यांनी स्वत:च्या वेगळ्या ‘कुर्द्स्तान’ची मागणी केली.

पहिलं महायु*द्ध संपल्यावर झालेल्या करारनाम्यात कुर्दांना वेगळं राज्य देण्याची तरतूद करण्यात आली होती. पण त्यांचा नशिबात वेगळं राष्ट्र नव्हतं. तुर्कस्तानने तीनच वर्षात त्यांची मागणी धुडकावून लावली.

हे देखील वाचा

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

केमाल पाशाने तो करार मोडीत काढला. गेल्या १०० वर्षांपासून त्यांचा हा स्वायत्त राज्यासाठीचा लढा अद्यापही सुरु आहे.

२०१३ च्या मध्यावधीत इस्लामिक स्टेटचा उदय झाला. या दह*शतवादी संघटनेने आपले जाळे सीरियाच्या ईशान्य भागात असणाऱ्या कुर्दिश लोकांच्या वस्ती स्थानात विस्तारायला सुरुवात केली. या डोंगराळ भागात लपण्यासाठीचे अड्डे बनवण्याचा त्यांचा डाव होता.

पण यामुळे कुर्दिश लोक व इस्लामिक स्टेट यांच्यात मोठा संघर्ष उभा राहिला. कुर्दिश लोकांच्या सिरीयन कुर्दिश डेमोक्रॅटिक पार्टीच्या पीपल्स प्रोटेक्शन युनिट या लष्करी संघटनेने इस्लामिक स्टेटच्या विरोधात आपला मोर्चा उघडला.

एकीकडे सिरियातील कुर्दिश इस्लामिक स्टेटशी लढा देतच होते की इराकमध्ये असलेल्या इस्लामिक स्टेटच्या द*हश*तवाद्यांनी कुर्दिश लोकांच्या कॉलनीवर ह*ल्ला केला. या हल्ल्याने इराकमधील स्वायत्त कुर्दिश प्रांतातून पेश्मेर्गा सैन्य तुकड्यांनी इस्लामिक स्टेटशी लढा देण्यास सुरुवात केली.

पण जि*हादी लोकांशी पेश्मेर्गा सैन्याला लढता आले नाही, उत्तर इराकमधून हे सैन्य मागे हटायला लागलं आणि पेश्मेर्गा सैन्याचा पराभव दृष्टीक्षेपात असताना अमेरिकेने आपली मदत पाठवली.

आपल्या फायटर जेट्सच्या मदतीने अमेरिकेने आयसीसचा पुरता धुव्वा उडवला आणि पेश्मेर्गा सैन्य पुन्हा नव्याने लढाईस उतरले.

इराक आणि सिरीयाप्रमाणे तुर्कस्तानातील कुर्दिश लोक हे आपले स्थानिक लष्करी गट तयार करून तुर्कस्तानात आपलं स्वायत्त राज्य स्थापन करू बघत होते.

पुढे इस्लामिक स्टेटने सिरियात आपलं डोकं पुन्हा वर काढलं आणि तेथील कुर्दांच्या कोबाने नावाच्या शहरावर त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. यामुळे असंख्य कुर्दिश लोक हे तुर्कस्तानच्या सीमेवर आपला जीव मुठीत धरून पळाले, परंतु तुर्कस्तानच्या एर्दोगनच्या शासनाने त्यांना अडवले आणि तुर्कस्तानातील कुर्दाना इस्लामिक स्टेटविरोधातल्या कुठल्याच लढाईत सहभागी होण्यावर बंदी घालण्यात आली.

यात तब्बल १६०० लोकांनी आपले प्राण गमावले होते.

पुढे अमेरिकेने सिरीयन डेमोक्रॅटिक अलायन्सची स्थापना केली. यात सिरीयन कुर्द, अरबी सैन्य आणि अमेरिकन सैन्याचा समावेश करण्यात आला आहे. या तिन्ही सैन्य दलांनी एकत्र येऊन इस्लामिक स्टेटवर ह*ल्लाबोल केला.

या SDF च्या सैनिकांनी इस्लामिक स्टेटचे बस्तान हलवले. त्यांनी इस्लामिक स्टेटचा कडवा प्रतिकार करत, त्यांना माघारी पाठवले.

काही काळातच इस्लामिक स्टेटची राजधानी रक्कावर त्यांनी कब्जा केला आणि या प्रदेशातील इस्लामिक स्टेटचे अस्तित्व जवळ जवळ संपुष्टात आणले.

पण २०१९ साली अमेरिकेने या युतीतून माघार घोषित केली आणि आपले सैन्यदल लवकरच सिरीयातून माघार घेईल अशी घोषणा केली. यामुळे मात्र सिरीयन कुर्दीशांच्या समोर एक नवा पेच उभा राहिला आहे.

