The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राणी मेरी अँटोइनेटने ऑर्डर दिलेलं घड्याळ तिच्या मृत्यूनंतर ३४ वर्षांनी तयार झालं होतं

by द पोस्टमन टीम
25 November 2024
in इतिहास
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब


१५ एप्रिल १९८३ रोजी असलेल्या शुक्रवारी शब्बाथ (प्रार्थना करण्याचा दिवस) सुरू झाल्यानंतर रस्ते रिकामे होते. वसंत ऋतू असल्यानं रात्रीच्या हवेमध्ये उबादारपणा आणि फुलांचा सुगंध दरवळत होता. असा वातावरणात एक लहान सिम्का १००० सेडान इस्रायलच्या अध्यक्षीय निवासस्थानाजवळील टोनी एन्क्लेव्हच्या वळणावळणाच्या रस्त्यावरून निघाली होती.

काही वेळात ती गाडी एका फिकट रंगाच्या तीन मजली इमारतीसमोर थांबली. इमारतीच्या समोरच्या खिडक्यांतून पांढरा प्रकाश चमकत होता. पहारेकरी झोपण्याच्या तयारी होते. त्या इमारतीमध्ये इस्लामिक कलाकृती संग्रहात ठेवण्यात आल्या होत्या. परंतु तेथील दुर्मिळ घड्याळं लोकांच्या आकर्षणाचं केंद्र होतं. त्याच ठिकाणी एका काचेच्या केसमध्ये जगातील सर्वांत महागडं घड्याळ विसावलेलं होतं. ही काचेची केस कोणत्याही सेफ्टी अलार्मशी कनेक्टेड नव्हती.

त्या इमारतीच्या बाहेर थांबलेल्या सेडानमधील व्यक्तीनं आजूबाजूला कोणी नसल्याची खात्री केली आणि कारच्या डीकीतून एक हायड्रॉलिक जॅक काढला. पुढच्या काही मिनिटात तो जॅक, दोरीची शिडी, स्क्रू ड्रायव्हर आणि हुक वापरून त्या माणसाने त्यावेळचा जगातील सर्वांत मौल्यवान घडाळ्यांचा संग्रह लंपास केला.

एका इंटरनॅशनल ज्वेल थीफनं हा सर्व कारनामा केला होता. शेरलॉक होम्सच्या कथेतील घटनाक्रमाप्रमाणं वाटणारी ही घटना ज्या इमारतीमध्ये घडली होती, ती इमारत म्हणजे इस्लामिक आर्टसाठी प्रसिद्ध असलेलं एल.ए. मेयर संग्रहालय होतं. त्या ठिकाणावरून १९८३च्या एप्रिल महिन्यातील शुक्रवारी जगातील सर्वांत प्रसिद्ध घड्याळ असलेलं ‘राणी मेरी अँटोइनेट’चं घड्याळ चोरी गेलं होतं. ही राणी कोण होती आणि तिचं घड्याळ इतकं प्रसिद्ध का होत? या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेणारा हा लेख..

हातामध्ये कधीही घड्याळनिर्मितीचं साहित्य न घेता घड्याळनिर्मितीच्या इतिहासात सर्वांत प्रसिद्ध झालेली व्यक्ती म्हणजे राणी मेरी अँटोइनेट. ऑस्ट्रियाची आर्चडचेस आणि फ्रान्सची राणी असलेल्या मेरीचं वैयक्तिक आणि राजकीय आयुष्य वादळी होतं. मात्र, आयुष्यातील सर्व गोंधळांचा सामना करत असताना तिनं कायम आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी जपल्या.



तिला घड्याळांची आवड होती. ब्रिगेट पॉकेट वॉच नंबर १६० या इतिहासातील सर्वात गुंतागुंतीच्या घड्याळानं राणीला आणि घड्याळ तयार करणाऱ्या व्यक्तीला दोघांना प्रसिद्धी मिळवून दिली. या घडाळ्याची गोष्ट १७८३ पासून सुरू होते. लष्करी वेशातील एका व्यक्तीनं अब्राहम लुईस ब्रिगेटच्या, ५१, क्वे डे लाहोरलॉग पॅरिसमधील कार्यालयाला भेट दिली.

रक्षकाच्या वेशातील ती व्यक्ती स्वीडिश लष्करी अधिकारी ‘काउंट हॅन्स एक्सेल वॉन फेर्सन’ असल्याचं म्हटलं जातं. काहींच्या मते, तो मेरी अँटोइनेटचा प्रियकर होता. तो राणीचा प्रियकर होता की नाही? या गोष्टीचे कोणतेही निश्चित ऐतिहासिक पुरावे नाहीत.

