The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

व्यापार उदीमात प्रचंड भरभराटीस आलेल्या या साम्राज्यात चलनी नाणेच नव्हते

by द पोस्टमन टीम
1 April 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


आज जगभरात एखाद्या वस्तूचे एखादे निर्धारित मूल्य असते आणि त्या मूल्याच्या आधारावर त्या वस्तूला विकत घेण्यासाठी एक चलन असते. अशी कल्पना करा की तुमच्याकडे कुठली मुद्रा नसेल आणि सामानाचे वितरण हे त्या मुद्रेत होता इतर वस्तूच्या मोबदल्यात करण्यात येत असेल तर? मेहनतीच्या मोबदल्यात चलनाऐवजी त्या किंमतीचे सामान देण्यात येत असेल तर? बँक आणि चलनाच्या आधारावर कुठले व्यवहारच होत नसतील तर? अर्थव्यवस्थेचे यानंतरचे स्वरूप कसे असेल?

कुठल्या देशाची अर्थव्यवस्था अशा अर्थचक्रात आकार घेऊ शकते का? याचे उत्तर कदाचित नाही हेच असेल. आज चलनाविना व्यापार असंभव वाटत आहे पण ५०० वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेतील एका साम्राज्याने जगासमोर व्यापार आणि अर्थव्यवस्थेचे एक नवीन उदाहरण उभे केले होते. पंधराव्या व सतराव्या शतकात दक्षिण अमेरिकेतील इन्का साम्राज्याने व्यापारी व्यवस्थेत केलेल्या बदलांचा उल्लेख आजही आपल्याला वाचायला मिळतो.

इन्का लोकांद्वारे करण्यात येणारा आधुनिक विचार आणि संशोधनांचा प्रयोग आजच्या आधुनिक जगासाठी देखील आदर्शवत आहे.

तेराव्या शतकात अँडीज पर्वतरांगेत वास्तव्यास असणाऱ्या एका आदिवासी समूहाने पेरू देशाच्या कुजको घाटात २०० वर्षांच्या कालखंडात ६० लाख लोकसंख्येच्या एका शक्तिशाली साम्राज्याची निर्मिती केली होती. हे साम्राज्य इन्का साम्राज्य म्हणून प्रसिद्ध होते. दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणोत्तर अँडीज पर्वतरांगेत हे साम्राज्य पसरले होते.

आजचे पेरू, अर्जेंटिना, कोलंबिया आणि बोलिव्हिया या साम्राज्याचा एक भाग होते. दक्षिणोत्तर तब्बल ५५०० किलोमीटरच्या विस्तीर्ण प्रदेशावर या संस्कृतीच्या लोकांचा वास होता. इथल्या लोकांना ३० हून जास्त भाषा अवगत होत्या. सोने, चांदी, वस्त्र आणि कोको यामुळे हे साम्राज्य प्रसिद्ध झाले. या साम्राज्यात ना बाजार होता ना कुठली चलनी मुद्रा हे लोक वापरत होते.



इन्का संस्कृतीत मीता नावाची मजुरांची संघटना व्यापारी, शेतकरी, कामगार इत्यादींना आवश्यक ती मदत करायची. मंदिर, कालवे निर्मिती, शेतीयोग्य जमीन, रस्ते, पूल, आणि बोगदे यांच्या निर्मितीचे काम ते करायचे. कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीशिवाय या लोकांनी एका स्वयंपूर्ण अर्थव्यवस्थेची निर्मिती केली होती. त्यांनी विशाल पिरॅमीड डिझाईन केलं होतं, सिंचन योजना यशस्वीपणे राबवली होती. माचू पिच्चूसारख्या डोंगरांवर मंदिराची निर्मिती केली होती. हे लोक मेहनतीलाच अर्थव्यवस्थेचा कणा मानायचे.

मिशनरी लोकांनी या लोकांचे वर्णन उत्तम बिल्डर आणि नियोजनकार असे केले आहे.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान न वापरता डोंगराळ भागात शहरांची निर्मिती केली होती, त्या भागातील जमीन कृषियोग्य बनवली होती. बटाटा, मका, भुईमुगाचे उत्पन्न हे लोक घ्यायचे आणि त्याचाच चलन म्हणून वापर करायचे.

मुद्रेविना बाजार हा या इन्का संस्कृतीच्या लोकांचे एक वैशिष्ट्य होते. त्यांनी अनेक कॉलनी वसवल्या होत्या. अगदी दूरदूरच्या प्रदेशात  देखील त्यांचा व्यापार चालायचा. त्यांच्या वस्तू उत्पादन, वितरण आणि उपयोग या चक्राचे नियंत्रण साम्राज्याच्या केंद्रीय शक्तीच्या माध्यमातून करण्यात येत होते. सर्व नागरिकांना आवश्यक गोष्टींचे वितरण भांडारातून करण्यात येत होते, त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला धन आणि बाजाराची गरजच नव्हती.

