The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पहिल्या महायु*द्धात चक्क रशियन झॉम्बींनी जर्मन सैन्यावर ह*ल्ला केला होता.

by Heramb
8 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जगाच्या इतिहासातील दोन्ही महायु*द्धांनी मानवतेचं अतोनात नुकसान केलं. पहिल्या महायु*द्धात लष्करी आणि नागरी मृतांची एकूण संख्या सुमारे ४ करोड होती. तर दुसऱ्या महायु*द्धात सुमारे साडे सात करोड लोक मरण पावले. या महायु*द्धांतील अनेक घटना आणि यु*द्धांविषयी आपण अनेक ठिकाणी वाचतो/ऐकतो. पण पहिल्या महायु*द्धात कदाचित जगाच्या इतिहासातील सर्वांत विचित्र लढाई झाली होती.

झॉम्बी आणि त्याबद्दलच्या अनेक कथा आपण आजवर ऐकल्या असतील. इतकंच काय तर अमेरिकेनेसुद्धा झॉम्बींशी लढण्याची तयारी पूर्ण केली आहे याबद्दलही आपण वाचलं असेल. यावेळी कदाचित आपल्याला ‘झॉम्बी’ ही काल्पनिक प्रतिकृती असल्याचं वाटलं असेल. पण पहिल्या महायु*द्धात या झॉम्बींचा समावेश होता, असं नेमकं कोणतं ‘विचित्र’ यु*द्ध होतं जाणून घेऊया या विशेष लेखात..

पहिल्या महायु*द्धात चक्क रशियन झॉम्बींनी जर्मनांवर ह*ल्ला केला होता. ईशान्य पोलंडमधील ओसोविक किल्ल्यावर ६ ऑगस्ट १९१५ रोजी ‘मृतांचा ह*ल्ला’ झाला.

रशियन सैन्यावर ‘गॅस’ ह*ल्ला करण्यापूर्वी जर्मन सैन्य वारा वेगाने वाहण्याची वाट पाहत होतं. योग्य वेळ आल्यानंतर जर्मन सैन्याने क्लोरीन गॅससह आपल्या तोफखान्याच्या मदतीने रशियन सैन्यावर जबरदस्त ह*ल्ला सुरु केला. या ह*ल्ल्यात पायदळ, सॅपर्स (मिलिटरी इंजिनिअर्सची तुकडी), आणि तोफखान्यांच्या एकूण १४ बटालियन्स सहभागी होत्या. तर किल्ल्याच्या रक्षणार्थ रशियन सैन्याकडे ९०० सैनिकांची कुमक होती.

क्लोरीन गॅसपासून बचाव करण्यासाठी बहुतेक रशियन सैनिकांकडे मास्क्स नव्हते किंवा अत्यंत खराब आणि चुकीच्या पद्धतीने तयार केलेले मास्क्स होते. त्यामुळे जेव्हा जर्मन सैन्याने क्लोरीन गॅसच्या फ्युम्सचा ह*ल्ला केला, तेव्हा रशियन सैन्याकडे बचावासाठी काही विशेष व्यवस्था नव्हती. क्लोरीन गॅस हवेतील आर्द्रतेमध्ये मिसळल्याने हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार झाले. यामुळे रशियन सैन्य फक्त गुदमरलंच नाही तर त्यांची फुफ्फुसे आणि घशाचा भाग अक्षरशः वितळू लागला आणि त्वचा सोलवटून निघण्यास सुरुवात झाली.



परिणामी संपूर्ण किल्ल्यावर रक्ता-मांसाचा चिखल झाला. झाडे आणि पक्षी मरू लागले. अनेक झाडाची पाने तपकिरी पडू लागली, गवत काळे पडू लागले. किल्ल्याबाहेरील लोकांच्या फुफ्फुसात विषारी वायू विरघळल्याने या वायूने त्यांच्या श्वसन-प्रणालीमध्ये प्रवेश केला आणि त्यांचा तात्काळ मृत्यू झाला. परंतु या सगळ्या भीषण मृत्यूतांडवातून सुमारे १०० रशियन सैनिक वाचले.

सब-लेफ्टनंट ‘व्लादिमीर कार्पोविच कोटलिंस्की’ यांच्या नेतृत्वाखाली, अतिशय गंभीररीत्या जखमी झालेलं रशियन सैन्य फक्त आपल्या ठाम निश्चयावरच उभं नव्हतं तर हे सैन्य चालून येणाऱ्या जर्मन सैन्याविरुद्ध लढायलासुद्धा तयार होतं. सुमारे ७००० जर्मन सैनिकांना या १०० रशियन सैनिकांनी ‘रोखले’.

ज्यावेळी जर्मन सैन्याच्या १२ बटालियन्स किल्ल्याच्या टॉवरवर पोहोचल्या, तेव्हा त्यांनी डझनभर विकृत आणि शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव होणारे सैनिक त्यांच्याकडे किंचाळत, अगदी झॉम्बींसारखे येताना पहिले. समोरून येणाऱ्या रशियन सैनिकांच्या तोंडाला फेस येत होता, ते पूर्णतः रक्तबंबाळ झाले होते, कदाचित फुफ्फुसाचे तुकडे होऊन त्यांना प्रचंड खोकला येत होता, आणि तरीही ते ह*ल्ला करण्यास तयार होते.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

जर्मन सैन्य मात्र हे विचित्र आणि भयानक दृश्य पाहून घाबरलं. जर्मन सैन्याने इतक्या वेगाने आणि बेसावधपणे माघार घेतली की ते त्यांच्याच सापळ्याला बळी पडले आणि अनेक जर्मन सैनिकांचा मृत्यू झाला. सब-लेफ्टनंट कोटलिंस्कीच्या या प्रतिह*ल्ल्यामुळे, आणखी दोन रशियन बटालियन पुढे जाण्यास आणि जर्मन सैन्य पुन्हा एकत्र येण्यापूर्वी किल्ला ताब्यात घेण्यास सक्षम होत्या.

खरं तर याचा शास्त्रशुद्ध विचार करायचा झाल्यास यात कोणत्याही चमत्कार किंवा जादूशिवाय सैनिकांचं ‘मनोबल’ आणि ‘धैर्य’ महत्वाचं होतं. संपूर्ण शरीराची वाईट अवस्था झालेली असतानाही केवळ आपल्या ‘कर्तव्यपूर्तीसाठी’ हे बचावलेले रशियन सैनिक लढण्याची क्षमता शरीरात नसतानाही केवळ मनोधैर्याच्या जोरावर आपल्या शत्रूविरुद्ध उभे ठाकले आणि ते दृश्य इतकं भयानक होतं की या लढाईला ‘मोस्ट बिझेर बॅटल इन द हिस्ट्री’ म्हणजेच ‘इतिहासातील सर्वांत विचित्र लढाई’ असं नाव देण्यात आलं.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

काल गडचिरोलीत पोलिसांनी खात्मा केलेला माओवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे कोण होता..?

Next Post

हबीबगंज रेल्वे स्थानकाला ज्यांचं नाव दिलं त्या राणी कमलापती कोण आहेत..?

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

हबीबगंज रेल्वे स्थानकाला ज्यांचं नाव दिलं त्या राणी कमलापती कोण आहेत..?

हॅलिफॅक्स ब्ला*स्ट - हिरोशिमाच्या अगोदरचा जगातला सगळ्यात मोठा स्फो*ट होता

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.