The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

समुद्रावर द*हश*तीचे साम्राज्य उभारणारा समुद्री लुटेरा एडवर्ड ब्लॅकबियर्ड

by द पोस्टमन टीम
24 March 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


जॅक स्पॅरो हे पायरेट्स ऑफ दि कॅरेबियन चित्रपटातील पात्र बहुतांश लोकांना परिचयाचे आहे. प्रख्यात अभिनेता जॉनी डेपने रंगवलेल्या या समुद्री लुटेऱ्याच्या पात्राने अनेकांना वेड लावलंय. पण तुम्हाला माहिती आहे का, कॅप्टन जॅक स्पॅरोप्रमाणेच एक समुद्री लुटेरा खरोखर अस्तित्वात होता.

एडवर्ड ब्लॅकबियर्ड हे नाव तुम्ही कधी ऐकले देखील नसेल, पण समुद्री लुटेरा म्हणून तो एकेकाळी जगभरात कुप्रसिद्ध होता. त्याचे नाव ऐकून लोकांची घाबरगुंडी उडायची, त्याने एकट्याने समुद्रात एवढा तांडव केला होता की त्यानंतर कोणालाही तसं करणं शक्य झालं नाही. हा ब्लॅकबियर्ड नेमका कोण होता, हे जाणून घेऊ…

एडवर्ड ब्लॅकबियर्डचा जन्म युरोपात झाला. एखाद्या सामान्य मुलाप्रमाणे त्याचे संगोपन करण्यात आले. तो ज्या ठिकाणी जन्माला आला, त्याठिकाणी समुद्र हे एकमेव उत्पन्नाचे साधन होते. एडवर्डला लक्षात आले होते की समुद्रच त्याचे आयुष्य आहे. तो त्याचा बहुतांश वेळ समुद्राच्या लाटांवर व्यतित करत होता.

तेव्हा एडवर्डच्या नावाच्या पुढे ब्लॅकबियर्ड हे नाव वापरले जात नव्हते. त्याचे नाव एडवर्ड टीच असे होते. पुढे त्याने स्वतः त्या नावात बदल केला.

याच काळात इंग्लंड आणि फ्रान्सच्या दरम्यान यु*द्धाला सुरुवात झाली. यामुळे जहाजांच्या दळणवळणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याच काळात एडवर्ड स्वतः सक्रिय झाला. हे यु*द्ध समाप्त होईपर्यंत तो जगातील सर्वांत मोठा समुद्री लुटेरा बनण्यासाठी तयार होता. इंग्लंडने त्याला कॅप्टनपद बहाल केले. इतकेच नाही तर त्याला एक जहाज देखील बहाल केले होते. हे एडवर्डच्या पथ्यावर पडले.



१७१६ साली एडवर्ड त्याच्या पहिल्या मोहिमेसाठी रवाना झाला. आतापर्यंत सरकारी मदतीशिवाय त्याने कुठलेच काम केले नव्हते. पण आता स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्याच्यासमोर चालून आली होती. त्याला विश्वास होता की तो ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण करेल. आता तो खऱ्या अर्थाने खतरनाक लुटेरा बनला होता. तो त्याच्या हातात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींची लूट करत होता. सोने, चांदी आणि रेशमाचा यात प्रामुख्याने समावेश होता.

त्याचे नाव जरी घेतले तरी अनेकांची झोप उडायची. यानंतर त्याने फ्रेंच जहाज लुटले आणि तिथल्या आतं*कासाठी तो एक पर्याय बनला.

हे देखील वाचा

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

यात तो प्रामुख्याने सामानाची लूट करायचा. पण यावेळी त्याने एक संपूर्ण जहाज ताब्यात घेतले. मग त्याने या जहाजाचे रूपांतर एका यु*द्धनौकेत केले. यावर त्याने चाळीस तोफा ठेवल्या. ज्याच्या बळावर लांबून येणाऱ्या शत्रूचा तो क्षणात बिमोड करायचा.