घड्याळ निर्मितीमध्ये पारंगत असलेल्या ब्रिगेटनं १७६२ साली आपला मूळ देश स्वित्झर्लंड सोडला आणि फ्रान्समधील सीन नदीच्या काठावर त्याची घड्याळनिर्मिती कार्यशाळा स्थापन केली होती. फ्रेंच दरबाराशी जवळचा संबंध असलेल्या जोसेफ-फ्राँकोइस मेरी नावाच्या धनाढ्य व्यक्तीनं ब्रिगेटला आश्रय देऊन मदत केली होती. जोसेफनं राजघराण्यातील अनेक लोकांशी ब्रिगेटची ओळख करून दिली होती.

हे देखील वाचा

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

नेपल्सची राणी, कॅरोलिन मुरातनं ब्रिगेटकडून ३४ विविध प्रकारची घड्याळ विकत घेतली होती. त्यात ब्रिगेटनं तयार केलेल्या पहिल्या मनगटी घड्याळाचाही समावेश आहे. ब्रिगेटची किर्ती दूरवर पसरलेली होती. स्वीडिश लष्करी अधिकाऱ्यानं ब्रिगेटला भेट दिल्यानंतर त्याला त्याच्या आयुष्यातील सर्वात गुंतागुंतीचं आणि प्रसिद्ध काम मिळालं.

ब्रिगेटला फ्रान्सची राणी मेरी अँटोइनेटसाठी एक घड्याळ तयार करण्याची ऑर्डर मिळाली होती. ब्रिगेटला राणीसाठी, त्यावेळी ज्ञात असलेल्या हॉरोलॉजिकल तंत्रज्ञानाचा वापर केलेलं गुंतागुंतीचं पॉकेट घड्याळ तयार कराव लागणार होतं. घड्याळ तयार करण्याची ऑर्डर मिळाल्यानंतर ब्रिगेटनं आपलं काम सुरू केलं. एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की, ब्रिगेटला या घड्याळाचं मानधन आणि ते कधीपर्यंत पूर्ण करायचं आहे, हे सांगण्यात आलं नव्हतं. तरी देखील त्यानं काम सुरू केलं होतं.

दरम्यानच्या काळात फ्रेंच दरबारात गोंधळ उडाला. १७९२ मध्ये, फ्रेंच राजेशाहीचं अधिकृतपणे पतन झाल्याचं घोषित करण्यात आलं. राजा सोळावा लुईला मृत्यूदंड देण्याची घोषणा करण्यात आली. पुढील वर्षी फ्रेंच राज्यक्रांतीच्या पहिल्या टप्प्यात राजाला फाशी देण्यात आली. त्यानंतर राणी मेरी अँटोइनेटला १७९२ मध्ये तुरुंगात डांबण्यात आलं आणि १७९२ मध्ये तिला देखील फाशी देण्यात आली.

राणीच्या मृत्यूमुळं तिला ते घड्याळ कधीच वापरता येणार नव्हतं. तरी देखील ब्रिगेटनं घड्याळ्याचं काम सुरू ठेवलं. कारण त्याला दोन गोष्टींची शाश्वती होती. एक म्हणजे, या मास्टरपीसमुळं त्याला इतिहासामध्ये मानाचं स्थान मिळणार होतं आणि दुसरं म्हणजे या घड्याळासाठी त्याला दुसरा एखादा ग्राहक नक्की मिळेल. १८२७ मध्ये हे राणी मेरी अँटोइनेटचं घड्याळ पूर्ण झालं. तो पर्यंत राणीचा मृत्यू होऊन ३४ वर्षे झाली होती आणि घड्याळाची ऑर्डर मिळून ४४ वर्षे!

अब्राहम लुईस ब्रिगेटनं बनवलेल्या घडाळ्याची किंमत ३० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ६० मिलीमीटर रुंदी असलेल्या या पॉकेट वॉचमध्ये एक प्रीपेच्युअल कॅलेंडर, जंपिंग अवर हँड आणि ८२३ भाग आहेत. १८ कॅरेट सोन्याचा आणि नीलमचा वापर केलेलं हे घड्याळ कलात्मकता, क्लिष्टता आणि सौंदर्याचा त्याकाळातील सर्वोत्तम नमुना होतं. हे अजूनही जगातील पाचवे सर्वात क्लिष्ट घड्याळ मानलं जातं.

