The Postman
No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास
No Result
View All Result
The Postman
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“भाकरी नसेल तर केक खा” असं क्वीन मेरी कधीच बोलली नव्हती..!

by द पोस्टमन टीम
28 June 2025
in विश्लेषण
Reading Time: 1 min read
0
ADVERTISEMENT

आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब


फ़्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासातलं “ब्रेड नाही तर केक खा” हे कुप्रसिध्द असं वाक्य उच्चारणारी साम्राज्ञी म्हणजेच मेरी एंटोनेट. गंमत म्हणजे जगभरात फ़्रेंच राज्यक्रांतीशी जोडलेलं हे वाक्य तिनं कधी म्हटलंच नव्हतं. या वाक्याचं पूर्ण श्रेय जातं, राजकीय विचारवंत आणि तत्वज्ञ जीन जेक्वस रुसो याला. हा शब्दप्रयोग शोधण्याचा श्रेय त्याला जातं तसेच ते जिच्या संदर्भात वापरलं ती राणी मेरी नव्हती नव्हती तर मारिया थेरेस होती.

फ़्रेंच राज्यक्रांती आणि साम्राज्ञी मेरी यांचं नातं अतूट आहे. आजवरच्या इतिहासांच्या धड्यात आपण हेच चित्र रंगविलेलं पाहिलं आहे. कोण कोणास म्हणाले? या एक गुण असणार्‍या प्रश्नात, “भाकरी नाही तर केक खा” हे कोणी म्हटलं याचं उत्तरही फ़्रेंच सम्राज्ञी मेरी असं लिहून पूर्ण एक मार्क पटकावला आहे. मात्र गंमत अशी की वास्तवात हे वाक्य तिनं कधीच उच्चारलं नाहीये. किंबहुना हे तिनं उच्चारलेलं वाक्य नसून या वाक्याचा जनक आहे एक पुरूष.

जीन जेक्वस रुसो या राजकीय विचारवंत आणि तत्वज्ञानं या वाक्याची निर्मिती केलेली असून याचा उल्लेख त्याच्या “कन्फ़ेशन” या आत्मचरित्रात आढळतो. हे वाक्य त्यानं जेंव्हा लिहिलं तेंव्हा मेरी एंटोनेट ही अवघी दहा वर्षांची ऑस्ट्रीयात राहणारी एक छोटी मुलगी होती आणि अद्याप फ़्रेंच सम्राज्ञी बनायची होती. लुई सोळावा याच्याशी लग्न झाल्यावर चार वर्षांनी ती फ़्रान्सला आली. लुईशी लग्न करण्यापूर्वी मेरी ऑस्ट्रियात राहत असे आणि ऑस्ट्रिया-फ़्रान्स हे परस्परांचे कट्टर शत्रू मानले जात असत. या शत्रुत्वाला पुर्ण विराम देण्यासाठी हा विवाह झाला खरा पण त्यानं फ़ारसा फ़रक पडला नाही.

सुरवातीच्या कालखंडात फ़्रेन्च जनतेला या ऑस्ट्रीयन महाराणीनं तिच्या सौंदर्यानं भुरळ पाडली होती. मात्र नंतर नंतर सामान्य जनता आणि राजघराणं यांच्यातली दरी जशी वाढत गेली तसं ही राणी जनतेच्या रागाचं लक्ष्य बनू लागली. तिची प्रतिमा खलनायकी बनविली गेली.

तिच्यावर अनेक आरोप केले गेले. चारित्र्यहनन करण्यात आलं आणि यात तिच्या मुलाचं नावही जोडण्यात आलं. फ़्रेंच दिवाळखोरीत जळत असताना तिच्या उधळपट्टीवर ताशेरे ओढले गेले. तिचं टोपण नाव “मॅडम दिवाळखोर” (मादाम डेफ़िसिट) ठेवलं गेलं. इतकंच नव्हे तर फ़्रान्समधला पैसा तिनं तिच्या भावाकडे, जोसेफ़ दुसरा याच्याकडे, वळवल्याचा तिच्यावर आरोप होता. वास्तवात तिच्यावर झालेल्या कोणत्याही आरोपाची सत्यता पुराव्यासहित कधीच समोर आली नाही. ज्या उधळपट्टीसाठी ती बदनाम झाली त्याचा विचार केला तर त्या काळातील इतर फ़्रेंच राजघराणी ज्या प्रमाणात उधळपट्टी करत होती त्या तुलनेत तिचा खर्च काहीच नव्हता म्हणायची वेळ येईल.



