The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

या भावंडांच्या आयुष्यातील खऱ्या घटनेवरून स्पीलबर्गने ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ बनवलाय

by द पोस्टमन टीम
21 July 2025
in इतिहास, मनोरंजन
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


१९९८ साली प्रदर्शित झालेला आणि ५ अकॅडमी अवॉर्ड मिळवलेला स्टीवन स्पिलबर्गचा ‘सेव्हिंग प्रायव्हेट रायन’ हा चित्रपट तुमच्यापैकी बहुतेकांनी पाहिला असेल. यातील यु*द्धाची काही दृश्ये आतापर्यंत तयार झालेली सर्वात भयानक दृश्ये आहेत. या चित्रपटामध्ये टॉम हॅन्क्सनं कॅप्टन जॉन एच. मिलरची भूमिका केली आहे. दुसरं महायु*द्ध शेवटाकडे आल्यानंतर डी-डे ह*ल्ल्याच्या वेळी कॅप्टन मिलरनं जीआय प्लाटूनचं नेतृत्व केलं होतं. सव्वा लाख सैन्यासह ना*झींचा पराभव करून फ्रान्सला मुक्त करण्याचं त्यांचं प्रारंभिक अभियान होतं.

ओमाहा बीचमधून बाहेर पडल्यानंतर मिलर आपल्या प्लाटूनसह फ्रान्समध्ये प्रवेश करण्यात यशस्वी होतो. मात्र, त्यानंतर काही दिवसातचं कॅप्टन मिलरला माघारी घेण्याचा निरोप मिळतो. त्याच्या हाती दुसरीच एक मोहिम सोपण्यात येते.

जेम्स एफ. रेयान (मॅट डॅमोन) नावाच्या एका सैनिकाला जिथे असेल तिथून शोधून आणण्याचे आदेश मिलरला मिळतात. रेयानचे तीन भाऊ काही महिन्यांच्या अंतरानं यु*द्धात मारले गेलेले असतात. मिलर आणि त्याची प्लाटून प्रयत्नांची पराकाष्ठा करून रेयानला शोधून घरी पाठवण्यात यशस्वी होतात. 

मात्र, यासाठी प्लाटून आणि मिलर दोन्ही नष्ट होतात. चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेली ही थरारक गोष्ट फ्रिट्ज निलँड नावाचा सैनिक स्वत: जगला आहे. त्याच्या आणि त्याच्या भावंडांच्या आयुष्यावर हा चित्रपट तयार करण्यात आलेला आहे.

१ नोव्हेंबर १९४२ च्या सकाळी दक्षिण पॅसिफिकमधील ग्वाल्ड कनालच्या लढाईदरम्यान जपानी टॉर्पिडोनं अमेरिकन क्रूझर ‘यूएसएस जुनेऊ’ला जलसमाधी दिली. क्रूझरवर जॉर्ज, फ्रान्सिस, जोसेफ, मॅडिसन आणि अल्बर्ट सुलिव्हन ही पाच भावंड होती. पर्ल हार्बरमध्ये आपल्या एका मित्राचा मृत्यू झाल्यानंतर ते अमेरिकन नौदलात भरती झाले होते. पाचही जणांना एकाच जहाजात घ्यावे, अशी विनंती त्यांनी भरती होताना केली होती आणि नौदलानं ती मान्यही केली होती.



साधारणपणे अमेरिकन सैन्यात भावंडांना एकाच ठिकाणी तैनात केलं जात नाही. मात्र, नौदलानं दुसऱ्या महायु*द्ध काळात अनेक ठिकाणी भावंडांना एकत्र तैनात केलं होतं. यामुळे सैन्याचा आणि कुटुंबांचाही आत्मविश्वास वाढत असल्याचं निरीक्षण काही अधिकाऱ्यांनी केलं होतं. असं म्हणतात जेव्हा ‘जुनेऊ’ बुडवण्यात आली तेव्हा तिच्यावर भावंडांच्या ३० पेक्षा जास्त जोड्या तैनात होत्या.

या घटनेचा परिणाम म्हणूनचं ‘फ्रिट्ज निलँड’च्या शोधासाठी अमेरिकेनं १९४४मध्ये चक्क मोहिम विशेष मोहिम सुरू केली होती. पाच सुलिव्हन भावंडांच्या आणि क्रूझरवरील इतर भावंडांच्या मृत्यूनंतर अमेरिकेन नौदलावर मोठी टीका झाली. कारण या सैनिकांच्या मृत्यूमुळं कित्येक आई-वडीलांचा आधार गेला. त्यामुळं अमेरिकन यु*द्ध विभागानं एक नवीन धोरण तयार केलं.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

‘sole-survivor policy’ नावाचं हे धोरण होतं. जर एखाद्या कुटुंबातील शेवटचं अपत्य जिवंत राहिलं असेल तर, त्याला यु*द्धापासून वाचवण्यासाठी अमेरिकन सैन्य प्रयत्न करेल, अशी तरतूद यामध्ये होती.