एकीकडे तुर्कस्तान कुर्दिश सैन्याच्या विरोधात उभा राहिला असताना अमेरिकेचा निर्णय एक प्रकारे कुर्दिश लोकांना गडद अंध:कारात ढकलणारा होता.

इस्लामिक स्टेटला यामुळे बळकटी मिळून ते देखील मोर्चे बांधणीला लागले आहेत. पण इस्लामिक स्टेटचा म्होरक्या बगदादी मारला गेला आहे, त्यामुळे तात्पुरती ही समस्या मिटली आहे. पण ती कधीही वर तोंड काढू शकते. पण तुर्कस्तानच्या आक्रमक धोरणामुळे कुर्द अजूनही अडकून पडले आहेत.

तुर्क कुर्दीशांच्या विरोधात का आहे?

तुर्कस्तानात कुर्दिश लोकांची संख्या ही १५-२० टक्के आहे. गेल्या शंभर वर्षांपासून तुर्की अधिकाऱ्यांच्या हातून कुर्दिश लोकांचा छळ केला जातो आहे. तिथे कुर्दिश लोकांच्या खानपान आणि पेहरावावर बंदी घालण्यात आली आहे.

तिथे कुर्दांना राष्ट्राचा शत्रू समजले जाते. याचं कारण वेगळ्या कुर्द्स्तानच्या चळवळीचा उगम हा तुर्कस्तानात झाला होता.

१९७८ साली अब्दुल्ला ओक्लान याने पीकेके नावाच्या संघटनेची स्थापना केली, जिने स्वातंत्र्य कुर्द्स्तानची चळवळ हाती घेतली. यातून एक मोठा संघर्ष उभा राहिला ज्यामध्ये ४० हजारापेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तुर्कस्तान आणि कुर्द्स्तानच्या ह्या टोळ्या यांच्यात सदैव यु*द्ध सुरु असतं.

इस्लामिक स्टेटच्या ह*ल्ल्यानंतर कुर्दिश लोकाना तुर्कस्तानचा प्रवेश नाकारला जाण्यामागे हे एक कारण आहे.

जर या दोन्ही देशातील कुर्दांनी ह*ल्ला केला तर तुर्कस्तानमध्ये यादवी माजेल, या भीतीपोटीच तुर्कस्तानमध्ये सिरीयन कुर्दांना प्रवेश नाकारून तुर्की कुर्दांवर बंधनं लादण्यात आली होती.

एकंदरीत मध्य पूर्वेत कुर्दिश लोकसंख्या एका मोठ्या भयाच्या छायेखाली जगत आहे. त्यांना अस्तित्व आहे पण ते अस्तित्व सिद्ध करायला त्यांना स्वतःचं घर नाही. इस्लामी असून देखील त्यांच्याप्रती कुठलीच सद्भावना इतर इस्लामी देशात नाही.

आज कुर्दांची अवस्था फार दयनीय असून ते स्वत:च्या घरात बेघर झाले आहेत. आता आंतरराष्ट्रीय समुदायाकडे डोळे लावून बसण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाही.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

Tags: AmericaDonald TrumpTurk
ShareTweet
Previous Post

‘शकुंतला देवींच्या’ स्पीडसमोर कम्प्युटर पण फिका पडायचा

Next Post

सिक्कीम भारतात सामील कसा झाला ? भाग २ : नेहरूंचा अनाठायी हस्तक्षेप

Related Posts

राजकीय

एक्सप्लेनर: इलेक्टोरल बॉण्ड्सचं प्रकरण नेमकं काय आहे?

30 March 2024
राजकीय

कायम रशियाचा राष्ट्राध्यक्ष राहण्यासाठी पुतिनने घटनाही स्वतःच्या बाजूने वळवलीये..!

25 March 2024
इतिहास

लोकसभेत लोहिया भाषणाला उभे राहिल्यावर पंतप्रधानसुद्धा बॅकफुटवर जात असत..!

7 February 2024
इतिहास

हरित क्रांतीच्या ‘बिहाइंड द सीन्स’ काम करणाऱ्या या लोकांबद्दल खूप कमी जणांना माहित असेल..!

19 January 2026
राजकीय

सार्वजनिक ठिकाणी स्मोकिंग अलाऊड नाही याचं कारण म्हणजे मिलिंद देवरा यांचे वडील..!

15 January 2024
विश्लेषण

Explained: ज्ञानवापी मशिदीचा वाद नेमका काय आहे? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स.

22 May 2022
Next Post
sikkim crisis featured

सिक्कीम भारतात सामील कसा झाला ? भाग २ : नेहरूंचा अनाठायी हस्तक्षेप

जमनालाल बजाज - एखाद्या साधू-संता प्रमाणे निर्मोही आयुष्य जगलेला उद्योगपती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.