राणीनं गरजूंना मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली असं सांगणार्‍यांचाही मोठा गट आहे. पैशाची मदत करताना तिचा हात सैल असल्याचंही सांगितलं जातं. या सगळ्याचा विचार करता, “लेट देम इट अ केक” हे तिनं म्हणणं तिच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत वाटतं.

तिच्या काळातल्या इतर राण्यांप्रमाणे तिच्या हातात सत्तेची पॉवर नव्हती. इतकंच नाही तर तिनं पतीला काही सल्ला दिलाच तर ती ऑस्ट्रियन वंशाची असल्यानं तो ग्राह्य धरलाच जात नसे. त्याकाळात फ़्रेन्च मुलांना ऑस्ट्रियन द्वेषाचं बाळकडू पाजत लहानाचं मोठं केलं जात असे आणि राजा लुईस सोळावाही याला अपवाद नव्हता. त्यामुळे पत्नी असली तरीही मेरीबाबत त्याच्या मनात एक पुर्वग्रह कायम राहिला.

हे देखील वाचा

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

टोकाचं नैराश्य आल्यानंतर लुईस सोळावा राज्याच्या गादीवरून पाय उतार झाला आणि त्यानंतरच मेरीच्या हाती सत्तासूत्रं आली. सत्ता हातात आल्यानंतर तिनं राजघराणं आणि राजदरबारी यांच्या सलोख्याचे संबंध पुर्नप्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले.

फ़्रेंच क्रांतीकारक एव्हाना आक्रमक बनले होतेच. त्यांनी राजघराण्यावर शरसंधान साधण्याची एकही संधी सोडली नाही. एकीकडे ऑस्ट्रियाची उत्तम आर्थिक स्थिती आणि फ़्रान्सची ढासळती परिस्थिती यात मेरी लक्ष्य बनू लागली.

ऑस्ट्रियाची उत्तम स्थिती आणि फ़्रान्सच्या कमकुवत आर्थिक स्थितीसाठी तिलाच जबाबदार धरलं जाऊन तिच्यावर फ़्रान्समधला पैसा ऑस्ट्रियात वळवत असल्याच्या बातम्या पसरू लागल्या.

हे सगळं घडत असतानाच फ़्रेन्च राजघराण्यात तिचे शत्रु वाढत होते कारण फ़्रान्सची गंगाजळी आटत चालली होती आणि अनेकांच्या बेबंध खर्चाला पैसा पुरा पडेनासा झाला होता. एकीकडे राजघराणी आणि दुसरीकडे फ़्रेंच क्रांतीकारक यांच्या तावडीत सापडलेली मेरी सॉफ़्ट टार्गेट बनल्याचं अनेकांचं मत आहे. फ़्रेंच क्रांतीकारकांचा श्रीमंत राजघराणी आणि गरीबीत पिचलेली सामान्य जनता यांच्यातला फ़रक दाखवणारा ब्रेड आणि केक शब्दप्रयोग होता. क्रांतीनंतरही तो अनेकदा वापरला गेला.

मेरीचा एकूण जीवनप्रवास एक मोठी शोकांतिका मानली जाते. फ़्रेंच क्रांतीदरम्यान तिला कारावासात टाकलं होतं आणि नंतरही सुटका झाल्यावर तिनं कधीच राजकारणात रुची दाखवली नाही. त्याऐवजी तिनं स्वत:ला समाजकार्यात झोकून दिलं.