सार्जंट फ्रिट्ज निलँड आणि त्याचे तीन भाऊ अमेरिकन सैन्यदलात सेवा देत होते. चौघांपैकी प्रिस्टन आणि रॉबर्ट निलँड हे दोघे, अमेरिका दुसऱ्या महायु*द्धात येण्यापूर्वीच सैन्यात दाखल झालेले होते. एडवर्ड आणि फ्रिट्ज नोव्हेंबर १९४२मध्ये स्वयंस्फूर्तीनं सैन्यात आले होते. यु*द्ध विभागाच्या ‘sole-survivor policy’ मुळं चौघा भावंडांना वेगवेगळ्या युनिट्समध्ये टाकण्यात आलं.

एडवर्डनं पायलट म्हणून पॅसिफिक महासागरावर सेवा दिली. रॉबर्टला ८२व्या एअरबॉर्न डिव्हिजनमध्ये टाकण्यात आलं. प्रिस्टनचा समावेश चौथ्या इन्फन्ट्रीमध्ये करण्यात आला होता. तर, फ्रिट्ज (फ्रेडरिक) १०१ एअरबॉर्न डिव्हिजनचा सदस्य होता. एडवर्ड वगळता इतर तिघे भाऊ इंग्लंडमध्ये पोहचले होते आणि ते शत्रू राष्ट्रावर आक्र*मण करण्याच्या तयारीत होते.

मायकल आणि ऑगस्टा निलँड यांना आपली चारही मुलं देशाची सेवा करत असल्याचा प्रचंड अभिमान होता. मात्र, नियतीनं त्यांच्यासमोर अचानक संकटांची मालिका उभी केली. मे १९४४ मध्ये एडवर्डचं विमान शत्रूने पाडलं असून तो बेपत्ता असल्याची बातमी आली. त्यानंतर ६ जून, १९४४ रोजी रॉबर्टचा डी-डेमध्ये मृत्यू झाला. त्याच्या दुसर्‍याच दिवशी ओमाहा बीचजवळ प्रिस्टननं देखील शेवटचा श्वास घेतला. नॉर्मंडीमध्ये पॅराशूट लँडिग करण्यात फ्रिट्जला यश आलं होतं मात्र, या प्रयत्नात तो त्याच्या युनिटपासून विभक्त झाला होता. एका महिन्याच्या काळातच निलँड दाम्पत्याची चारही मुलं त्यांच्यापासून दूरावली गेली.

जेव्हा अमेरिकन यु*द्ध विभागाला तीन निलँड भावंडांच्या मृत्यूबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यांनी फ्रिट्ज निलँडचा शोध घेण्याचा निर्धार केला. ५०१ रेजिमेंटचा अधिकारी फ्रान्सिस सॅम्पसन याच्यावर फ्रिट्झला शोधण्याची जबाबदारी टाकण्यात आली होती.

सॅम्पसन आणि त्याच्या रेजिमेंटनं आपल्या जीवाची बाजी लावून फ्रिट्ज निलँडचा शोध घेतला आणि त्याला सुखरूप घरी पाठवलं. त्यानंतर काही दिवसांनी बेपत्ता असलेला एडवर्ड देखील सापडला. उपचार करून त्याला त्याच्या कुटुंबाच्या हवाली करण्यात आलं.

दुसर्‍या महायु*द्धाच्या काळात ‘sole-survivor policy’ धोरणाची अंमलबजावणी झाली असल्यानं, पुढे ते आणखी विकसित करण्यात आलं. १९४८ मध्ये काँग्रेसनं या धोरणाचं कायद्यात रुपांतर केलं. या कायद्यानुसार जर कुटुंबातील एक किंवा त्यापेक्षा जास्त मुलं किंवा मुलींचा मृत्यू झाल्यास त्या कुटुंबातील इतर मुलांना सैन्य सेवेतून सूट देण्यात आली. १९६४ मध्ये या कायद्यात पुन्हा काही बदल करण्यात आले. जर एखाद्या कुटुंबातील वडील, मुलगा किंवा मुलीचा सैन्यात असताना मृत्यू झाला आणि त्याच कुटुंबातील जर आणखी एखादी व्यक्ती सैन्यात असेल तर तीला स्वेच्छानिवृत्ती घेण्याची परवानगी देण्यात आली.

फ्रिट्ज निलँडचा आधार घेऊन आणि सैन्यात असलेल्या व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कुटुंबियांची काय वाताहत होते, हा धागा पकडून स्टीवन स्पिलबर्गनं चित्रपटाची रूपरेषा तयार केली. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या काही घटना जरी ग्लोरिफाय करण्यात आल्या असल्या तरी त्यातून जगभरातील सैन्यदलांना मोठा संदेश नक्कीच मिळाला आहे.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

इजिप्तच्या या वाळवंटात व्हेलचे शेकडो सांगाडे सापडले आहेत

Next Post

१८व्या शतकातच टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून एका गुन्हेगाराला अटक केली होती

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
भटकंती

लोक मोबाईल बघतात म्हणून या आज्जींनी चहाची टपरी बंद करून पुस्तकांचं हॉटेल सुरु केलं

16 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
Next Post

१८व्या शतकातच टेलिकम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून एका गुन्हेगाराला अटक केली होती

नेपच्युनचा शोध निरीक्षणाने नाही तर गणितामुळे लागलाय..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.