The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काही लोकांच्या मते जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागे या कुटुंबाचा हात असतो

by द पोस्टमन टीम
13 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जोपर्यंत आपण स्वत: कमावते होत नाही तोपर्यंत आपल्याला आई-वडिलांकडून पैसे घ्यावे लागतात. बहुतांशी कुटुंब वडिलांच्या आर्थिक मिळकतीवर चालतात. म्हणजेच वडील त्या कुटुंबाचे कर्ताधर्ता असतात. काहीही खरेदी करून आणायचं असलं की, त्यांच्याकडून पैसे घ्यावे लागतात. थोडक्यात काय तर वडील त्या कुटुंबाची बँक असतात आणि ते कुटुंबाच्या कल्याणासाठी पैसा पुरवण्याचं काम करतात.

मोजक्या लोकांचं एक कुटुंब सांभाळण्यासाठी किती दमछाक होते ही गोष्ट आपली वडिलच जाणो. अशा स्थितीत जर मी तुम्हाला म्हटलं, मध्ययुगीन युरोपमध्ये एक असं कुटुंब होतं जे युरोपातील अनेक देशांना सांभाळण्याचं काम करत होतं तर..? विश्वास नाही ना बसणार? मात्र, ही गोष्ट एकदम खरी आहे. युरोपमध्ये असं एक कुटुंब होतं जे युरोपातील अनेक राज्यकर्त्यांना वित्तीयपुरवठा करत होतं. सध्या वर्ल्डबँक जे काम करते तेचं काम त्यावेळी हे कुटुंब करत होतं. म्हणूनच त्या कुटुंबाचा उल्लेख इतिहासातील ‘सर्वांत श्रीमंत कुटुंब’ असा केला जातो. ‘रॉथशिल्ड’, असं या कुटुंबाचं नाव होतं. युरोपला पैसा पुरवणारं हे धनाड्य कुटुंब नेमकं कोण होतं? त्यांच्याकडे इतका पैसा आला कुठून? आणि सध्या या रॉथशिल्डची काय अवस्था आहे? याबाबत माहिती देणारा हा लेख…

रॉथशिल्ड्स हे फ्रँकफर्टमध्ये उगम पावलेलं एक प्रभावशाली बँकर कुटुंब होतं. त्यांच्या बँकिंग साम्राज्याची स्थापना अठराव्या शतकात मायर ऍम्शेल रॉथशिल्ड यांनी केली होती. त्यानंतर मायरची पाच मुलं: नेथन मायर, जेम्स मायर, सॉलोमन मायर, कार्ल मायर आणि ऍम्शेल मायर दुसरा यांच्या नेतृत्वाखाली हे कुटुंब प्रसिद्ध झालं. 

रॉथशिल्डस् आंतरराष्ट्रीय वित्त क्षेत्रामध्ये अग्रणी होते. त्यांनी फ्रँकफर्ट व्यतिरिक्त लंडन, पॅरिस, व्हिएन्ना आणि नेपल्स येथे देखील आपल्या शाखा स्थापन केल्या होत्या. वस्तू आणि परकीय चलनाच्या छोट्या व्यवसापासून सुरुवात केलेल्या रॉथशिल्ड कुटुंबानं मर्चंट बँकिंग, खासगी बँकिंग, मालमत्ता व्यवस्थापन, विलीनीकरण आणि अधिग्रहण, विमा, व्हेंचर कॅपिटल, निवृत्तीवेतन आणि गुंतवणूक, सार्वभौम कर्जासारख्या विविध वित्तीय विभागांमध्ये आपलं वर्चस्व निर्माण केलं. इतकंच नाही तर पूल, बोगदे आणि रेल्वे बांधकाम क्षेत्रातसुद्धा त्यांनी गुंतवणूक केली होती. सुएझ कालव्याच्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये त्यांची गुंतवणूक होती. याशिवाय हॉटेल, मीडिया, वाहतूक आणि वाइन उद्योगामध्ये देखील त्यांनी प्रवेश केला होता.

जर्मनीतील फ्रँकफर्ट शहराच्या बाहेरील भागात युडेनगास नावाचं एक ठिकाण होतं. युडेनगास या लहानशा लोकवस्तीमध्ये ३ हजारपेक्षा जास्त ज्यू रहिवासी दाटीवाटीनं राहत होते. अतिशय कठोर परिस्थितीमध्ये त्याठिकाणी ज्यू राहत होते.



ज्यू लोक रविवार, ख्रिश्चन सुट्टी आणि रात्री बाहेर पडू शकत नव्हते. त्यांना सार्वजनिक बागा किंवा कॉफी शॉपमध्ये जाण्यास मनाई होती. याशिवाय इतर ठिकाणीसुद्धा ते समुहाने जाऊ शकत नव्हते. 

अशा स्थितीत ज्यू असलेले मायर ऍम्शेल रॉथशिल्ड (१७४४-१८१२) मोठे झाले. मायर रॉथशिल्डनं अगदी लहान वयापासूनच व्यवसाय शिकला. त्याचे वडील, ऍम्शेल मोझेस रॉथशिल्ड, रेशमी कापडाचा आणि चलन देवाण-घेवाणीचा व्यवसाय करत होते. फ्रँकफर्टच्या सहामाही व्यापारी मेळ्यांमध्ये विकत घेतलेल्या नाण्यांचं वर्गीकरण करणे हे मायरचं सुरुवातीचं काम होतं.