लुईचा वध झाल्यानंतर मेरीची तब्येत खालावत चालली. तिनं अन्नत्याग केला होता. त्यातच तिला ट्युबरकोलायसिसची व्याधी होती. याचा परिणाम म्हणून तिला नंतर कर्करोगानं ग्रासलं. तिच्या मुलाला तिच्यापासून दूर करण्यात आलं आणि राज्यक्रांतीचा भाग म्हणून एका चर्मकाराकडे व्यवसाय प्रशिक्षण घेण्यासाठी सोपविण्यात आलं. या मुलाचाही कारावासातच मृत्यू झाला.

मेरीला तिच्यावरच्या आरोपांचा बचाव करण्याची संधी दिली आणि त्याचा प्रतिवाद करण्याच्या तयारीसाठी तब्बल एक दिवस दिला गेला. सुरवातीला तिनं तिच्यावरच्या आरोपांना प्रत्युत्तर देणं टाळलं. मात्र तिच्यावर प्रचंड दबाव आणल्यानंतर मात्र तिचा बांध कोसळला. आजपर्यंत तिनं राखलेला संयम ढासळून तिनं पोटतिडकीनं तिच्यावर तिच्याच पोटच्या मुलासोबत ठेवलेल्या संबंधांना खोडून काढलं मात्र तिचं म्हणणं काहीही असलं तरीही तिची शिक्षा आधीच ठरलेली होती. डोक्याचे केस भादरुन तिची संपूर्ण पॅरिसमधून धींड काढण्यात आली. मृत्यूनंतरही तिचा मृतदेह अज्ञात जागी कोणत्याही उल्लेखाविना पुरण्यात आला.

एका राणीचा असा अंत व्हावा याहून दुसरे दुर्दैव कुठले नसेल!


आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.

ShareTweet
Previous Post

दुसऱ्या महायु*द्धात पराक्रम गाजवून व्हिक्टोरिया क्रॉसचे मानकरी ठरलेले ‘नामदेव जाधव’..!

Next Post

या दोन मुलांनी एलियन्सनी त्यांचं अपहरण केल्याचा दावा केला होता, नार्को टेस्टही दिली..!

Related Posts

ब्लॉग

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026
विश्लेषण

पोलीस स्टेशन असताना ‘चौकी’ कशासाठी? जाणून घ्या कायदेशीर फरक आणि तुमचे हक्क!

29 May 2026
विश्लेषण

Explainer – अमेरिकेची व्हेनेझुएला कारवाई ड्र*ग्स विरोधात की कच्या तेलासाठी

23 January 2026
विश्लेषण

आज आपण फास्ट इंटरनेट वापरतोय ते INS Khukri च्या या पराभवामुळे

3 March 2025
विश्लेषण

ओशोंनी जेवढी व्याख्याने दिली आहेत. ती संपूर्ण ऐकून संपवायला कितीतरी वर्षं जातील

10 December 2025
आरोग्य

या तव्यांचे मटेरियल थेट यु*द्धभूमीवरून आपल्या किचन्समध्ये आले आहे..!

18 August 2025
Next Post

या दोन मुलांनी एलियन्सनी त्यांचं अपहरण केल्याचा दावा केला होता, नार्को टेस्टही दिली..!

या सेनापतीने मौर्य साम्राज्य संपवून वैदिक धर्माचं पुनरुज्जीवन केलं होतं..!

Please login to join discussion

Browse by Category

  • Acdsee
  • Ccleaner
  • Fortnite
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रीडा
  • गुंतवणूक
  • ब्लॉग
  • भटकंती
  • मनोरंजन
  • राजकीय
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • शेती
  • संपादकीय

Recent News

४९८-अ च्या खोट्या गुन्ह्यातून सुटकेसाठी राम गोपाल वर्मा यांच्या मित्राला ‘भाईं’ची मदत!

1 July 2026

मोफत अँटीव्हायरस वापरताय? सावधान, कंपन्या तुमच्याकडूनच कमावतायत भरमसाठ पैसे!

19 June 2026

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

No Result
View All Result
  • विश्लेषण
  • वैचारिक
  • मनोरंजन
  • शेती
  • संपादकीय
  • भटकंती
  • क्रीडा
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • इतिहास

© 2023 The Postman (Property of Straight Angles Media Solutions Pvt. Ltd.)

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.