The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ॲक्रोमॅगली रोग झाल्याने प्रसिद्धी मिळालेल्या या माणसावरून श्रेकचं कॅरेक्टर बनवलंय..!

by Heramb
16 November 2024
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


लहानपणी तुम्ही नक्कीच श्रेक नावाचे कार्टून पहिले असेल. हिरव्या रंगाचे अवाढव्य कॅरेक्टर जगातील बिनकामी नियमांचे उल्लंघन करून परीकथांवर विनोद करत असतं. सुरुवातीला श्रेक एक रागीट आणि एकाकी व्यक्तिरेखा दाखवली जाते, पण त्याची दुसरी बाजू देखील याच सिरीजमध्ये उघड होते. जसजशी सिरीज पुढे सरकते तसतसा श्रेकचा मृदू स्वभाव आणि विनोदबुद्धी अधिक स्पष्ट होत जाते.  विनोदी आणि व्यंग्यात्मक वक्तव्य त्याची ओळख बनतात.

एका खऱ्याखुऱ्या माणसापासून प्रेरणा घेऊन हे कॅरेक्टर तयार झाले आहे. फ्रेंच-रशियन कुस्तीपटू मॉरिस टिलेट असं त्या माणसाचं नाव. मॉरिसचे शरीर वैशिष्ट्यपूर्ण होते. त्याचे शरीर सामान्यांप्रमाणे नाही तर प्रचंड अवाढव्य होते. ॲक्रोमॅगली नावाच्या रोगामुळे त्याच्या शरीराची अनियंत्रित वाढ झाली होती. नेमका कोण होता हा मॉरिस आणि त्याच्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी हा लेख..

मॉरिस टिलेटचा जन्म १९०३ साली फ्रेंच आई-वडिलांच्या पोटी रशियामध्ये झाला. वयाच्या आठव्या वर्षीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्याच्या मोहक आणि निष्पाप चेहऱ्यामुळे त्याच्या आईने त्याला अँजेल असे टोपणनाव दिले होते. तो इतरांप्रमाणेच नॉर्मल आणि सुंदर तरुण मुलगा होता. १९१७ साली रशियामध्ये सुरु झालेल्या बोल्शेव्हिक क्रांतीमुळे मॉरिसच्या आईने आपल्या मुलासह फ्रान्समध्ये स्थलांतर केले. त्यानंतर त्याच्या शरीराची वाढ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायला सुरुवात झाली. ही वाढ मुळीच सामान्य नव्हती. त्याचे डोके, छाती, हात आणि पायांची प्रचंड प्रमाणात वाढ होत होती. वयाच्या विसाव्या वर्षीच त्याला अक्रोमॅगली नावाचा रोग असल्याचे निदान झाले.


मॉरिस टिलेट, वयाच्या तेराव्या वर्षी

पिट्यूटरी ग्रंथीवर (मेंदूच्या मागच्या पृष्ठभागाच्या मध्यात असलेली नलिकाविरहित ग्रंथी) ट्युमर तयार झाल्याने अशी परिस्थिती निर्माण होते. यामुळे पिट्यूटरी ग्रंथी वाढीचे अत्यधिक हॉर्मोन्स तयार करते. मॉरिसच्या ऐन तारुण्यात अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळेच त्याची उंची वाढण्याऐवजी हाडे अधिक जाड होऊ लागली. यामुळेच त्याचा चेहरा आणि शरीर देखील प्रचंड मोठे झाले.

या रोगामुळे त्याच्या आवाजावरही परिणाम झाला, म्हणून त्याने आपल्या कायद्याच्या पदवीचा अभ्यास देखील अर्ध्यात सोडून दिला. कालांतराने त्याने आपली अर्ध्यावर सोडलेली डिग्रीदेखील पूर्ण केली पण आपल्या विचित्र आवाज आणि स्वरूपामुळे आपण कधीही यशस्वी होणार नाही असे त्याला वाटले. त्यानंतर मॉरिस फ्रेंच नौदलात अभियंता बनला, त्यामध्ये मॉरिसला चीफ पेटी ऑफिसर हे पद बहाल करण्यात आले. तो प्रचंड बुद्धिमान होता. मॉरिसचे सुमारे १४ भाषांवर प्रभुत्व असल्याचे सांगितले जाते.