विविध ठिकाणची करन्सी उपलब्ध असल्यामुळं संपूर्ण प्रदेशातील खरेदीदार आणि विक्रेते मायरकडं आकर्षित झाले. मायर बारा वर्षांचा असताना त्याचे आई-वडील देवीच्या रोगामुळं मरण पावले. त्यानंतर तो आपल्या नातेवाईकांसोबत राहत होता. त्यांनी त्याला हॅनोव्हरला ‘सायमन वुल्फ ओपेनहायमर’ या एका प्रमुख ज्यू बँकिंग हाऊसमध्ये शिक्षणासाठी पाठवलं. त्याठिकाणी मायरला परकीय व्यापार आणि वित्तपुरवठ्याचे धडे मिळाले. याशिवाय प्राचीन रोम, पर्शिया आणि बायझंटाईन साम्राज्यासारख्या ठिकाणांवरील दुर्मिळ नाण्यांबद्दल देखील माहिती मिळाली. या नाण्यांचे संग्रहक राजपुत्र आणि इतर श्रीमंत लोक होते. त्यांच्याशी व्यवहार करणाऱ्या ज्यु लोकांना ‘कोर्ट ज्यू’ म्हटलं जाई.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

१७६३ मध्ये वयाच्या १९व्या वर्षी मायर रॉथशिल्ड फ्रँकफर्टला परतला आणि त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या व्यवसायात आपल्या भावांना मदत करू लागला.

मायर दुर्मिळ नाण्यांचा डीलर बनला आणि त्यानं हेसेचा क्राउन प्रिन्स विलहेमचा राजाश्रय मिळवला. प्रिन्सनं मायरच्या वडिलांकडून नाणी देखील विकत घेतलेली होती. मायरसाठी हे अतिशय महत्त्वाचे व्यावसायिक संबंध होते. कारण क्राउन प्रिन्स विलहेम अफाट संपत्तीचा वारस होता. १७६९ मध्ये, रॉथशिल्डला प्रिन्सकडून कोर्ट फॅक्टर पदवी मिळाली.

१९७० मध्ये, मायरनं मनी चेंजर आणि एका कोर्ट फॅक्टरची मुलगी असलेल्या गुटल शपरशी लग्न केलं. या जोडप्याला एकूण दहा अपत्ये झाली. त्यामध्ये पाच मुलं आणि पाच मुलींचा समावेश होता.

फ्रेंच राज्यक्रांतीदरम्यान रॉथशिल्डचं बँकिंग साम्राज्य झपाट्यानं वाढलं. मायरनं हेसियन मर्सिनरी सैनिकांच्या नियुक्तीसाठी ब्रिटनकडून मिळणारी पेमेंट सुलभ केली. १८००च्या सुरुवातीला, मायरनं आपल्या मुलांना नेपल्स, व्हिएन्ना, पॅरिस आणि लंडन येथे पाठवलं. त्याची मुलं देखील त्याच्याप्रमाणं होतकरू होती. त्यांनी नेपल्स, व्हिएन्ना, पॅरिस आणि लंडनमध्ये आपला व्यवसाय सुरू केला.

युरोपमध्ये पाच ठिकाणी शाखा असलेली रॉथशिल्ड ही पहिली बँक बनली. त्यांनी शेकडो वर्षे विविध राज्यकर्त्यांना यु*द्धासाठी वित्तपुरवठा करण्याचं काम केलं. या व्यवसायातूनच त्यांना अतिरिक्त संपत्ती निर्माण करण्याची पुरेशी संधी उपलब्ध झाली. आपला मृत्यू होण्यापूर्वी मायर रॉथशिल्डनं त्याच्या वारसांसाठी व्यवसाय कसा हाताळावा याबद्दल कठोर सूचना सोडल्या होत्या. त्यानं उत्तराधिकारीपदासाठी कठोर रूपरेषा आखली होती. ज्यानुसार कुटुंबाची मालमत्ता केवळ पुरुषांना मिळणार होती. मुलींना वारसाहक्कातून थेट वगळण्यात आलं होतं.

मायर रॉथशिल्डची चार मुलं बाहेर देशात गेली होती. त्यातील तिसऱ्या क्रमांचा मुलगा नेथन (१७७७-१८३६) हा सर्वांत यशस्वी ठरला. नेथननं १७८९ मध्ये इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये कापड व्यवसाय सुरू केला आणि नंतर लंडनमध्ये बँकर म्हणून देखील काम केलं. तिथे त्यानं १८१० मध्ये एन एम रॉथशिल्ड नावाची बँकिंग कंपनी सुरू केली.