ब्लॅकबियर्ड हा फक्त त्याच्या लुटीसाठी नाहीतर त्याने लुटीदरम्यान केलेल्या हिं*सेसाठी प्रसिद्ध झाला.

एडवर्डने आपल्या वेशभूषेत यानंतर बदल केला. त्याने दाढी वाढवली. ही दाढी त्याची एक ओळख बनली. लोक त्याला नरकातील सैतान म्हणू लागले. असं म्हणतात की एडवर्ड त्या दाढीच्या पाठी एक जाळ काढणारं रसायन ठेवत होता. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर उत्पन्न होत होता. ज्यावेळी एडवर्डच्या दाढीतून धूर बाहेर निघायचा त्यावेळी हा एखादा सैतान आहे की काय असे वाटायचे.

रात्रीच्या अंधारात त्याला बघितल्यावर भलेभले थरथर कापायचे. त्याने आपल्या जहाजावर एक कवटी बनवली होती. त्याच्या या लूकमुळे एडवर्ड फार चर्चेत आला होता.

१७१८ मध्ये त्याने अनेक लुटी केल्या. त्यामुळे त्याचा गुन्हेगारांमध्ये समावेश करण्यात आला. इंग्लंडचे सरकार त्याच्याविरोधात गेले. त्यांनी या लुटीपासून अंतर राखण्यास सुरुवात केली. एडवर्डने आपल्या जहाजाला रंगवले होते. त्याने त्या जहाजची संपूर्ण ओळख बदलून टाकली. त्याने लुटीचा सगळा माल सुरक्षित स्थळी नेला. पुढे आपले जहाज त्याने नॉर्थ कॅरोलिनाच्या तटावर सोडले. यानंतर तो सरळ गव्हर्नरजवळ गेला आणि राजाची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली.

गव्हर्नर आणि एडवर्ड यांनी यानंतर एकमेकांशी मैत्री केली. गव्हर्नरने एडवर्डला लपवण्यास होकार दिला. या मोबदल्यात गव्हर्नरला एडवर्डकडून चांगली रक्कम देण्यात आली. यानंतर हे साटेलोटे सुरुच होते. पण काही दिवसांनी एडवर्डने गव्हर्नरला पैसे देण्यास मनाई केली. यानंतर गव्हर्नर चिडला आणि त्याने एडवर्डला मारण्याची तयारी सुरु केली.

गव्हर्नरने एडवर्डला मारण्यासाठी काही लोकांना जहाज घेऊन पाठवले, एडवर्डला याची काहीच माहिती नव्हती. आपल्या काही साथीदारांसह तो जहाजावर होता. अचानक त्याच्यावर ह*ल्ला चढवण्यात आला. समोरासमोर यु*द्ध झाले. गोळीबार झाला, चाकूचे वार झाले. एडवर्डचे साथीदार यात मारले गेले. पण एडवर्डने हार मानली नव्हती. तो एकटाच लढत होता. तेव्हा अचानक एक गोळी त्याच्या छातीवर येऊन आदळली. एडवर्ड कोसळला. त्याच्या शत्रूंनी त्याच्यावर चाकूह*ल्ला केला. एडवर्ड रक्तबंबाळ झाला. शेवटच्या क्षणापर्यंत तो संघर्ष करत होता. अखेरीस त्याचा मृत्यू झाला.

हिं*सेच्या बळावर समुद्रावर राज्य करणाऱ्या एडवर्ड ब्लॅकबियर्डचा देखील तसाच मृत्यू झाला, जसा एखाद्या गुन्हेगाराचा व्हायला हवा.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved. 

ShareTweet
Previous Post

सिगारेट सुटत नाही, तर हे पाच सोपे घरगुती उपाय कराच

Next Post

Explainer – मनसुख हिरेन, सचिन वाझे, परमवीर सिंह. समजून घ्या संपूर्ण प्रकरण!

Related Posts

विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
Next Post

Explainer - मनसुख हिरेन, सचिन वाझे, परमवीर सिंह. समजून घ्या संपूर्ण प्रकरण!

जगातली पहिली अंतराळवीर एक रस्त्यावरची भटकी कुत्री होती

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.