The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सगळीकडे चेटकिणी झाडूवर बसून उडताना का दाखवल्या जातात..?

by द पोस्टमन टीम
24 January 2025
in मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


मी लहान असताना ‘द गर्ल ऑन दि ब्रूमस्टीक’ नावाचा चित्रपट पाहिला होता. एका निरागस किशोरवयीन चेटकिणीची गोष्ट त्यात सांगितली होती. शाळेत नापास झाल्यामुळं तिला ३०० वर्षे शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. शाळेतील एका शिपायाच्या मदतीनं ती सर्वसामान्य मानवांच्या जगात पळून येते. तिथे तिची ओळख एका किशोरवयीन मुलासोबत होते. दोघांची चांगली मैत्रीही होते. तो तिला त्याच्या शाळेत घेऊन जातो आणि मग सुरू होते धमाल!

झाडूवर बसून फिरणारी आणि मी पाहिलेली ती पहिली चेटकिण होती. त्यामुळं साहजिकचं माझ्या बालमनात चेटकिणीची एक चांगली प्रतिमा तयार झाली. त्यानंतर मात्र, आणखी एक-दोन चित्रपट पाहण्यात आले आणि माझ्या मनातील चेटकिणीच्या त्या चांगल्या प्रतिमेला तडा गेला. झाडूच्या दांड्यावर बसून फिरणाऱ्या चेटकिणी चांगल्या लोकांना त्रास देतात, अशी माझी समजूत झाली. तेव्हा कधी माझ्या मनात प्रश्न नाही आला की, या चेटकिणी झाडूवर बसून का फिरतात? नंतर मात्र पडला. त्याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मी केला.

जादूच्या झाडूवर बसून इकडे-तिकडे फिरणारी हिरव्यागार कातडीची चेटकीण गेल्या काही वर्षांपासून हॅलोवीन आयकॉन ठरली आहे. झाडू आणि चेटकीण हा आता स्टेरिओटाईपच झाला आहे. 

परंतु, झाडूसारख्या घरगुती वस्तूशी जादूगार आणि विशेषत: चेटकिणी कशा जोडल्या गेल्या यामागचा वास्तविक इतिहास काहीसा रंजक आहे. सगळ्यात अगोदर झाडू हा मानवाच्या दैनंदिन वापरात कधी आणि कसा आला ते पाहू.

झाडूचा शोध कसा लागला याबाबत इतिहासात स्पष्टता नाही. मात्र, प्राचीन काळापासून झाडून घेण्याची कृती केली जाई याबाबत काही पुरावे आणि संदर्भ सापडतात. प्राचीन काळी लोक धूळ किंवा शेकोटीतील राख बाजूला करण्यासाठी झाडांच्या फांद्या आणि नैसर्गिक तंतुंचा वापर करत. न्यू टेस्टामेंटमध्ये देखील झाडून घेण्याच्या कृतीचा उल्लेख आढळत असल्याचं जे. ब्रायन लॉडर यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.



‘ब्रूम’ हा शब्द वनस्पती आणि झुडूपांपासून आला आहे. सुरुवातीला ज्या-ज्या वस्तूंचा वापर सफाई करण्यासाठी केला जाई, त्याला ब्रूम हाच शब्द वापरला जाई. हळूहळू जुना इंग्रजी शब्द ‘बेसम्स’ हा शब्द देखील वापरला गेला. १८ व्या शतकापर्यंत दोन्ही शब्द वापरले गेले. सुरुवातीपासूनच दोन्ही शब्द स्त्रियांशी जोडले गेले. पुढे काळाच्या ओघात झाडू ही सर्वव्यापी घरगुती वस्तू शक्तिशाली आणि अघोरी स्त्रियांचं प्रतीक बनली.

झाडूवर फिरणारी पहिली चेटकीण होती पुरुष !

हे देखील वाचा

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

झाडू ही वस्तू स्त्रियांशी जोडली गेली असली तरी पहिल्यांदा झाडूवर स्वार होणारी व्यक्ती ही स्त्री नसून पुरूष होती. गिलाउम एडेलिन, असं या व्यक्तीचं नाव होतं. एडेलिन पॅरिस जवळील सेंट-जर्मेन-एन-ले येथील पुजारी होता. १४५३ मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. चर्चमध्ये जादूटोणा केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. जाहीरपणे टीका झाल्यानंतर आणि अतोनात छळ सहन केल्यानंतर त्यानं जादूटोणा करण्याचा प्रयत्न केल्याचा कबुलीजबाब दिला होता. त्यानंतर त्याला आजीवन तुरुंगवास भोगावा लागला.

गिलाउम एडेलिनच्या या कबुलीजबाबानंतर झाडूवर बसून फिरणारी चेटकीण या संकल्पनेनं हळूहळू लोकांच्या मनात घर केलं. झाडूवरील चेटकिणीची पहिली प्रतिमा १४५१ मध्ये समोर आली. फ्रान्सचा कवी ‘मार्टिन ले फ्रान्स’च्या ‘ले चॅम्पियन देस डेम्स (द डिफेंडर ऑफ लेडीज)’ या हस्तलिखितात दोन प्रतिमा होत्या.