ते इतर लोकांशी व्यापार करायचे पण अंतर्गत व्यापारासाठी त्यांना याची गरज नव्हती. श्रमाचे प्रबंधन आणि एकत्रित करण्यात आलेल्या संसाधनांच्या विनियोगाने त्यांनी एक सफल अर्थव्यवस्थेची निर्मिती केली होती. सामूहिक श्रम आणि आर्थिक उत्पादकतेच्या बळावर त्यांनी सामाजिक धन निर्माण केले होते. समाजाच्या प्रत्येक नागरिकाला काम करण्याची संधी या संस्कृतीने देऊ केली होती.

इथे आळशी लोकांना मृत्युदंड देण्यात यायचा.

कामाच्या मोबदल्यात मोफत शिक्षण, कपडे, अन्न आणि आरोग्य सुविधा अशी व्यवस्था उभारण्यात आली होती. श्रमदान करणाऱ्याच्या शारीरिक मेहनतीला मोठी किंमत इन्का संस्कृतीत मिळायची. श्रमानुरूप कामाचे वितरण करण्यात येत होते. इन्का साम्राज्याच्या आर्थिक व्यवहारानुसार सरकारद्वारे श्रमजीवी लोकांना श्रमशक्तीच्या आधारावर अत्यावश्यक सामान व वस्तूंचा पुरवठा करण्यात येई.

याठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्तू नियमन करण्यात येत होते. उरलेल्या वस्तूंचा वापर तिथे पुनर्निर्माणासाठी करण्यात येत होता. सरकार राज्याच्या उत्पादनांना आणि सामानाला आपल्या सुरक्षित छत्राखाली ठेवायचं. आवश्यकतेनुसार त्याचे यायचे.

वातावरण बदलाची समस्या होती, त्यामुळे एल निनो/ला निनोच्या प्रभावापासून वाचण्यासाठी गोदामांची निर्मिती करण्यात आली होती. इथे रसद सुरक्षित ठेवण्यात येत होती आणि पुढे उपासमारीसारख्या गंभीर संकटातून रक्षण करण्यासाठी हे लोक या साठवलेल्या धान्याचा वापर करायचे. त्यांचे अर्थशास्त्र हे खाद्यान्न उत्पादन आणि त्याचे नियमन याच्याभोवतीच केंद्रित होती.

इन्का साम्राज्यात आधुनिक रस्तेमार्गांचा विकास करण्यात आला होता. इथे तब्बल ४० हजार किलोमीटरच्या मार्गांचा विकास करण्यात आला होता. संपूर्ण दक्षिण अमेरिकेत रस्त्यांचे जाळे विणण्यात आले होते. या महामार्ग प्रणालीला कॅपेक नेन म्हणून ओळखले जात होते. याचा वापर दळणवळणासाठी अथवा सैन्य वाहतुकीसाठी करण्यात येत नव्हता, तर फक्त एका दूरसंचार नेटवर्कसाठी करण्यात येत होता.

इथे डोंगरांना जोडण्यासाठी दोरखंडाचे पुल उभारण्यात आले होते. वाहनांच्या वाहतुकीसाठी हे वापरले जात होते. नासाचे अंतराळवीर त्यांच्या अभियानासाठी ज्या कोरड्या अन्नाला घेऊन जायचे, त्याची निर्मिती देखील इन्का संस्कृतीच्या कालखंडात करण्यात आली. कून नावाच्या कोरड्या बटाट्याचे उत्पादन इन्का संस्कृतीचे लोक घ्यायचे.

इन्का संस्कृतीशी निगडित अनेक पैलू आजदेखील रहस्यमय आहेत. १५९२ साली स्पॅनिश लुटेरा फ्रान्सिस्को पिजारोने इन्का साम्राज्याचा सर्वनाश केला होता. असं म्हणतात की युरोपियन प्रवाशांनी पसरवलेल्या चेचक नावाच्या आजाराने ही संपूर्ण संस्कृती लयास गेली होती.

आजच्या आधुनिक काळाला लाजवतील अशा समाजव्यवस्थेची रचना आणि अर्थव्यवस्थेचा विकास इन्का साम्राज्यात करण्यात आला होता.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

विनोबांच्या आंदोलनामुळे कसणारे हात जमिनीचे मालक झाले

Next Post

चापेकर बंधूंवरच्या इनाम रकमेने त्यांच्याच सहकाऱ्यांचे डोळे फिरले आणि त्यांचा घात झाला

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

चापेकर बंधूंवरच्या इनाम रकमेने त्यांच्याच सहकाऱ्यांचे डोळे फिरले आणि त्यांचा घात झाला

इस्राईल-इजिप्तच्या वादात सुएझ कॅनल आठ वर्षे बंद होता

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.