फ्रेंच नौदलामध्येच त्याने कुस्तीचे प्रशिक्षण घेतले. कुस्तीच्या या प्रशिक्षणानंतर त्याने युरोप आणि इंग्लंडमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपले नशीब आजमावले. फ्रेंच नेव्हीने दिलेले प्रशिक्षण आणि शारीरिक ताकद यांच्या जोरावर त्याने सर्व सामने जिंकले. यानंतर तो अमेरिकेत स्थायिक झाला. तिथे त्याला एक प्रोफेशनल कुस्तीपटू म्हणून कीर्ती मिळाली. आपल्या प्रतिस्पर्ध्यांना तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने हरवत असे. प्रतिस्पर्धी एकदा दमला की तो अस्वलाप्रमाणे त्याला कवटाळत असत. यालाच बेअर हग म्हणतात, ही त्याची सिग्नेचर स्टाईल होती.  

कुस्तीशिवाय तो वैज्ञानिक क्षेत्रातही प्रसिद्ध होता. त्याला निअँडरटल माणसाच्या सर्वांत जवळचा आणि आजवर जिवंत असलेला माणूस म्हणून मान्यता मिळाली. निअँडरटल्स ही एक विलुप्त प्रजाती किंवा पुरातन मानवांची उपप्रजाती आहे. ही सुमारे ४० हजार वर्षांपूर्वी युरेशियामध्ये राहत होती. मॉरिसची शारीरिक रचना देखील या निअँडरटल माणसाच्या शरीररचनेशी मिळतीजुळती होती. शिकागो येथील ‘फिल्ड म्यूजियम फॉर नॅचरल हिस्ट्री’ याठिकाणी निअँडरटल माणसाच्या काल्पनिक चित्रांबरोबर त्याचे फोटोदेखील काढण्यात आले. 

हे देखील वाचा

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

शिकागो येथील ‘फिल्ड म्यूजियम फॉर नॅचरल हिस्ट्री’ येथे काढण्यात आलेला फोटो

मॉरिस आपल्या प्रचंड शारीरिक क्षमतेमुळे ट्रेन, बस किंवा मोटार कार लीलया ओढत असे. यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जात असत. त्याच्या काळातील सर्व बलाढ्य आणि शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या पैलवानांबरोबर त्याने कुस्ती खेळली होती आणि तो जिंकलाही होता. याच अद्वितीय कारनाम्यांमुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक संरचनेमुळे त्याला अनेक फ्रेंच आणि हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. पण त्याला अनेकदा जगातील सर्वांत कुरूप माणूस म्हणूनही संबोधले गेले.

सन १९४६ पर्यंत तो अमेरिकेतील सर्वांत जास्त शुल्क घेणारा क्रीडापटू बनला होता. शारीरिक संरचनेमुळे तो कदाचित वरवर पाहता रागीट माणूस वाटेलही, पण तो एक सभ्य, सुशिक्षित आणि दयाळू माणूस होता. त्याला चेसची प्रचंड आवड होती. आपला मित्र पॅट्रिक केलीसोबत तो बराच वेळ चेस खेळण्यात घालवत असे.

आयुष्याच्या मध्यानंतर या रोगामुळे त्याला प्रचंड शारीरिक वेदना होत असत. त्याला अनेक वैद्यकीय समस्या देखील होत्या. १९५४ साली, वयाच्या ५१व्या वर्षी, न्यूमोनियामधून बरं होत असताना, हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आणि ही ज्वलंत कारकीर्द थाम्बली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन पुढे श्रेक नावाचे कॅरेक्टर तयार करण्यात आले.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

गाझावासीयांसाठी आयुष्याची ५० वर्षे दिली, पण ती मुस्लिम नव्हती, एवढीच तिची चूक..!

Next Post

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण ‘सूर्यकिरण’ एवढं खास का आहे..

Related Posts

विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
विश्लेषण

हवेत तरंगती मशाल ते सामन्यांचा सहभाग, यांसह पॅरिस ऑलिम्पिक्सची अनेक वैशिष्ट्ये आहेत

19 August 2024
विज्ञान तंत्रज्ञान

एक्सप्लेनर – मायक्रोसॉफ्टच्या पीसीवर सकाळपासून येणाऱ्या ‘ब्लू स्क्रीन ऑफ डेथ’मागील कारण

19 July 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
Next Post

वर्ल्डकपच्या अंतिम सोहळ्याचं प्रमुख आकर्षण 'सूर्यकिरण' एवढं खास का आहे..

मुंगीएवढ्या लहान किड्यांनी इथं आपलं वेगळं साम्राज्यच उभं केलंय

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

11 December 2024

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.