The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सगळ्या गावाच्या मिळून बँकेत ५००० कोटींपेक्षा जास्त ठेवी, हे आहे भारतातलं सर्वांत श्रीमंत गाव

by Heramb
28 October 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


भारतीय ‘गाव’ म्हटलं की सहसा आर्थिक समृद्धीचा फारसा संबंध आपल्याला येताना दिसत नाही. साधारणतः गावामध्ये एक किंवा दोन दुकाने, कृषीसामग्रीची विक्री केंद्रे असतात. पण गुजरातच्या कच्छमधील माधापार गाव हे या धारणेला अपवाद ठरले आहे. गांधीजींच्या ‘गावाकडे चला’ या वाक्याचं प्रमोशनच या गावाने केलं आहे असं म्हटलं तर अतिशयोक्त वाटायला नको. आजच्या लेखात माधापार गावात  ने मकं काय विशेष आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया..

माधापार गाव हा कित्येक वर्षे अनेक व्यावसायिकांच्या, गुंतवणूकदारांच्या आणि एकूणच श्रीमंतांच्या चर्चेचा विषय होता. या गावात सुमारे ७६०० कुटुंबांमध्ये ९२ हजार लोक वास्तव्यास आहेत. या संपूर्ण लोकसंख्येचे तब्बल ५ हजार कोटी इतके बँक डिपॉजिट्स आहेत. आकडेवारीनुसार, गावातील प्रत्येक प्रौढ व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये सरासरी १५ लाख रुपये असतात. या आणि इतर अनेक कारणांमुळे माधापार हे फक्त देशातीलच नाही तर कदाचित जगातील ‘सर्वांत श्रीमंत गाव’ बनले आहे.

या गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या गावात तब्बल १७ बँकांच्या शाखा आहेत, ज्यात ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चा देखील समावेश होतो. या गावात इतक्या बँकांच्या शाखा असण्याचे प्रमुख कारण म्हणजे गावातील लोकांना पूर्वीपासूनच बँकिंग क्षेत्राची तपशीलवार माहिती आहे. तर आधी सांगितल्याप्रमाणे येथील प्रत्येक व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये सरासरी १५ लाख रुपये असतात. त्यामुळे बॅंक्ससुद्धा आपला व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने या गावात आपल्या शाखा सुरु करतात.

पण या गावाच्या श्रीमंतीचं नेमकं रहस्य काय असावं? फक्त शेती करून या गावाने इतकी संपत्ती कशी कमावली, या बद्दल अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असेल. पण फक्त पारंपरिक आणि विशेषतः ‘एपीएमसी’ आधारित शेती करून इतकी संपत्ती मिळवणे हे जवळ जवळ अशक्य काम आहे. तरी या गावातील उत्पन्नात शेतीचा बराचसा वाटा आहे. याठिकाणी प्रामुख्याने ऊस, आंबा आणि मका ही पिके घेतली जातात आणि गावातील शेतमाल मुंबईमध्ये पाठवला जातो.



माधापार गावातील अफाट संपत्तीचं खरं कारण म्हणजे येथील ‘एनआरआय’ अर्थात ‘अनिवासी भारतीयांची’ लोकसंख्या. गावातील बहुतेक कुटुंबांचे सदस्य परदेशात राहून नोकरी करतात. येथील स्थानिक लोक इंग्लंड, अमेरिका, आफ्रिका आणि अरब देशांमध्ये काम करून तिथे कमावलेले पैसे भारतात, त्यांच्या कुटुंबीयांकडे पाठवतात.

स्थानिकांनी एकमेकांना सहकार्य करून आणि मातीशी असलेलं नातं अबाधित ठेऊन या लहानशा गावाचा नेत्रदीपक आर्थिक विकास केला आहे. या गावात अनेक शाळा, महाविद्यालये, आरोग्य केंद्रे, मंदिरे, धरणं, उद्याने आणि तलाव असल्याने या गावाचे लहान पण विकसित आणि सुंदर शहरात रूपांतर झाले आहे.

माधापारच्या स्थानिकांनी लंडनमध्ये १९६८ साली ‘कच्छ माधापार कार्यालय’ किंवा ‘माधापार व्हिलेज असोसिएशन’ची स्थापना केली. या मंडळाचे प्रमुख उद्दिष्ट माधापार आणि आसपासच्या गावातील परदेशात राहणाऱ्या स्थानिकांना एकत्र आणणे हा होता. प्रत्येक गावाने आपापल्या गावातील मनुष्यशक्तीचा योग्य वापर केल्यास तसेच सहकार्याच्या माध्यमातून गावाचा कसा कायापालट होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे माधापार गाव.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

‘माधापार’ हे कच्छच्या मिस्त्रींनी स्थापन केलेल्या अठरा गावांपैकी एक. बाराव्या शतकात या गावातील ‘कच्छ गुर्जर क्षत्रिय’ समाजाचे लोक धनेटी गावात स्थायिक झाले. कालांतराने हे लोक अन्जर आणि भुज या गावांमध्ये स्थलांतरित झाले. माधापार या गावाचे नामकरण ‘माधा कानजी सोळंकी’ यांच्या नावावरून झाले आहे. माधा सोळंकी इसवी सन १४७३-७४ मध्ये धनेटीहून या गावात स्थायिक झाले.

माधा सोळंकी हे ‘हेमराज हरदास’ या सोळंकी राजवटीच्या राजाचे तिसरे वंशज होते. आजच्या माधापारला पूर्वी ‘जुना वास’ म्हणजेच जुनी राहण्याची जागा म्हणून ओळखले जात. या यो*द्धा क्षत्रिय समाजालाच पुढे ‘मिस्त्री’ अशी ओळख त्यांच्या प्रचंड प्रदेश व्यापनामुळे मिळाली. या समाजानेच पुढे कच्छच्या विकासात मोलाचे योगदान दिले. त्यांनी कच्छमध्ये मंदिरे आणि अनेक ऐतिहासिक इमारती उभारल्या.

इसवी सन १५७६च्या आसपास माधापार गावात ‘पटेल’ समाजाची संख्या वाढू लागली. १८५७ साली ‘नवो वास’ अर्थात नवीन राहण्याची जागा गावामध्ये सुरु करण्यात आली अन् गावाची लोकसंख्या आणि समृद्धी वाढतच राहिली. सुदैवाने सन २००१ च्या भूकंपामध्ये गावामध्ये मोठी वित्तहानी झाली नाही. पण काही ‘शे’ वर्षांपूर्वीची मिस्त्रींची ऐतिहासिक निवासस्थाने मात्र उ*द्ध्वस्त झाली.

आज ‘माधापार’ हे गाव देशातील अन्य गावांसाठी एक आदर्श आहे. गावांचा विकास झाला तरच देशाचा विकास होणे शक्य आहे हे आपण अनेकदा ऐकतो पण, माधापारने आपल्या विकासातून आणि आर्थिक सुबत्तेतून हे प्रत्यक्षात उतरवलेलं आपल्याला दिसून येईल.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

अमेरिकेत कृष्णवर्णीय बाळांचा वापर मगरींच्या शिकारीसाठी ‘चारा’ म्हणून केला जात असे

Next Post

तेव्हा दोन ज्यू धर्मगुरूंनी मुस्लिमांच्या पवित्र ‘काबा’चं रक्षण केलं होतं

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

तेव्हा दोन ज्यू धर्मगुरूंनी मुस्लिमांच्या पवित्र 'काबा'चं रक्षण केलं होतं

एडविन एच. आर्मस्ट्राँग - एफएम रेडियो तंत्रज्ञानाचा 'अनसंग हिरो'

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.