दोनशे वर्षांपूर्वी स्थापन केलेली एन एम रॉथशिल्ड अँण्ड सन्स आजही त्याठिकाणी कार्यरत आहे. २०१९ मध्ये, बँकेने १.८७ अब्ज पाउंड महसूल जमा केला होता. इतर रॉथशिल्ड बँकांप्रमाणे, एन एम रॉथशिल्ड अँड सन्सनं देखील संकटकाळात ब्रिटीश सरकारला कर्ज दिलं.

नेपोलियनच्या यु*द्धांदरम्यान, बँकेनं सरकारने मित्र राष्ट्रांना पाठवलेल्या अनुदानांचं व्यवस्थापन केलं. यु*द्धांना एकदाती वित्तपुरवठा करणारी ही त्याकाळची एकमेव बँक होती. १८२४ मध्ये, नेथन रॉथशिल्ड आणि मोझेस मॉन्टेफिओर यांनी अलायन्स अश्युरन्स कंपनीची स्थापना केली, जी सध्या आरएसए समूहाचा भाग आहे. १८३५ मध्ये, नेथननं स्पेनमधील पारा खाणींची मालकी मिळवली आणि या रासायनिक घटकावर मक्तेदारी मिळवली. सोने आणि चांदी शुद्धीकरणासाठी महत्त्वपूर्ण आहे. ही गोष्ट त्याला भविष्यात अतिशय फायद्याची ठरली. कारण, १८५२ मध्ये एन एम रॉथशिल्ड अँड सन्सनं बँक ऑफ इंग्लंड आणि रॉयल मिंटसाठी सोने-चांदी शुद्ध करण्यास सुरुवात केली.

नेथन रॉथशिल्डनं ज्यू धर्मीय लोकांच्या कल्याणासाठी मोठं योगदान दिलं. त्याच्या कुटुंबानं पॅरिस आणि लंडनमधील ज्यू लोकसंख्येपर्यंत सेवाभावी योजना पोहचवल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळं लंडनमध्ये ‘युनायटेड सिनेगॉग’ची निर्मिती झाली. नंतर, कुटुंबातील सदस्यांनी इस्रायलच्या विकासाला पाठिंबा दिला आणि घरे व सरकारी इमारती बांधण्यास मदत केली. नेथनची सर्वांत धाकटी मुलगी लुईस आणि तिच्या सात मुलींनी फ्रँकफर्टमधील ३० रॉथशिल्ड धर्मादाय संस्थांची जबाबदारी घेतली. यामध्ये सार्वजनिक ग्रंथालये, अनाथाश्रम, रुग्णालये, वृद्धांसाठी घरे आणि शाळांचा समावेश होता.

सतत अविरतपणे सुरू असलेल्या काळाच्या पावलांसोबत यु*द्धे, राजकारण आणि कौटुंबिक शत्रुत्वामुळं पुढच्या १०० वर्षांत कौटुंबिक संपत्ती कमी झाली. १८६३ मध्ये बँकेची नेपल्स शाखा बंद झाली. पुरुष वारस नसल्यामुळं १९०१ मध्ये फ्रँकफर्ट शाखादेखील बंद झाली. ऑस्ट्रियावरील ना*झींच्या आक्रमणानंतर आणि ज्यूंना निर्माण झालेल्या धोक्यामुळे १९३८ मध्ये व्हिएन्ना शाखा बंद करण्यात आली.

त्यानंतर ठिकठिकाणी असणारी रॉथशिल्ड इस्टेट ब्रिटिश, फ्रेंच सरकार आणि इतर सामाजिक संस्था व विद्यापीठांना दान करण्यात आली. कौटुंबिक संपत्ती वंशज आणि वारसांमध्ये विभागली गेली.

सध्या रॉथशिल्ड कुटुंबातील वारस आर्थिक सेवा, रिअल इस्टेट, खाणकाम, ऊर्जा आणि धर्मादाय कार्यांसह अनेक उद्योग करतात. या कुटुंबाकडे जगभरात एक डझनहून अधिक वाईनरी आहेत. पुण्यातील एक सुप्रसिद्ध आणि श्रीमंत इराकी ज्यू, सर ससून डेव्हिडचा एक मुलगा, अब्दुल्ला इंग्लंडला गेला, तेथे त्याने अल्बर्ट नाव धारण करून याच कुटुंबातील एका मुलीशी लग्न केले होते. या कुटुंबातील बहुतेक सदस्य कौटुंबिक संपत्ती निर्माण करणाऱ्या ऑपरेशन्समध्ये गुंतलेले आहेत. एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत कुटुंब असलेल्या रॉथशिल्ड कुटुंबाच्या वंशजांनी सतत मानवतावादी, सांस्कृतिक आणि व्यावसायिक गोष्टींमध्ये आपलं योगदान दिलं आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

आपण युट्युबवर रात्रभर जागून घरं बांधणाऱ्या लोकांचे व्हिडीओ बघतो ते कोण आहेत..?

Next Post

काल गडचिरोलीत पोलिसांनी खात्मा केलेला माओवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे कोण होता..?

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

काल गडचिरोलीत पोलिसांनी खात्मा केलेला माओवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे कोण होता..?

पहिल्या महायु*द्धात चक्क रशियन झॉम्बींनी जर्मन सैन्यावर ह*ल्ला केला होता.

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.