The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘आंद्रे नेल’ला सिक्स मारून श्रीसंतने मैदानात नाचून केलेलं सेलिब्रेशन आजही आपलं फेव्हरेट आहे

by द पोस्टमन टीम
14 November 2024
in क्रीडा
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब 


क्रिकेटच्या मैदानावर दोन खेळाडूंमध्ये होणारी ‘तू-तू, मैं-मैं’ ही काही नवीन गोष्ट नाही. आतापर्यंत मैदानावर दोन खेळाडूंमध्ये वाद झाल्याची अनेक प्रकरणं घडून गेलेली आहेत. मात्र, काही घटना अशा आहेत आपल्या मनाच्या पटलावर कोरल्या गेल्या आहेत. त्या घटनांना आपण आयुष्यभर विसरू शकत नाहीत. उदाहरणचं घ्यायचं झालं तर, जावेद मियाँदाद आणि किरण मोरेच्या ‘माकड उड्या’ घ्या किंवा हरभजन आणि अँड्र्यू सायमंड्सची ‘हमरी-तुमरी’ घ्या. या दोन्ही घटना भारतीय क्रिकेट चाहत्यांना कायम आठवतील.

२००६ मध्ये अशीच एक घटना घडली होती. ती घटना पाहून अनेकांना लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये शर्ट काढून फिरवणारा सौरव गांगुली आठवला होता. शाळकरी पोरासारख्या दिसणाऱ्या एका भारतीय बॉलरनं दक्षिण आफ्रिकेच्या फास्ट बॉलरच्या समोर असा काही डान्स केला होता की, त्यावेळी कॉमेंट्री बॉक्स, स्टेडियममधील प्रेक्षक, ड्रेसिंग रूममधील खेळाडूंसह मैदानातील सर्व खेळाडूंना हसू आवरणं कठीण झालं होतं. हा खेळाडू कोण होता? त्यानं क्रिकेट ग्राउंडमध्ये डान्स का केला होता? या प्रश्नांची उत्तरं देणारा हा लेख…

२००६ मधील भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट दौऱ्यापासून ही गोष्ट सुरू होते. अर्थात त्याला पूर्वीची देखील थोडीफार पार्श्वभूमी होती हे नाकारून चालणार नाही. भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा ग्रेग चॅपेल यांच्या हातात होती. भारतीय संघाचा कर्णधार असलेल्या सौरव गांगुलीला चॅपेलनं बाहेरचा रस्ता दाखवला होता. याशिवाय टीममध्ये रोटेशन पॉलिसी देखील लागू केली होती. त्याचा परिणाम म्हणून आफ्रिकन दौऱ्यापूर्वी भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाकडून ४-१ अशी हार स्वीकारून आला होता. मात्र, त्यानंतर झालेली टेस्ट सिरीज भारतानं खिशात घातली होती.

३५ वर्षानंतर भारतानं वेस्ट इंडिजमध्ये कसोटी मालिका जिंकून दाखवली होती. त्यामुळं पाच वनडे आणि तीन टेस्ट मॅच खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाकडून थोड्याफार अपेक्षा तर सर्वांनाच होत्या. मात्र, नवीन कर्णधार राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या भारतीय संघानं पाच सामन्यांची वनडे सिरीज अगदी सहज गमावली.

२००७ च्या क्रिकेट वर्ल्डकपच्या अगोदर झालेल्या वनडे सिरीजमध्ये भारताला व्हाईट वॉशचा सामना करावा लागला. भारतीयांचं अनोखं क्रिकेट प्रेम तर आपल्याला माहितीच आहे. वेळ आली तर खेळाडूंच्या घरांवर बाटल्या फेकणास देण्यास देखील आपण मागे पुढे पाहत नाही. व्हाईट वॉश मिळाल्यानंतर गोंधळ तर होणारच होता. क्रिकेट चाहत्यांच्या दबावाचा विचार करून टेस्ट सिरीजसाठी पुन्हा गांगुलीला कर्णधार म्हणून बोलवण्यात आलं. त्यानंतर सुरू होतो आपल्या गोष्टीचा दुसरा अंक.



टेस्ट सिरीज सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या ‘रेस्ट ऑफ साउथ आफ्रिका’ संघासोबत आपल्याला सराव सामना खेळावा लागणार होता. मात्र, हे सामने आपल्या चिंतेचं कारण नव्हतं. आपली चिंता दुसरीच होती. दक्षिण आफ्रिकेतील वेगवान खेळपट्ट्यांवर वेगवान मारा करण्यासाठी आपल्याकडं फक्त एक भरोशाच्या बोलर होता, तो म्हणजे एस श्रीशांत. संपूर्ण टेस्ट सिरीज आपण त्याच्या बळावर खेळणार होतो. त्यानं आपली कामगिरी चोख बजावली. मात्र, तो एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत राहिला.

सराव सामन्यांच्या अगोदर रेस्ट ऑफ साउथ आफ्रिका संघाचा कर्णधार जॅक्विस रुडॉल्फनं पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यानं श्रीशांतचं मानसिक खच्चीकरण करण्यास केलं होतं. ही गोष्ट श्रीशांतच्या डोक्यात होती. मात्र, गांगुलीनं दिलेल्या सल्ल्यामुळं श्रीशांत फक्त आपल्या बोलिंगच्या माध्यमातून उत्तर देणार होता.