दोनपैकी एका प्रतिमेतील स्त्री झाडूवर बसून फिरताना तर दुसरी स्त्री पांढऱ्या काठीवर बसून फिरताना दिसत आहे. दोघींनी डोक्याला स्कार्फ गुंडाळलेला आहे. त्यांच्या उल्लेख ‘वाल्डेन्सियन’ म्हणून केला गेलेला आहे. 

या पंथातील लोकांना कॅथोलिक चर्चनं विधर्मी म्हणून संबोधलं जाई. कारण त्यांनी स्त्रियांना आराधना करण्याची परवानगी दिली होती.

झाडूवर बसून उडणाऱ्या चेटकिणींचा पॅगन लोकांशी संबंध आहे का ?

मानववंशशास्त्रज्ञ (अन्थ्रोपोलॉजिस्ट) रॉबिन स्केल्टनच्या अभ्यासानुसार जादूटोणा आणि झाडू यांच्यातील संबंधाचं मूळ पॅगन (मूर्तिपूजक) लोकांच्या प्रजनन विधीमध्ये असण्याची शक्यता आहे. ग्रामीण पॅगन शेतकरी आपल्या पिकांच्या वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात झाडांच्या फांद्या किंवा झाडू घेऊन नृत्य करत. पॅगन स्त्रिया जादूटोणा करून झाडूवर बसून वाईट कामं करतात, अशी समजूत समाजात पसरवण्यात आली असावी.

झाडू, शरीरसुख अन् जादुटोणा

१३२४ मध्ये एक श्रीमंत आयरिश विधवा स्त्री अ‌ॅलिस किटेलर हिच्यावर चेटूक केल्याचे आरोप लावण्यात आले होते. तपासकर्त्यांनी तिच्या घराची झडती घेतली होती.

कीटलरच्या घराची झडती घेत असताना त्यांना झाडूच्या दांड्याच्या आकाराचा एक मलमचा पाईप सापडला. त्यावर तिने आपल्या एका कर्मचार्‍याला चिकटवलं होतं.

जॉन मन यांनी आपल्या मर्डर, मॅजिक आणि मेडिसिन या पुस्तकात १५व्या शतकातील धर्मशास्त्रज्ञ जॉर्डनेस डी बर्गमो यांच्या लिखाणाचे काही संदर्भ दिलेले आहेत. ‘काही स्त्रिया जादुटोणा करून आपल्या अश्लिल कृत्यांसाठी पुरुषांचा वापर करत. ज्याप्रमाणं चेटकिणी झाडूच्या दांड्यावर बसतात त्याचं प्रमाण त्या पुरुषांच्या अंगावर बसत’, असे या संदर्भांमध्ये लिहिलेलं आहे.

मध्ययुगीन युरोपातील जादूटोण्याबद्दलच्या नोंदविलेल्या गेलेल्या या गोष्टींचा आणि वास्तविकतेचा किती संबंध होता हे वादातीत आहे. मध्ययुगीन जादूटोण्याबद्दल जी काही माहिती आपल्याला मिळाली आहे, ती धार्मिक अभ्यासक, तत्कालीन सरकारी अधिकारी यांच्या लिखाणातून मिळाली आहे. त्यामुळं आता त्याची सत्यता पडताळून पाहणं जवळपास अशक्य आहे.

एकूण असा आहे या झाडूवर फिरणाऱ्या चेटकिणींचा इतिहास!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

भारतीय सैनिकांनी आफ्रिकेत गाजवलेल्या पराक्रमाची साक्ष म्हणजे पुण्याच्या NDA मधला सुदान ब्लॉक

Next Post

इलेक्ट्रिक कारची फॅशन शंभर वर्षे अगोदर एकदा येऊन गेलीये

Related Posts

भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

एफबीआयला तीन वर्षं गुंगारा देत त्याने एवढं मोठं कांड केलं, आता यावर चित्रपट आलाय..!

28 October 2024
मनोरंजन

ते विमान नेमकं गेलं कुठं याचा पत्ता आजवर लागू शकला नाही..!

7 October 2023
मनोरंजन

इंटरनेटपेक्षा कबुतराचा स्पीड जास्त आहे हे सिद्ध झालं होतं..!

27 September 2025
मनोरंजन

टीममेटने दिलेले डेअर पूर्ण करण्यासाठी या पठ्ठ्याने ऑलिम्पिकचा पहिलाच ध्वज चोरला होता..!

27 September 2025
मनोरंजन

अ*ण्वस्त्र बनवणाऱ्या शास्त्रज्ञाने जगातला पहिला व्हिडीओ गेम बनवला होता!

26 September 2025
Next Post

इलेक्ट्रिक कारची फॅशन शंभर वर्षे अगोदर एकदा येऊन गेलीये

'Keep calm..'चे पोस्टर्स मुळात एक सरकारी जाहिरात होती..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.