या घड्याळाचं रहस्य मेरी अँटोइनेटच्या किंवा ब्रिगेटच्या मृत्यूनंतर संपलं नाही. जवळपास दोन शतकांपासून या घड्याळानं अनेक घड्याळ निर्माते आणि संग्राहकांना आकर्षित केलं आहे. १८३८ पर्यंत हे घड्याळ एका धनाढ्य फ्रेंच व्यक्तीकडे होतं. त्यानं ते दुरूस्तीसाठी टाकलं आणि त्याला ते परत मिळवता आलं नाही. म्हणून ब्रिगेटची पत्नी मॅडम ब्रिगेट यांनी ते ताब्यात घेतलं.

१८८७ पर्यंत हे घड्याळ ब्रिगेट घराण्याकडेच होतं. १८८७ मध्ये त्यांनी ते एका इंग्रजी कलेक्टरला विकलं. १९००मध्ये डेव्हिड सॅलोमन्स नावाच्या एका घड्याळ संग्राहकानं त्याची मालकी मिळवली. सॅलोमन्सची मुलगी व्हेरानं आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर (१९७४) त्यांच्याकडील घड्याळं जेरुसलेममधील ला मेयर म्युझियम ऑफ इस्लामिक आर्टमध्ये दिली. पुढे १९८३मध्ये याच ठिकाणावरून मेरी अँटोइनेटच्या घडाळ्यांसह १०६ घडाळ्यांची चोरी झाली.

पोलिसांना कित्येक वर्ष या चोरीचा तपास केला मात्र, त्यांना चोराला पकडण्यात यश आलं नाही. २३ वर्षानंतर कुख्यात चोर नामान डिलरनं ही चोरी केल्याचं उघड झालं. युनायटेड स्टेट्स, युरोप आणि इस्रायलमधील विविध सेफमध्ये त्यानं ती घड्याळं लपवून ठेवली होती. डिलरच्या मृत्यूनंतर त्याच्या विधवेनं २००४ मध्ये चोरीची घड्याळे विकण्याचा प्रयत्न केला.

मात्र, तिला पकडण्यात आलं. २००७ पर्यंत चोरीला गेलेल्या सर्व १०६ घडाळ्यांपैकी फक्त ३९ घड्याळं परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं. यामध्ये राणी मेरी अँटोइनेटच्या घडाळ्याचा देखील समावेश आहे. ही घड्याळं जेरुसलेममधील संग्रहालयाला देण्यात आली. या दुर्मिळ आणि प्रसिद्ध घड्याळाची ऑर्डर खरंच राणीच्या प्रियकरानं दिली होती का? राणीला आणि घड्याळ निर्मिती करणाऱ्या ब्रिगेटला याबाबत कल्पना होती का? असे काही प्रश्न आजही अनुत्तरीचं आहेत.


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

आपला ‘बंधुभाव’ जगासमोर व्यक्त करण्यासाठी दोन समाजवादी नेत्यांनी एकमेकांना किस केलं होतं

Next Post

डचांनी जायफळासाठी चक्क ‘न्यू यॉर्क’च्या मालकीवर पाणी सोडलं होतं..!

Related Posts

इतिहास

अवघ्या पंचविशीतल्या या मेजरच्या बलिदानामुळे आज काश्मीर भारतात आहे!

11 December 2024
इतिहास

या शेठने सही केलेल्या कागदालाही सोन्याचा भाव होता..!

17 July 2024
इतिहास

महाराष्ट्रात शेकडो आषाढी वारी पालखी सोहळे आहेत, त्यापैकी हे काही वैशिष्ट्यपूर्ण सोहळे

5 July 2025
इतिहास

आज एका क्लिक वर आपण कॉल रेकॉर्ड करतो, त्याचा शोध एडिसनने लावलाय

28 May 2024
इतिहास

या त्रिकुटाने ६०० हून अधिक लहान मुलं वाचवली, पण त्यांना कधीच योग्य तो सन्मान मिळाला नाही

30 April 2025
इतिहास

या ‘जाणत्या राजा’मुळे आपल्याला अस्सल, समकालीन शिवचरित्र वाचायला मिळाले

25 April 2025
Next Post

डचांनी जायफळासाठी चक्क 'न्यू यॉर्क'च्या मालकीवर पाणी सोडलं होतं..!

इतिहासाच्या पानांत हरवलेली एक प्रभावशाली राणी म्हणजे 'नेफर्टिटी'..!

Please login to join discussion

Browse by Category

  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

सावधान- अंगावर टॅटू काढण्याआधी हा विचार केलाय का?

23 January 2026

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.