हे देखील वाचा

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

जेव्हा वॉन्डरर्सच्या मैदानावर कसोटी सामना सुरू झाला तेव्हा एकट्या श्रीशांतनं पहिल्या डावामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या पाच बॅट्समन्सला माघारी धाडलं. हे पाचही बॅट्समन एक से बढकर एक दिग्गज होते : हाशीम आमला, जॅक कॅलिस, शॉन पोलॉक, ग्रॅमी स्मिथ आणि मार्क बाउचर. संपूर्ण आफ्रिकन संघ केवळ २४९ धावांवर गुंडाळला गेला होता.

त्यानंतर भारतीय संघ मैदानावर आला. आपल्या डावात भारतीय संघांनं जवळपास ४०० धावांची लीड मिळवली होती आणि व्हि. व्हि. एस. लक्ष्मण आणि एस. श्रीशांत मैदानावर होते. लीड वाढत असल्यानं आफ्रिकन बोलर्स सैरभैर झाले होते.

आफ्रिकन बोलर्सपैकी आंद्रे नेल आक्र*मक होता आणि त्याला प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना डिवचण्याची आवड होती. त्यानं बोलिंग करताना श्रीशांतला भडकवून देण्याचा प्रयत्न केला. नेलनं श्रीशांतला वारंवार शाब्दिक चिथावणी दिली. मात्र, चिडण्यासाठी फक्त एखादं निमित्त शोधणारा श्रीशांत जणू त्यावेळी डोक्यावर बर्फ घेऊन उभा होता. तो एकदम शांतपणे आंद्रे नेलच्या शिव्या खात होता. आता आपलं तोंड नाही तर बॅट चालवायची असा निश्चय श्रीशांतनं केला होता. त्यानं पुढच्याच चेंडूवर नेलला एक गगनचुंबी षटकार मारला. आता मात्र, श्रीशांत शांत बसणार नव्हता. षटकार खेचल्यानंतर त्यांना क्रिजच्या मधोमध येऊन बॅट फिरवून-फिरवून डान्स केला. तो विनोदी नजारा पाहून सर्वजण अक्षरश: हसत सुटले होते.

जोहान्सबर्गमधील वॉन्डरर्सच्या मैदानावर झालेला तो कसोटी सामना भारतानं जिंकला होता. क्रिकेट इतिहासामध्ये भारतीय संघानं पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना जिंकला होता. हा ऐतिहासिक विजय भारतीयांच्या आणि बीसीसीआयच्या चांगलाच लक्षात राहील. कारण, मैदानावर श्रीशांतनं केलेल्या डान्सनंतर खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये गोंधळ घातला होता. आफ्रिकन भूमीवर पहिला कसोटी विजय साजरा केल्यानंतर भारतीय संघानं ड्रेसिंग रूममध्ये विजय साजरा करताना इतका गोंधळ घातला की, तेथील अनेक वस्तूंची तोडफोड झाली होती.

त्यानंतर आफ्रिकन क्रिकेट बोर्डानं बीसीसीआयवर नुकसान भरपाईचा दावा ठोकला आणि श्रीशांत विरुद्धसुद्धा आयसीसीकडं तक्रार केली. मात्र, आयसीसीनं श्रीशांतला निर्दोष मुक्त केलं. कारण, वादाची सुरुवात आंद्रे नेलनं केल्याचं सर्वांनी पाहिलं होतं.

या घटनेनंतर आंद्रे नेल आणि श्रीशांत एकमेकांचे चांगले मित्र झाले होते. एका मुलाखतीमध्ये नेलला श्रीशांतच्या डान्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ती घटना आठवून स्वत: नेल देखील खूप हसला होता. आपल्याला श्रीशांत सोबतची टसल कायम आवडते. आयपीएल दरम्यानसुद्धा आम्ही खूप मस्ती केली, अशी प्रतिक्रिया साउथ आफ्रिकन पेसर आंद्रे रसनं दिली होती.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

हॅलिफॅक्स ब्ला*स्ट – हिरोशिमाच्या अगोदरचा जगातला सगळ्यात मोठा स्फो*ट होता

Next Post

कम्प्युटरचा जनक असलेल्या बॅबेजने कंटाळून शेवटी जुगाराचा धंदा चालू केला होता

Related Posts

इतिहास

क्रिकेटचे शहेनशाह डॉन ब्रॅडमन ‘डक’ झाल्याने डिस्नीने आपल्या कॅरेक्टरचं नाव ‘डोनाल्ड डक’ ठेवलं..!

5 February 2024
क्रीडा

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

19 November 2023
क्रीडा

..आणि त्यादिवशी ऑस्ट्रेलियन संघ १३ खेळाडूंसह मैदानावर उतरला होता!

28 October 2024
इतिहास

लतादीदींमुळे विश्व विजेत्या भारतीय टीमला विनिंग प्राईझ देता आले..!

25 October 2024
क्रीडा

यंदाच्या वर्ल्ड कपची अंतराळातील उद्घाटनासह अनेक वैशिष्ट्ये आहेत..!

5 October 2023
क्रीडा

कॅन्सरने पाय गमावला पण मॅरेथॉन धावण्याची जिद्द नाही!

12 September 2025
Next Post

कम्प्युटरचा जनक असलेल्या बॅबेजने कंटाळून शेवटी जुगाराचा धंदा चालू केला होता

IIT मुंबईच्या मुलांनी इलॉन मस्क फाउंडेशनचं २५०००० डॉलर्सचं अनुदान जिंकलंय

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.